(यादी गेली कवित्व उरले)

कपिल काळे's picture
कपिल काळे in जे न देखे रवी...
6 May 2009 - 4:03 pm

किती भली मोठी लांब
किती भली मोठी लांब
मारुतीचीच शेपटी
देवा!! आता तरी थांब

लेखकांना केले सिद्ध
तयां केले यादीबद्ध
जे वाचले ते टाकले
बाकी सारे निषिद्ध

स्वाक्षरीत कंपू नसे
तोचि मात्र हवा असे
प्रतिसादांसाठी कसे
मन वेडे हो तरसे

कंपूतील गंपू तेच
टाकतात नवे पेच
कडमडे कोणी नवा
धडपडे लागे ठेच

ठाके नवा कोणी उभा
मांडला सवतासुभा
आयडी होइल ब्लॉक
नसे पोचण्याची मुभा

साहित्याच्या समुद्रात
मिपा असे नदीमात्र
कशाला ही यादीबिदी
स्वांतसुख क्षणमात्र

मराठी ही कर्कवृत्ती
बरी का हो अशी वृत्ती
सत्वरी वाचा , होइल
मुद्रण सुलभ आवृत्ती

ह. घ्या सा. न. ल.

कवितामत

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

6 May 2009 - 4:54 pm | सायली पानसे

:-)) छान आहे.

चिरोटा's picture

6 May 2009 - 4:58 pm | चिरोटा

कविता आवडली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रमोद देव's picture

6 May 2009 - 5:10 pm | प्रमोद देव

कविता मस्त आहे.
आवडली.

अवलिया's picture

6 May 2009 - 7:19 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

प्राजु's picture

6 May 2009 - 10:03 pm | प्राजु

क्या बात है!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी's picture

11 May 2009 - 6:41 am | सँडी

असेच म्हणतो.
=D>

-संदीप.
काय'द्याच बोला.

कपिल काळे's picture

7 May 2009 - 8:03 am | कपिल काळे

सायली, भेन्डीबाजार, देव काका, अवलिया, प्राजु - प्रतिसादांबद्द्ल आभार!!

कपिल(सामंत)

अमोल केळकर's picture

7 May 2009 - 9:09 am | अमोल केळकर

कपिल, मस्त रे
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2009 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीहीही .... मस्तच!

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2009 - 9:57 am | श्रीकृष्ण सामंत

कविता मस्तच आहे.

म्हणोनी म्हणतो मनुजा!
सांगावा जमेल तो आशय पद्यातूनी
नच जमे तो तितूका गद्यातूनी
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

योगी९००'s picture

8 May 2009 - 12:43 pm | योगी९००

कपिलभाऊ,

मस्तच रे...

स्वाक्षरीत कंपू नसे
तोचि मात्र हवा असे
प्रतिसादांसाठी कसे
मन वेडे हो तरसे

हे सगळ्यात आवडले...!!!

जरा कमी निष्ठांवर पण काही येऊ द्या.

खादाडमाऊ

यन्ना _रास्कला's picture

11 May 2009 - 6:26 am | यन्ना _रास्कला

किती भली मोठी लांब
किती भली मोठी लांब

एैवजी

किती भली मोठी लांब
वाचुन पाठीला लागली आम्ब

चालल का?

बाकि कविता ततोतंत. आवडली
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

कपिल काळे's picture

11 May 2009 - 11:02 am | कपिल काळे

<<वाचुन पाठीला लागली आम्ब >>
हे छंदात बसत नाही.

यादी हा शब्द न लिहिता, तो आहे तसेच यादीची लांबी अंमळ जास्त आहे - हे जाणवून देण्यासाठी दोनदा तीच ओळ वापरली आहे.

विजय आवारे's picture

11 May 2009 - 11:06 am | विजय आवारे

झकास झाली कविता.

किती भली मोठी लांब
किती भली मोठी लांब
मारुतीचीच शेपटी
देवा!! आता तरी थांब

हे आवडले.