तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा
जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा
तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे
तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे
लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे
हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे
अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
प्रतिक्रिया
1 May 2024 - 11:54 pm | चित्रगुप्त
https://youtu.be/ngch5NKgPh8?si=Pzi0uuClgkc_9Pqd
मस्त गाणे आहे.
4 May 2024 - 5:54 pm | चौथा कोनाडा
+१०१
2 May 2024 - 2:35 pm | अहिरावण
बापरे
6 May 2024 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले
भीती
ह्या आजोबांचे लेखन वाचून मला माझी अवस्था अशी होईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे :))))
6 May 2024 - 6:50 pm | अमरेंद्र बाहुबली
इतक्यात थकलात? त्यानी आतापर्यंत १४०० लेख लिहिलेत. रोज २ जरी टाकले मीपावर तरी ७०० दिवस सहज जातील. म्हणजे जवळपास पाऊणे दोन वर्षे. अध्येमध्ये प्रोफेसर देसाईंशी भेटीगाठी, फोनवर बोलणे होतच राहिल. काय बोलणं झालं ह्यावर मिपावर सविस्तर लेख येईलच. कधी मुंगळ्याच प्रेत दिसेल तर कधी गांधील माशीचं त्यावेळी जे मनोगत दाटून येईल ते इथे रीतसर ओतले जाईलच, असे आणखी सहासातशे लेख होतीलच.
म्हणून मानसिक तयारी करुन रहा.
6 May 2024 - 7:39 pm | अहिरावण
चला तुमच्यापासून प्रेरणा घेऊन एआयच्या सहाय्याने आम्ही पण लिहिले.. पहचानो...
कधी कधी मनात विचार येतो
कधी कधी मनात विचार येतो
जसे तू माझ्यासाठी बनवला आहेस
जसे तू माझ्यासाठी बनला आहेस
याआधी तुम्ही कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होता
पूर्वी, तू कुठेतरी ताऱ्यांमध्ये राहत होतास.
तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे
तुला माझ्यासाठी पृथ्वीवर बोलावले आहे
कधी कधी मनात विचार येतो
की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे
की हे शरीर आणि हे डोळे माझा भरवसा आहे
ही माझ्यासाठी गेशूची दाट सावली आहे
हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे
हे ओठ आणि हे हात माझा विश्वास आहे
कधी कधी मनात विचार येतो
रस्त्यावर सनई वाजल्यासारखी
रस्त्यावर सनई वाजल्यासारखी
लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे
लग्नाची रात्र आहे, मी पडदा उचलत आहे
शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात
शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात
कधी कधी मनात विचार येतो
जणू तू माझ्यावर आयुष्यभर असेच प्रेम करशील.
प्रेम माझ्याकडे असेच पाहील
मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच
मला माहित आहे तू अनोळखी आहेस पण तसाच
कधी कधी मनात विचार येतो
7 May 2024 - 1:42 am | चित्रगुप्त
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है... याचं आई रुपांतर लईभारी.
'शर्माच्या बाहुपाशात तुम्ही संकुचित होत आहात' गजब.