प्रेरणा: 'स्वप्लिल मन' यांची ही सुगंधित सफर बघून काही (नको त्या) आठवणी जाग्या झाल्या !!
-----------------------------------------------------------------------
एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली
journey मग ती विस्मरणीय होऊन गेली !
आईला तिच्या बरोबर पाहून मला वाईट वाटले
दुर्भाग्यावर माझ्या मला नवल नाही वाटले
ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
आणि तिची आई मात्र बाजूला करत होती
विमान जसे उडे तसे वाटे व्हावा स्पर्श तिचा
आईकडे बघून माझ्या अंगावर काटा यायचा
माझी चांगली window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत आई मधे बसली !
केस तिचे तिच्या चेहर्याशी खेळत होते
आईमुळे मला ते जराही दिसत नव्हते
सुवास तिच्या पर्फ्युमचा मंद येत होता
पण मधे आई असल्याने खूप लांब होता
कसा गेला दिवस नाही कळले काही
नाव विचारण्याचे धैर्य झाले नाही
उतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर ती आपल्या आईस घेऊन गेली
अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीसोबत तिच्या आईचा चेहरा दिसतो
असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेन
भेटल्याभेटल्या पहिले आईस बाजूला करेन
प्रतिक्रिया
7 May 2009 - 1:10 am | श्रावण मोडक
चतुरंग...?
7 May 2009 - 1:14 am | चतुरंग
सुंदरीच्या स्पर्शाने काटा येण्याऐवजी आईच्या दहशतीने काटा उभा करणारी तुझी रोमांचकारी सफर आवडली!
तुझं अनिवार दु:ख समजू शकतो रे संदीप! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, मधेच बसणार्या मुलीच्या आईला काटेकोरांटी म्हणावे का? :B )
चतुरंग
7 May 2009 - 1:18 am | संदीप चित्रे
पोर करंटा म्हणावे का ? :)
7 May 2009 - 2:32 am | मीनल
मुख्य आयडिया जुनीच आहे. पण मांडणी आधुनिक आहे. मस्त वाटल वाचायला.
मीनल.
7 May 2009 - 6:42 am | अवलिया
अरेरे ! :)
--अवलिया
7 May 2009 - 6:43 am | बेसनलाडू
(प्रवासी)बेसनलाडू
7 May 2009 - 7:00 am | रेवती
विस-मरणीय सफर आवडली.
टाळ्या आणि शिट्ट्या!
रेवती
7 May 2009 - 8:03 am | प्राजु
हम्म.. संदीप..!!!
अस्सं का??
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 May 2009 - 8:53 am | संदीप चित्रे
सहानुभूतीसाठी धन्स मित्र-मैत्रिणींनो....
रेवती -- टाळ्या आणि शिट्या पोचल्या :)
7 May 2009 - 8:59 am | विनायक प्रभू
घ्या चित्रे साहेब,
पण कविता छान.
7 May 2009 - 9:18 am | सँडी
आवडली.
आलेत असे अनुभव. नंतर फोनाफोनी, मेलामेली आणि अधुनमधुन भेटीगाठी चालु होतात.;)
अजुनतरी 'काटेकोरांटी' च्या अडचणी नाही आल्या कधी. :)
-संदीप.
काय'द्याच बोला.
7 May 2009 - 11:46 am | पाषाणभेद
पुढच्या वेळी तिच्या आईशी गप्पा मारा. त्या वेळी नक्की यश मिळेल, आणि वेळही छान जाईल. तथास्तू.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
7 May 2009 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहीही ...
एक खडूस शंका: खिडकीत मुलगी, तिच्या शेजारी तिची आई आणि आईच्या शेजारी तुम्ही असताना मुलीची ओढणी तुमच्या खांद्यावर कशी पडली? का आधी ओढणी पडली आणि नंतर तुम्ही सीट देऊ केलीत??
7 May 2009 - 11:52 am | सहज
चांगलय.
काय राव, मागवून मागवून ज्युस पाजायचे ना काटेकोरांटीला, बरेच ब्रेक मिळाले असते. शिवाय डि.व्ही.टी. ची भिती घालून फेर्या मारायला लावायच्या...
:-)
7 May 2009 - 10:47 pm | स्वप्निल मन
खुपच छान
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.