कुटचलनाची बाराखडी----ब्लॉक-चेन

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
21 Jun 2023 - 5:54 pm

नमस्कार मंडळी
माझ्या मागच्या एका लेखात कुटचलनाबद्दल थोडी माहिती दिली होती. पण कुटचलन हे ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे आले किंवा ज्यावर ते आधारित आहे , त्या ब्लॉकचेन बद्दल काही लिहायचे राहून गेले होते. ते आपण इथे पाहूया. जसे आपल्याला झेरॉक्स म्हटले की समजते पण खरेतर "फोटो कॉपियर" हे त्या तंत्राचे मूळ नाव आहे आणि झेरॉक्स ते बनवणारी एका कंपनी. तसे ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे आणि बीटकॉइन हे ब्लॉकचेनवर आधारलेले एक कुटचलन.

मागच्या लेखाचा दुवा
कुटचलनाची बाराखडी

तर मुळात ब्लॉकचेन काय आहे ? तर ते एक उघडे इलेक्ट्रॉनिक पुस्तक आहे, जे कोणीही बघू शकते, पण त्यात फेरफार करू शकत नाही.

ज्यांना बँक कसे काम करते हे माहित असेल त्यांना लेजर सिस्टीम सुद्धा माहित असेलच. समजा ए च्या खात्यातून बी च्या खात्यात १०० रुपये गेले, आणि सी च्या खात्यातून बी ला २०० रुपये मिळाले .तर बँकेच्या लेजरमध्ये त्याची सर्व नोंद होते.असे दिवसाभराचे व्यवहार सुद्धा लेजरमध्ये डेबिट किंवा क्रेडिट च्या स्तंभात नोंदले जातात.याला डबल एंट्री म्हणतात. पण हे व्यवहार फक्त बँकच बघू शकते. कारण इथे बँक ही मध्यस्थ आहे. बँकेचा या व्यवहारांवर पूर्ण कंट्रोल आहे. पण हे व्यवहार जर कोणी खोडले तर? तर होणार गोंधळ टाळायला ट्रिपल एंट्री पद्धत वापरली जाते. ज्यात आपण असे समजू की कुठेतरी दूर या होणाऱ्या व्यवहारांचा मागोवा ठेवला जातो. म्हणजे त्यांची विश्वासार्हता वाढते. आता जर हे व्यवहार बँकेशिवायच करायचे झाले तर ते विश्वासार्ह होण्यास काय करावे लागेल? इथे ब्लॉकचेन कामास येते.

ब्लॉकचेन हे बँकेपेक्षा अजून एक पाऊल पुढे जाऊन काम करते. म्हणजे ए माणसाने बी ला १०० रुपये दिले, या व्यवहाराचा एक इलेक्ट्रॉनिक ब्लॉक तयार होतो. त्याला एक युनिक हॅश किंमत दिली जाते. हा ब्लॉक मग त्या ब्लॉकचेन मध्ये सहभागी असणारे सगळे नोड (म्हणजे संगणक) तपासून बघतात आणि तो योग्य असल्याचा निर्वाळा देतात. आणि मग तो ब्लॉक साखळीत म्हणजे ब्लॉकचेनमध्ये जोडला जातो. अशा पहिल्या ब्लॉक ला जेनेसिस ब्लॉक म्हणतात. पुढच्या व्यवहारात बी ने सी ला २०० रुपये दिले. त्याचा नवा ई- ब्लॉक तयार होतो, पण या दुसऱ्या ब्लॉक मध्ये आधीच्या ब्लॉकची माहिती हॅश सकट असते. आता समजा असेच व्यवहार होत राहिले, तर प्रत्येक ब्लॉक मध्ये आधीच्या सगळ्या ब्लॉकची माहिती-साखळी असेल. आणि ब्लॉकचेनचा भाग असणाऱ्या सगळ्या संगणकांकडे तीच माहिती-साखळी असेल. आता समजा कोणीतरी या साखळीत मधेच घुसून एका ब्लॉकमध्ये फेरफार केला , तर तिथपासून पुढची साखळी करप्ट होईल . म्हणजे सगळ्या संगणक नोड्स कडे जी माहिती आधीपासून आहे, त्याच्याशी हे डिटेल्स जुळणार नाहीत, आणि तो ब्लॉक व त्यापुढचे ब्लॉक किंवा साखळी कोणीच ग्राह्य धरणार नाही. थोडक्यात हे फेरफार लगेच पकडले जातील आणि इन-व्हॅलिड केले जातील.

