आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
17 May 2024 - 4:41 am

“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे,

“मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं.

जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो.

जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.

तुमच्यावर कोणीही, कितीही शिंतोडे फेकले,तरी, तुम्ही जर ती एक मजेदार घटना म्हणून त्याकडे पाहिलंत, तर तुम्हाला बेचैन झाल्यासारखं वाटणार नाही.
मजा करण्याचा प्रयत्न केल्यास जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट मजेदार दिसेल.
माझा विश्वास आहे की, आपलं जीवन आपण चांगल्या उद्देशाने जगण्यात सार्थकी लावत असतो.

मी पून्हा म्हणेन,आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही.”
मला असं वाटतं तुम्हाला ही तसंच वाटत असावं.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

17 May 2024 - 5:46 pm | चौथा कोनाडा

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात

एक बालसुलभ लघूशंका : आनंदी न राहता मजा कशी काय करतात बुवा ?

प्रसाद गोडबोले's picture

17 May 2024 - 10:59 pm | प्रसाद गोडबोले

जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.

>>>

आजोबा, तुम्हाला ना लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याच्या मनात असले बाष्कळ विचार येत नाहीत.
असो. आता वाचुन तुम्हाला उपयोगही नाही म्हणा कारण वाढत्या वया सोबत ठाम झालेल्या धारणा नंतर बदलता येणे अशक्य असते.

पण तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने मी गट क्रमांक १ मधील सर्वांना सुचवु इच्छितो की - गीतारहस्य हे एक मस्टरीड पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं की तुम्हाला फ्रेडरिक नीचा, शोपेनहौर , एक्झिंस्टंशॅलिझम, सिनिसिझम , हेडॉनिझम, वगैरे वर ठेच न लागता सरळ सुलभपणे "हिंदु जीवन तत्वज्ञान" कळुन येते. आणि जीवनाचा उद्देश काय आहे वगैरे तत्सम प्रश्न एकदम सहज सुलभ होऊन जातात !

इत्यलम .

बरेच वर्षांपूर्वी रस्त्यात फुकट वाटत होते म्हणून 'हिज डिव्हाईन ग्रेस - ए.सी. भक्तिवेदान्ता स्वामी प्रभुपादा' यांंचे भगवद्गीता - AS IT IS' घरी घेऊन आलो. ते AS IT IS वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे असे मुद्दाम लिहीले आहे, त्याअर्थी काहीतरी गोची असणार. मग त्यातली 'निष्काम कर्म' ची व्याख्या वाचली, ते अशी : 'प्रमाणित' गुरुने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. हे वाचून कपाळावर हात मारून पुस्तक ठेऊन दिले आणि नंतर रद्दीत दिले. ('प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? )
बाकी त्या ध्रुवराठी प्रमाणेच या भक्तिवेदान्तांचे पुष्कळ शिक्षित चेलेचपाटे असतात.
-- यावरून आणखी एक आठवले, अनेक वर्षांपूर्वी माझा पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे मासिक 'परामर्श' यात 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' हा लेख प्रकाशित झाला होता, त्यावर काही पुणेकरांची मला शिव्या घालणारी खास पत्रेही मिळाली होती. असो. टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे. (बारीक टाईप आणि कमजोर नजर यामुळे) तरी मागवून ठेवतो.

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2024 - 3:46 pm | प्रसाद गोडबोले

भगवद्गीता - AS IT IS

हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.

टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे.

घेऊन टाका , १००-२०० रुपायात मिळते इथे. पण आधीच संवैधानिक सुचना म्हणुन - पुस्तक प्रचंड अवघड आहे कळायला. त्यांन्नी अगदी बेसिक सिनिसिझम , हेडॉनिझम पासुन खंडनमंडन करत कर्मासाठी कर्म , अर्थात निष्काम कर्मयोग पर्यंत विवरण केलेले आहे. पुर्वपीठीका नसेल तर हे पुस्तक समजणे जवळपास अशक्यप्राय आहे.
काही लोकं म्हणतात की - टिळकांनी श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या चित्तस्य शुध्दये कर्मः न तु वस्तुपलब्धये | ह्याचे खंडन करण्या करिता पुस्तक लिहिले. मला मात्र ते काही फारसे पटले नाही. टिळक फक्त इतकेच म्हणत आहेत की निष्काम कर्मयोगी हा जीवनमुक्तच असतो , त्याला संन्यास घेणे वगैरे सव्यापसव्य करत बसायची गरज नाही.

असो.
बाकी कीही असेल पण हे पुस्तक वाचल्यावर मी केलेले एक विधान स्मरते -

"लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ, होमरुल , केसरी , मराठा , सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही केले नसते तरी केवळ हे पुस्तक लिहिल्यामुळे ते अजरामर झाले असते इतके अफाट , भव्य , लोकोत्तर आहे हे पुस्तक."

