माझाही एक भयानक अनुभव

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Jul 2023 - 4:03 pm

या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला
अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो.
ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये.
दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते. बटन दाबले की त्यामुले लॅच च्या कळीची हालचाल होऊन दार ओढले की उघडले जायचे. हात ओले झाल्यामुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते.
परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते.
दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून दार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला.
हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर?
माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते.
बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करून तरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.
ते दहा मिनीट मात्र माझ्या मनात काहीच्याकाही विचार येऊन गेले.
समजा दार उघडलेच गेले नाही तर? इथे गुदमरून आपले काही झाले तर? इथपासून ते हॉटेलच्या रूम मधे मृत्यू आल्या च्या बातम्या डोळ्यासमोर येवून गेल्या. समजा आपले काही असे झाले तर आपल्या कुटूंबीयाना आपल्या बद्दल कसे कळेल?
तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?

वावरअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Jul 2023 - 4:28 pm | कंजूस

सहमत.
ते गोल नॉबवाले हँडलस एकदम फेक आहेत. बाहेर पडतानाही खरोखरच लॉक झाले का तीन तीनदा बघावे लागते. जरासे ढकलले की दार उघडते. पूर्वी पैसे कॅशमध्येच न्यावे लागत. ते सर्व घेऊनच बाहेर पडत असू.

बाकी एसी रूमबद्दल मी नेहमीच सावध राहातो . खिडक्या नसलेल्या कोंडवाड्यास एसी लावून अधिक पैसे उकळतात हॉटेलवाले.
ठाण्याचे टिपटॉप लगीनहॉलवालेही अशाच रूम देतात.

ते गोल नॉबवाले हँडलस एकदम फेक आहेत.

+१००

डेंजरस.

विअर्ड विक्स's picture

31 Jul 2023 - 10:25 am | विअर्ड विक्स

असाच अनुभव मला कोरिया वास्तव्यात आला होता. कोरिया मध्ये हॉटेल पेक्षा डॉर्मिटरी मध्ये राहणे परवडते. भाषा हि समस्या असते . अशाच एका डॉर्म मध्ये राहत असतांना बाथरूमचा दरवाजा बाहेरून लॉक झाला त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट स्टाफ ला अडचण सांगता नाकीनऊ आले. त्याने खोलीमध्ये येता एक अॅलन किने लॉक उघडले . गोल नौबला एक छोटे होल असते तिथे अॅलन कि टाकली कि उघडते . अॅलन की नंबर माझ्यामते ७-८ असावा . जाणकार सांगू शकतील .

श्रीरंग_जोशी's picture

29 Jul 2023 - 7:50 pm | श्रीरंग_जोशी

खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ.
प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे.

खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात.
नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

श्रीरंग_जोशी's picture

29 Jul 2023 - 7:50 pm | श्रीरंग_जोशी

खरोखरंच भयानक अनुभव, विजुभाऊ.
प्रसंगावधान राखून तुम्ही या अवघड प्रसंगातून बाहेर पडलात याचे समाधान आहे.

खिडक्या नसणार्‍या खोल्या असणार्‍या हॉटेलला परवानगी मिळायला नको. खिडक्या नसणार्‍या खोल्या केवळ गोदामाप्रमाणे सामान ठेवायला वापरायला हव्यात.
नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

तुर्रमखान's picture

29 Jul 2023 - 11:25 pm | तुर्रमखान

नंतर तुम्ही हॉटेलच्या प्रशासनाला याबाबत सांगितले का? त्यांनी काय प्रतिसाद दिला?

तुमच्या कंपनीच्या ट्रॅवल डिपार्टमेंटलासुद्धा कळवा. कंपनीकडून चौकशी झाली आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं तर जास्त फरक पडेल.
पण खिडकी नसलेली हॉटेल रूम घेऊ नये हा धडा मिळाला. कुठेही एकही खिडकी नाही म्हणजे एकतर आजुबाजुला प्रचंड बकाल एरिया असला पाहिजे किंवा अगदी चिकटून इमारती असतील.

अहमदाबाद मधील सॅटेलाईट भाग हा अगदी एलीट वस्ती आहे.
हाॅटेल हे एका माॅलच्या ईमारतीचा भाग होते.त्यामुळे असेल ,खिडकीसाठी वाव मिळाला नसेल.

