सामंत काकांचा हा लेख वाचला आणी ही कविता सुचली. विश्वातील सर्व माऊलींना ही माझी कविता समर्पित.
आई म्हणजे आत्मा आणी ईश्वर
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
आई, माऊली, माता, माय
बावरलेल्या वासराची गाय
आई म्हणजे प्रेम निस्वार्थी
आई म्हणजे मांगल्याची धरती
आईच प्रेरणा,पवित्र श्रद्धा
आईच मंदीर आईच देवता
आईच्या कुशीत निजावे क्षणभर
सर्व दु:खं मिटावी पळभर
आई म्हणजे पाऊस वळवाचा
आई म्हणजे सार विश्वाचा
आई म्हणजे शिदोरी आशिर्वांची
आई म्हणजे सरीता ममतेची
आई म्हणजे शीतल चंदन
आई म्हणजे अतुट बंधन
कोटी प्रणाम माझे सर्व माऊलींना
आईचे प्रेम अखंड मिळो सर्वाना
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
11 May 2009 - 12:13 am | यशोधरा
आईच्या कुशीत निजावे क्षणभर
सर्व दु:खं मिटावी पळभर
अगदी :)
11 May 2009 - 12:34 am | मानस
सुरेख, कविता आवडली.
फ. मुं. शिंदे यांची "आई एक नाव असतं..... घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं" ही कविता आठवली ....
सर्व माय-माऊलींना "मदर्स डे" च्या अनेक शुभेच्छा
11 May 2009 - 3:58 am | समिधा
खरचं खुप सुंदर कविता केली आहेत आपण.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
11 May 2009 - 6:09 am | यन्ना _रास्कला
आईच प्रेरणा,पवित्र श्रद्धा
आईच मंदीर आईच देवता
मी आजपन रोज आईच्या पायान्ला हात लावुनच कामाला निघतो.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
11 May 2009 - 8:05 am | सँडी
मराठमोळा,
अप्रतिम! खुपच छान आहे कविता.
-संदीप.
काय'द्याच बोला.
11 May 2009 - 8:32 am | क्रान्ति
आई म्हणजे आत्मा आणी ईश्वर
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
आईसाठी याहून चांगली भेट काय असू शकेल? अप्रतिम कविता!
=D> =D> =D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
11 May 2009 - 9:19 am | राघव
छान लिहिलेयस :)
ही कविता देखील आई साठीच आहे.. http://www.misalpav.com/node/5999
बघ कदाचित आवडेल तुलाही!
राघव
11 May 2009 - 11:07 am | जागु
आई खुप छान.
11 May 2009 - 11:22 am | दिपक
आईवर अप्रतिम काव्य. :)
11 May 2009 - 5:18 pm | दशानन
सुंदर !!!!
थोडेसं नवीन !
12 May 2009 - 7:02 am | अवलिया
सुरेख !
--अवलिया