उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे,
जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे.
राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे
निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे.
राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे
स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे.
उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे
फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे.
राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे
जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे.
राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे
फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे.
राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे
भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे.
.
प्रतिक्रिया
11 May 2009 - 12:59 pm | पर्नल नेने मराठे
राहीले जे पार पाडायचे, कर्तव्य ते जीवनाचे
ह्म्म....
चुचु
12 May 2009 - 12:02 pm | अनंता
कविता छान आहे!
टीप : खव, व्यनि सुविधा बंद आहे.
11 May 2009 - 1:00 pm | दशानन
उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे,
जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे.
सुंदर..
मागे फिरणे नेहमीच सोपे नसते !
कधी कधी मोहामुळे तर कधी मागे फिरल्यामुळे होणा-या त्रासामुळे मागे फिरण्याची इच्छा होत नाही .... माणूस जगणे विसरतो मोहापायी... तर मागे वळणे जवळ जवळ अशक्य.
थोडेसं नवीन !
11 May 2009 - 3:30 pm | अवलिया
--अवलिया
11 May 2009 - 1:49 pm | उदय सप्रे
उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे,
जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे.
छान आहे , हेच म्हणतो !
12 May 2009 - 6:40 am | सँडी
छान आहे.
-संदीप.
काय'द्याच बोला.
11 May 2009 - 3:22 pm | सायली पानसे
छान कविता!
11 May 2009 - 8:53 pm | क्रान्ति
राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे
निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे.
'भले-बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर' आठवले.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
12 May 2009 - 3:05 am | प्राजु
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 May 2009 - 10:40 am | जागु
मराठे, राजे, अवलिया, सँडी, उदय, क्रांती, प्राजू, कर्क, सायली. तुमचे मनापासुन धन्यवाद.
12 May 2009 - 11:59 am | पाषाणभेद
"भोगुन भोग गतकालाचे"
काय सांगावे, खरे वाटते हे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
13 May 2009 - 1:25 pm | दत्ता काळे
सकारात्मक विचाराची कविता.
13 May 2009 - 1:30 pm | यशोधरा
उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे
फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे.
सुरेख आहे ही कल्पना! आवडली.
13 May 2009 - 9:01 pm | मदनबाण
राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे
जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे.
सुंदरच...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.