"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
9 May 2023 - 2:31 pm

मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही. पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा मुस्लिम मित्र व त्याची बायको अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.

चित्रपट संपल्यावर "मस्त पिक्चर बनाया हैं यार... ये किसी के भी साथ हो सकता हैं!" असा त्या मित्राने गंभीर स्वरात दिलेला अभिप्राय आणि त्याला "सच्ची" असा एका शब्दात त्याच्या बायकोने तितक्याच गंभीरपणे दिलेला दुजोरा मलाही अंतर्मुख करून गेला. तो अभिप्राय आणि त्याला दुजोरा देणाऱ्या दोन्ही व्यक्ती धर्माने मुस्लिम असल्या तरी त्यातून व्यक्त झालेल्या भावना ह्या लवकरच वयात येऊ घातलेल्या एका मुलीचा पिता आणि मातेच्या होत्या, त्यात डोकावलेली काळजी अगदी स्पष्टपणे जाणवली होती आणि माझ्या मते हेच 'The Kerala Story' ह्या चित्रपटाचे खरेखुरे यश आहे.

तर मंडळी, सध्या अनेक कारणांनी चर्चेत असलेला आणि परवा संध्याकाळी बघितलेला हा चित्रपट मला कसा वाटला, तो का आवडला हे सांगण्यासाठी आणि त्या अनुषंगाने माझी काही मते मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच!

'द केरला स्टोरी'
1

निर्माता: विपुल अमृतलाल शहा.
आंखे, वक्त, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, फोर्स, कमांडो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांपैकी काहींचे दिग्दर्शनही समर्थपणे करणारे विपुल शहा हे नाव तसे सुपरिचित. पण आत्तापर्यंत केवळ व्यावसायिक, करमणूकप्रधान अशा मसालापटांची निर्मिती करणाऱ्या विपुल शहांनी लव्ह जिहाद सारख्या धगधगत्या विषयावरील 'द केरला स्टोरी' ह्या त्यांच्या पठडीबाहेरच्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस अशा चित्रपटाची यशस्वीरीत्या निर्मिती करून सुखद धक्का दिला आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे अगत्याचे वाटते!

दिग्दर्शक: सुदिप्तो सेन.
'सुदिप्तो सेन' ह्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट मी ह्याआधी पाहिला नसल्याने हे नाव माझ्यासाठी अनोळखी असले तरी नाटकीपणाला अजिबात थारा न देता वेगवान, अतिशय वास्तवदर्शी आणि अत्यंत प्रभावी सादरीकरणातुन त्यांनी दिग्दर्शक म्हणुन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कित्येक प्रसंग पाहाताना आपण नक्की हिंदी सिनेमा पहातोय कि हॉलीवुडपट पहातोय असा प्रश्न पडावा इतके ते प्रभावी आहेत. अर्थात त्यांचा मी हा पहिलाच चित्रपट पहिला असल्याने असे वास्तवदर्शी चित्रपट देण्यात हातखंडा असलेले आणि दिग्दर्शक म्हणून माझ्या आवडीच्या असलेल्या 'अनुराग कश्यप' ह्यांच्या पंक्तीत त्यांना इतक्यात नेऊन बसवण्याची मला घाई नाही, त्याआधी सातत्य जोखण्यासाठी त्यांचे आणखीन काही सिनेमे बघणे आवश्यक आहे असे वाटते.

संक्षीप्त कथानक:
चित्रपटाची कथा-पटकथा सुर्यपाल सिंग, विपुल शहा आणि सुदिप्तो सेन ह्यांनी लिहिली असुन ती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.

'शालिनी उन्नीकृष्णन' ही पितृछत्र हरपलेली आणि आपल्या आई व आजीबरोबर राहणारी सर्वसामान्य हिंदू घरातली मुलगी, 'गीतांजली मेनन' हि कम्युनिस्ट विचारसरणी असणाऱ्या घरात वाढलेली, आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आणि 'निमाह मॅथ्यूस' हि एका ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी अशा एकमेकींशी अपरीचीत असलेल्या तिघीजणी कासारगोड ह्या परजिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तिथे शिकण्यासाठी होस्टेलवर राहायला जातात. तिथे 'असिफा' हि स्थानिक मुलगी त्यांची चौथी रूममेट असते!

तिथल्या वास्तव्यात असिफा त्यांचे ब्रेनवॊशिंग करून त्या तिघींना 'लव्ह-जिहाद'च्या सापळ्यात अडकवण्याचे आणि त्यांचे धर्मांतरण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करते. शालिनी आणि गीतांजलीला त्या सापळ्यात अडकवण्यात ती यशस्वी होते. पैकी शालिनी हे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याने तीचे पूर्णपणे ब्रेनवॉशिंग होऊन ती जिहाद साठी सीरियाला जायलाही तयार होते (अर्थात त्यासाठी तिची फसवणूक करून तशी परिस्थिती कशी निर्माण केली जाते वगैरेचा तपशील इथे देणे अयोग्य ठरेल). गीतांजली उर्फ 'गीतू' आणि धर्मांतर केल्यानंतरचे नाव अनिशा हि देखील त्या सापळ्यात पूर्णपणे अडकते, पण काही कारणाने शालिनीपेक्षा थोडी सुदैवी ठरल्याने ती जिहादी वगैरे बनण्यास तयार होत नाही, ज्याच्या परिणामी तिला आयुष्यातून पूर्णपणे उठवण्यात येते. आणि निमाह हि बऱ्यापैकी कट्टर कॅथलिक विचारसरणीची असल्याने आसिफा आणि तिच्या सहकाऱ्यांना तिला धर्मांतर आणि लव्ह जिहदच्या सापळ्यात अडकवणे शक्य होत नाही तेव्हा ड्रग्स देऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मानसिकदृष्ट्या उध्वस्त केले जाते.

जिहाद साठी सीरियाला जायला निघालेल्या शालिनीच्या कोलंबो मार्गे पाकिस्तानातील क्वेट्टा ते अफगाणिस्तान ह्या प्रवासात घडणाऱ्या घटना, इसिस ह्या दहशतवादी संघटनेच्या तळावर तिला येणारे निर्घृण अनुभव अशा घटनांमधून पुढे सरकणाऱ्या कथेचा अंत त्वचारोग झालेली (तो कदाचीत Sexually transmitted diseases - STD असावा) शालिनी उर्फ फातिमा इसिसच्या तावडीतुन केलेल्या यशस्वी पलायनानंतर अफगाणिस्तानच्या एका जेल मध्ये जाउन खितपत पड्ल्यावर होतो.

चित्रपटाची इतपतच कथा सांगणे इष्ट वाटते, बाकीच्या घटना समजण्यासाठी सिनेमा बघणे योग्य ठरेल...

