सप्रेम द्या निरोप

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
17 Dec 2023 - 4:10 pm

प्रिय मित्रहो,
आता निरोप घ्यावयाची वेळ आली आहे.फार वर्षांपूर्वी येथे लिहावयास सुरवात केली आणि सुटलोच म्हणावयास पाहिजे.निरनिराळ्या
विषयांवर मनसोक्त लिहले. याचे एक कारण म्हणजे मी जमा केलेली नाना विषयांवरची पुस्तके. त्यांत फार निवड होती असेही नाही. पण
आपण वाचलेले जर आपणास आनंद देते ते इतरांनाही देईल या कल्पनेने त्यावर लिहले. सभासदांना आवडले असावे (ही एक मनाची गोड समजूत्)पण प्रत्येक गोष्टीला शेवट पाहिजेच नाही कां ? तेव्हा आंता लेखनाला पूर्णविराम. पण जातांना एक गोष्ट करावयाची इच्छा आहे. जमवलेली पुस्तके येथील मित्र-मैत्रिणींना सप्रेम भेट म्हणून द्यावित. यांत बरेच काही आहे. यादी द्यावयाची तर बरीच जागा जाईल. उदा. रामायण-महाभारताचे प्रत्येकी ९ खंड; अध्यात्म-धार्मिक २०-२५ पुस्तके, १०० च्या आसपास कवितासंग्रह्,जगातील अनेक संग्रहालयावरील पुस्तके, अरेबियन नाइट्स (गौरी देशपांडे ) यांचे भाषांतरीत सर्व भाग (मागे कुणातरी 'ताईं ना ते घ्यावयाचे होते ,त्यानी घेतले नसतील तर त्यांचा पहिला नंबर); इत्यादि. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.माझा पत्ता : शरद हर्डीकर,फिनिक्स (बी) अपार्टमेन्ट, सेनापति बापट मार्ग. डामिनोज पिझा च्या मागे.पुणे १६. दू.ध्वनी ९९२३० ६२६७३ वयोमानामुळे बूकपोस्ट करता येणार नाही याची माफी मागतो. घरी येऊन गोळा करावी लागतील.वेळ : सकाळी ८ ते रात्री ८. यावयाच्या आधी फोन केल्यास उत्तम.सर्वांना शुभेच्छा. आ.न. शरद बोले अखेरचे तो , आलो इथे रिकामा सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे

जीवनमान

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2023 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर नमस्कार. अधुन-मधून येत राहा. खरं तर, पुस्तकांसाठी विशेषतः कवितांसाठी यावं वाटतंय आलो तर नक्की भेटेन किंवा मिपाकर प्रचेतस यांना बोलून पाहतो. मिपावर वाटलं की नक्की येत राहा. आता निरोप घेतो वगैरे असा काही पण करु नका. भ्रमनध्वनी क्रमांक साठवून ठेवला आहे. मिपावरील लेखन, गप्पा, प्रतिसाद आपल्या लेखनाने आनंद दिला आहे. मजा येत राहिली आहे. वालावलकर आणि आपण दोघांनी एक काळ नुसती भन्नाटा मजा आणली. पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ आपल्याशी जालावर परिचय जालावरील लेखनामुळे झाला. आपण प्रत्यक्ष भेटलो नाही,बोललो नाही. संत साहित्यातील कवितांपासून आपल्या प्रेमात एक वाचक म्हणून पडलो ते आजतागायत. तेव्हा, येत राहा सर. :)

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

17 Dec 2023 - 8:30 pm | कर्नलतपस्वी

गूँजते रहेगें ये अल्फ़ाज़ मिरे कानों में

कितने आराम से कह दिया खुदा-हाफ़िज़ तू ने

कधी त्या भागात आलो तर जरूर भेट घेईन.

कर्नलतपस्वी's picture

17 Dec 2023 - 8:31 pm | कर्नलतपस्वी

गूँजते रहेगें ये अल्फ़ाज़ मिरे कानों में

कितने आराम से कह दिया खुदा-हाफ़िज़ तू ने

कधी त्या भागात आलो तर जरूर भेट घेईन.

कंजूस's picture

17 Dec 2023 - 8:41 pm | कंजूस

राम राम .

प्रचेतस's picture

17 Dec 2023 - 11:57 pm | प्रचेतस

आतमध्ये कुठेतरी तुटलं,
निरवानिरवीची भाषा करू नका, येत राहा, लिहित राहा, जोपर्यंत शक्य होतंय तो पर्यंत करा.

गवि's picture

18 Dec 2023 - 8:48 am | गवि

+१००

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2023 - 1:18 pm | चौथा कोनाडा

+ १०१

नको अशी निरवानिरवीची भाषा
भेटत रहायचे आपल्याला सदोदित !

