माझं challenge (आव्हान)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 May 2024 - 1:40 am

आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते
हा माझा लेख वाचत असताना
किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही
“ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही
किंवा
मला हुंदका आला नाही”
असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

तिमा's picture

4 May 2024 - 6:49 am | तिमा

लेख वाचत असताना आईची जरुर आठवण झाली. तिचे वाचन अफाट होतं. तिला जर हा लेख वाचायला दिला असता तर म्हणाली असती, " स्क्रोल करुन करुन बोटं दुखली रे ! स्क्रोल करुनही लेख संपतच नाहीये.

या आव्हानामागे हेतु काय आहे हे स्पष्ट करावे ही विनंती.
तसेच समजा तसे कुणी लिहिले, तर पुढे काय ? तेही लिहावे.
(एवढा मोठा मजकूर वाचणे हेच मुळात एक आव्हान आहे)

श्रीकृष्ण सामंत's picture

4 May 2024 - 8:58 am | श्रीकृष्ण सामंत

चित्र, विचित्र प्रतिक्रिया वाचून "आई "
ह्या विषयावर असे ही विचार असूं शकतात
हे पहाण्याची "खुमखुमी" दुसरं काय?
आईची महती वाचण्यासाठी आव्हान पेलणं "मजबुरी" हो सक्ती है?

श्रीकृष्ण सामंत's picture

4 May 2024 - 8:36 am | श्रीकृष्ण सामंत

आईची महती ३ प्रदक्षणेत पुरी होते
किंवा पृथ्वी प्रदक्षणा ही पुरी होत नाही

श्रीकृष्ण सामंत's picture

4 May 2024 - 8:39 am | श्रीकृष्ण सामंत

आईची महती तीन प्रदक्षिणेत सुद्धा पुरी होते किंवा पृथ्वी प्रदक्षणा करू नये होत नाही

प्रसाद गोडबोले's picture

4 May 2024 - 10:01 am | प्रसाद गोडबोले

लल्ललल्लू

लेख थोडाफार वर वर चाळला. अगदीच बालबुद्धी लेख आहे. बाल बुद्धी म्हणजे कसे की लहान बाळाला आईवर निरागस प्रेम असते तसे तितक्या प्रेमाने लिहिलेलं लेख . सगळं obvious आहे हो. त्यावर काय प्रतिक्रिया लिहिणार ?

तुम्ही काही तरी झणझणीत लिहा तर बोलू :))))

मेव्हणी/गर्लफ्रेंड/ अंगवस्त्रा तुझी आठवण येते.
पाहिली बाईक/कार तुझी आठवण येते.
व्हिस्की / सिंगल माल्ट तुझी आठवण येते.
गोवा तुझी आठवण येते.

Vagaire vagaire
;)

अहिरावण's picture

4 May 2024 - 12:30 pm | अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
===============================

अरेरे !! आपल्या आईच्या आठवणीने मनुष्य अस्वस्थ होऊ शकतो, भावनावेगाने डोळ्यात पाणी येऊ शकते. काही जणांना काही वाटू शकत नाही. ज्यांची आई जिवंत असेल त्यांना कदाचित ते गांभीर्य जाणवणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एखादे वाक्य, लेख, परिच्छेद, कादंबरी, कविता वाचून भिन्न भिन्न विचार येऊ शकतात. आणि यावेत.

मात्र, अमुकच एक प्रतिक्रिया यायलाच हवी असा अट्टाहास अनाकलनीय आहे. विशेषतः सदर लेखकाच्या वयाचा, अनुभवाचा विचार करता कितीतरी नाती शांतपणे संपतांना त्यांनी पाहीलीच असतील. तरी आवेगावर नियंत्रण येत नसेल तर वय वाढून उपयोग नसतो असेच खेदाने म्हणावे लागेल.

जाता जाता आमचा आवडता लेखक काम्यु म्हणतो प्रत्येक माणसाला त्याची प्रिय व्यक्ती मरावी असे एकदा तरी आयुष्यात वाटतेच.

पुलेशु / पुआशु

अर्थात आई शब्द म्हटला तरी, सकारात्मकच वाटतं.हे काय आव्हानं ? उगाच :)
लेख वाचला ,मला तर इतकी आईची आठवण आली की तिचा डीपी मी ठेवणार होते, प्रतिक्रिया देणार होते.पण आठवलं आई हा कम्फर्ट झोन सोडायचा प्रयत्न करतेय...

उग्रसेन's picture

4 May 2024 - 2:19 pm | उग्रसेन

आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

अमर विश्वास's picture

5 May 2024 - 11:33 am | अमर विश्वास

आ डॉट ई डॉट तु डॉट झी डॉट ...

असले टायटल वाचत असतानाच डोळ्यापुढे अंधेरी आली ... मन भरून आले ...
पुन्हा अंधेरी येऊ नये म्हणून पार्ल्यात सेटल व्हायचे ठरवले ... पण पुणे आणि पार्ले एकच असे कळल्यामुळे पुण्यातच स्थायिक झालो ...

कांदा लिंबू's picture

5 May 2024 - 2:54 pm | कांदा लिंबू

- टवाळखोर मोड ऑन -

बाई हवी म्हणोऽनी
सोडी न जीव हेका
प्रेम स्वरूप बाऽई...

- टवाळखोर मोड ऑफ -