__/\__

रामचंद्र's picture

21 May 2024 - 7:32 am | रामचंद्र

https://weeklysadhana.in/view_article/vinay-hardikar-on-tilak-and-geeta-...
--- टिळक आणि गीतारहस्य यावर विनय हर्डीकर

Bhakti's picture

21 May 2024 - 11:53 am | Bhakti

+१११

हो , असं बर्याच ठिकाणी,छुपा प्रचार आहेच इस्कॉनचा..

प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? )

पण अनेकदा उपनिषद,मला वाटतं वेदांतांचाही संदर्भ चांगला दिलाय,तेव्हा वाचनीयही आहे.

Bhakti's picture

18 May 2024 - 8:24 pm | Bhakti

*वेदांचा संदर्भ

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

19 May 2024 - 1:11 am | हणमंतअण्णा शंकर...

इस्कॉनचा कोणत्याही कोर्सची सुरुवात या वाक्याने करतातः

स्वामी प्रभुपाद हाच एकमेव बोनाफाईड गुरु आहे ज्याच्या कडून गीता शिकावी.

लोल. 'निष्काम' कर्म माय अ‍ॅस.

चौथा कोनाडा's picture

23 May 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा

इस्कॉन आणि इस्कॉन मंदिराचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो... की या मंदिरांमध्ये गेलं की झगमगाटी शो-रूम मध्ये गेल्या सारखं वाटतं आणि तिथेले प्रचारक हे सेल्स एक्सेक्युटीव्ह वाटतात ... माझ्या सारख्या निरिच्छ पामर माणसाला असलं मार्केटींग काय भुरळ घालणार ?

चित्रगुप्त's picture

23 May 2024 - 10:21 pm | चित्रगुप्त

बरेच वर्षांपूर्वी एका 'इश्श्य -कोण?' मंदिरात कुटुंबियांसोबत गेलो होतो. खाद्यपदार्थ उत्तम होते आणि मृदुंगाच्या तालवर चालणारी भजनेही उत्तम. मात्र दर्शनासाठी रांग होती, त्यात उभे राहून प्रत्यक्ष मूर्तीच्या आधी दोन टेबले मांडून दोन-तीनजण बसले होते, आणि पैसे घेऊन पावत्या देत होते. दर्शनासाठी तिकीट आहे असे समजून सगळे तिथे पैसे देत होते. मी म्हणालो की देवाच्या दर्शनासाठी कसले पैसे ? मी देणार नाही. मूर्तीनंतर लगेचच बाहेर जाण्याचे मोठे द्वार होते, पण मधे लोखंडी साखळी लावलेली होती आणि तिथे उभा असलेला शेंडीवाला आणखी पुढे जायला सांगत होता. पुढे मोठा बाजार असून त्यात खूपसे कसले कसले स्टॉल होते. मला काहीही घ्यायचे नाही, मला आता बाहेर जायचे आहे, वगैरे नाना पाटेकर थाटात भांडून साखळी ओलांडून बाहेर निघालो. घरची मंडळी उगाच कशाला भांडता वगैरे मला म्हणून त्या बाजारातून लांबचा फेरा घालून बाहेर पडली.
-- असो. मी आपणहून कधी कोणत्याही मंदिरात दर्शनाला वगैरे जात नसलो(अपवाद - वास्तुकला, मूर्तीकला, प्रांगणातले भव्य वृक्ष, चित्रकला, प्राचीन ऐतिहासिक इमारती वगैरे बघण्यासाठी जाणे) तरी भारतात आणि जगभर नवनवीन भव्य वैभवशाली मंदिरे बांधली जाणे ही काळाची गरज आहे, असे मात्र मला निश्चित वाटते. खर्च चालवण्यासाठी तिकीट वगैरे लावणे गरजेचे असेल तर तेही करावे. (सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या, वर लिहीलेल्या प्रसंगी मी पैसे दिले नव्हते पण आता देईनही )
अनेक मंदिरे, गुरुद्वारे वगैरेंमधे उत्तम जेवण विनामूल्य दिले जात असते (अलिकडेच अमदावादला कृष्ण मंदिरात असे उत्तम जेवण मिळाले होते)

चौथा कोनाडा's picture

24 May 2024 - 5:23 pm | चौथा कोनाडा

इस्कॉन - 'इश्श्य -कोण?'

Smilutyfb
हा .... हा .... हा .... !

अगदी असे अनुभव येतात !

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2024 - 11:19 pm | हणमंतअण्णा शंकर...

