साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकाळी तब्बल तीन हजार खर्च करून आणि रोज किमान ९ तास श्रवणभक्ती करणं हे तसे नविनच होते. या शिबिरात शिकलेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे जे शब्द आपण सहजंच वापरतो त्यांची नेमकी व्याख्या करण्याची एक सवयच लागली आहे.
तर धाग्याच्या शीर्षकातील निरागसता हा शब्द आपण घेऊ या. माझ्यापुरती निरागसता म्हणजे एक खास प्रकारची अनभिज्ञता. त्यामध्ये आपल्याला आपण बावळट आहोत, कशाचीच आपल्याला माहिती नाही वगैरे भावना मनाला स्पर्श देखील करीत नाही. आपण आपला सभोवताल आपल्याला जसा वाटेल तसा समजावून घेतो आणि त्याला आपल्या सोयीचा प्रतिसाद देतो. लहान मुलांना एकटं असतांना बघणं हा एक आनंददायक अनुभव असतो कारण ते कोणत्याही प्रकारचा कमीपणा न बाळगता त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या आणि घडणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद देत असतात.
आज काल समाजमाध्यमांवर वावरतांना आपल्याला अशाच निरागसतेचा अनुभव कधी कधी येत असतो. गृहसंकुलातील रहिवाशांचा ग्रुप असो कि कॉलेजच्या जुन्या मित्रांचा ग्रुप असो, कुणीतरी कोणाच्यातरी वाढदिवसाची किंवा अशीच काहीतरी बातमी देतो. आणि मग सगळे सदस्य रिबिनी, चॉकलेट्स, टाळ्या, केक यांच्या चित्रांसकट संदेशांचा पाऊस पाडतात. कित्येकांच्या बाबतीत तर संबंधित व्यक्तीचा दूरान्वयेनेदेखील बऱ्याचजणांशी संबंध आलेला नसतो. असाच प्रकार आदरणीय व्यक्तींवरील लेख, सणवार, पौर्णिमा, चतुर्थी सारखे खास दिवस यांच्या बाबतीतही दिसून येतो.
आता अशा वागण्यात कसली आली निरागसता असा प्रश्न पडू शकेल. तर आपण करतो त्यातील अर्थविहीनता न समजणे, अनुकरण करण्यातून जी काही सामाजिक ओळख मिळते ती हवीशी वाटणं यांच्या मुळाशी खरे तर असते ती निरागसता.
प्रतिक्रिया
29 Apr 2024 - 7:48 pm | रामचंद्र
निरागसतेपेक्षा इतरांसारखाच अनुरूप प्रतिसाद देण्याचे अप्रत्यक्ष दडपण हे कारण वाटते.
29 Apr 2024 - 11:02 pm | सर टोबी
29 Apr 2024 - 11:04 pm | सर टोबी
29 Apr 2024 - 11:02 pm | सर टोबी
29 Apr 2024 - 11:17 pm | सर टोबी
30 Apr 2024 - 12:29 am | रामचंद्र
30 Apr 2024 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Apr 2024 - 2:40 pm | अहिरावण