ही वारी चुकायची नाय

Avinash Anushe's picture
Avinash Anushe in जनातलं, मनातलं
17 Jun 2023 - 2:10 pm

सालाबादा प्रमाणे यावर्षीही IAS (Indo Athletic Society) ची सायकल वारीची तयारी लवकरच सुरू झाली. यावर्षी ठरवले होते की चांगला सराव करून वारी चांगल्या वेगात पूर्ण करायची आणि परंतु लांब पल्याची राईड करणे काही शक्य झाले नाही आणि एक महिना आधी हाताला इजा झाली व सायकल चालवू शकलो नाही आणि रेकी राईडलाही जाता आलं नाही. मग शेवटी ठरवलं की यावर्षी मुख्य वारीच्या राईड मध्ये सगळ्यांबरोबर सहभागी होऊया. परंतु व्यवस्थित स्पीडमध्ये करता येईल की नाही याची खात्री अजिबात नव्हती पण मनाशी खूनगाठ बांधली की काही झाले तरी वारी पूर्ण करायची मागच्या वर्षी जसे तीस किलोमीटर कमी केले होते तसे करायचे नाही.

वारीच्या एक आठवडा आधी २८ मे तारखेला ४२ किलोमीटरची राईड केली हात पुर्ण बरा झाला होता, म्हटलं पाहूया आता मुख्य राईडला. दोन दिवस आधीपासूनच भरपूर पाणी पिऊन व कार्बोहाइड्रेट चा आहार घेऊन तयारी केली.

२ जुनला ऑफिस मधून लवकरच आलो सायकलची तयारी केली, बरोबर न्यायचे सामान जमा केले. सर्व चीज वस्तू तपासून घेतल्या आणि बॅग भरली आणि झोपी गेलो दोन वाजताचा अलार्म झाला तसा उठलो तयारी केली व पावणेतीन वाजता घर सोडले ते पोचलो थेट भक्तीशक्तीला फ्लॅग ऑफ चे ठिकाणी. तिथे सगळे सायकल वारकरी जमा झाले होते अतिशय उत्साहात होते. पूर्णपणे भक्तीमय वातावरण तयार झाले होते. अगदी ती वेळ येऊन ठेपली मग उलटी गिनती सुरू झाली आणि शेवटी IAS चे पदाधिकारी आणि अथिती यांनी झेंडा दाखवून वारीची सुरुवात केली. जसे पेडल मारले तसा एक वेगळाच उत्साह संचारला आणि पंढरपूरच्या दिशेने आगेकूच सुरू झाली. पाहता पाहता नाशिक फाट्याला पोहोचलो सर्व कार्यकर्ते मित्रांना भेटलो आणि तिथलाही फ्लॅग ऑफ झाला आणि काही वेळात हडपसरला पोहोचलो. तिथून काही सायकलिस्ट आधीच निघाले होते सगळ्यांना उन्हाची भीती होती म्हणून बरेच जण फ्लाग ऑफच्या आधीच निघाले होते तिथे आयएएस स्वयंसेवक मित्रांनी पुढे निघण्याचा इशारा केला व मी न थांबताच पुढे निघालो. यावर्षी जवळपास पंधराशे सायकल स्वार होते त्यामुळे पूर्ण रस्ता सायकलींनी भरला होता व हडपसरच्या पुढील सरळ रोडवरती नजर जाईल तिथपर्यंत सायकल्स दिसत होत्या त्यांचे लाल लाईट चमकत होते. एका गतीत पेडल मारत रस्ता कापत होतो चढावा वर जास्त जोर न लावता कॅडन्स वाढवून आरामात एक एक चढ पार केले, उतारावर पेडल न मारता वजनाचा फायदा घेत रिकावरी केली. अगदी आरामात पहिल्या नाश्त्याच्या ठिकाणी पोचलो. नाश्ता करून सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन तिथून निघालो पाटसला काही वेळ थांबलो आणि पाणी पिलो आणि कुरकुंभच्या मोठ्या चढाकडे कुच केली. अगदी आरामात चढ पार केला व उतारावरून फौजी हॉटेलच्या दुसऱ्या मुक्कामी पोहोचलो इथे नाश्ता केला व ३० मिनिटे विश्रांती घेतली रिकव्हारी केली मगच पुढे निघालो

