आनंदाच्या दारी परब्रह्म येते
सुखाचा पहाट, दाखवते.
मनामनामध्ये उजळते प्रेम
समृद्धीचा वाट, सापडते.
सरो सारे दु:ख होवो भरभराट
दिवाळी पहाट, ऐश्वर्याची.
सोबतीच्या पाया मिळो पायवाट
उडू दे थाट, दिवाळीचा.
आनंद सोहळा,प्रकाशाचे पर्व
नात्यांचा उत्सव ,चार दिस.
दिवाळी म्हणजे दुजे काही नाही
आनंदाची ग्वाही, स्वत:लाच.
शुभ दिपावली
-----अभय बापट
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 12:51 pm | नूतन
छान रचना
मात्र,सुखाचा पहाट,समृद्धीचा वाट जरा खटकलं
18 Nov 2023 - 7:09 am | सागरसाथी
धन्यवाद
18 Nov 2023 - 7:33 am | चामुंडराय
यंदा अधिक मासामुळे दिवाळी एक महिना उशिरा आली त्यामुळे शुभ दिवाळीच्या बरोबरीने शुभ्र दिवाळीचा देखील अनुभव आला.
18 Nov 2023 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
दीपावली-पाडव्याच्या शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे