रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची
ओवी ज्ञानीयाची.
आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय? ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्यांचा बाजार भरतो. समर्थांच्या शब्दांत "शास्त्रांचा बाजार भरलाl देवांचा गल्बला जालाl लोक कामनेच्या व्रतालाl झोंबोन पडतीl आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते.
समाजात धर्माच्या बाबतीत माजलेला गोंधळ पाहून संत निवृतींनाथांनी संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठी भाषेत प्रगट करण्याची आज्ञा दिली. आता भगवद्गीताच का? हा प्रश्न मनात येणारच. वेद, उपनिषद यांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता माणसाच्या मनातून भय, भ्रम, संशय, निराशा दूर करते. आत्मग्लानि आणि अकर्मण्यतेने ग्रस्त माणसाला स्वकर्तव्य, स्वधर्माची जाणीव करून देते. माणसाला निष्काम कर्म आणि अखंड पुरुषार्थ करत जगण्याचा मार्ग दाखविते. ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले. अनेक संतांनी आणि प्रवचनकारांनी वेदांचे ज्ञान महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात पोहचविले. दुसर्या शब्दांत रेडा वेद गायन करू लागला होता.
आज ही तीच परिस्थिति आहे. हजारो पंथ आणि धर्म आहेत. चमत्कारांच्या गाथा आहेत. या शिवाय सरकार मान्य गेमिंग एप ही आहेत. आयपीएल वर पैसा लावा, दोन कोटी मिळवा. जिंकणार्यांच्या नावांचा उदो-उदो होतो. कोट्यवधी युवा मेहनत मजूरी सोडून विभिन्न गेमिंग खेळयांत त्यांच्या जवळ असलेला पैसा ही कोट्यधीश बनण्याच्या लालसेने उडवीत आहे. चमत्कार होईल या आशेने कथा पारायण, नवस बोलत आहेत, कधी तरी नशीब उघडेल या आशेने. देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.(राशन पाणी सरकार फ्री देतेच, मग काम करायची गरज काय). जेंव्हा माणूस स्वकर्तव्य आणि स्वकर्म विसरून जातो त्याच्या नशिबी उपासमार, गरीबी आणि भूक येणारच. थोडक्यात आज ही भगवद्गीतेचा संदेश पुन्हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र पोहचविण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
29 Jun 2023 - 12:53 pm | इपित्तर इतिहासकार
म्हणे पर्यंत एकदम शेवटचा परिच्छेद वाचला.
एकंदरीत ज्ञानेश्वरी संबंधी विवेचन आवडले. ज्ञानेश्वरीचा संदेश लोकांच्यापर्यंत पोचवला पाहिजे हे पण खरे, पण मध्येच गेमिंग ॲप, नवी पिढी, सरकारने दिलेल्या सवलती इत्यादी का घुसले ते मला समजले म्हणता येणार नाही त्यामुळे पटले का नाही पटले ते पण म्हणत नाही.
असो, कळकळ आहे बरी तुमची पण नेमकं म्हणायचं काय आहे ते जास्त सुस्पष्ट केल्यास अजून रंगत येईल.
पुलेशु
ई. ई.
29 Jun 2023 - 1:01 pm | अहिरावण
>>>देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.
काहिही हं... पटाईत
29 Jun 2023 - 1:14 pm | अहिरावण
>>>आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला.
हो.......लहानपणी
>>आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही.
मला अनेक माणसे रेड्यासारखे बोलणारी माहित आहेत
>>मग या कथे मागचे सत्य काय?
अफवा, भ्रम, लोकवदंता...
>>ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते.
आजही अनेकांना "नीट" लिहिता वाचता येत नाही
>>संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्या माणसाला.
आज तेवढे पण नाही
>>दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते.
पालीत होते, अर्धमाग्धीमधे होते
>>आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते.
