मी कुठवर पाहू वाट ?

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
11 May 2009 - 9:07 am

मी कुठवर पाहू वाट ?

मी कुठवर पाहू वाट ?
सांग ना.....
कुठवर पाहू वाट ?

या उत्तररात्री आठवतो मज
केशसंभार घनदाट
ही रिती शेज अन् तळमळता मी
जाते उशीत भिजून पहाट
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

तो तरुण कोवळा स्वप्नाळू
ती सुंदर , शीतल ना कुठला थाट
पाहताच तिला तो हरवून गेला
....नयनी आठवांची* ही लाट ! * आठवांची = आठवणींची
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

ते भावविश्व नाजुक त्याचे
ती परखड , वास्तव , अभ्यासू
पुसताच तिला त्याने तेंव्हा
मारली तिनेच त्यावर काट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

आला इथवर तो, संसारी
पण विसर न पडला खास
नांदीस जिंदगीच्या तेंव्हा
लागला भैरवीचा जो नाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

हे घरकुल सारे भरलेले
पण साक्षीस ना भार्या आता
मज नसे वासना कशाचीच
पण्.....समोर भरले ताट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

केली न कधीही प्रतारणा
पण कांता न च झाली प्रेयसी
जरी प्रेयसी न झाली कांता,
मनीचा सरला न अंतर्पाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

हे उंच उंच जाती गगनी
पहिल्या प्रेमाचे का झोके?
त्या प्रेमाचे जुने खोड हे,
सखये.....पुन्हा एकदा छाट !
म्हणुनी पाहतो तुझी मी वाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

11 May 2009 - 2:08 pm | कपिल काळे

ते भावविश्व नाजुक त्याचे
ती परखड , वास्तव , अभ्यासू
पुसताच तिला त्याने तेंव्हा
मारली तिनेच त्यावर काट

एवढा नाजूकपणा?

क्रान्ति's picture

11 May 2009 - 8:46 pm | क्रान्ति

सगळ्या ठिकाणी वाट पहाणेच! कल्पना छान आहे. [कविताही]
:)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com