देणारी सर्व मंदिरे मला आवडतात. त्यामुळे मी इस्कॉन मध्ये आवर्जून जाऊन खाऊन येतो.
इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण बनवणारे इस्कॉनवाले आवडतात.
इस्कॉनसारखी मंदिरे वाढोत आणि मला उत्तम जेवण मिळो.

चौथा कोनाडा's picture

26 May 2024 - 5:47 pm | चौथा कोनाडा

इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण...

सेम पिंच !

मी "झगमगाटी शो-रूम" आणि "सेल्स एक्सेक्युटीव्ह" असे शब्द वापरले अस्ले तरी त्यांच्या श्रद्धेचा / झोकुन देऊन सेवा करण्याच्या वृत्तीचा वेगळ्या अर्थाने यांचा आणि अश्या सगळ्याच सेवाभावी लोकांविषयी आदर वाटतो.

पूर्णवाद तत्वज्ञानाचा आधार घेत प्रा. वि. पु. आपटे यांनी तीन खंडात (अधिभौतिक, अधिदैविक, अध्यात्मिक वर्गीकरण करून) लिहीलेले भगवद्गीता भाष्य अवश्य वाचण्यासारखे आहे. त्यात आजच्या युगधर्माशी सुसंगती राखण्याचा प्रयत्न केलेला असल्याने, तसेच ज्ञान, भक्ती/ उपासना किंवा कर्म अशा एकाच बाबीवर अवास्तव भर न दिल्याने ते एकांगी वाटत नाही.

नठ्यारा's picture

18 May 2024 - 11:31 pm | नठ्यारा

चित्रगुप्त,

'प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ???

प्रमाणित गुरूने सांगितलेले काम करणे ही निष्काम कर्माची केवळ पहिली पायरी आहे. यातून पुढे साधकाने स्वतंत्र होणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्यावरनं आठवलं की ( माझ्या मते ) एखादा मनुष्य स्वयंप्रमाणित असू शकतो. मात्र खूपदा अशा माणसास स्वत:स गुरू म्हणवून घेण्यात अजिबात रस नसतो.

-नाठाळ नठ्या

नठ्यारा's picture

18 May 2024 - 11:33 pm | नठ्यारा

प्रसाद गोडबोले,


भगवद्गीता - AS IT IS
हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.

संदर्भग्रंथ म्हणून बरं आहे. अन्वयार्थ आयता लावून मिळतो.

-नाठाळ नठ्या

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2024 - 12:20 am | प्रसाद गोडबोले

नाही.

इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती.

तुम्हाला अन्वयार्थ हवा असल्यास तुम्ही गीता प्रेस गोरखपुर ची पुस्तके पाहु शकता.
सोप्प्या भाषेत आणि रसाळ विवेचन हवे असल्यास ज्ञानेश्वरी पहा.
तत्वज्ञानाच्या लेव्हल वरुन सगळे समजुन घ्यायचे असल्यास गीतारहस्य पहा.

पण इस्कॉन नकोच.

तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे , इस्कॉन म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे. अहो इतर दुसरे कोणाचे सोडा, ते त्यांच्या मंत्रात ही "हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||" असे न म्हणता आधी कृष्ण म्हणतात अन नंतर राम. का तर म्हणे कृष्ण पुर्णावतार आहे आणि राम अंशावतार आहे =)))) हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा. असल्यांपासुन दुरच राहिलेले उत्तम !

https://www.misalpav.com/node/42634

नठ्यारा's picture

19 May 2024 - 2:01 am | नठ्यारा

पसंत अपनी अपनी.
-ना.न.

१९६७ साली पंधरा पैश्यात घेतलेली विनोबांची 'गीताई' अजूनही माझ्याकडे आहे. अधून मधून वाचतो.

विनोबांची सर्वसाधारण माहिती आपल्यालापैकी बहुतेकांना असतेच. ही थोडी अजून सविस्तर:
https://www.mkgandhi.org/vinoba/vinoba-apostle-of-peace.html
इतकं कष्टाचं (स्वेच्छेने) आयुष्य काढून पंचाहत्तरीनंतर विनोबा हळूहळू स्वतःतच मिटून गेले असं वाटतं. याउलट गांधीजींचा शेवटपर्यंत (वय ७८) सार्वजनिक जीवनातला किंवा हाती घेतलेल्या अफाट स्वरूपाच्या कामातला आपला उत्साह किंवा कर्तव्यबुद्धी टिकून होती असं दिसतं. हा फरक का असू शकेल?

