प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात.
जुनेरलं नातं...
आभाळीची चंद्रकोर
शोभते तुझ्या भाळी
तुझ्या पैंजण नादाने
आनंदाची मांदियाळी
चंद्रकोरीचा गारवा
सुखावतो डोळा
विचार चांदण्याचा
मनी घुमतो पारवा
चंद्रकोर झाली बिंब
उजळल्या दाही दिशा
चंचल मन शिंजीर
पालवल्या नव्या आशा
जसे नभी सुर्य चंद्र
दिनरात अशी साथ
कधी तार कधी मंद्र
ताल,सुरांचे आर्त
साथ कधी सरू नये
जुनेरल्यां नात्यावर
निरोपाची वेळं
कधी येवू नये
जुनेरले नाते
नियतीचा खेळं
एक जायं दिगंताला
एक फुपाट्यातं जळं
प्रतिक्रिया
7 Mar 2024 - 11:37 am | राजेंद्र मेहेंदळे
कर्नल काकांची प्रतिभा बहरत चालली आहे. पुलेशु
7 Mar 2024 - 12:03 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ कविता हा आपला प्रांत नाही त्यामुळे कविता आधी वाचायचो नाही. पण कर्नल साहेबांमूळे कविता वाचण्याची सवय लागत चाललीय. पुढील कविता लवकर येऊद्या.
9 Mar 2024 - 2:02 pm | प्राची अश्विनी
चंद्रकोर आखीव रेखीव सुरेख आहे.
शिंजीर म्हणजे??
9 Mar 2024 - 3:32 pm | कर्नलतपस्वी
म्हणजे सनबर्ड, सुर्यपक्षी. अतीशय सुंदर आणा तेव्हढाच चंचल चपळ अगदी मनासारखा. छायाचित्र काढताना छायाचित्रकाराला घाम फुटतो.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
15 Mar 2024 - 4:13 pm | प्राची अश्विनी
अच्छा! नवीन शब्द कळला
13 Mar 2024 - 8:50 am | कुमार१
सुरेख आहे !
20 Mar 2024 - 6:48 am | भागो
अमरेंद्र बाहुबली +१
कर्नल साहेब फॉर्मात आहेत.
20 Mar 2024 - 12:17 pm | किसन शिंदे
मूळ कवितेइतकीच ही कविताही आवडली.