भिगवन पर्यंत अगदी आरामात पोहोचलो तिथे भिगवन सायकलिस्टनी कोकम सरबताची सोय केली होती. दोन-तीन ग्लास सरबत पिऊन पाणी पिऊन पुढे निघालो जसा उतार संपला तसा पहिला मोठा चढ सुरू झाला परंतु शरीरात चांगली ऊर्जा असल्याने आरामात चढ पार केले IAS च्या कार्यकर्त्यांनी हायड्रेशनसाठी जागा अगदी चोख निवडलेल्या होत्या, प्रत्येक दहा ते पंधरा किलोमीटरला पाणी इलेक्ट्रोलाईट ची सोय होती कारण हाच अवघड पल्ला होता. एक एक चढ पार करत इंदापूर बायपासला पोहोचलो शहरातून जाण्याचे ठरले होते त्याप्रमाणे शहराच्या रस्त्याला निघालो, पुढे इंदापूर सायकलिस्टने लिंबू सरबताची सोय केली होती. दोन सरबत घेऊन शेवटच्या सहा किलोमीटरचा पल्ला पार केला व जेवणाचे ठिकाणी पोहोचलो १:२० वाजता. ठराविक वेळेत पाणी इलेक्ट्रोलाइट्स पित होतो आणि हायड्रेशनची ची पातळी बरोबर ठेवली. या योजनेचा अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झाला. आता १६० किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला व चांगल्या ताकतीने तो पूर्ण केला होता याचा खुप आनंद झाला. इथपर्यंत २३ किमी सरासरी वेग आला होता, याचे माझे मलाच आश्चर्य वाटत होते, कारण काही सराव नसताना जानेवारीपासून फक्त तीन-चारच राईड केल्या होत्या तरीही हे शक्य झाले ते केवळ हायड्रेशन ची पातळी योग्य ठेवल्याने.

काही वेळ आराम केला नंतर जेवण केले, जेवणाची आरामाची खूप उत्तम सोय आयएएसने केलेली होती. ३:३० वाजता पुढील प्रवासासाठी निघालो सूर्य उजव्या बाजूला आल्याने पूर्ण उजवीबाजू भाजून काढत होता, पण जसा निघालो तसे उजनी धरणा पासूनचे पुढील सगळे चढ पार केले न थांबता पण आता शरीर तापल्यामुळे असह्य झाले, शेवटी टेभूर्णी जवळ एका झाडाखाली बसलो पंधरा मिनिटे आराम केला पाणी पिलो व पुढे निघालो. पण आता मात्र पायाचे स्नायू थकले होते पुन्हा एक ठिकाणी थांबलो उसाचा रस पिलो व पंधरा मिनिटे झोप काढली. पुढे निघालो आणि टेंभुर्णी फाट्यावरून पंढरपूरचा रस्ता धरला तसे आता शेवटचा टप्पा आला होता पण आधीच्या अनुभवावरून हे माहीत होतं की पूर्ण पंढरपूरला पोहोचेपर्यंत सगळे चढ आहेत. त्यामुळे हळूहळू जाण्याचे ठरले मध्ये दोन ठिकाणी विश्रांती घेतली त्यावेळी गार्मिन घड्याळाची बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला, शेवटी मोबाईल वर शेवटचा टप्पा नोंद केला. सायकलच्या लाईटही चार्ज करून घेतल्या कारण थोड्याच वेळात अंधार पडणार होता. ऊन कमी होऊन वातावरण जरा आल्हाददायक झालं होतं आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत एकेक पायडल मारून मी रस्ता कापत होतो. मध्ये मध्ये चढ येत होते आणि कधी एकदाचा रस्ता संपतो असं झालं होतं. शेवटी एकदाचा मी चंद्रभागेच्या पुलावर पोहोचलो आणि चंद्रभागेचे आणि कळसाचे दर्शन झालं, तसा पूर्ण प्रवासाचा शीण निघून गेला. ही वारीखऱ्या अर्थाने सुखकर झाली ती पांडुरंगाची कृपा म्हणायची जी IAS च्या योग्य नियोजनातून प्राप्त झाली.