कलाकार
प्रमुख पात्रः शालिनी उन्नीकृष्णन | अभिनेत्री: अदा शर्मा
आधी बघितलेल्या तेलगू सिनेमांमुळे परिचयाची झालेली 'अदा शर्मा' हि एकमेव अभिनेत्री वगळता बाकीचे सर्वच कलाकार माझ्यासाठी अनोळखी होते. पण तेलगू सिनेमांमध्ये बघितलेली ग्लॅमरस अदा शर्मा आणि ह्या चित्रपटात पूर्वाश्रमीची 'शालिनी उन्नीकृष्णन' आणि धर्मांतरित झाल्यावर 'फातिमा' ची प्रमुख भूमिका साकारणारी अदा शर्मा ह्यांत भरपूर फरक जाणवला. भूमिकेची गरज म्हणून वजन वाढवलेली अदा शर्मा 'हिरोईन मटेरियल' वाटली नसली तरी अभिनयात बऱ्यापैकी बाजी मारून गेली आहे.
बाकी चित्रपटातील महत्वाच्या पात्रांपैकी असिफाच्या भुमिकेतली सोनिया बलानी, गीतांजली मेननच्या भुमिकेतली सिद्धि इदनानी, निमाह मॅथ्युसच्या भुमिकेतली योगीता बिहानी, शालिनिच्या आईची भुमिका साकारणारी देवार्शीनी चेतन, गीतांजलीच्या आईची भुमिका साकारणारी उषा सुब्रमणीयम-सक्सेना, तसेच युनोचे आणि जेल अधिकारी, लव्ह जिहादच्या सापळ्यात ह्या तरुणींना अडकवणारे असिफाचे सहकारी, मुल्ला/मौलवी वगैरे सर्वच कलाकारांनी आपापल्या भुमिका अगदी चोख बजावल्या आहेत. त्यामुळे कास्टींग साठीही पुर्ण मार्क्स ह्या चित्रपटाला द्यायला हरकत नाही!

चित्रपटातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे प्रसंगः
संपुर्ण चित्रपटच आवडला असला तरी हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने त्यातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे काही प्रसंग नमुद करण्याचा मोह टाळता येत नाहिये!

१) एका प्रसंगात शालिनी, गीतांजली, निमाह आणि असिफा अशा चौघीजणी जेवायला बसलेल्या असतात. टेबलच्या एका बाजूला बसलेल्या निमाह आणि असिफा जेवण्याआधी अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लिम पद्धतीने प्रार्थना करतात जेव्हा टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या शालिनी आणि गीतांजली त्याविषयी विचारणा करतात तेव्हा असिफा आणि निमाह त्यांच्या धर्मात जेवणाआधी अनुक्रमे गॉड आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी करण्याच्या प्रार्थनेचे असलेले महत्व विशद करतात आणि त्यावर शालिनी व गीतांजली ह्या हिंदू मुली जी उत्तरे देतात ती ऐकून हसावे कि रडावे हे समजत नाही.

वास्तविक घरचे संस्कार वेगळे, पण जेवणाआधी "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" अशी प्रार्थना आपल्यापैकी बहुतेक सर्वांना शाळेत डबा खाण्याआधी शिकवली जात असल्याचे आठवत असेल. कुठल्याही मंगल प्रसंगी पंगतीत जेवतानाही "पार्वती पते हर हर महादेव" असा गजर झाल्याशिवाय लोक घास तोंडात घालत नसत/नाहीत. आज आपल्यापैकी कितीजण जेवणाआधी अशी प्रार्थना करतात? शाळेनंतर मी स्वतः जेवणाआधी अशी प्रार्थना करत नसल्याने खरंतर मला हा प्रश्न विचारायचा बिलकुल अधिकार नाही पण आपल्या मिपाकरांपैकी किंवा अन्य सोशल मीडियावर तावातावाने हिंदु धर्मा विषयी मोठमोठ्या बाता मारणारे कितीजण रोजच्या प्रत्येक जेवणाआधी अशी प्रार्थना करतात किंवा स्वतः करत असले तरी कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल!

२) ब्रेनवॊश झालेली शालिनी हिजाब परीधान करून सुट्टीवर घरी येते त्यावेळी दरवाजा उघडल्यावर तिला त्या अवतारात बघितल्यावर आणि घरात आल्यानंतर आईने आणून दिलेला प्रसाद खाण्यास नकार देऊन ती जेव्हा देव-देवतांची निंदा नालस्ती करते आणि प्रसादाची थाळी टीपॉय वर ठेवण्याआधी आईने तिचा त्यावर ठेवलेला पाय खाली केल्यावर पुन्हा आपला पाय मुद्दामहून त्या प्रसादाच्या थाळीजवळ ठेवणाऱ्या आपल्या मुलीला बघून तिच्या आईची झालेली अवस्था मनाला चटका लावून जाते.

३) शरिया नुसार स्त्रियांना मोबाईल फोन वापरायला बंदी आहे असे जेव्हा शालिनी उर्फ फातिमाला इसिसच्या दहशतवाद्याकडून सांगितले जाते तेव्हा ती अतिशय निरागसपणे त्याला उलट प्रश्न विचारते "पण शरिया तयार झाला तेव्हा मोबाईल फोन कुठे अस्तित्वात होता ?" हा एकमेव प्रसंग असा आहे जेव्हा प्रेक्षागृहात हशा पिकतो. हा अपवाद वगळता चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी शांतता असते.

४) धर्मांतरित झालेलया गीतांजली उर्फ अनिशाला तिचे वडील हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याचे सांगणारा तिच्या आईचा फोन येतो. असिफा त्याबद्दल विचारणा करते तेव्हा वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि तिच्यासाठी म्हणून ठेवलेले दाग-दागिने घेऊन जाण्यासाठी आईने फोन केला होता पण हे घरच्यांनी तिला परत बोलावण्यासाठी केलेले ढोंग वाटत असल्याचे ती सांगते.
त्यावर तुझे वडील काफिर असल्याने ते तसेही 'दोज़ख' (नरकात) जाणार आहेत, त्यांचे पाप कमी करण्यासाठी तूला त्यांच्यावर थुकावे लागेल किंवा त्यांना दगड मारावा लागेल असे सांगतानाच तू जाऊन हे कर आणि दागिने घेऊन ये, काफ़िरांची दौलत ताब्यात घेणे शरियाला मान्य आहे.
असिफाने सांगितल्याप्रमाणे गीतांजली हॉस्पिटल मध्ये जाऊन आईच्या डोळ्यांदेखत आपल्या वडिलांच्या डोक्यावर जाऊन थुंकते तो प्रसंग मनाला फार यातनादायी आहे.

५) आपण फसवले गेलोय हे लक्षात आल्यावर अंमली पदर्थांचे व्यसन जडलेली पश्चातापदग्ध गीतांजली आपल्या वडीलांच्या मांडीवर डोके ठेउन जेव्हा "तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर आज माझ्यावर हा प्रसंग ओढवला नसता" अशा शब्दांत त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडते तो प्रसंगही फार प्रभावी वाटला.

संपुर्ण चित्रपटात असे अनेक परिणमकारक प्रसंग आहेत त्यबद्दल आणखीन लिहिले तर चित्रपट बघण्याची इच्छा असलेल्यांचा रसभंग होण्याचा धोका टाळण्यासाठी ते आवरते घेतो!

बाकी चित्रपटात कुठेही अंगप्रदर्शन वगैरे काही नाही. बलात्काराचे दोन-तिन प्रसंग आहेत पण कल्पकतेने चित्रित केले असल्याने त्यातही कुठे बिभत्सपणा नाही, ज्यांनी OTT वरच्या वेबसिरीज बघितल्या असतील त्यांना तर ते बलात्काराचे प्रसंग अगदी बाळबोध वाटतील. केवळ हिंसाचाराचे काही तुरळक रक्तरंजीत प्रसंग कथानकाची गरज म्हणुन चित्रपटात असल्याने ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'A' प्रमाणपत्र दिले असावे असे वाटले, अन्यथा हा चित्रपट कोणीही पहाण्यासारखा आहे त्यासाठी खरंतर १८+ वय असण्याची काही गरज नाही, ह्यापेक्षा कितीतरी रक्तरंजीत व्हिडीओ गेम्स लहान मुले खेळतात!