आज तरी कुठे कळते
>>अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्यांचा बाजार भरतो. समर्थांच्या शब्दांत "शास्त्रांचा बाजार भरलाl देवांचा गल्बला जालाl लोक कामनेच्या व्रतालाl झोंबोन पडतीl आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते.
आजही तेच आहे. काही फरक पडला का समर्थांच्या उप्देशाचा? काही नाही...
मनुष्याचा मुलभुत स्वभाव आराम करणे हा आहे.. पर्य्याय नाही म्हणून काम करावे लागते.
>>समाजात धर्माच्या बाबतीत माजलेला गोंधळ पाहून संत निवृतींनाथांनी संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठी भाषेत प्रगट करण्याची आज्ञा दिली.
ओके
>>आता भगवद्गीताच का? हा प्रश्न मनात येणारच.
नाही आला
>>वेद, उपनिषद यांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता माणसाच्या मनातून भय, भ्रम, संशय, निराशा दूर करते. आत्मग्लानि आणि अकर्मण्यतेने ग्रस्त माणसाला स्वकर्तव्य, स्वधर्माची जाणीव करून देते. माणसाला निष्काम कर्म आणि अखंड पुरुषार्थ करत जगण्याचा मार्ग दाखविते. ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले. अनेक संतांनी आणि प्रवचनकारांनी वेदांचे ज्ञान महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात पोहचविले. दुसर्या शब्दांत रेडा वेद गायन करू लागला होता.
म्हणजे समाज सुधारला होता की काय? मग तुकाराम, एकनाथ, रामदासाला का आपली लेखणी झिझवावी लागली?
>>आज ही तीच परिस्थिति आहे. हजारो पंथ आणि धर्म आहेत. चमत्कारांच्या गाथा आहेत.
म्हणजे रेडा गायला त्याचा उपयोग नाहीच... रेडा रेकलाच
>> या शिवाय सरकार मान्य गेमिंग एप ही आहेत. आयपीएल वर पैसा लावा, दोन कोटी मिळवा. जिंकणार्यांच्या नावांचा उदो-उदो होतो. कोट्यवधी युवा मेहनत मजूरी सोडून विभिन्न गेमिंग खेळयांत त्यांच्या जवळ असलेला पैसा ही कोट्यधीश बनण्याच्या लालसेने उडवीत आहे. चमत्कार होईल या आशेने कथा पारायण, नवस बोलत आहेत, कधी तरी नशीब उघडेल या आशेने. देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.(राशन पाणी सरकार फ्री देतेच, मग काम करायची गरज काय).
काहिही हं... श्री पटाईत
>> जेंव्हा माणूस स्वकर्तव्य आणि स्वकर्म विसरून जातो त्याच्या नशिबी उपासमार, गरीबी आणि भूक येणारच. थोडक्यात आज ही भगवद्गीतेचा संदेश पुन्हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र पोहचविण्याची गरज आहे.
काही उप्योग होईल असे नाही
29 Jun 2023 - 1:39 pm | साहना
२०२३ मध्ये १९७३ च्या तुलनेत कमी उपासमार भूक इत्यादी आहे. त्यामुळे भारतीय समाज गीतेच्या धार्मिक मार्गावर वेगाने मार्गक्रमण करत आहे असे आम्ही समजायचे का ?
आखाती देशांत ह्याऊन चांगली परिस्थिती आहे. तिथे तर GST सुद्धा नाही आणि IT सुद्धा नाही त्यामुळे त्यांनी भगवद्गीता कदाचित कोळून पिली असेल आणि कर्मयोग आत्मसात केला असेल !
29 Jun 2023 - 1:46 pm | अहिरावण
>>>>आखाती देशांत ह्याऊन चांगली परिस्थिती आहे. तिथे तर GST सुद्धा नाही आणि IT सुद्धा नाही त्यामुळे त्यांनी भगवद्गीता कदाचित कोळून पिली असेल आणि कर्मयोग आत्मसात केला असेल !