पण हे सर्व झाले फक्त चलनाच्या किंवा देवाण घेवाणीच्या बाबतीत. पण सामान्य माणसाला याचा काय उपयोग? तर असे अनेक व्यवहार असतात की ज्यात देणारा आणि घेणारा समोरासमोर नसतात किंवा असले तरी त्यांना एकमेकांबद्दल विश्वास नसतो अशा ठिकाणी ब्लॉकचेन काम करते
--स्मार्ट काँट्रॅकट-दोन माणसे किंवा कंपन्यांमध्ये जे काँट्रॅक्त्त कागदावर होते, त्याला हा इलेक्ट्रॉनिक पर्याय आहे.
--सायबर सुरक्षा -या पद्धतीत विदा म्हणजे डेटा अनेक ठिकाणी विखरून ठेवलेला असल्याने हॅकर ला तो चोराने आणि त्यात फेरफार करणे खूप अवघड असते.
--इंटरनेट ऑफ थिंग्स - जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केला जातो आणि तो वापरून निष्कर्ष काढले जातात तिथे ब्लॉकचेन उपयोगी पडते. एक उदाहरण म्हणजे समजा एखाद्या ग्रीन हाउस मध्ये दर मीटरवर सेन्सर लावून तापमान, आर्द्रता वगैरे मोजले जाते आणि प्रत्येक मिनिटाला ते सर्व्हरकडे पाठवून किती पाणी द्यायचे, किती ऑक्सिजन पाहिजे वगैरे ठरवले जाते तिथे हा डेटा सतत सेन्सर कडून सर्व्हरला जाताना तो करप्ट होऊ नये म्हणून ब्लॉकचेन कामी येते.
-क्रिप्टो करन्सी- हे तर बिट कॉईन मुले आपल्याला माहीतच आहे.
--एन एफ टी- नॉन फंजिबल टोकन्स-- म्हणजे एखाद्या वस्तूचा युनिक टॅग. समजा मी मित्राकडून ५ रुपयाचे नाणे घेऊन त्याला ५ रुपयाची नोट दिली तर ते झाले फंजिबल टोकन. पण मी त्याऐवजी त्याला जर एका कागदावर कोड लिहून दिला ,जो तो जगात कुठेही वापरू शकेल तर ते झाले नॉन फंजिबल टोकन.
जमिनीची दस्त नोंदणी- एखादी मालमत्ता खरेदी करताना आपण सर्च रिपोर्ट काढतो आणि टायटल क्लिअर आहे ना ते बघतो. ब्लॉकचेन मुळे प्रत्येक मालमत्तेला एक युनिक टॅग येईल ज्यामुळे तिचा पूर्ण इतिहास एका टिचकीवर समजेल.
फळे आणि शेतमाल- युरोपमध्ये अनेक ठिकाणी फळे किंवा भाज्या विकताना त्यावर ब्लॉकचेन वापरून तयार केले कोड वापरणे बंधनकारक आहे. हा कोड स्कॅन केल्यास ती भाजी/फळ कुठून आले, त्यावर किती कीटकनाशके फवारली , पेरणी,कापणी वगैरे कधी झाली सगळे समजते.

मी तर ऐकले आहे की आजकाल रिझर्व्ह बँकही इतर बॅंकांमधले सेटलमेंट ब्लॉकचेन वापरून करते. जाणकारांनी प्रकाश टाकावा. तर असे हे आपल्या आयुष्याला सर्वांगाने भिडलेले ब्लॉकचेन तंत्रज्ञान. जितके सोपे करून सांगता येईल तितके सांगितले आहे. आवडल्यास प्रतिक्रियेतून जरूर कळवा.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Jun 2023 - 8:48 pm | कर्नलतपस्वी

घेण्याचा प्रयत्न करतो.