असो... एकंदरित चित्रपट चांगला आहे. गाणी दोन-तिनच असली तरी संगीत सुश्राव्य आहे. 'दिल से' नंतर मल्याळम बोल असलेले गाणे असलेला हा बहुदा त्यानंतरचा पहिलाच चित्रपट असावा. सध्या ह्या चित्रपटावरुन बराच गदारोळ माजवला जातोय. ह्या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी केरळ सरकारने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी काल परवाकडे तामिळनाडुतील मल्टीप्लेक्स मालक/चालकांनी हा चित्रपट न दखवण्याचा निर्णय घेतला आहे तर पश्चिम बंगालच्या तथाकथीत "फ्री स्पिच" समर्थक मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये 'बॅन' केला आहे. असे असले तरी ह्या सर्व गदरोळावर मात करुन हा चांगला चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आहे ही नक्कीच समाधनाची गोष्ट आहे!

तर मंडळी वर उल्लेख केलेल्या माझ्या मित्राच्या अभिप्रायातील "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्यातील गर्भीतार्थ लक्षात घेउन केवळ 'लव्ह जिहाद' च्या परिप्रेक्षातुन आणि धार्मीक दृष्टिकोनातून ह्या चित्रपटाकडे न पहाता वास्तवाचे भान देणारी हि 'उत्तम कलाकृती' ज्यांना शक्य असेल त्यांनी चित्रपटगृहात जाऊन तर ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पुढे OTT किंवा अन्य कुठल्याही माध्यमावर आवर्जून पहावी अशी आग्रही शिफारस करतो आणि "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्याचा पुनरुच्चार करुन आता इथेच थांबतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

कलाशिफारस

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

9 May 2023 - 3:38 pm | कुमार१

वास्तवाचे भान देणारी ही 'उत्तम कलाकृती'

आणि तिचे निव्वळ चित्रपट रसिक या दृष्टिकोनातून केलेले रसाळ रसग्रहण मनापासून आवडले.

चित्रपटाच्या निर्मात्यांपासून ते कलाकारांपर्यंत महत्त्वाच्या सर्वांची दखल घेतली गेली आहे हेही विशेष.

चांदणे संदीप's picture

9 May 2023 - 4:02 pm | चांदणे संदीप

चित्रपट पाहिला नाही परंतु तुमच्या लेखनाला थम्स अप!

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

10 May 2023 - 1:39 pm | टर्मीनेटर

कुमार१ | चांदणे संदीप
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कपिलमुनी's picture

9 May 2023 - 4:34 pm | कपिलमुनी

छान परिक्षण/ रसग्रहण !

कुठेही प्रचारी किंवा अभिनिवेश नाही.
बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..

टर्मीनेटर's picture

10 May 2023 - 1:49 pm | टर्मीनेटर

@ कपिलमुनी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

बाहेर एवढा प्रोपोगंडा असताना देखील तुमच्या सोबत मुस्लिम लोक आले हे विशेष ..

मुनिवर्य, आम्ही चौघे अनेक चित्रपट एकत्र बघतो. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर अशा एकत्र पाहिलेल्या चित्रपटांपैकी 'पुष्पा', 'KGF २', 'भूल भुलैया २', 'धर्मवीर - मु.पो. ठाणे' हि पटकन आठवलेली काही नावे! त्यामुळे 'द केरला स्टोरी' हा चित्रपटही एकत्र पाहणे ह्यात आमच्यासाठी तरी विशेष असे काही नव्हते! बाकी प्रोपगंडा तर काय तिन्ही त्रिकाळ आपल्या सभोवती चालुच असतो, त्या पासुन स्वतःचे संरक्षण करणारी 'इम्युनीटी' आमच्यात तयार झाल्याने त्याच्या सहीत जगण्या-वागण्याची आता सवय झाली आहे 😀

अच्छा.. म्हणजे सगळीकडे सुरू असलेला लव्ह जिहाद हा "प्रपोगंडा" आहे तर..
प्रपोगंडा - ideas or statements that may be false or present only one side of an argument that are used in order to gain support for a political leader, party, etc.

तुमच्या पुढच्या थिअऱ्या काय असणार आहेत?

कसाब शांतता पसरवण्यासाठी मुंबईत आला होता...
याकूबचा दिवाळीची दारू आणि RDX मध्ये गोंधळ झाला..
अफझल गुरूला पार्लमेंट मध्ये मिठाई पाठवायची होती..

पोटासाठी काय काय करावे लागते ना..

कपिलमुनी's picture

24 May 2023 - 5:53 pm | कपिलमुनी

लव्ह जिहाद आहे तर मग लव्ह जिहाद चे कायदेशीर पुरावे आणि व्याख्या द्या .

श्रीगुरुजी's picture

24 May 2023 - 8:01 pm | श्रीगुरुजी

लव्ह जिहाद (कायद्यानुसार व्याख्या) -

Prohibition of unlawful conversion from one religion to another by use of misrepresentation, force, undue influence, coercion, any other fraudulent means, allurement, or promise of marriage.

काही आक्षेप किंवा शंका असल्यास न्यायालयात दाद मागावी.

अधिक माहिती हवी असल्यास स्वतः शोधावी.

कपिलमुनी's picture

24 May 2023 - 5:55 pm | कपिलमुनी

काही़जण पोट आहे म्हणून करतात बाकी अडाणचोट किंवा भिकारचोट आहे म्हणून करतात

पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा

मुस्लिम मित्र व त्याची बायको

अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.

त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती? 'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे!
परिक्षणाबद्दल धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

10 May 2023 - 5:45 pm | टर्मीनेटर

@ Trump

त्या मुस्लीम मित्र आणि त्याच्या बायकोची काय प्रतिक्रिया होती?

ट्रंप साहेब चित्रपटाबद्दल त्यांची प्रतिक्रीया काय होती हे मी लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदात लिहिलेले आहे! तरी तुम्ही

'खरा इस्लाम असा नाही', अशी प्रतिकिया असेल तर पुढे काय बोलायचे!

असे जे लिहीले आहे त्यामागे त्यांचे धर्मविषयक विचार काय असतील हे जाणुन घ्यायची जिज्ञासा असावी असे वाटल्याने काही गोष्टी सांगतो...

नाही, तुम्ही उल्लेख केल्या प्रमाणे अशी प्रतिक्रिया नव्हती 😀 आणि विचारांत क्लॅरीटी आणि जीवन शैली/पद्धती विषयी आपले स्वतःचे तत्वज्ञान अंगिकारणाऱ्या मित्रमंडळींच्या संभाषणात असल्या स्पष्टीकरणांची गरजही भासत नाही! आणि धार्मिकतेबद्दल म्हणाल तर त्याचे धर्माविषयक तत्वज्ञान त्याच्याच भाषेत सांगायचे तर "माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते तसेच अजिबात मिठ नसलेला पदार्थ जसा बेचव होतो त्याचप्रमाणे जिवनात धर्म अजिबात नसेल तर जिवनही बेचव होते." असे अगदी सरळ सोपे आहे. हे त्याच्या शब्दात सांगीतले असले तरी आम्हा खास किंवा जवळच्या मित्रपरिवारतील सर्वच मंडळींची विचारसरणी ही अशीच आहे. बाकी धर्मांध विचाराच्या लोकांना (मग ते कुठ्ल्याही धर्माचे असोत) नुसते मित्र म्हणुनही आम्ही स्विकारत नाही!

असो.. प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

शाम भागवत's picture

11 May 2023 - 6:41 am | शाम भागवत

प्रतिसाद आवडला.

अथांग आकाश's picture

11 May 2023 - 12:34 pm | अथांग आकाश

+१
वरील प्रतिसाद आवडला!