विनोबा म्हणजे विनाब भावे ना? कला चष्मा आणि लांब पांढरी री दाढी वाले + शेळीचे दूध कि काय ते
या वरून आठवले "फन फ्याकट" म्हणतात कि काय ते

गांधीजींचे ( हो मी अजूनही त्यांना "जी नेच संबोधतो )
सुरवातीचे राजकीय गुरु = गोखले
पट्ट शिष्य = भावे
राजकारणातील विरोधी विचारांचे = सावरकर
त्यांना जीवे मारणारे ( वध कि खून हा वाद नको म्हणून मारणारे म्हणले आहे ) = गोडसे

च्या मारी हात धून मागे लागलेले दिसत आहेत .. ह्या ह्या ह्या
(खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

चौकस२१२'s picture

22 May 2024 - 7:12 am | चौकस२१२

हायला ह्या गु गल मराठी ने वैताग आणलाय
खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी
ऐवजी
स रळ सरळ काही जण जातीयवादी लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नोंदवत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

Bhakti's picture

19 May 2024 - 8:19 am | Bhakti

हे राम!

म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे.

बरोबर हं.तुम्ही परत्म्याचे अंश आहात ,जसा अर्जुन ईश्वराचा अंश आहे पण तो कृष्ण नाही/त्याच्यासारखा होऊ शकत नाही...अशी वाक्ये सतत आहेत.
तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे

जर आधी माहिती असतं तर अशाच रविवारच्या सकाळी २६५ रुपयांना दारावर विकत घेतली नसती ;)
उलटपक्षी गीता, ज्ञानेश्वरी, रामायण अशा ग्रंथाचे बाळकडू कधीच न मिळाल्याने मी आता हे वाचतेय हेच इतरांना जरी कौतुक वाटतं तरी माझ्यात इतकी वर्षे वाया गेल्याचा अपराधी भाव उरतो..असो आता गीता प्रेस गोरखपुर मिळवणं आले.

गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके चांगली आहेत पण त्यांनी प्रकाशित केलेला भगवद्गीतेचा मराठी अनुवाद साधारण दर्जाचा आहे.

अच्छा..मग कोणती गीता घेऊ मी?

तुम्हाला विवेचनासहित हवीय की सरळ भावार्थ?

या इस्कॉनच्या गीतेत संस्कृत श्लोक मग प्रत्येक शब्दाचा अर्थ मग श्लोकाचा अर्थ मग भावार्थ .अशीच श्लोक , शब्दार्थ,अर्थ, भावार्थ रचना असणारी गीता पाहिजे.

प्रचेतस's picture

19 May 2024 - 9:30 pm | प्रचेतस

तशी रचना इतरत्र मिळणे अवघड. मात्र गीतेवरील शांकरभाष्य उपलब्ध आहे. अर्काइव्हवर हिंदी अनुवाद मिळेल. मराठीत गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांनी केलेला सुगम मराठी अनुवाद उत्कृष्ट आहे, अगदी पॉकेट साईझ पुस्तक आहे.

Bhakti's picture

20 May 2024 - 6:51 am | Bhakti

_/\_

चौकस२१२'s picture

19 May 2024 - 2:00 pm | चौकस२१२

इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती.
अगदी अगदी तो एक एककल्ली पंथ आहे इस्कॉन मंदिरात जाऊन हे भोलेनाथ किंवा हर हर महादेव म्हणा डोळे वटारतील !
एवढेच काय स्वामी नारायण वाले भले हिंदू म्हणू देत स्वतःला पण तो हि एक एककल्ली पंथ आहे
अरब एमिरातीतील नावे मंदिर हे "हिंदू मंदिर" कि स्वामीनी नारायणपंथाचे मंदिर हा प्रश्न
काय ते प्रमुख महाराज काय त्यांचे स्वतःच्या विमानातून येणे ..साधेपणा नाहीच

हिंदू धर्माची अशी १००० शकले करून स्वतःचा "सवता सुभा" निर्माण करणे ,
दुर्गा भक्त शंकराच्या मंदिरात जाणार नाहीत , शंकराचे भक्त कृष्णाच्या मंदिरात जाणार नाहीत हिंदू स्वतःचा स्वतःला असे विभागून घेतात दुर्दैव आपले

चौकस२१२'s picture

22 May 2024 - 7:32 am | चौकस२१२

हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा.
दुर्दैव
एकदा इस्कॉन च्या मंदिरात शिवपूर्णिमेला एक मित्राने प्रसाद उपवासाचे आहे का विचारले, तर तेथील माळ धारी म्हणाला का? तर हा म्हणाला " आज भोलेनाथ यांचा दिवस आहे " , तर इस्कॉन वाला हम्हणाला मारे लिये कृष्ण हि सब है
उत्तरेतील एका इस्कॉन देवळात एक व्यक्ती त्या दिवशी रामाचे भजन म्हणू लागली तर तिथलला एक "जपधारी" हिस्टेरिकल झाला
सिध्दिवंयनायकला केशरी रिक्षेतून येऊन आपली पुसतक विकणारे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

