आवेग हृदयाचा की मनाचा असावा
मी श्री समर्थांना म्हणालो,
“कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात .
तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात.
खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही.
किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो. एक प्रकारे, तो अधिक प्रौढ विचाराचा असतो असं म्हटलं तरी चालेल.
आणि कदाचित अधिक समजूतदारपणे,सावध राहून जीवन जगण्याचा त्याचा मनसुबा असतो, असही म्हटलं तरी चालेल.”
पूढे मी त्यांना म्हणालो,
“मी विचार करायला लागलो की, ह्या दोघा विचारसरणी मध्ये कोणती विचारसरणी जास्त सरस असावी.
उद्देश साधण्यात हट्टी असणं.
की हट्टी नसणं.
एखाद्या कठीण प्रसंगात आपण कुठची विचारसरणी अंगिकारावी.”
श्री समर्था मला म्हणाले.
“पहिली विचारसरणी असलेल्या
व्यक्तीचं मला कौतुक करावंअसं वाटतं.
परत परत प्रयत्न करण्याच्या
त्याच्या चिकाटीमुळे जरी त्याच्या कमकुवतपणाची त्याला गंभीरता दिसेनाशी झाली असली, तरी तो
समजूतदार नसल्याने जिद्दीला कारणीभूत झाला असावा,आणि म्हणूनच तो प्रयत्न करणं थांबवूं शकत नसावा.असं मला वाटतं.
असं असलं तरी त्याच्यात प्रयत्न करण्याचं सामर्थ्य असतं. आणि त्याच्याजवळ संयम आणि चिकाटी असते हे दुर्लक्षून चालणं योग्य होणार
नाही.
एखाद्दा जुगारू व्यक्ती सारखा धोका पत्करून, शेवटी काही प्राप्त झालं नाही तरी बेहत्तर अशी वृत्ती तो ठेवत असतो. म्हणतात ना,,
“पतन होणारे शूर वीर असेच जन्माला येतात”. तशापैकी तो असावा असं मला वाटतं.”
मी त्यांना म्हणालो
“तुमचं ऐकून सरतेशेवटी, मी या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो की काहीही झालं तरी, दोन्ही विचारसरणीपैकी एकाची निवड अशी नाही की, जी मी फक्त जागेवरच करू शकेन किंवा काही मार्गदर्शक तत्त्वं अनुसरून मी करू शकेन. तरी पण मी आधीची विचारसरणी ही “हृदयाच्या आवेगाने” होत असेल आणि नंतरची विचारसरणी “मनाच्या आवेगाने” होत असेल असं म्हणण्याचं मी धाडस करीन.
कोणत्याही परिस्थितीत बरेच वेळा मी “मनाचा आवेग” असलेली विचारसरणी निवडीन.असं मला वाटतं.”
श्री समर्थ मला म्हणाले,
“बरेचदा मी अशा परिस्थितीतून गेलो
असताना मी स्वतःला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की प्रयत्न थांबवून पुढे जाणं चांगलं असतं. म्हणजेच
दुसरी विचारसरणी निवडणं योग्य असतं.तुमची “ मनाच्या आवेगाची”
विचारसरणी निवडणं योग्य असतं.
तथापि, मी हट्टी राहिलो तर मला सर्वोत्कृष्ट फायदा मिळवता येईल,आणि मी प्रयत्न सोडू न शकल्याने,मला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यावर मी तासन्तास प्रयत्न करून मिळवू शकेन.ही पण विचारसरणी,तुमची
“हृदयाच्या आवेगाची” विचारसरणी
काही वाईट नाही असंही त्यावेळी मला वाटलं आहे. आणि हे असं मला वाटतं त्याचं कारण कदाचित मी मोठा होत असताना माझ्या आई-वडिलांनी केलेल्या गोष्टी मी पाहिल्या असल्याने, त्यांनी जीवनात फक्त काहीतरी चांगलं, काहीतरी बरोबर, करण्यासाठी किती संघर्ष केला आहे, किती गोष्टी सहन केल्या आहेत हे पाहून ह्याची जाणीव झाल्यामुळे तसं मला वाटलं असावं.”
हे श्री. समर्थांचं म्हणणं ऐकून माझं मन द्विधा झालं. हे ही बरोबर ते ही
बरोबर वाटूं लागलं.
अखेर मी त्यांना म्हणालो,
“थोडक्यात, मला असं वाटतं की वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा दृष्टीकोन ठेवून,दोनापैकी एका विचारसरणीची निवड करून काम हाताळण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
आणि मी असंही म्हणेन की,जर एखाद्याला प्रयत्न करत राहून काम फत्ते करायचं असेल तर त्याने प्रयत्न करत रहायला पाहिजे.”
विचार हे माणसांच्या बुद्धीचं बळ आहे.चर्चा करून योग्य विचार निवडण्याचा प्रयत्न करणं हे ही सुबुद्धीचं मोठं लक्षण आहे.
प्रतिक्रिया
3 May 2024 - 8:51 am | अमर विश्वास
3 May 2024 - 8:51 am | अमर विश्वास
3 May 2024 - 8:51 am | अमर विश्वास