"माणसाच्या जिवनात धर्माचे प्रमाण हे एखद्या पदार्थात आवश्यक असलेल्या मिठाच्या प्रमाणा एवढेच असावे, मिठ जास्त झाले तर जशी पदार्थाची चव बिघडते त्याचप्रमाणे जिवनात धर्माचे प्रमाण वाढले तर जिवन बिघडते
टर्मीनेटर, बहुतेक हिंदूंचेही हेच विचार आहेत ...अगदी भाजपाला पाठिंबा देणारी हिंदूंचे सुद्धा , देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा

दुर्दैवाने ( निदान वरकरणी तरी असे भासतें) "कि देश आधी धर्म नंतर" किंवा तुम्ही दिलेल्या उपमे प्रमाणे "धर्म चिमूटभर चवीपुरता " हा विचार २ जागतिक अब्राहमीक धर्मातील लोकांकडून कमी दिसतो ..
आणि विशेष म्हणजे जिथे हे २ अब्राहमीक धर्माचे लोक अल्पसंख्यांक आहेत तिथे हा अभाव जास्त दिसतो ... ( उधारण वांद्र्यातील क्रिस्टी जेवढे धार्मिक वाटले तेवढ्या प्रमाणात जिथे बहुसंखय ख्रिस्ती आहेत अश्या इंग्लड किंवा इतर पाश्चिमात्य देशात वाटले नाहीत... तसे नसते तर येथे रविवारी चर्च तुडुंब भरले दिसले असते ...!

(हेच विधान कदाचित इस्लाम अनुयायांबद्दल मी करणार नाही . कारण साधे आहे जर सरासरी काढली तर एकूण जिथे जिथे ख्रिस्ती बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी ख्रिस्ती राष्ट्रे कमी आहेत , त्यामानाने जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक आहेत तिथे धर्मांवर आधारलेली अशी मुस्लिम राष्ट्रे जास्त आहेत)
मग काही लोक हे विचारतील कि हिंदू जर एवढा सहिष्णू आहे आहे तर गेली ९ + वर्षे तो संघाचं विचारसरणीला का पाठिंबा देतोय?
याला अनेक कारणे आहेत , हिंदू अगदी अचानक धार्मिक झालाय हे नाही . आजही "हिंदुराष्ट्र्र करा" या पेक्षा "हिंदूंचा योग्य मान राखणारे" राष्ट्र करा" देश सुस्थित राहो यालाच जास्त प्राधान्य दिले जाईल / असेच बहुतेक हिंदू म्हणेल असे मला वाटते ....

हंस असा सहिष्णू हिंदू मात्र वैतागलेले आहे हे खरे सतत रॅडिकॅह डॉ खेळणारे हिंदू फोड चालू ठेवणारे यांचं कारवायांमुळे,, " फार झाले सहिष्णुता गेली चुलीत " असे एक दिवस वैतागून म्हणलं त्याने तर तो त्याचा दोष राहणार नाही....

देश आणि चांगले नागरिक ह्यालाच प्राधान्य बहुतेक हिंदू देतात.. अर्थात अनेक जणांचा ह्यावर विश्वास बसणार नाही म्हणा >>>
सहमत आहे!

यश राज's picture

9 May 2023 - 4:39 pm | यश राज

प्रत्येकाने पहिलाच पाहिजे असा चित्रपट.

टर्मीनेटर's picture

12 May 2023 - 11:13 am | टर्मीनेटर

प्रत्येकाने पहिलाच पाहिजे असा चित्रपट.

१०००% सहमत 👍

कर्नलतपस्वी's picture

9 May 2023 - 5:21 pm | कर्नलतपस्वी

पण मला एक समजत नाही समाजात अशा अनेक घटना घडत असताना या पासून कुणी धडा घेत का नाही!

सुबोध खरे's picture

9 May 2023 - 6:42 pm | सुबोध खरे

मेरा अब्दुल ऐसा नही है!

रंगीला रतन's picture

10 May 2023 - 10:24 pm | रंगीला रतन

मेरा अब्दुल ऐसा नही है!

टर्मीनेटर's picture

12 May 2023 - 12:16 pm | टर्मीनेटर

मेरा अब्दुल ऐसा नही है!

@ सुबोध खरे
चपखल!
प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला, तारुण्यसुलभ कल्पनांमध्ये तसे वाटणे स्वाभाविक असले तर तिचा अब्दुल 'तसा' निघाल्यास आयुष्याची राख-रांगोळी होणे अपरिहार्य!

@ रंगीला रतन
व्हिडीओ आवडला!

@ कर्नलतपस्वी

"पण मला एक समजत नाही समाजात अशा अनेक घटना घडत असताना या पासून कुणी धडा घेत का नाही!"

कर्नल साहेब जेव्हा जेव्हा हा विषय ऐरणीवर येतो तेव्हा तेव्हा तो प्रकार कसा खोटा आहे हे समाजमनावर ठसवण्यासाठी सिनेसृष्टीतील नामवंत/पडेल कलाकारांपासून राजकारणी, वकील, प्राध्यापक, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार-संपादक, तथाकथित डावे विचारवंत आणि अशा प्रकाराला ज्यांचे उघड किंवा छुपे समर्थन आहे असे समाजातील विविध घटक हिरीरीने पुढे येतात. त्यावर गदारोळ माजवून विषयाचे गांभीर्य संपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो ज्याच्या परिणामी हे प्रकार सुरूच राहतात आणि नवनवीन तरुणी त्याला बळी पडतच रहातात!

वास्तविक आज 'लव्ह जिहाद' म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार तसा काही नवीन नाहीये, फार मागे जाण्याची आवश्यकता नाही पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण त्यावेळी समाजमाध्यमे अस्तित्वात नसल्याने ती प्रकरणे आजच्यासारखी प्रकाशात येत नव्हती. लोकलज्जेस्तव अशा पीडित स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेव्हाही पोलिसांत तक्रारी देखील केल्या जात नव्हत्या आणि आजही त्या तेवढ्या प्रमाणात केल्या जात नाहीयेत त्यामुळे अशा प्रकरणांची निश्चित आकडेवारी मिळणे हि अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही गोष्ट 'लव्ह जिहाद' हा कांगावा आहे, असे काही अस्तित्वातच नसते वगैरे वगैरे गळे काढणाऱ्यांना देखील माहीत असते, नाही अशातला भाग नाही. पण दांभिकता रक्तात भिनलेली हि मंडळी आपल्या अजेंड्याला मारक ठरू शकेल अशी कुठलीही गोष्ट पुढे आली कि क्षणाचाही विलंब न करता त्याचा विरोध करण्यासाठी त्वरित पुढे येऊन आकांडतांडव करायला सुरुवात करतात.

सध्या 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटावरून उपरोल्लिखित मंडळी जो गदारोळ करत आहेत त्यातून आपल्या मराठी भाषेत प्रचलित असलेल्या "एकतर हागणाऱ्याला तरी लाज असते किंवा बघणाऱ्याला तरी" असा आशय असलेल्या एका जुन्या म्हणीच्या सत्यतेची प्रचिती येत आहे.

इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल!
(* वरील परिच्छेदाकडे केवळ उदाहरण म्हणून पाहावे तसे लिहिण्यात त्या पीडित माता/भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उपमर्द/अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.)

तत्कालीन चर्चा-बातम्यांमधून होणाऱ्या जनजागृतीपेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून साधणारा परिणाम नक्कीच प्रभावी आणि दीर्घकालीन असल्याने ह्या चित्रपटाच्या निमित्ताने विषयाची दाहकता आणि गांभीर्य भारतीय समाजापुढे आणून एकप्रकारे जनजागृतीचे कार्य करणाऱ्या निर्माता,दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व चमूचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करावेसे वाटते आणि ह्या चित्रपटाविरोधात काहूर माजवणाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करून, त्यांच्या अजेंड्याला पूरक ठरतील अशा त्यांच्या फाजील प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात आपली ऊर्जा आणि वेळ खर्च न करता Keep Calm and Watch "The Kerala Story" एवढे लिहून माझा प्रतिसाद आवरता घेतो!