The UAE does not levy income tax on individuals. However, it levies corporate tax on oil companies and foreign banks. Excise tax is levied on specific goods which are typically harmful to human health or the environment. Value Added Tax is levied on a majority of goods and services.
बोल्ड केलेले शब्द हे जीएसटीला पर्यायवाचक आहेत असे आमचे अल्प ज्ञान आहे. बाकी हे फक्त एकाच देशाबद्दल आहे.
बाकी देशांबद्दल आपण शोध घ्या आणि आपले वाक्य तपासा किंवा भारताबद्दल ओकणे चालू ठेवा... गेट वेल सुन
30 Jun 2023 - 2:19 am | साहना
GST हा मानवी इतिहासातील मैलाचा दगड आहे. म्हणजे सापेक्षतावादाचा सिंद्धांत नंतर क्लिष्ट अशी काही थेअरी मानवाने निर्मित केली असेल तर ती म्हणजे भारतीयांचा विश्वगुरू छाप GST. कृपया इतर देशांतील फुटकळ २-१०% टॅक्स ची तुलना GST सारख्या इंद्रजालाशी करणे म्हणजे राहुल गांधींनी बालपणी काढलेल्या सूर्योदयाच्या चित्राची तुलना किंवा ममता बॅनर्जी ह्यांच्या म्हातारपणात काढलेल्या चित्रांची तुलना तेजोमहालय शी करण्यासारखे आहे. पेन्सिल शार्पनर वर किती टक्के GST असावा आणि तो पेन्सिल आणि खडूरब्बर च्या तुलनेत वेगळा का असावा ह्यावर सखोल चिंतन करून प्रति ब्रहस्पती साक्षांत निम्मोकाकू ह्या चिरकूलर (सरकुलर) काढतात. अशी कार्यकुशलता तुम्हाला पृथ्वीतलावर कुठे मिळेल ?
असो. लोक उगाच मी हायजॅक वगैरे करत आहेत म्हणून ओरडा करताहेत त्यामुळे आणखीन इथे लिहिणार नाही. (असे नाही कि मी कमेंट नाहीटाकला तर मिपावरचे ऋषीवृंद इथे ज्ञानामृताचे कण उधळतील).
29 Jun 2023 - 1:41 pm | साहना
> माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्यांचा बाजार भरतो.
https://www.youtube.com/watch?v=6-IzKRCt4fU&t=13s
29 Jun 2023 - 7:11 pm | सर टोबी
सहसा पुरुष देखील वापरणार नाहीत अशी ग्राम्य भाषा आणि काँग्रेस सरकारच्या कारभाराचं टोकाचं अतिरेकी चित्रण हे साहना यांच्या लिखाणाचं वैशिष्ठ्य. काँग्रेसच्या समाजवादी अर्थकारणाला काही वैचारीक बैठक होती. ती कुणाला अमान्य असण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याचे फायदे नाकारण्याचा कृतघनपणा अमान्य आहे. दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर अजून एका गुलामगिरीत नको अडकायला या दृष्टिकोनातून परकीय गुंतवणूक जास्त नियंत्रित असणं, परकीय चलन उपयुक्त गोष्टींसाठीच वापरलं जावं म्हणून चैनीच्या वस्तू आयात न होणं अशी कारणं होती. पण काँग्रेसला झोडपायचंच असा उद्देश असल्यावर काय करणार.
तिकडे विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी संतांनी जी व्याकुळ होऊन काव्य लिहिली तशी पटाईतांचीं मोदी भक्तिमय अवस्था. त्यात सत्य कमी आणि भक्तीच जास्त.
असो. राजकीय चर्चांचं मुख्य व्यासपीठ बंद आहे पण मोरीला बोळा नसल्यामुळे असे चर्चारूपी बारीक सारीक उंदीर सुखनैव बागडतायत!
29 Jun 2023 - 8:28 pm | इपित्तर इतिहासकार
How sexist is that ! फक्त साहना ह्यांच्याप्रती नाही तर पुरुष अन् शिवराळ भाषेप्रती सुद्धा !!
