पाषाणभेद in जे न देखे रवी... 26 Mar 2024 - 10:45 pm धाव धाव टीम लिडरा बग आली माझ्या कोडा किती आता गुगलावे? एआय मदतीला घ्यावे? डेडालाईन मृत्यू भासे चहा कॉफी नरडी डाचे आता उद्धरण्या केवळ तूच येई धावत सबळ पाषाणाच्या चुकल्या कोडी टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी - पाभे २६.०३.२०२४ अभंगकाहीच्या काही कविताभक्ति गीतकविता प्रतिक्रिया मस्तच, पण टीम मेंबरांच्या 27 Mar 2024 - 12:28 am | रामचंद्र मस्तच, पण टीम मेंबरांच्या मदतवजा हस्तक्षेपाचीपण मजा यात येऊ द्या की. छान 27 Mar 2024 - 1:59 am | श्रीरंग_जोशी अशा परिस्थितीत अनुभव सर्वाधिक उपयोगी ठरतो. रचना आवडली. मस्त 27 Mar 2024 - 12:34 pm | मुक्त विहारि कविता आवडली.. वा ! 27 Mar 2024 - 7:10 pm | अहिरावण वा ! पाभे यांची माफी मागुन 27 Mar 2024 - 10:58 pm | राजेंद्र मेहेंदळे अरे अरे टीम मेंबरा कशाला फुका आरडाओरडा आळशा आधार बार्ड वापर की जरा कार्ड (पक्षी - डोके) कमी कर टंगळ मंगळा झडकरी काम उरकी बाळा ऑफिस आता बंद होई बायको घरी वाट पाही रामे म्हणे ऐशा नरा माराव्या मोजुनी पैजारा वा, रामे, झकास! 28 Mar 2024 - 12:23 am | रामचंद्र वा, रामे, झकास! लै भारी 28 Mar 2024 - 12:49 am | श्रीरंग_जोशी मूळ कवितेवर प्रतिक्रियेने चार चंद्र लावले आहेत ;-). प्रॉम्प्ट होता चांगला 28 Mar 2024 - 6:56 am | गवि प्रॉम्प्ट होता चांगला बार्ड तरीही गंडला बार्ड झाले जेमिनी आज झाले एनिमी वाटले जे गेम-चेंजिंग? निघाले ते नेम-चेंजिंग गपटाचे धरता पाय भरकटे तोही हाय.. अपॉलॉजीचा नुसता पूर सोल्यूषण राहिले दूरदूर.. खरच प्रतयक्षाहून प्रतिमा 28 Mar 2024 - 3:57 am | nutanm खरच प्रतयक्षाहून प्रतिमा (प्रतिक्रिया) सुंदर !! अरे अरे पाषाणा.... 28 Mar 2024 - 9:31 am | कर्नलतपस्वी पाषाणाच्या जरी चुकल्या कोडी टंकाळली बोटं कडाकडा मोडी भंजाळले डोके तरी सुटेना कोडे वारंवार लिडरा डोळे मोडी काय करू आता सांगा तुम्ही पाषण म्हणे.... अरे अरे पाषाणा .... फुका फोडशी टाहो झडकरी शरण जा हो बेतुक्या माजी म्हणे मेंबर.... उठ उठं पाषाणा काढ धुम्रकांडी सोडी गोल गोल धुम्रवलये भराभरा बार्ड,जेमिनी आणी चाटगपटं सारे वाकतील चरणी पटापट खोडा सुटेल कोडाचा झटपट बेतुक्या म्हणे..... निसंदेह सुटेल कोडा, सत्वर नवस फेडा चकणा,उदक सोडा बेतुक्या मुखी. -बेतुक्या हाहाहा--गवि आणि कर्नलकाका 28 Mar 2024 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे अपॉलॉजीचा नुसता पूर सोल्यूषण राहिले दूरदूर.--सुरेख सत्वर नवस फेडा चकणा,उदक सोडा बेतुक्या मुखी.---ही सुचवणी पण जबरदस्त चूक झाली कुठं गावंना 28 Mar 2024 - 1:12 pm | अथांग आकाश चूक झाली कुठं गावंना बोलल्या बिगर रहावना बु्जलिया डोळ्यांची भोकं न खाजवा की तुम्ही खाजवा की जरा खाजवा की बग शोधायला डोकं न खाजवा की बग शोधायला डोकं भारी आहे 28 Mar 2024 - 5:21 pm | मुक्त विहारि आवडले डोळे ओले झाले 29 Mar 2024 - 9:12 am | कर्नलतपस्वी कवितेवर कवितांचा प्रतिसाद पाहून डोळे ओले झाले. वाटते कवितेला आता अच्छे दिन आले.