चौकस२१२'s picture

12 May 2023 - 11:39 am | चौकस२१२

खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना .... टर्मीनेटर ने टरमिनेट केले कि ... ये हुई ना बात .. मोगाबॉ खुश हुआ

अथांग आकाश's picture

12 May 2023 - 12:11 pm | अथांग आकाश

अप्रतिम प्रतिसाद!!!

हे राम... सकाळी लिहिलेला हा प्रतिसाद व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्डच्या रूपाने आता मलाच परत आला आहे… दुनिया गोल है भैया 😀
पण ज्यानी कोणी तो मेसेज म्हणुन पहील्यांदा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला असेल त्याने कॅापी-पेस्ट करताना वरती आयडी वगैरेही ठेवलाय हे बरे झाले… उगाच साहित्यचोरी वगैरेचे बालंट यायला नको, त्याच्यावरही आणि माझ्यावरही 😂 😂 😂

1

रंगीला रतन's picture

12 May 2023 - 8:36 pm | रंगीला रतन

इथे 'हागणाऱ्याच्या'* जागी लव्ह जिहादला बळी पडलेल्या, पण 'लोकलज्जेस्तव' त्या प्रकरणी तक्रारी दाखल न करणाऱ्या मुली/स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय तर 'बघणाऱ्या' च्या जागी 'खरी आकडेवारी समोर आणा' अशी मागणी लावून धरणाऱ्या 'निर्लज्ज' मंडळींना कल्पून बघा, चित्र स्पष्ट होईल!
लै जोरशात मारली आहे :=)

मुक्त विहारि's picture

9 May 2023 - 5:27 pm | मुक्त विहारि

परिक्षण आवडले....

Bhakti's picture

9 May 2023 - 8:18 pm | Bhakti

मस्तच लिहिलंय!
आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल!
मला अनेक परंपरा , अर्थ माहिती आहेत .पण सनातन धर्म आणि धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असतात हे आताशी समजलं आहे.(खुप दिवसांपासुन लिहायचं होतं हे, तुमच्या धाग्यावर लिहिले :) अवांतर साठी माफी)
लेकीला म्हणूनच भरतनाट्यम क्लासला घातलयं.मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया.

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 8:14 am | टर्मीनेटर

मुक्त विहारि | भक्ति
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ भक्ति

"मस्त संस्कृत शब्द ,श्लोक म्हणते..भारी वाटतं.मला तर वाटतं तिनं संस्कृतमध्ये पदवी घ्यावी :) बघूया."

हुशार आहेच की ती, संस्कृतमध्ये पदवी मिळवुन नक्कीच तुमची इच्छा पुर्ण करेल!

या धाग्याच्या निमित्ताने.
आजच एक वेगळी घटना ऐकली.
कॅफे मध्ये बसलेल्या मुलीला डोळ्यात औषध टाकून पळवले.
तिला कतार ला विकायचा प्लॅन होता.
काहीतरी जुगाड करून ती पळून आली.
तिचा पूर्ण ब्रेनवाश केला गेला होता.

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 8:20 am | टर्मीनेटर

"ये किसी के भी साथ हो सकता हैं!" सावध रहाण्याला पर्याय नाही.

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

श्रीगणेशा's picture

9 May 2023 - 11:29 pm | श्रीगणेशा

चित्रपट परीक्षण आवडलं!

चौकस२१२'s picture

10 May 2023 - 5:18 am | चौकस२१२

आपलं परीक्षण चित्रपट पाहिल्यावर नीट वाचणार हे नक्की
तूर्तास , आपण एका मुस्लिम कुटुंबाबरोबर हा चित्रपट पाह्यला गेलात आणि ते आले या बद्दल आपले आणि त्यांचे कौतुक
हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने
असे समतोल विचार दाखवले असतील तर उत्तमच आहे ...
दुर्दैवाने " मुस्लिमांच्या भावना दुखावू नका" एवढाच परवलीचा शब्द घेऊन या चित्रपटाला जो विरोध होतोय तो दुर्दैवी

""तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर .....
आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 8:30 am | टर्मीनेटर

श्रीगणेशा | चौकस२१२
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चौकस२१२

"आणि हे वाक्य ऐकून तर हाहा पो दु झाले "

प्रत्यक्ष चित्रपट पाहताना ज्या घटनांच्या पार्शवभूमीवर आधारित असा तो संवाद आहे त्या पाहिल्यावर हसू येणार नाही!

प्रचेतस's picture

10 May 2023 - 12:48 pm | प्रचेतस

संतुलित आणि समतोल परीक्षण आवडले. असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच. मात्र यानिमित्ताने तुमच्या बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)

@ प्रचेतस

"असे चित्रपट मात्र आवडत नसल्याने बघणार नाहीच."

मलाही आवडत नाहीत, पण विषयाची योग्य हाताळणी आणि वेगवान, प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट मात्र आवडला!

"बॉण्डपटांवरील लेखमालिकेची आठवण करून देत आहे. लिहायला घ्या भो लवकरात लवकर :)"

कोकण-गोवा मालिकेचे २-३ भाग अजून लिहायचे बाकी आहेत, ते झाल्यावर बॉंड पंचविशीला हात घालतो 😀

कानडाऊ योगेशु's picture

10 May 2023 - 4:06 pm | कानडाऊ योगेशु

आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात

काही वर्षांपूर्वी बंगरूळात असताना शेजारी एक मुस्लीम कुटुंब राहायला आहे. पती पत्नी व एक लहान मुलगा व त्याची साधारण ८-९ वर्षांची मोठी बहिण असे. माझी कन्या ही साधारण त्याच वयाची असल्याने मुलीसोबत तिची गट्टी जमली. मुलगा ३-४ वर्षांचा होता व बालसुलभ ओढीने माझी कन्याही त्याच्या सोबत खेळत असे. काही दिवसंनंतर जाणवले कि मुलीच्या बोलण्यात उर्दू शब्द यायला लागले होते आधी कौतुक वाटले. काही दिवसांनी माझी कन्या रडत रडत घरी आली कारण विचारले तर मुलाने मारले आम्ही बाहेर आलो. परिवारातील मुस्लीम स्त्री मुलाला रागवत होती पण तिने हात काही उचलला नाही. वो मस्सूम है ना असे म्हणुन प्रकरण मिटवले. नंतर एकदा बाहेर अजान चालु असताना मुलगी एकाएक स्तब्ध झाली तिला विचारले असे का केले तर म्हणाली कि अल्ला जहन्नुम मे डालेगा नही तो .तेव्हा जाणीव झाली कि आता काही केले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागेल.मी ही आस्तिक आहे व रोजच्या दिनचर्येत देवासमोर बसुन स्तोत्र वगैरे म्हणत असतो पण तो पावेतो कन्येला त्यात समाविष्ट केले नव्हते. आणि विशेष म्हणजे त्या परिवारीत्ल मुलीसाठी रोज संध्याकाळी कुराण पठणासाठी एक मौलवी येत असे तेव्हा ती मुलगी अगदी हिजाब वगैरे घालुन तयार राह्त असे. त्या दिवसांपासुन कन्येला देवासमोर प्रार्थना म्हणणे आरती म्हणणे ह्यात अगदी आग्रहाने घेऊ लागलो. आणि तिला आश्वस्त ही केले कि त्या मुलाने पुन्हा हात उचलला तर दोन ठेवुन दे आम्हीही बोलु कि ये भी मस्सूम है वगैरे. पण ती वेळ न्म्तर आली नाही.

