गाठोडं

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
7 May 2009 - 12:12 pm

काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन
आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून !

जतन करावी एखादी ओळ गाण्याची
रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची !

स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं,
दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं !

जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी,
खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी !

लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ,
उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं !

आठवणीत ठेवावी एखादी कथा,
योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा !

स्मरणात ठेवावी एखादी मैत्री,
साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

7 May 2009 - 12:17 pm | सायली पानसे

मस्त आहे कविता.

सहज's picture

7 May 2009 - 12:18 pm | सहज

जतन करावी एखादी ओळ गाण्याची
रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची !

रवंथ आवडले!

अवलिया's picture

7 May 2009 - 12:20 pm | अवलिया

क्या बात है !!
मस्त !!

--अवलिया

पाषाणभेद's picture

7 May 2009 - 12:25 pm | पाषाणभेद

स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं,
दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं !

यानेच दु:ख हलके होते. मस्तच.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता's picture

7 May 2009 - 12:25 pm | अनंता

कृतज्ञतेचं गाठोडं उघडल्याबद्दल.
तुझ्याशी निष्कपट,निर्व्याज , निर्मळ मैत्री करायला आवडेल!

(तरल मनाचा)- अनंता
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

सँडी's picture

7 May 2009 - 1:10 pm | सँडी

अप्रतिम!!!

लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ,
उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं !

मस्तच!

-संदीप.
काय'द्याच बोला.

प्राजु's picture

7 May 2009 - 8:32 pm | प्राजु

आवडली कविता.
मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

7 May 2009 - 9:42 pm | क्रान्ति

सगळीच कविता मस्त. त्यातल्या त्यात या ओळी खूप भावल्या.
स्मरणात ठेवावी एखादी मैत्री,
साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !
अवांतर :-मुझसे दोस्ती करोगी? :)

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

जागु's picture

8 May 2009 - 10:58 am | जागु

सायली, सहज, अवलिया, पाषाणभेद, अनंता, सँडी, प्राजू, क्रांती. तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.