चौकस२१२'s picture

22 Jun 2023 - 6:13 am | चौकस२१२

तंत्रन्यानाबद्दल चांगली माहिती दिलीत .. दुर्दैवाने लोक हे तंत्र आणि त्यावर आधारित हे जे काही क्रिप्टो करन्सी चे विष/ विश्व निर्माण झाले आहे त्यात गफलत करतात
तंत्र उपयोगी असेल यात शंका नाही पण क्रिप्टो जे काही फॅड आहे त्यात अनेक लोक अडकणार आहेत .. सध्या कोईनबेस आणि बियांस यावर अमेरिकेचं एस ई सी ( सेबी ची अमेरिका आवृत्ती) कडक कररवाई केली आहे .. बघू काय होते ते सध्या तरी वाइल्ड वाइल्ड वेस्ट असे चित्र आहे
मुख्य मुद्दा असा आहे कि
स्टोक मार्केट मध्ये एखाद्या उद्योगाला जर आम जनते कडून पैसे उभे करायचे असतील तर त्यांना कठीण अश्या "चाळणी तुन जावे लागते (आय पी ओ ) मग तशीच देखरेख क्रिप्टो टोकंन / कॉईन उभे करणाऱ्यांवर का नसावी? २ पानाचा "व्हाईट पेपर निर्मण" करून अशी चाळणी / देखरेखीतूनयातून सुटका हवी आहे .... चापलुसी

खरे तर जगात ज्या ७ + भारतीय रुपया हि मान्य अशी चलने आहेत ती आटा डिजिटलच आहेत . काही वर्षांपूर्वी युरो निर्माण झाले .. याला कारण त्यामागे अनेक देशाचे पाठबळ होते... या हजारो " कॉईन च्या मागे कसले आहे पाठबळ ? पोकळ हवा

याशिवाय एफटी क्स / माऊंट गोथ , तसेच तो कानडिअन माणूस १३० कि किती मिलियन क्रिप्टो घेऊन भारतात " गुल " झाला .. याउलट मान्यवर एक्सचेन्ज कधी बुडाली असे झालाय का ? BSE/NSE/ NYSE. SGX. ASX/ CME/ CBOE /LSE

चौकस२१२'s picture

22 Jun 2023 - 6:21 am | चौकस२१२

शंका
१) स्मार्ट काँट्रॅकट-दोन माणसे किंवा कंपन्यांमध्ये जे काँट्रॅक्त्त कागदावर होते, त्याला हा इलेक्ट्रॉनिक पर्याय आहे. यात जरी असे कॉन्ट्रॅक्ट झाले तरी प्रत्यक्ष वस्तूंची देवन घेवाण आणि त्यातील धोके हे आहेतच
२) क्रिप्टो मध्ये फोर्किंग होते म्हणजे काय? त्याचा फायदा तोटा कोणाला होतो? शेअर स्प्लिट सारखे आहे का हे? मुळात जर फक्त अमुक अमुक बिटकॉईनच जर निर्माण होणार असे होते म्हणे तर हि काय भानगड?
३) स्टेबल कॉईन हणजे नक्की काय आणि कशाला? यु एस दि टी कसलं सरळ यु एस दि वापरा कि
४) जगमान्य चलन " एक प्रोमिसरी नोट असते सरकारने दिलेली" क्रिप्टो मध्ये अशी कोण जबाबदारी घेत नाही मग त्यात "स्टोरेज ऑफ व्हॅल्यू " कशी काय?
५) बिटकॉइन "जगन्मान्य "आहे असे गृहीत धरेल पण तशी म्हणे एकूण २००० कोण आहेत मग त्यांचे काय? शेवटी एक गोबल करन्सी नाहीच कि
६) रोज जीवनात चहाला भाऊ शून्य पूर्णांक शून्य शून्य ....... ५ बिटकॉइन द्या हे त्रांगडे कोण करणार !