शाम भागवत's picture

11 May 2023 - 6:42 am | शाम भागवत

प्रतिसाद आवडला.

कानडाऊ योगेशु, पुढचा धोका वेळीच ओळखलात ते बरे झाले!
प्रतिसाद आवडला!!

@ कानडाऊ योगेशु
स्वानुभवाधारित प्रतिसाद आवडला 👍
नव्या पिढीला कर्मठपणा आणि सोवळे-ओवळे शिकवण्याची गरज नाही, पण काही बेसिक धार्मिक संस्कार मुलांवर घरातूनच होणे अत्यावश्यक वाटते!

विवेकपटाईत's picture

10 May 2023 - 5:48 pm | विवेकपटाईत

एक अरब स्टोरी ही बनविण्याची गरज आहे. हजारो मुलींना गरीब मुलींशी भारतात येणारे अरब शेख काही दिवसांसाठी लग्न करतात आणि तलाक देतात . काही विदेशात घेऊन जातात मौज मस्ती करतात आणि नंतर त....... https://m-hindi.webdunia.com/latest-deutsche-welle-news/arab-sheikh-marr...

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 May 2023 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
रंगीला रतन's picture

10 May 2023 - 10:05 pm | रंगीला रतन

परिक्षण आवडले

धर्मराजमुटके's picture

10 May 2023 - 10:36 pm | धर्मराजमुटके

चित्रपट उत्तम आहे. काश्मीर फाईल्स फारच संथ होता.
मुद्दा क्र. १ :
मुळात लव जिहाद हा एक अँगल झाला मात्र मुळ गोष्ट तीच आहे. स्त्रीला काबूत ठेवण्याची !
पुरुषाची आदिम प्रवृत्ती ! आपल्या प्रॉपर्टीत दुसरा भागीदार होऊ नये ही दुसरी इच्छा !

मुद्दा क्र. २
आई वडीलांनाच धर्माबद्दल माहिती नसते तर मुलांना काय कप्पाळ सांगणार ? गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ? तत्त्वज्ञान वगैरे दुरच्या गोष्टी झाल्या पण निदान कथारुपात देव देवतांच्या गोष्टी तरी हिंदूंना माहित असाव्यात. कथा वाचून, ऐकून कदाचित लहान वयात समजणार नाहीत, धर्माबद्द्ल नावड निर्माण होईल किंवा मूल नास्तिक होईल. पण त्या गोष्टींत रस निर्माण झाला तर पुढे जाऊन धर्मबदलाचे भूत तरी मानगुटीवर चढणार नाही.
हिंदू धर्म ब्रह्मा आणि सरस्वतीची गोष्ट चुकीची असली तरी खुलेपणाने मांडतो, वेगवेगळ्या पंथांना, मतांना थारा देतो, इतर धर्मीयांचे / पंथीयांचा त्यांच्या आवडीप्रमाणे जगण्याला मंजूरी देतो ही हे स्वातंत्र्य अनुभवायचे असेल तर हिंदू असण्याला पर्याय नाही. आपल्या धर्माबद्द्ल माहीती असेल आणि इतर धर्मांचा थोडा बहूत अभ्यास असेल तर बाळबोध शालीनी प्रमाणे धर्मांतर शक्य होणार नाही.

"जो देव आपल्या बायकोला वाचवायला स्वतः सक्षम नसतो तो माकडांची मदत घेतो तो तुम्हाला काय मदत करणार ? " "जो देव आपल्या मुलाला सुळावर जाण्यापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कसा वाचवणार " अशा प्रश्नांवर निरुत्तर होण्याची गरज नसते आणि त्याचे उत्तर देण्याची गरज नसते.
या प्रश्नाच्या उत्तरादाखल
"जो देव त्याच्या सर्वात लाडक्या अनुयायाला साध्या तापापासून वाचवू शकला नाही, त्याला अपस्मारापासून वाचवू शकला नाही तो देव तुम्हाला कशी मदत करणार ? "
"जो देव आपल्या लाडक्या अनुयायाच्या नातवाचा खून होण्यापासून वाचवू शकला नाही तो तुम्हाला कशा प्रकारे वाचवणार ? "
असे प्रश्न विचारता येऊ शकतात.

ज्या दिवशी बाईची जात आपल्या इज्जत, आब्रु सारख्या संकल्पना मोडीत काढेल आणि त्यामुळे आत्महत्या करणार नाही त्या दिवशी पुरुषाच्या हातातील एक प्रभावी आयुध गळून पडेल. हे मध्यमवर्गीय पुरुषांसाठी देखील तितकेच लागू आहे. देव दिसत नाही म्हणून तुम्ही छाती काढून नास्तिक असल्याचे ढिंढोरे पिटता तेवढ्याच मोठ्याने दिसत नसलेल्या इज्जत / आब्रुचे नगारे वाजविणे सोडले तर आयुष्य सुखी होईल.
असो. हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे.

शाम भागवत's picture

11 May 2023 - 6:42 am | शाम भागवत

प्रतिसाद आवडला.

गणपतीच्या मिरवणूकीत नाचले आणि गुढीपाडव्याला नऊवारी साड्या आणि फेटे घालून फटफट्या चालवणे म्हणजेच धर्म एवढीच पालकांची समज असेल तर मुलांना काय समजावणार ? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार >>>
हा हा, चपखल!

विवेकपटाईत | राजेंद्र मेहेंदळे | रंगीला रतन | धर्मराजमुटके
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ धर्मराजमुटके

"हा प्रतिसाद म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे असे समजून विसरुन गेले तरी चालण्यासारखे आहे. "

नाही, तसे काही नाही. प्रतिसादातून भावना व्यवस्थित पोचल्या!

शाम भागवत's picture

11 May 2023 - 6:51 am | शाम भागवत

परिक्षण आवडले.
मला काही हा सिनेमा पाहवणार नाही. याच कारणाने काश्मिर फाईलही पाहिलेला नाही.
पण भारतात हिंदू धर्म जागा होऊ लागला आहे हे नक्की. अगदी नास्तिक हिंदू देखील आता हिंदू धर्मावर होणा-या आघातावर विचार करायला लागला आहे. बोलायला लागला आहे व हे प्रमाण वाढत चालले आहे.

मात्र यातून अध्यात्माकडे वळणारी माणसे तयार व्हायला पाहिजेत एवढीच इच्छा आहे.

आपलेच दात आपलेच ओठ, नुकतेच केदार शिंदे या अनुभवी दिगदर्शकने ( शगंगाधर टिपरे ते शाहीर साबळे ) एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी महाराष्ट्रात केरळ स्टोरी फुकट दाखवलं जात आहे यावर नाराजी व्यक्त केली आहे ..
हि कसली विचित्र पोटदुखी ..विचित्र प्रवृत्ती .. साहिर साबळेंचं जीवांवरील चित्रपट आणि हिंदू मुलींचे धर्मांतर हे केवढे वेगळे विषय .. काय यांच डोस्क फिरलोय का ?

हा विडिओ जरूर पहा
https://www.youtube.com/watch?v=3dzSfJJLYFw

सतिश पाटील's picture

11 May 2023 - 12:01 pm | सतिश पाटील

बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता,
मग तुम्हाला आवडला का चित्रपट ?

आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही.
बायकोचे मत तेच तुमचे मत का ?

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 9:42 am | टर्मीनेटर

शाम भागवत | सतिश पाटील
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ सतिश पाटील
आपण जी दोन वाक्ये अधोरेखित करून दोन प्रश्न विचारले आहेत त्या वाक्यांआधीचे त्या परिच्छेदातले सर्वात पहिले वाक्य

"मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही."

