उशीर.....
ही हुरहुरणारी सांज अशी
अन् भुरभुरणारे केस तुझे
असते सुरेख सुंदर कांता पण.....
मज दिसती ते गणवेष तुझे !
खिडकीवर , गाली ओघळते
ही श्रावणातली धार अशी
तू कधी कवळशील सांग सखे
हे विरघळते अवशेष तुझे?
ही चांदरात गे पुनवेची
मी स्वार जुन्या आठवांवरती
हा धपापणारा श्वास मला
पण ओठांवरती फेस तुझा !
संपले स्वप्न ते सोनेरी
अन् माझेही झाले सोने
पण मोहरलो मी चितेवरीही
गळता.....भिजल्या पापण्यांचे केस तुझे !
प्रतिक्रिया
11 May 2009 - 11:44 am | जागु
असते सुरेख सुंदर कांता पण.....
मज दिसती ते गणवेष तुझे !
हटकेच आहे उपमा.
12 May 2009 - 3:02 am | प्राजु
उपमा हटकेच आहे.
शेवटही आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/