आणि फक्त इस्कॉन नाही तर सगळे "हिंदू वेष" असलेले गुरु आणि बाबा आणि ताई महाराज हेच करता विशेषतः स्वामी नारायण
पहिल्यांदा त्या मंदिरातील मूर्ती बघितली फेटा घातलेली मला वाटले कि कृष्णाला गुजराथी लोक स्वामी नारायण म्हणत असतील तर तसे नाही स्वामी नारायण एक माणूस होउन गेला ...
बरं त्यांचे मंदिरात पुरुष / स्त्र्यांनी वेगळेच बसले पाहिजे ( च वर आमचा आक्षेप ) स्त्रियांनी पूजा जवळ जाऊन करयाची नाही.. काय वाटेल ते पुरोगामी हिंदू संस्कृतीत जे बदल झालेत ते ह्यानं मेनी नाहीत ... नुसतं भगवा वापरून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे (ते हि हि हरकत नाही, व्हॅटिकन नाही का करत पण निदान ते स्वतःला पूर्ण ख्रिस्ती म्हणवततात तरी ) तुम्ही कोणाही स्वामी नारायण वाल्याला विचारा कि "काय रे तू सर्वसाधारण हिंदू आहेस का?"
ते लेकाचे हम स्वामी नारायण वाले है " असे म्हणतात किंवा प्रश्न टाळतात असा माझा अनुभव आहे

इतर देवळात जात नाहीत
खरे तर हिंदूला कोणतयाही देवळात जायला कसली आहे निर्बंध ...
धर्मात स्वतःचा सवता सुभा निर्माण करायाचा आणि मूळ धर्माला कमकुवत करायच! काय हे पण शेवटी पैसे आणि सत्ता

असो हॅविंग सेंड थत इतर अब्राहमीक धर्मातील लोकांनी हि जागा काबीज करण्यपेक्सह स्वामी नारायण तर स्वामी नारायण इस्कॉन तर इस्कॉन
खुलासा हि चर्चा हिंदू धर्मातील अंअंतर्गत आह ए तेव्हा ज्यांचे हिंदू स=धर्माशी काही देणे घेणे नाही किंवा ज्यांना यात मनुवाद वैगरे दिसतो त्यांनी सहभागही होऊ नये .. !

रामचंद्र's picture

22 May 2024 - 8:05 am | रामचंद्र

सध्या मिपावर चालू असलेल्या नर्मदे हर यांच्या लेखमालेत गुजरातमधील परिक्रमा मार्गाजवळ असलेल्या स्वामिनारायण पंथचलित संस्था आणि तिथे आलेले अनुभव यांचे वर्णन आहे. महाराष्ट्रातील भक्तिमार्गातील साधेपणापेक्षा अगदी वेगळा प्रकार तिथं दिसतो.

कर्नलतपस्वी's picture

22 May 2024 - 8:52 am | कर्नलतपस्वी

काहीही असो,बाकी स्वामीजींच्या मंदिरातील जेवण लई भारी आणी खुपच स्वस्त. आम्हीं गेलो होतो.

रामनारायण, रामनारायण,लक्ष्मीनारायण फारसा काही फरक नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2024 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदी माणुसच अधिक मौजमजा करु शकतो, तेव्हा अधिक आनंदी राहा आणि मौजमजा करा.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2024 - 11:08 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार सर. कशे आहात ?

निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

आता निकाल लागला की भेटू एकदा जून मध्ये.

पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा ठरवायचा आहे. कारण मोदी तर निवडून येणार, मग लिबरल लोकांनी आनंदी कसं राहायचं , मौजमजा कशी करायची ;)
पुढील शहीनबाग, एल्गार मोर्चा , आरक्षण आंदोलन, शेतकरी आंदोलन ह्यावर सविस्तर चर्चा करू आत्ताच .