आपल्या वाचनातुन निसटले असावे काय 😀
असो.. वरील प्रश्न विचारण्यामागील आपल्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी उत्तरे देतो.
१)

मग तुम्हाला आवडला का चित्रपट ?

ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच अधोरेखीत केलेल्या माझ्या "बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता" ह्या वाक्यातील 'तिलाही' ह्या शब्दात दडलेले आहे 😀

२)

बायकोचे मत तेच तुमचे मत का ?

माझे मत काय असावे हे वरती दिलेल्या पहिल्या वाक्यातील 'ती माझी आवडच नाही.' ह्या शब्दांतुन लक्षात येणे तसे अजिबात अवघड नाही. पण तरीही तुम्हाला अपेक्षित असा तुम्ही काढलेला अर्थही मान्य करण्यासही माझी काहीच हरकत नाही, तसेही म्हणतातच ना "Wife is always right" इथेही तसंच समजा हवंतर 😂

अथांग आकाश's picture

11 May 2023 - 12:19 pm | अथांग आकाश

आम्ही सुद्धा गेल्या रविवारी हा सिनेमा पाहीला असल्याने लेखातील प्रत्येक वाक्याशी सहमती आहे!
सर्व भारतियांनी एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे!!
सिनेमा आणि परिक्षण दोन्ही आवडले. धन्यवाद!!!
0

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2023 - 4:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

घरच्यांसोबत चित्रपट पाहिला आणि आवडला.

त्यावरचे बरेच लेख वाचले बरेच योउत्युबे व्हिडीओ पण पाहिले. त्या सगळ्यात हे परिक्षण सर्वात जास्त संतुलीत आणि परखड वाटले.

चित्रपट यायच्या आधिपासुनच अनेकांची जळजळ सुरु झाली होती. अपेक्षेप्रमाणे या वर राजकारण देखिल सुरु झाले आहे.

पण ते सगळे बाजूला ठेवत कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा लेख प्रचंड आवडला.

प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा सिनेमा.

पैजारबुवा,

कंजूस's picture

13 May 2023 - 3:29 am | कंजूस

"*******पासून कुणी धडा घेत का नाही!"
हे एक सामान्य वाक्य म्हणजे मनातील एक कप्पा तडजोड न करण्याबाबत असतो. दुसरा टप्पा पयशे हवे असतील तर *** तमुक करायला हवे हे सांगतो.

अथांग आकाश | ज्ञानोबाचे पैजार | कंजूस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कंकाका आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला आहे 😀

कर्नलतपस्वी's picture

16 May 2023 - 11:20 am | कर्नलतपस्वी

बहुतेक माझ्या प्रतिसादाला उत्तरले असावेत.

सुबोध खरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.

बाकी मनाचे काय!

मन काळोखाची गुफा
मन गरगरते आवर्त

माणसागणीक मनाची वेगवेगळी रूपे. कोण सापळा लावून बसलायं आणी कोण त्यात आडकतं.

शाम भागवत's picture

16 May 2023 - 12:49 pm | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 May 2023 - 12:49 pm | शाम भागवत

आज आमच्या एका कौटुंबीक ग्रुपवर मेसेज आलाय.

एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.
__________

हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?

एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे….

तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?

कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ?

तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक कुठे आहे ?

आमच्या समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते आणि इबादत/नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते...

तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा स्वतःला देवाकडून कांही हवे असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात.
आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल, मंदिरात काय करावे माहित नसेल, पूजा हे कर्तव्य आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का ?

तुमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकांचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्याने शुभम् करोती कल्याणनम् अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दु:खही वाटत नाही !

घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना "सलाम" म्हणायला शिकवतो.
पण तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला जबाबदार कोण ?

कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात.

तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत येत नाही, आणि ब-याचदा मातृभाषाही येत नाही. हा आमचा दोष आहे का ?

तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही. आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही.

तुम्ही स्वतः तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता. तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता. या पद्धतींची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते.

आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात. याला मुस्लिम जबाबदार कसे ?

तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.

तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा. आम्ही कारणीभूत आहोत का ?

खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ?

आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.

अनेक दशकांपासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात. पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर का ठेवता ?

याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.

आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.

शाम भागवत's picture

16 May 2023 - 12:50 pm | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 May 2023 - 12:51 pm | शाम भागवत

मी यावर आमच्या ग्रुपमधे खालील प्रतिसाद उत्तरादाखल पोस्ट केलाय.

ब्राह्मण ब्राह्मणासारखा वागत नाही. मग बाकीच्यांनी त्याला का महत्व द्यावे?

पण माझा अनुभव मला असं सांगत आला आहे की, ब्राह्मणाने ब्राह्मणासारखे वागले तर वाईटातला वाईट सुध्दा कालांतराने आपल्याशी चांगले वागायला लागतो.

मात्र कलियुगातील "ब्राह्मण" या शब्दाची व्युत्पत्ती मी माझ्यापुरती बदलून घेतली आहे.

ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो असे मानण्याऐवजी, ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणारा तो ब्राह्मण अशी माझी सुधारित व्याख्या आहे.

माझ्या विचारांशी सुसंगत पोस्ट आल्याने माझे मत मांडण्यासाठी स्वत:ला आवरू शकलो नाही.

एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.

सदर लेखात लेखकाने विचारलेले प्रश्न अजिबात गैरलागू नसले तरी ह्या लेखातला आशय विचारात न घेता तो केवळ एका 'मुसलमान' व्यक्तीने लिहिला आहे म्हणून आपलेच (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे तथाकथित हिंदू धर्माभिमानी) लोकं एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी करतील किंवा त्यावर टिका तरी करतील!

"कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात."

ह्या विधानाची सत्यता मी स्वानुभावावरुन मान्य करतो!
सौदी अरेबिया ह्या कट्टर इस्लामी देशाकडून जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्या कट्टर 'वहाबी' पंथाची धार्मिकमुल्ये अनुसरावी ह्यासाठी अब्जावधी 'पेट्रोडॉलर्सची' खिरापत वाटली जाते हि गोष्ट आता लपून राहिलेली नाही! भारतातही ह्या 'कार्यासाठी' त्त्यांच्याकडून प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मदरसे आणि मशिदींना त्यासाठी अर्थपुरवठा केला गेला/जातो आहेच, तसेच अनेक लहानशा खेडेगावांमध्येही टोलेजंग नवीन मशिदिंच्या उभारणीसाठी तुफान खर्च करण्यात आला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत शहरांत/निमशहरी भागांत आणि लहान-सहान खेडेगावांमध्ये कितीतरी अशा नवीन/चकाचक मशिदिंची उभारणी झालेली आपल्यापैकी अनेक डोळस लोकांच्या दृष्टीस पडली असेल. मशिदींच्या घुमटावरील किंवा मिनारांवरील चंद्रकोरीच्या विशिष्ट कोनावरून अशा सौदी 'फंडिंग' मधून उभारलेल्या नविन मशिदी ओळखणे आधी तसे सोपे होते, पण आता हळू हळू अनेक जुन्या मशिदींवरील चंद्रकोरींचा कोनही बदलण्यात येत असल्याने पुढे अशी ओळख पटवणे अवघड होत जाईल.

तर सांगायचा मुद्दा काय तर, जगभरातील सर्व मुस्लिमांची वेशभूषा अरबी पद्धतीची आणि बोली भाषा अरबी असावी ह्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. 'उर्दू' ह्या एतद्देशीय भाषेला मूठमाती मिळून भारतीय मुस्लिमांची बोली भाषाही अरबी करण्यासाठी आणि कुराण पठणासाठी मदरसे आणि मशिदींमधून अरबी भाषेचे वर्ग चालवले जातात तसेच भरघोस पारितोषिकांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात.

