माझे आजी आजोबा

chittmanthan.OOO's picture
chittmanthan.OOO in जनातलं, मनातलं
20 Jun 2019 - 11:25 pm

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली.

मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली . कुण्या साहित्यिकांन सांगितलेलं की पत्नी ही आई बहिणींची जागा भरून काढते पण इथे तर पत्नीला आई होताना मी बघितलं.

माझ्या लहानपणी आजोबा आजारीच असायचे पण मी लहान असल्याने दंगा करायचो .त्यामुळे आज्जीला दोघांचा त्रास व्हायचा. मी आजीला न सांगता झाडाच्या चिंचा काढायला ,कधी सुगरणीचा खोपा काढायला विहिरीवर जायचो.माझी आई शिक्षिका असल्याने आजोबांच्या आजारपणात माझ्या संगोपनाची दुहेरी जबाबदारी आज्जीवर होती.त्याचा तिला त्रास झाला पण कधी बोलली नाही. मी इतका त्रास देऊनसुद्धा मला आजीने कधीच साधी चापटपण मारली नाही.

माझ्या आजोबांचा जन्म १९२९चा . ते सातवीला जाईपर्यंत त्यांना पायावर उभे राहता येत नव्हते . पण तरीही शिकण्याची जिद्द एवढी मोठी की छोट्या धकल गाडी वर बसून शाळेला जायचे . वडगांव ला दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती पण पुढच्या शिक्षणाला कोल्हापूरला जाणं भाग होत. त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचा खर्च द्यायला नकार दिला. जिद्द न सोडता ते अनवाणी पायाने चालत कोल्हापूरला जायचे. जेवायची सोय अशी की ज्या घरी शिकवणी द्यायची त्या घरी ठरलेल्या वारी जेवण .

शिक्षण झाल्या झाल्या त्यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लागली. त्यांची मुलाखत कर्मवीर भाऊराव पाटलांनी घेतली होती त्यामुळे अण्णांचा प्रभाव आजोबंवर होता.

लग्नानंतर ज्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी कुटुंब या नियमाने भरपूर जागी भटकंती झाली . थोडे शिस्तीचे असल्याने वा संस्थेचा नियम असल्याने बदल्यांचे प्रमाण हे ज्यास्तच होते . पण कधी बदली रद्द करावी वा गावाजवळ करून घ्यावी असे त्यांना कधी वाटलं नाही . ३० वर्षे नोकरी केल्यानंतर भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मिळाला . निवृत्तीनंतर आजोबा सर्व कुटुंबासह गावी आले . गावात आल्यावर संस्कार वाचनालय चालू केले तसेच स्वतः लिहलेले लेखांसहित्य प्रकाशित केले .

थोड्याच कालावधीत त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. पार्किन्सन्स चे निदान झाले . आजोबांचे लिखाण , वडगांव रोड च्या पलॉटवर फिरायला जाणे बंद झाले . आयुष्यभर प्रामाणिक जीवन जगणाऱ्याच्या नियती काय नशिबात टाकते ते समजलेच नाही.

माझी आजी स्वयंपाकात सुगरणच आहे. आजोबांच्या बदल्यामुळे खूप ठिकाणचे पदार्थ तिने शिकून घेतले . आजही तिने केलेले पदार्थ special च. कोणतेही काम जीव वोटून केले की ते चांगले होतेच हा तिचा दंडक.

शेवटी मला इतकंच वाटत की आहे आजोबा मिळतात तेव्हा माझ्यासारखा नशीब न मानणारा नास्तिक पण म्हणतो की आपल्यावर नियतीने खूप मोठे उपकार केले...!!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

21 Jun 2019 - 7:13 am | कानडाऊ योगेशु

भाग्यवान आहात !

कंजूस's picture

21 Jun 2019 - 10:32 am | कंजूस

आवडलं हा. आठवणी हेच फोटो.

chittmanthan.OOO's picture

25 Jan 2024 - 4:54 pm | chittmanthan.OOO

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. आणखी वाचन करण्यासाठी www.Chittmanthan.com ला भेट द्या .

श्वेता२४'s picture

21 Jun 2019 - 11:02 am | श्वेता२४

आवडलं

यशोधरा's picture

21 Jun 2019 - 11:10 am | यशोधरा

आवडलं.

chittmanthan.OOO's picture

21 Jun 2019 - 11:18 am | chittmanthan.OOO

धन्यवाद.. काही सूचना असल्यास कृपया निसंकोच सांगणे

chittmanthan.OOO's picture

21 Jun 2019 - 11:18 am | chittmanthan.OOO

धन्यवाद.. काही सूचना असल्यास कृपया निसंकोच सांगणे

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2019 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिलंय ! आपल्या लहानपणी, आजोबा-आजीने केलेली माया, मनात कायमचं घर करून राहते... असा स्वानुभव आहे.

chittmanthan.OOO's picture

25 Jan 2024 - 4:55 pm | chittmanthan.OOO

खर आहे ...खूपच भावनिक नाते आहे ते .
www.Chittmanthan.com

Namokar's picture

21 Jun 2019 - 7:35 pm | Namokar

छान लिहिलय

जालिम लोशन's picture

21 Jun 2019 - 7:59 pm | जालिम लोशन

सुरेख.

ज्योति अळवणी's picture

21 Jun 2019 - 9:57 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे. पण आजी बद्दल थोडं अजून लिहिलं असतत तर बरं झालं असतं. तुमच्या लेखनातून समजत की आजीचा सहवास जास्त लाभला आहे. अशा वेळी त्यांच्याबद्दलचा ओलावा लिहिला असतात तर लेख अजून सुंदर झाला असता

प्रमोद देर्देकर's picture

22 Jun 2019 - 10:02 am | प्रमोद देर्देकर

आवडलं थोडे अजून विस्ताराने लिहा.

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2024 - 5:55 pm | चौथा कोनाडा

सुरेख लिहिलंत ! खरंच भाग्येवान आहात.
मी ८ वर्षांचा असतानाच वडिल गेले, त्यांचा सहवास मिळु शकला नाही ... पुसटसे आठवतात ! पितामह कधीचेच गेलेले.
आईच्या माहेरी मात्र मातामही आजीचा चांगला सहवास लाभला... खाष्ट होती पण पैसा नसताना सुद्धा काडी काडी जमवून नवर्‍याच्या माघारी १० जणांना सांभाळायची धमक होती... ते करतुत्व मनावर कायमचे कोरले गेले आहे !

पत्नी ही आई बहिणींची जागा भरून काढते पण इथे तर पत्नीला आई होताना मी बघितलं.

काळजाला हात घालणारे वाक्य !

आपल्या आणखी आठवणी वाचायला आवडतील !

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jan 2024 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लिहीलंय.