"पुरुष सुद्धा वापरणार नाहीत" ह्या गृहितकात पुरुष मनसोक्त शिवीगाळ / फालतू भाषा वापरतात असे ध्वनित झाले.
ह्यात
१. साहनाजीना stereotype करण्यात आले
२. भाषेला stereotype करण्यात आले
३. पुरुषांना stereotype करण्यात आले
असे म्हणायला फुल स्कोप आहे, बाकी तुम्ही म्हणले ते बरोबर का चूक ह्यावर मी माझे मत तूर्तास राखीव ठेवतो
30 Jun 2023 - 2:11 am | साहना
> ग्राम्य भाषा
म्हणजे नक्की काय ? ग्रामीण प्रकारची भाषा ? (अर्वाच्य/अश्लील/द्विअर्थी प्रकारचे मी कधीच लिहिले नाही).
आणि पुरुष ग्रामीण भागांत कसली भाषा वापरतात हे ऐकून ठाऊक आहे त्यामुळे त्याच्याशी माझ्या भाषेची तुलना हि अतिरंजित नाही का ? माझे मुद्दे पटत नसेल वगैरे तर सर्व ठीक आहे पण भाषा प्रयोगांत मी कुठे मर्यादा सोडली आहे ?
बरे काँग्रेस सरकारला नावे ठेवणारी मी काही पहिली नाही. एका अत्यंत घाणेरड्या गवताला सामान्य लोकांनी "काँग्रेस गवत" हे नाव आपणहून ठेवले ह्यातंच काँग्रेस च्या कारभाराची इतिश्री आहे.
> काँग्रेसच्या समाजवादी अर्थकारणाला काही वैचारीक बैठक होती. ती कुणाला अमान्य असण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याचे फायदे नाकारण्याचा कृतघनपणा अमान्य आहे.
पहा आम्ही तुम्हाला पाण्यात बुडवून मारले, जीव गेला हे नुकसान मान्य असले तरी ह्यापुढे तुम्हाला पोट भरायची गरज नाही हा फायदा लक्षांत न घेता बुडवणार्या माणसापुढे लोळण न घेणे हा कृतघ्न पणा नाही तर आणखीन काय ?
काँग्रेस च्या तथाकथित समाजवादी विचारांना कसलीही वैचारीक बैठक नव्हती. सत्ता आपल्या हातात केंद्रित आणि मलिदा खाणे ह्यालाच जर वैचारिक बैठक तुम्ही म्हणत असाल तर मग आणखीन काही बोलू शकत नाही. वरील आणीबाणी चा संपूर्ण लेख तेच तर स्पष्ट करतो आहे.
> दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर अजून एका गुलामगिरीत नको अडकायला या दृष्टिकोनातून परकीय गुंतवणूक जास्त नियंत्रित असणं, परकीय चलन उपयुक्त गोष्टींसाठीच वापरलं जावं म्हणून चैनीच्या वस्तू आयात न होणं अशी कारणं होती.
थोडक्यांत आपल्या नागरिकांची अवस्था गुलामापेक्षाही खराब करून ब्रिटिशांनी जसा देश सोडला होता त्यापेक्षाही दळिद्री करून सोडला आणि वरून उपकाराची भाषा. आणि इकडे परदेशी चैनीच्या वस्तू फुंकत हे फुकटचे ज्ञान आम्हा गरिबांना पेलायचे.
> पण काँग्रेसला झोडपायचंच असा उद्देश असल्यावर काय करणार.
काँग्रेसला लोकांनीच लत्ताप्रहार करून आधीच रस्ता दाखवला आहे.
> तिकडे विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी संतांनी जी व्याकुळ होऊन काव्य लिहिली तशी पटाईतांचीं मोदी भक्तिमय अवस्था. त्यात सत्य कमी आणि भक्तीच जास्त.
मेह ! महामानवांच्या विरोधांत माझ्यापेक्षा जास्त ह्या फोरम वर कुणी लिहिले असेल तर दाखवा.