या वारीत आणखी एक फलप्राप्ती झाली ते म्हणजे २५००१ किलोमीटरचे सायकल चालवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. २०१६ साली मी सायकलिंग चालू केले व पहिल्या वर्षातच दहा हजार किलोमीटर इतके अंतर पार केले होते परंतु मागील मागील दोन वर्षे २३००० किलोमीटर वरच थांबलो होतो.

सर्व सायकल मित्र व खास करून IAS चे खूप खूप आभार व्यक्त करतो ज्यामुळे ही वारी सुखकर होऊ शकली

II जय हरी विठ्ठल II

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

एवढ्या उन्हात सायकल वारी ठेवणे आणि यावर्षी जवळपास पंधराशे सायकल स्वार होते त्यामुळे पूर्ण रस्ता सायकलींनी भरला होता इतक्या सायकल स्वारांनी येणे हे आश्चर्यकारक आहे.
अवश्य लिहा आणि फोटो टाका.

Avinash Anushe's picture

18 Jun 2023 - 10:00 am | Avinash Anushe

लांब पाल्याचे सायकलवीर उन्हाची पर्वा करत नाहीत किंबहुना तो त्यांचा सराव झालेला असतो. आमची रेकी राईड तर २० मे ला झाली होती हा वीडियो पहा https://youtube.com/watch?v=k-ojRZVDEGA&feature=share7 सगळे दिसणार नाहीत कारण मागे पुढे २-३ तासाच्या अंतरावर असतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2023 - 12:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हीडीयो खुपच आवडला. सायकलस्वार आणि सपोर्टटीमचं कौतुक आहे, सर्व सायकलवीर आणि लेखक म्हणूनही आपलं कौतुक आहे,
राईड करते राहा... पुलेशु.

-दिलीप बिरुटे

Avinash Anushe's picture

23 Jun 2023 - 8:03 am | Avinash Anushe

धन्यवाद :) आभारी आहे

प्रशांतशेठमुळे अनेक सायकलिस्ट लिहिते होताहेत, अजूनही सायकल वृत्तांत येऊ द्यात.

Avinash Anushe's picture

23 Jun 2023 - 8:05 am | Avinash Anushe

एक उत्तम माध्यम उपलब्ध करून दिले आहे त्यांनी

मुक्त विहारि's picture

18 Jun 2023 - 8:47 pm | मुक्त विहारि

तुमच्या ह्या स्वारीला, सलाम

Avinash Anushe's picture

23 Jun 2023 - 8:06 am | Avinash Anushe

धन्यवाद :) आभारी आहे

कर्नलतपस्वी's picture

19 Jun 2023 - 10:35 am | कर्नलतपस्वी

मागील वर्षी आमच्या गावातील तरुणांनी पुणे कन्याकुमारी पुणे आशी सायकल वारी केली.

लहानपणी पुणे मुंबई सायकल रेस असा एक प्रसंग आठवतो. त्यात घाटाचा राजा अशी बक्षीस असायची. नाव संपूर्ण नाही आठवत पण दशरथ नावाच्या सायकलस्वाराला हे टायटल मिळाल्याचे आठवते. सर्वात जलद बोरघाट पार केला होता त्यांनी.

या खेळात जीवाची बाजी लागते त्यामुळेच सर्व खेळाडूंचे अभिनंदन.

Avinash Anushe's picture

23 Jun 2023 - 8:07 am | Avinash Anushe

धन्यवाद :) आभारी आहे. घाटाचा राजा ही रेस अजूनही होते youtube वर आहेत याचे वीडियो

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2023 - 7:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा पण लेख मस्तच. लिहिते रहा.

Avinash Anushe's picture

23 Jun 2023 - 8:08 am | Avinash Anushe

धन्यवाद :) आभारी आहे

तुषार काळभोर's picture

20 Jun 2023 - 7:50 pm | तुषार काळभोर

आणि प्रेरणादायी!
कुठून येते एवढी ऊर्जा आणि इच्छाशक्ती?