=))))

चौकस२१२'s picture

19 May 2024 - 7:06 pm | चौकस२१२

आणि हो सरांनी घटनेचि एक तरी प्रत जपून ठेवावि कारण काही "उदार मतवादी मंडळींचच्या ? मते ३ऱ्यांदा जर भाजप आणि ते हि मोदींसारख्य बुचर ऑफ गुजराथ च्या नेतृत्वखाली निवडून आले ( थँक्स टू एव्हिल ए वि मशीन ) तर घटना नामशेष होणार हुकुमशाही पक्की होणार , मूसलमान आणि इतर सर्व अल्पसंख्यांकाना ठेवणयासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बांधले जाणार ( कंत्राट अडाणी आणि अंबानी यांना मिळणार अर्थात ) इत्यादी इत्यादी ,,,,,,,,

चौकस२१२'s picture

20 May 2024 - 5:40 am | चौकस२१२

शेतकरी आंदोलन ना ते तर फारच सत्य वादि होत हो .. प्रत्यक्ष मिया खलिफा नि सांगतले ना मग आपल्याला विश्वास ठेवलाच पाहिजे ... ( काय न्यान वाटत असतात त्या तृप्त होतं ते ऐकून बघून ! ( मन हो )
-शेतकरी फक्त पंजाबात असतात याचा शोध लागला
- सगळ्या शेतकऱ्यांना पंजाबी / गुरुमुखी वाचता येत मग तो कर्नाटकातील असो कि बिहार मढील ( कारण असे कि इकडे १०,००० कि मी दूर वर शेताकरी बचावो हे सगळं गुरुमुखींतून लिहिलेले ! ( जणू ऑस्ट्रेलियातील जॅक आणि जील ला गुरुमुखी वाचता येते )
- धर्मांध अश्या हिंदू लोकांचा दिवाळी नावाचा कार्यक्रम झाला तर तिथे "निषेधाचे" फलक घेऊन फक्त शीख दिसले , इत्यादी

ए भाऊ इथे मी काही सर्वशिख धर्मी बद्दल बोलत नाहीये उघडपणे भारत विरोधी कारराव्या करणारे काही खलिस्तानी
कानडा मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा उभा केला होता इथे तर मादी भाजप चा संबंध नाही ना ?
https://www.youtube.com/watch?v=xT9q24r2r_s
पाठिम्बा दिसतोय अश्या लोकांना वाह रे वाह देशभक्त ( भारतात राहणारे)
पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये

अमरेंद्र बाहुबली's picture

20 May 2024 - 8:51 am | अमरेंद्र बाहुबली

भारत विरोधी कारवाया करणारे भरपूर आहेत, डी आर डी ओ चा संचालक संघाचा कुरुळकरही पाकिस्तान माहिती देत होता. असो. तुम्हाला सांगून काय फायदा?

पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये नको. गुरुद्वारा इथे पण आहेत.

प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s

अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना )

, नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा
https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8
https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg
https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs
https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0

म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते?

प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s

अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना )

, नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा
https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8
https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg
https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs
https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0

म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते?

अमरेंद्र बाहुबली's picture

20 May 2024 - 6:38 pm | अमरेंद्र बाहुबली

भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? झेंड्याचा अपमान करणारे नी पाकिस्तानला माहिती देणारे देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुरुळकर हे दोघे सारखेच आहेत. पण गळे फक्त एका विरूद्धच का काढतात? संघाविरुद्ध का काढत नाही??

चौकस२१२'s picture

21 May 2024 - 11:05 am | चौकस२१२

गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत
पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय मी शीख समाजातील खूप अशी लोकसंख्या आहे कि ज्यांनीं ठरवून जगभर भारतविरुद्ध कारवाया केल्यात , यात अख्या शीख धर्माला दोष देत नाहीये हिंदू आणि शीख हे एकाच आहेत य मताचा आहे मी
शेतकरी आंदोलनाचे धार्मिक आंदोलनात रूपांतर का केले गेले? लाल किल्यावर शीख धर्म ध्वज का चढविला गेला? , नुसत्या भारतीय दूतावसवर निदर्शने करणे वेगळे आणि हिंदू मंदिरनवर हल्ला करणे वेगळे ..

अमरेंद्र बाहुबली's picture

21 May 2024 - 4:32 pm | अमरेंद्र बाहुबली

गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत
पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय
संघाचा असल्याने मोदी सरकारच्या काळात सरकारच हया देशद्रोह्याला वाचवेल. आणी हा एकाच व्यक्ती नाही. खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता. अगदी १५ ऑगस्ट नी २६ जानेवारीला सुध्दा. मग तिरंग्याचा अपमान नाही का? संघही तसंच आहे. देढबाहेरील खलिस्तानी जसे तसेच हे आतले संघवाले.

मुक्त विहारि's picture

21 May 2024 - 7:55 pm | मुक्त विहारि

संघही तसंच आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, कधी धर्मा आधारीत किंवा भाषे आधारीत, वेगळ्या देशाची मागणी केली आहे?

------

खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता.

कुठे त्या भुजबळांच्या आचरट प्रतिसादांना उत्तर देताय?

संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती.

यातील कोणतीही माहिती नसताना भुजबळ द्वेषापोटी केवळ बाष्कळ आणि आचरट विधाने करत आहेत

त्यांना प्रतिसाद देण्यात कशाला वेळ घालवतेय

खरे साहेब तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे. फक्त अशांना हे सांगा..