प्रतिक्रिया
27 Mar 2024 - 12:28 am | रामचंद्र
मस्तच, पण टीम मेंबरांच्या मदतवजा हस्तक्षेपाचीपण मजा यात येऊ द्या की.
27 Mar 2024 - 1:59 am | श्रीरंग_जोशी
अशा परिस्थितीत अनुभव सर्वाधिक उपयोगी ठरतो. रचना आवडली.
27 Mar 2024 - 12:34 pm | मुक्त विहारि
कविता आवडली..
27 Mar 2024 - 7:10 pm | अहिरावण
वा !
27 Mar 2024 - 10:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
अरे अरे टीम मेंबरा
कशाला फुका आरडाओरडा
आळशा आधार बार्ड
वापर की जरा कार्ड (पक्षी - डोके)
कमी कर टंगळ मंगळा
झडकरी काम उरकी बाळा
ऑफिस आता बंद होई
बायको घरी वाट पाही
रामे म्हणे ऐशा नरा
माराव्या मोजुनी पैजारा
28 Mar 2024 - 12:23 am | रामचंद्र
वा, रामे, झकास!
28 Mar 2024 - 12:49 am | श्रीरंग_जोशी
मूळ कवितेवर प्रतिक्रियेने चार चंद्र लावले आहेत ;-).
28 Mar 2024 - 6:56 am | गवि
प्रॉम्प्ट होता चांगला
बार्ड तरीही गंडला
बार्ड झाले जेमिनी
आज झाले एनिमी
वाटले जे गेम-चेंजिंग?
निघाले ते नेम-चेंजिंग
गपटाचे धरता पाय
भरकटे तोही हाय..
अपॉलॉजीचा नुसता पूर
सोल्यूषण राहिले दूरदूर..
28 Mar 2024 - 3:57 am | nutanm
खरच प्रतयक्षाहून प्रतिमा (प्रतिक्रिया) सुंदर !!
28 Mar 2024 - 9:31 am | कर्नलतपस्वी
पाषाणाच्या जरी चुकल्या कोडी
टंकाळली बोटं कडाकडा मोडी
भंजाळले डोके तरी सुटेना कोडे
वारंवार लिडरा डोळे मोडी
काय करू आता सांगा तुम्ही
पाषण म्हणे....
अरे अरे पाषाणा ....
फुका फोडशी टाहो
झडकरी शरण जा हो
बेतुक्या माजी
म्हणे मेंबर....
उठ उठं पाषाणा काढ धुम्रकांडी
सोडी गोल गोल धुम्रवलये भराभरा
बार्ड,जेमिनी आणी चाटगपटं
सारे वाकतील चरणी पटापट
खोडा सुटेल कोडाचा झटपट
बेतुक्या म्हणे.....
निसंदेह सुटेल कोडा,
सत्वर नवस फेडा
चकणा,उदक सोडा
बेतुक्या मुखी.
-बेतुक्या
28 Mar 2024 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
अपॉलॉजीचा नुसता पूर
सोल्यूषण राहिले दूरदूर.--सुरेख
सत्वर नवस फेडा
चकणा,उदक सोडा
बेतुक्या मुखी.---ही सुचवणी पण जबरदस्त
28 Mar 2024 - 1:12 pm | अथांग आकाश
चूक झाली कुठं गावंना
बोलल्या बिगर रहावना
बु्जलिया डोळ्यांची भोकं
न खाजवा की
तुम्ही खाजवा की
जरा खाजवा की
बग शोधायला डोकं
न खाजवा की
बग शोधायला डोकं
28 Mar 2024 - 5:21 pm | मुक्त विहारि
आवडले
29 Mar 2024 - 9:12 am | कर्नलतपस्वी
कवितेवर कवितांचा प्रतिसाद पाहून
डोळे ओले झाले.
वाटते कवितेला आता
अच्छे दिन आले.