तुर्रमखान's picture

30 Jul 2023 - 3:32 pm | तुर्रमखान

म्हणजे शेजारच्या इमारतीची भिंत अगदी लागून आहे.

शहरातल्या गजबजलेल्या इमारतींसाठी एअर कंडिशन हा नाईलाज झाला आहे. माझ्या भाचीच्या शिकवणीवाल्यांनी अशीच जाहिरात केली म्हणून मी खास बघायला गेलो होतो. प्रचंड गजबजलेल्या ठिकाणी खुराड्या सारख्या खोल्यात एसी बसवले होते कारण खिडक्यांना काही स्कोपच नव्हता. तिथे जायला रस्ता एवढा अरुंद होता की आग वगैरे लागली तर अवघड आहे.

अजुन एक म्हणजे बर्‍यापैकी चांगल्या हॉटेल मध्ये बाथरूम मध्ये एक फोन असतोच. ९९%* हॉटेल अनधिकृत असतात. म्हणजे सेफ्टी ऑडिट झालेलं नसतं किंवा त्यांचे हात ओले केलेले असतात.

*विदा द्या म्हणून वस्सकन अंगावर येऊ नये. तो माझ्याकडे नाही. जनरल निरिक्षण आहे.

अनन्त्_यात्री's picture

30 Jul 2023 - 1:19 pm | अनन्त्_यात्री

आला होता महाबलीपुरमच्या हाॅटेलात पण बाथरूममधील इंटरकाॅममुळे बचावलो होतो.

शानबा५१२'s picture

31 Jul 2023 - 9:59 am | शानबा५१२

तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?

एकदा गॅलेरीमध्ये गेल्यावर तिन उभ्या काचांची खिड़की आतुन बंद झाली होती, ति खिडकी खोलायला गॅलेरीमध्ये एकही नॉब(?) नव्हता, सर्व आतुन होते. खाली उडी टाकायची म्हटले तर मोठे ग्रील लावले होते. ह्या सर्वातुन मी कसा बाहेर आलो असेन विचार करा.
आहे नाही तेवढी सर्व ताकद लावुन मला गॅलेरी मधुन काच जोरात सरकवुन त्याचे आतले नॉब(?) तुटेपर्यंत ओढावे लागले होते, जवळजवळ अर्धा तास लागला. दुस-या दिवशी आतले सर्व नॉब्स काढुन टाकले.

योगी९००'s picture

31 Jul 2023 - 10:25 am | योगी९००

हे असे काही अनुभव वाचले आहेत. बाथरूम मध्ये लॉक एक मुलगी झाली होती त्यावर एक शॉर्ट फिल्म पण बहुतेक पाहिल्याची आठवते.

यामुळे एकटा हॉटेलात रहात असलो तर बाथरूम कधीच लॉक करत नाही. दरवाजा ही थोडासा उघडाच ठेवतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Jul 2023 - 11:47 am | राजेंद्र मेहेंदळे

थोडक्यात वाचलात. का कुणास ठाऊक, पण मलाही बिन खिडकीची खोली कधीच आवडत नाही. अगदी वर्दळ दिसली नाही तरी, झाडे,पक्षी काहीतरी दिसत राहिले पाहीजे, हवाही खेळती राहीली पाहिजे.

अवांतर- माझ्या बहीणीचा मुलगा २ वर्षाचा असताना एकदा ती आंघोळीला गेली आणि त्याने रडता रडता बाहेरुन कडी घातली. घरात दुसरे कोणीच नव्हते. बाथरुमच्या दरवाजाला काच ही नव्हती(पूर्ण लाकडी). आजुबाजुच्या रहदारीमुळे ओरडुनही फायदा नव्हता (आवाज कुणी ऐकला नसता). शेवटी तिनेच आतुन त्याला लाडीगोडीने समजावुन कशीतरी दरवाजाची कडी उघडुन घेतली. त्यानंतर पुन्हा असे न करण्याबद्दल कानाला खडा लावला.

आंद्रे वडापाव's picture

31 Jul 2023 - 1:03 pm | आंद्रे वडापाव

A