१. काहीसे बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्ट कागदोपत्री काय किवा ईलेक्ट्रॉनिक काय, पाळणे/न पाळणे शेवटी आपल्या हातात आहे. नाहीतर दाद मागायला कोर्ट आहेच.
२. फोर्किंग-- ब्लॉक चेन मध्ये २ प्रकारे फोर्किंग होते. सॉफ्ट आणि हार्ड. समजा एखादी ब्लॉक चेन तयार होऊन पुढचे पुढचे ब्लॉक जोडले जात आहेत आणि १०० ब्लॉक झालेत, पण मधेच लक्षात आले की ९१ व्या ब्लॉक मधे गडबड किवा काहितरी संशयास्पद आहे. तर सर्वानुमते निर्णय घ्यावा लागतो की ती गडबड काढुन टाकण्यासाठी कसे फोर्किंग करावे, थोडक्यात नव्वदाव्या ब्लॉकपासुन पुन्हा चेन चालु करावी(म्हणजे १० ब्लॉक पुसुन टाकावेत--हार्ड फोर्क) की आहे ती चेन चालु ठेवुन नव्वदाव्या ब्लॉक पासुन अजुन एक फाटा फोडावा (सॉफ्ट फोर्क) म्हणजे दोन चेन समांतर चालत राहतील.
३.स्टेबल कॉईन- हा जरा वेगळा विषय आहे. तरीही असे म्हणुया की बिटकॉइन सारख्या कूटचलनातील भयानक चढ उतार आणि त्यातील धोके/रिस्क टाळण्यासाठी स्टेबल कॉइन आली. ही कॉइन कुठल्यातरी एका स्थिर वस्तूच्या किमतीशी जोडलेली असल्याने त्यात मर्यादित चढ उतार होतात. उदा. एखादे स्टेबल कॉइन सेन्सेक्स किवा निक्केई किवा एन वाय एस ई अशा ईंडेक्स शी जोडलेले असेल तर हा ईंडेक्स जितका वरखाली होईल त्याच प्रमाणात या कॉइनची किंमतही बदलेल. म्हणजे त्या बदलाला काहीतरी आधार असेल.

b

४. या प्रश्नाचे उत्तर एखादा अर्थतज्ञच देउ शकेल, मी फारतर अर्थसाक्षर आहे, तज्ञ नाही.
५. हे ही तसेच अर्थशास्त्राशी निगडीत आहे, पण मुद्दा बरोबर आहे की या हजारो चलनांची स्वतःची योग्य किंमत आणि एकमेकांशी गुणोत्तर कसे लावायचे हा प्रश्नच आहे.
६. हम्म. खरे आहे. पण तसे तर कोपर्‍यावरचा चहावाला डॉलर किवा युरो पण घेणार नाही, कारण ते बदलुन घेण्यासाठी होणारी कटकट कोण करेल? अर्थात भविष्यात कूटचलनाला मान्यता मिळेलही, कोणास ठाउक. पण तोवर तरी हा मुद्दा बरोबर आहे.

ही कॉइन कुठल्यातरी एका स्थिर वस्तूच्या किमतीशी जोडलेली असल्याने त्यात मर्यादित चढ उतार होतात.

आपल्याच एका दुसऱ्या उत्तम चलती असलेल्या दुसऱ्या कॉइन किंवा टोकनशी हे चलन जोडून त्याला स्टेबल कॉइन दर्जा द्यायचा असाही प्रयत्न (बराच काळ यशस्वी राहून मग भयंकर फुटलेला) करणारे लोक आहेत. आता हे लोक क्वोन म्हणून विचारू नका. ;-))

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2023 - 12:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुद्दा बरोबर आहे. पण आता तो असेही म्हणणार की मी माझ्या डोक्याने पैसे कमावले. तुम्ही चुxx बनलात हा तुमचा बावळटपणा

https://edition.cnn.com/2023/06/20/business/crypto-boss-do-kwon-sentence...

गवि's picture

22 Jun 2023 - 1:21 pm | गवि

अगदी अगदी..

ही कॉइन कुठल्यातरी एका स्थिर वस्तूच्या किमतीशी जोडलेली असल्याने
हि झाली व्याखया पण प्रत्यक्षात काय?आणि कसे हे पेगिंग होते आणि त्यावर कोणाची नजर?
बर कुटचलनचे चे प्रवक्ते / भक्त आहेत ते एक मोठा सांगतात कि "अनामिकता " ठेवता येते .. पण जेवहा फियाट करन्सी ( म्हणजे जगन्मान्य अशी सरकारने अधिकृत पाठिंबा दिलेले चलन) हे देऊनच तुम्ही कुटचलन घेता तेव्हा आणि परत रोजच्या वापरला कुटचलन देऊन त्याचे फियाट करन्सी रूपांतर करीत तेवहा त्याची नोंद राहतेच कि मग कसली आली आहे डोम्बलाची अनामिकता !