अरेबियन नाइट्स (गौरी देशपांडे ) यांचे भाषांतरीत सर्व भाग
मी घेण्यासाठी इच्छुक आहे.
घरी येउन नेऊ शकेन.
तुम्हाला फोन करतो.

अरेबियन नाईटस् बद्दल विचारणा करणारी ताई म्हणजे मी. संग्रह तेव्हांच विकत घेतला आहे. त्यामुळे विजुभाऊ तुम्ही नक्कीच पुढे जावू शकता.

काय कमाल अप्रतिम लेखन केले आहे तुम्ही _/\_
आत्म्याला सत्ता आहेच पण सातत्यही आहे.
सुंदर वाक्य!
तुमचे उपनिषदांवरचे लेख वाचत आहे, अप्रतिम खजिना मला गवसला आहे.
लिहित रहा!

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Dec 2023 - 11:59 am | राजेंद्र मेहेंदळे

मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन. मी पण असेच म्हणेन--जमेल तसे येत रहा, लिहीत रहा. नसेल तर वाचनमात्रे रहा.

भीमराव's picture

19 Dec 2023 - 8:50 pm | भीमराव

बाकी लोकांसारखी माझी आणि आपली ओळख नाही, पण एवढंच सांगेन येत रहा वरचेवर.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2023 - 2:37 pm | मुक्त विहारि

पण,

एक विनंती आहे...

मिपाकर हा शेवट पर्यंत मिपाकरच असतो.

त्यामूळे, मिपा सोडून जाऊ नका...

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2023 - 6:09 pm | कर्नलतपस्वी

शनिवार सकाळ साडे अकरा ते तीन श्री व सौ शरद हर्डीकर यांना सदिच्छा भेट दिली. श्री प्रकाश घाटपांडे व अमरेन्द्र बाहुबली यांचा सहभाग होता.प्रचेतस, रामचंद्र व इतर पुण्यातील मिपाकर काही अपरिहार्य कारणास्तव येवू शकले नाही.विजूभाऊ यांची थोडक्यात चुकामूक झाली.

अतिशय सकारात्मक विचार असणारे वयोवृद्ध ( त्यांचा उत्साह बघता वयोवृद्ध म्हणणे चूक वाटते. वय वर्ष सत्तयाऐंशी व ब्याऐंशी). लग्नास सहा दशकांहुन अधिक काळ गेला,अगत्यशील जोडपे. भेटल्यावर खुप वर्षापासून ओळख आहे असे वाटले. तीन तास यांच्या संगतीत व पाहुणचारात कसे निघून गेले कळलेच नाही.

भेटल्यावर कवी बोरकर यांचे शब्द आठवले,

कशाचा न लाग भाग
कशाचा न पाठलाग
आम्ही फूलांचे पराग

एक वेगळा लेख या दाम्पत्यावर लिहीता येईल जो इतर सर्वांनाच मार्गदर्शक ठरू शकेल. सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळेच मानसिक व शारीरिक दृष्ट्या स्वस्थ. पंचेंद्रिये संपुर्ण ताब्यात.

पुन्हा येण्याचे आग्रहाचे निमंत्रण.

श्री व सौ शरद हर्डीकर यांचे आशीर्वाद घेऊन तीन वाजता निरोप घेतला. उभयतांना हार्दिक शुभेच्छा.

Bhakti's picture

26 Dec 2023 - 6:52 pm | Bhakti

छान!

नि३सोलपुरकर's picture

27 Dec 2023 - 2:30 pm | नि३सोलपुरकर

खुप छान .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2023 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त भेट. मलाही भेटायचं आहे. बघू कसं जमतं ते.

पुण्यातल्या काही दोस्तांचा गोपनिय कट्टा घडतोय म्हणे.
बघूया कसं जमतं तेव्हा.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

27 Dec 2023 - 4:21 pm | विजुभाऊ

प्रत्येक शब्दाशी सहमत आहे कर्नलसाहेब.
शरदकाकांना पहिल्यांदाच भेटलो, पण त्यांचे अगत्य आणि उत्साह यामुळे कोणाकडे पहिल्यांदाच जातोय असे वाटलेच नाही.
एक्सप्रेस वे ट्रॅफिक ची कृपा झाली सकाळी साडे आठला निघालेलो सव्वा तीन वाजता त्यांच्याकडे पोहोचलो त्यामुळे तुमची आणि घाटपांडे साहेबांची भेट घेता आली नाही याची खंत आहे.
शरदकाकांनी पुढचा कट्टा त्यांच्याकडे घेऊया असे सांगितले आहे.
थोडी पूर्व कल्पना आणि शनिवार असेल तर मलाही येता येईल.
काकांचे वाचन, व्यवसाय, अनुभव आणि त्यांचा उत्साह हे अनुभवायलाच हवे.