गच्छ शूकरः लोकं वदतु यत् सिंहः त्वां न युध्यत्।
ते जानन्ति कः मलं खादति कः मृगया कर्तुं साहसं करोति

अमरेंद्र बाहुबली's picture

22 May 2024 - 10:39 pm | अमरेंद्र बाहुबली

संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती.

संघाने १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कधीही साजरे केले नाहीत. किंबहुना हे दु:खद दिन म्हणून उल्लेख करतात. (संदर्भ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघास खुले पत्र- एड. खा. बाळासाहेब आंबेडकर आणि त्या पत्राला खुले उत्तर मा.गो.वैद्य, प्रकाशक – ब.श.दाते, भारतीय विचार साधना, पुणे. डिसेंबर, १९९३)

https://www.altnews.in/nationalists-fraudulently-quote-flag-code-excuse-...

मजकुरात स्पष्टपणे असे म्हटले आहे की प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय सप्ताह, स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधींच्या जयंती या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जाऊ शकतो. 15-06-1971 च्या गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या पत्रातही हेच नमूद करण्यात आले आहे .
Both these documents confirm that that flag code that was in place prior to 2002 placed no restrictions on private citizens to hoist the national flag on at least three days of the year. Despite being permitted to hoist the national flag on January 26th, August 15th and October 2nd , RSS chose not to do so for 52 years. This is an embarrassing fact for RSS supporters and therefore it is not surprising that they try to justify this by claiming that it was the Flag Code which prevented the RSS from hoisting the national flag, a claim which is not true.

सुबोध खरे's picture

23 May 2024 - 9:55 am | सुबोध खरे

private citizens

भुजबळ बुवा

खाजगी नागरिक आणि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना यातील मूलभूत फरक पाचवीतील मुलास सुद्धा समजतो.

यामुळेच २००२ पूर्वी सामान्य नागरिकास तिरंगा फडकावण्यास मनाई नव्हती.

एवढे मूलभूत ज्ञान नसताना आपण डोंगर पोखरुन झुरळ बाहेर काढलंत.

म्हणूनच मी सांगतो कि तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.

खरे तर डॉक्टर खरे यांचा सल्ला मानून मी तुमचच्या सारखात्यांशी वाद घालण्यात / प्रतिसाद देण्यात काही अर्थ नाही तरी माझी खाज म्हणून लिहितो
तुमच्या "थेअरी" प्रमाणे भारतातील सर्व सरकारी संस्था भाजप वापरते ईडी असो कि इलेक्शन कमिशन असो कि कोर्ट .. होई ना मग तसे जर असेल तर हि कुरुलकरांची "भानगड" बाहेर आलीच कशी आणि त्यावर सरकारीका रवायी झालीच कशी सुरु?
ज्या माणसाला संघ आणि खलिस्तानी एकाच वाटतात त्याच्याशी काय बोलायायचे !
लगे रहो मुन्नाभाई

सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही..

साल २०१५ :

मी माझे पारपत्र (पासपोर्ट) बदल करण्यास गेलो. मला सांगण्यात आले की आपण देशातून एक ना हरकत प्रमाण पत्र घेऊन या.. झाला माझा प्रवास सुरु.. बाबांना सांगितलं.. त्यांनी लगेच हालचाल करून विदा दाखल केला. परंतु २०१६ आले काहीच झाले नाही.. मग मला कोणीतरी एक दुआ पाठविला की इथे तक्रार करून बघ..

घरात वादळ वाट सुरु.. काय होईल कसा होईल ? मनात एक विश्वास ठेऊन मी विदा दिला आणि ४ दिवसामध्ये मला सर्व कागदपत्र घरपोच मिळाले..

कोण होतो मी ? अडाणी ? अंबानी ? कि अमरेंद्र बाहुबली म्हणतात तसे कोणी ? I WAS NO BODY . आणि तरी देखील मला जे हवे ते मिळाले..

कट २

मोदीजी VANCOUVER ला आले होते.. मी पामर त्या गर्दीत एक छोटासा पुष्पगुच्छ घेऊन उभा.. संधी मिळाली.. मी पुढे झालो आणि त्यांना नमस्कार केला.. त्यांनी स्वीकारला आणि माझी चौकशी केली. मी घडलेला वृत्तांत वाचला... ते म्हणाले.. अरे हो.. तुझा मुलगा कुठे आहे ? आणि त्यांनी चक्क माझ्या मुलाचा नाव घेतले.. आणि मला प्रश्न केला.. बाळा का तुला असे वाटले कि आपला देश सोडून जावा ? माझ्याकडून काही कमी राहीले असेल तर सांग, आपण काय करू या ?

