वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Jul 2023 - 3:13 pm

समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥

इसरोच्या वैज्ञानिकांनी तिरुपति येथे जाऊन भगवंताचे आशीर्वाद चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी घेतले. ते वैज्ञानिक होते, तरीही त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले ही बातमी वाचल्यावर अनेक अतिविद्वान लोकांच्या पोटात दुखू लागले। स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या अतिविद्वानांनी सोशल मीडियावर देशाचा मान सम्मान वाढविणार्‍या वैज्ञानिकांची खिल्ली उडविन्याचा दारुण प्रयास केला. "सत्यासाठी शिरले असत्याच्या गाभार्‍यात" अशाही टिप्पणी झाल्या. काहींच्या मते हिंदू देवतांची पूजा करणारे वैज्ञानिक नसतात ते फक्त तंत्रज्ञ असतात. हे सर्व वाचून हे लोक मानसिक विकृत असावे किंवा हिंदू धर्म विषयी त्यांच्या मनात अत्यंत द्वेष भरलेला असावा. तरीही वैज्ञानिक कोण हे या लेखात उदाहरण सहित स्पष्ट केले आहे.

दोन दगड़ एकमेकवर आपटले की अग्नि प्रगट होते हे जाणने म्हणजे ज्ञान. विशिष्ट पद्धतिने और विशिष्ट वेगाने आघात केल्याने दगडातून अग्नि प्रगट होतो हे जाणने म्हणजे शास्त्र/ तंत्र. जे लोक या शास्त्रावर प्राविण्य मिळवून अग्नीच्या मदतीने विविध आविष्कार करतात ते शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ.

आता मनात प्रश्न येणे स्वाभाविक आहे, विज्ञान म्हणजे काय आणि वैज्ञानिक कुणाला म्हणायचे? विज्ञान शब्दातच अर्थ दडलेला आहे. विज्ञान म्हणजे विवेक पूर्ण ज्ञान।अग्नीचा उपयोग घरे जाळण्यासाठी होतोआणि अन्न शिजविण्यासाठीही. सौप्या भाषेत ज्या संशोधानांनी समाजाचे आणि मानवतेचे कल्याण होते ते संशोधन करणार्‍यांना वैज्ञानिक म्हणणे उचित. चंद्रयान मोहिमेच्या उद्देश्य समाज आणि मानवतेचे कल्याण असल्याने या मोहिमेशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ हे वैज्ञानिक आहे. असो.

ज्ञात असलेल्या तंत्राचे सर्व गणित अचूक असतांनाही नासाच्या असो, किंवा इसरोच्या अनेक मोहिमी अयशस्वी झालेल्या आहेत. क्रिकेट मध्ये तर हा अनुभव प्रत्येक मॅच मध्ये येतोच. कठीण झेल घेणार्‍या खेळाडू सौपा झेल ही सोडतो. फूलटॉस चेंडूवर ही खेळाडू बाद होतात. स्वत:च्या मेहनती सोबत भगवंतावर विश्वास असेल तर अपयशानंतर ही माणूस निराश होत नाही. पुन्हा जोमाने मेहनत करू लागतो.

आपल्या वैज्ञानिकांचा भगवंतवर आणि स्वत:च्या संशोधनावर विश्वास आहे म्हणून त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jul 2023 - 6:03 pm | कंजूस

विज्ञानात शक्यता अशक्यता,द्वैत वाद सिद्ध झाला आहेच.

वैज्ञानिकांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली ह्यावर बडबड करणे मूर्खपणाचे आहे ह्याबाबत सहमत. कोण आपल्या मोकळ्या वेळात काय करेल ह्यात इतरांचा संबंध नाही.

पण, तुमचे इतर विवेचन, उदा, वैज्ञानिक म्हणजे काय वैगरे फारसे पटले नाही.

तर्कवादी's picture

18 Jul 2023 - 5:58 pm | तर्कवादी

कोण आपल्या मोकळ्या वेळात काय करेल ह्यात इतरांचा संबंध नाही.

सहमत. पण फक्त त्या गोष्टीची विनाकारण प्रसिद्धी व उदोउदो न झाल्यास अधिक उचित झाले असते.

विवेकपटाईत's picture

21 Jul 2023 - 8:22 am | विवेकपटाईत

माझी परिभाषा शंभर टक्के ठीक आहे. Science शब्दाचा अर्थ शास्त्र आहे विज्ञान नाही. विज्ञान शब्दाचा एकच अर्थ निघतो विवेक पूर्ण ज्ञान.

चित्रगुप्त's picture

22 Jul 2023 - 6:20 pm | चित्रगुप्त

प्राचीन भारतीय साहित्यात चार वेद, सहा शास्त्रे (वेदांगे), अठरा पुराणे, चौसष्ठ कला आणि चौदा विद्या असल्याचे सांगितले आहे. यातील 'शास्त्रे' खालीलप्रमाणे:

छन्दः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोSथ पठ्यते | ज्योतिषामयनं चक्षुर्निरूक्तः श्रोत्रमुच्यते|
शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम् | तस्मात् साङ्गमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते |

अर्थात - छंदशास्त्र, कल्पसूत्रे, ज्योतिष, निरुक्त, शिक्षा आणि व्याकरण ही सहा शास्त्रे आहेत. (वेदवाङ्मयाचे अनुक्रमे पाय, हात, डोळे, कान, नाक आणि मुख आहे अशी कल्पना)

हल्लीच्या मराठीत इंग्रजी, फारसी, अरबी, ऊर्दु, कानडी, तेलगु तसेच इतर अनेक भाषांमधील शब्द वापरले जात असल्याने Science ला 'शास्त्र' किंवा 'विज्ञान' म्हणण्यापेक्षा 'सायन्स' च म्हणणे जास्त उपयुक्त ठरावे.
भारतीय संस्कृतीत 'शास्त्र' आणि 'विज्ञान' या दोन्हीचे अर्थ 'सायन्स' पेक्षा वेगळे आहेतसे दिसते. याविषयी जालावर शोध घेता डोके चक्रावून जाईल येवढी विविध मते मांडलेली दिसतात. त्यापेक्षा मराठीत रूढ अनेक इंग्रजी शब्दांप्रमाणे 'सायन्स' म्हणणे सोपे.