29 Jun 2023 - 7:44 pm | कंजूस
आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते.
30 Jun 2023 - 6:41 am | चौकस२१२
यातील ग्राम्य कि कशी भाषा , पुरुष सुद्धा वापरतील... , एखाद्या पक्षाला झोडपणे / भक्त असणे किंवा नसने वैगरे सगळे बाजूला ठेवूया कारण ते अप्रुस्तुत आहे
,, मूळ प्रश्न जो मांडलं गेलं आहे त्याच बोला "दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर अजून एका गुलामगिरीत नको अडकायला या दृष्टिकोनातून परकीय गुंतवणूक जास्त नियंत्रित असणं, परकीय चलन उपयुक्त गोष्टींसाठीच वापरलं जावं म्हणून चैनीच्या वस्तू आयात न होणं अशी कारणं होती. "
हि सुरवातीची थोडातरी गरज होती नाही का?
तसेच लगेच फायदा ना देणाऱ्या परंतु देश स्वावलंबी होण्यासाठी जरुरी असलेलया गोष्टीवर सरकारला खर्च करावा लागतो हे हि तुम्हाला मान्य नाही का
अर्थात त्याचाही अतिरेक झालं हे वादातीत आहे(एअर इंडिया - रेल्वे इत्यादी ) पण मुळात सगळंच खुले सोडले असते तर टाटा गोदरेज आणि किर्लोस्कर कदाचित उभेच राहू शकले नसते ...
तुफान मेल सारखा घुसून तुम्ही सगळंच बेकार असे म्हणताय यावर लोक अचंबित झाले आहेत
आणि यात लिहिणारा / री भारतात राहतो कि नाही याचा काही संबंध लावू नये ती व्यक्ती काय म्हणते आहे आणि हेतू काय दिसतोय यावर सगळे असते
5 Jul 2023 - 6:01 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद देणार्य सर्वांना धन्यवाद.
6 Jul 2023 - 10:45 am | nutanm
छान लेख व. प्रतिसाद . इथे यावरून मला मात्र एक सुंदर गाणे आठवते ते कॄषण अर्जुनाला म्हणतोय, " विमोह त्यागून करमफलांचा सिद्ध होइ पार्था , करतवयाने घडतो माणूस जाणून घे. पुरुषार्था" व शेवटी सुधीर फडकयांनी स्वर उंचावून म्हटलंय " मीच मोडित़ वितोवितो मीच घडवितो
6 Jul 2023 - 11:17 am | nutanm
शेवटची ओळ लिहिण्यात चुकलेय " मीच घडवितो मीच मोडतो उमज आता परमार्था " अतिशय सुंदर गाणे बाबूजी सुधीर फडके यांचे फार मोठा न उडणारा आवाज पण उत्तम चढविलाय शेवटच्या दोन कडव्यात. व ऐकताना मला नेहमी फार सुंदर भरून आलेले वाटते. असा ताल ही छान आहे. शेवटी ही माणसे खूप मोठ्या उंचीची बाबूजी आपल्या जागी, शाहीर साबळे यांचया इतका खडा आवाज कोणाचाच नाही , हॄदयनाथ त्यांच्या परीने श्रेष्ठ.किती उदाहरणे सांगावीत तेवढी थोडीच.
6 Jul 2023 - 11:22 am | nutanm
सुधीर फडके यांचा न. ऐवजी न उडणारा नाही न चढणारा आवाज म्हणायचंय चुंभू.द्यावी घ्यावी.
11 Jul 2023 - 12:38 pm | चौथा कोनाडा
भगवद गीता सोडा, ज्ञानेश्वरी उलगडून सांगणारे शेकडो ग्रंथ आजवर प्रकाशित झाले, अजूनही होत असतात. रेडे हा आजही समाजाचा भाग आहेत.. आज ही रेड्यांच्या मुखातून वेद वदवणाऱ्याची गरज आहे