कोणता पंतप्रधान हे करेल ? राहुल गांधी ? ज्याला किलो आणि लिटर मधला फरक नाही कळत ? कि खुजलीवाल ? कि आपले अमरेंद्र बाहुबली ?

मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही..

मी खूप दिवस ही चर्चा वाचनमात्र राहिलो पण आज राहवले नाही म्हणून व्यत झालो..

कोणी दुखावला असेल तर मला माफ करा.. पण आज मोदींना पर्याय नाही..

मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही..
चपखल लिहलंय म्हणूनच नाही तर त्या मागची तळमळ दिसली आणि माझयाहि डोळ्यात पाणी आलं खरं सांगतो ..

अरे भारतात राहो किंवा नाही भारतासाठी चांगले विचार आणून सुद्धा या भाऊबली आणि प्रोफेसर सारखी मंडळी अतियश निर्बुद्ध आणि खालच्या पातळी वरून जाऊन लिहितात .. वाईट वाटत अरे कारण मदीं आणि भाजप ला विरोध कोण नाही म्हणतो पाडा त्यांना, कोणी अडवलाय पण काय वाटेल ते म्हणे खलिस्तान आणि संघ एकाच, म्हणे लोकशाही संपली

नतद्रष्ट पणा हा एवधाचा पशब्द समोर येतो

बन्या बापु's picture

22 May 2024 - 7:49 am | बन्या बापु

मनापासून लिहिला आहे आणि अजिबात असत्या नाही.. जे मागितले तसे.. आता विश्वास ठेवा गर नको.. माझा देव साक्षी आहे

चौकस२१२'s picture

20 May 2024 - 8:28 am | चौकस२१२

प्रोएफसार आणि अमरेंद्र भाऊबलींसारखाय देशभक्तनसाठी खास
https://www.youtube.com/watch?v=8VsxoRc-eWQ

चौथा कोनाडा's picture

20 May 2024 - 10:19 pm | चौथा कोनाडा

लैच डेंजर चौकसदोनशेबारा भाऊ !

मुक्त विहारि's picture

21 May 2024 - 10:46 am | मुक्त विहारि

लिंक बद्दल धन्यवाद....

आजची सही...

मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, काही
व्यक्ती, वैयक्तिक पातळीवर उतरतात... अशा लोकांना फाट्यावर मारावे...

विवेकपटाईत's picture

21 May 2024 - 11:24 am | विवेकपटाईत

मी अनेक गीता वाचल्या आहे. जर गीता समजायची असेल तर स्वामी रामदेव यांची वाचा. सुरवातीला गीता वर भाष्य करणार्‍या जवळपास सर्व विचारवंतांची अर्थात शंकराचार्य , रमानुजाचार्य, मध्वाचार्य, महर्षि अरविंद... ..ते टिळक मते दिली आहे. ( नंतर विषयानुसार गीतेच्या श्लौकांचे वर्गीकरण आहे. प्रत्येक अध्याय आणि श्लौकाचा विषय काय हे ही आधी दिले आहे. नंतर प्रत्येक श्लौकाचा अर्थ दिला आहे. स्वत:चे विचार त्यात नाही. भाषा एकदम सौपी आहे. अनेक ठिकाणी विचारवंतांचे references आहेत. बहुतेक विश्वविद्यालयात गीता अध्ययन करणार्‍यांसाठी आहे. बाकी आज पर्यन्त वाचलेली श्रेष्ठ पुस्तकांपैकी एक आहे.

बन्या बापु's picture

22 May 2024 - 7:45 am | बन्या बापु

तुम्ही हसतात आहात ? चला माझा दिवस सार्थकी लागला कि एका तरी माणसाला मी हसू दिले.. पण

ह्या असल्या भुजबळांना गर्भशास्त्रापासून भू शास्त्रापर्यंत भाषा कळते.. त्यांना माणसाचे काम नाही दिसत ? इटली मध्ये गेलेला राहुल बाळ चालतोय पण आमचा नरेंद्र गेले १० वर्ष खटतोय ह्याची लाज वाटते !

हे असले भूगर्भशास्त्री काय कामाचे ? लाज नाही वाटत ह्यांना..ह्यांची अब्रू जेव्हा लुटते तेव्हा हे पार्टी देतात आणि भर सभेमध्ये ज्याने प्राण लावून इज्जत वाचवली त्याला कानफडात लावून विचारतात .. की पूछ मैने ये थप्पड कौ मारा ? अरे मारा तो मारा और जस्टिफिकेशन भी ?

'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
.
मी हे फार वर्षांपूर्वी वाचले होते.