याशिवाय रेगुलेशन नसल्याने अखे एक्सचेंजच बुडणे हा प्रकार आहे ते वेगळेच ,
बार कुटचलनचे चे प्रवक्ते / भक्त आहेत ते एक मोठा सांगतात कि "अनामिकता " ठेवता येते .. पण जेवहा फियाट करन्सी ( म्हणजे जगन्मान्य अशी सरकारने अधिकृत पाठिंबा दिलेले चलन) हे देऊनच तुम्ही कुटचलन घेता तेव्हा आणि परत रोजच्या वापरला कुटचलन देऊन त्याचे फियाट करन्सी रूपांतर करीत तेवहा त्याची नोंद राहतेच कि मग कसली आली आहे डोम्बलाची अनामिकता !
याशिवाय रेगुलेशन नसल्याने अखे "एक्सचेंजच बुडणे" हा प्रकार आहे ते वेगळेच ,

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Jun 2023 - 8:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख ब्लॉक चेन वरती आहे, तुम्ही क्रिप्टो एके क्रिप्टो करुन का मागे लागलाय?

बरे , तुमच्या उत्तरावरुन असे वाटतेय की तुम्ही या विषयातील जाणकार आहात. तसे असेल तर येउंद्या की क्रिप्टो करन्सी ची काळी बाजु लोकांपुढे. टाका एक धागा.

अरे भाच्या माझा हेतू तुझा धागा लंपास करण्याचा नवहता पण ब्लॉक चेन च्या महत्वाखाली सर्वसामान्यांच्या दृष्टितने क्रिप्टो करन्सी हेच येते म्हणून प्रकाश टाकला....
आणि धाग्याचे शीर्षक कुटचलन असे आहे ना ?
असो मी काही यातील ( ब्लॉक चेन आणि क्रिप्टो ) तन्य नाही पण एकूणच ज्याला structured financial product म्हणतात त्यात काय घडामोडी / फिनटेक मधील हालचाली यावर अभयास सतत चालू असतो याशिवाय ब्रोकर जर देशोधडीला लागलं तर काय फ्राड झालाय वैगरे हे प्रत्यक्ष पाहिलंय म्हणून ते अंग विषयानुरूप मांडले एवढेच

जर क्रिप्टो क्रिप्टो माझ्य हातून झाले असले तर मग धागा बदलून ब्लॉक चेन एवढे ठेवा...

चौकस२१२'s picture

22 Jun 2023 - 8:15 am | चौकस२१२

हे पहा
https://www.youtube.com/watch?v=AfChq4-mtAo
उ बर पद्धतीने आधी घुसायचे आणि मग रेग्युलेटर च्या नावाने बॉम्ब मारायाची ! हि वृत्ती दिसते आणि चोराचं उलटया बॉमंबा म्हणजे " रेगुलर ना नवीन टेक्नॉलॉजी कळत नाही "
पैसा हा पैसा असतो . डिजिटल किंवा कसाही

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2023 - 11:45 am | राजेंद्र मेहेंदळे

प्रथम लिंक सविस्तर बघतो , मग सांगतो.

मात्र कुठल्याही तंत्राच्या बाबत हे खरे आहे. तंत्रज्ञान पुढे पुढे पळते आणि नियामक मात्र मागे राहतात. फार लांब कशाला, शेअर बाजारात होणारे घोटाळ वाढल्यानेच त्यावर नियामक म्हणुन नंतर सेबी जन्माला आली ना? किवा सध्या चॅट जी पी टी च्या बाबतीतही हेच चालु आहे. त्याच्या वापराचे नियमच तयार नाहियेत आणि लिक सुस्साट वापरत आहेत.

शिवसागरमध्ये झालेल्या चर्चेत आपण ह्या विषयावर माहिती दिली होतीच. तेव्हाच ह्या लेखमालेचे सूतोवाच झाले होते. येऊ द्यात आता बयाजवार.

आनन्दा's picture

22 Jun 2023 - 10:56 am | आनन्दा

हो, हा लेख खूप त्रोटक आहे
कृपया सविस्तर लेखमाला करावी ही विनंती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2023 - 11:46 am | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद प्रचेतस आणि आनन्दा. खरेतर लेखमाला करायची असा काही विचार डोक्यात नाहीये. पण या संदर्भात काही सुचले तर पुढचा भाग टाकेन.

रंगीला रतन's picture

22 Jun 2023 - 11:26 pm | रंगीला रतन

सोप्या भाषेतली माहिती आवडली.