लेखात मी उल्लेख केलेल्या माझ्या मुस्लिम मित्राची 'कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये शिकणारी (आता) १२ वर्षाची झालेली मुलगी लॉकडाऊन संपल्यानंतरही शाळा उघडल्या नव्हत्या त्या काळात मशिदीमध्ये चालणाऱ्या अशा 'अरबी' भाषा वर्गासाठी जात होती. अरबी भाषेचा गंधही नसलेल्या पण जात्याच हुशार असलेल्या ह्या मुलीने अवघ्या सहा महिन्यांत त्या भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यातील प्राविण्य जोखण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही पटकावले.

भारतात उर्दू भाषेतील बातम्या/कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले. आता हे त्या लहान मुलांनी अरबी भाषा शिकावी म्हणून दाखवलेले प्रलोभन होते/आहे कि खरंच त्यादृष्टीने तयारी सुरु आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

एकीकडे 'अल जझीरा' वाहिनीवरील वृत्तनिवेदिकांसारखा पोशाख आणि अगदी हुबेहूब त्यांच्याच लकबीत वार्तांकन करण्याच्या तिच्या सरावाचे व्हिडीओ जेव्हा हि मुलगी मला पाठवते तेव्हा तिची प्रगती बघून फार कौतुकही वाटते तर दुसरीकडे ह्या 'वहाबीकरणातून' भारतीय मुस्लिमांमध्ये वाढत जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेची चिंताही वाटते.
हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!

येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अ‍ॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले.

म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!

म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!

होय!
आधी जास्तीतजास्त भारतीय मुस्लिमांना अरबी भाषा शिकवायची.
मग स्थानिक अरबी वाहिन्या सुरु करायच्या.
शहरांपासून गावखेड्यांपर्यंतच्या सुशिक्षित/अशिक्षित, गरीब/श्रीमंत अशा सर्व स्तरांतल्या सुमारे वीस कोटी मुस्लिमांना प्रभावित करू शकणारे हे माध्यम हाताशी आले कि मग त्यावरील कार्यक्रमांतुन कट्टर वहाबी पंथाची शिकवण/चालीरीती ह्यांचा रतीब घालायचा असे काहीसे नियोजन असावे असा अंदाज लावता येईल.

मुक्त विहारि's picture

17 May 2023 - 9:31 pm | मुक्त विहारि

मी, CCC, नावाच्या कंपनीत कामाला होतो, सौदी अरेबिया मध्ये... सन, 2008-09....

बहुसंख्य कामगार, बिहारी मुस्लिम..... आणि त्या सर्वांचे एकमत असे की, सौदी हा आमचा मुलभूत देश आणि आमची खरी भाषा अरबीच आहे.... (कारण, मक्का आणि मदिना, सौदी अरेबिया मध्ये आहेत.) .... पाकिस्तान हा आमचाच भाग... एक ना एक दिवस, भारतात शरियत कायदा आम्ही लागू करणारच, असही ते म्हणायचे....

और 25 साल रुको ... IAS, IPS, MLA और MP भी हमारे होंगे, उस के बाद फिर से भारत में मुस्लिमों का राज होगा ... ह्यावर त्या सर्वांचे एकमत होते .....

हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
-----

जैन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?

पारशी आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?

स्वातंत्र्या नंतर आणि विशेषतः 1970 नंतर, बौद्ध आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?

ख्रिश्र्चन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?

शीख आणि हिंदू यांच्यात किती दंगली झाल्या?

-------

बाय द वे,

तुम्ही कुराण वाचले आहे का?

आणि तुमच्या उदारमतवादी विचारसरणी बद्दल अभिनंदन...

मी तुमच्या इतका उदारमतवादी होऊ शकत नाही....

मी, ना राणा संगा होऊ शकतो, ना राणा प्रताप, ना लचित बडफुकन, ना छत्रपती संभाजी महाराज .... पण, मी सुर्याजी पिसाळ किंवा राजा जयचंद कधीच होणार नाही ....

टर्मीनेटर's picture

16 May 2023 - 11:39 pm | टर्मीनेटर

हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!

असे ते एकसंध वाक्य आहे, त्यातले अर्धे वाक्य तुम्ही वेगळे काढुन अधोरेखीत केल्याने संपुर्ण वाक्याच्या मुळ अर्थाचा विपर्यास होतोय आणि त्यामुळे पुढचा तुमचा सगळा प्रतिसादच भरकटल्यासारखा वाटतोय 😀

मुळ वाक्यांची मोडतोड करुन त्यांच्या अर्थाचा विपर्यास करुन सादर करण्याची पत्रकार आणि न्युज चॅनल्सच्या अ‍ॅंकर्सची सवय आता त्यांच्या वाचक्/प्रेक्षकांमध्येही उतरत चालली आहे असे वाटते.
असो.........

आणि त्याच्याही आधी पासून, जैन आणि बौद्ध संस्कृति भारतात नांदत आहेत...

त्यामुळे, जैन आणि बौद्ध आणि हिंदू, ह्या संस्कृती एकमेकांचा आदर राखूनच होत्या आणि आहेत आणि पुढेही असतील....

तुमच्या वाक्यातील पहिला भाग पटला.

पण, त्याच वाक्यातील, पुढचा भाग पटला नाही.

म्हणून जो भाग पटला नाही, त्यावरच भाष्य केले.

श्रीगुरुजी's picture

19 May 2023 - 9:11 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

22 May 2023 - 10:57 pm | श्रीगुरुजी

बरीच किंमत दिली पण वाचली

एखाद्या उच्चशिक्षित कमावती मुलीला जेमतेम १२ वी पास, कामधंदा नसलेल्या, मारहाण करणाऱ्या मुस्लिमाविषयी काय आकर्षण असावे?

सर टोबी's picture

23 May 2023 - 2:48 am | सर टोबी

मागणी तसा मथळे आणि बातम्या यांचा पुरवठा तर होत नाहीय ना?

पीडित तरुणी घरातून निघून गेली त्याची ना दाद ना फिर्याद. बरं या “हिडन ट्रुथचे” पाप सेक्युलर सरकारवर मारायचे असेल तर गेली निदान अठरा वर्षे मध्य प्रदेशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमींचे सरकार आहे. तेव्हा सदरची ”तरुणी" निदान छत्तीस वर्षाची असावी.

भरीला तिचं ब्रेन वॉश पण झाले होते पण ती सर्व विचारधारा सिनेमाच्या तीन तासाच्या प्रबोधनाने बदलली. हा म्हणजे “हादसे के वजह से यादगाश वापस” येण्याचाच प्रकार दिसतोय.

बघा बुवा. बातम्या छापणं हा वर्तमानपत्र चालवणाऱ्यांचा व्यवसाय झाला. पण तुमचं तसं नाहीय ना. “आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दुवा द्या” अशी मागणी करायची असेल तर आपले स्वतःचे दावे देखील बळकट असायला हवे ना?

श्रीगुरुजी's picture

23 May 2023 - 6:35 am | श्रीगुरुजी

शहामृगी प्रवृत्तीचे ढळढळीत उदाहरण

मुक्त विहारि's picture

27 May 2023 - 12:18 am | मुक्त विहारि

बाय द वे,

श्रीगुरूजी,

काही लोकांच्या बरोबर प्रतिसाद-प्रतिसाद हा खेळ मी तरी खेळत नाही ..... आपलाच वेळ वाया जातो ...

आजची सही ...

उदारमतवादी हिंदू, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ......