“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?”
“टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम”
“व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?”
“आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?”
“शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!”
“पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?”
“यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना? लिस्टन टु युअर पापा वन्स फॉर गॉड्स सेक!”
“श्श..रवी! वी आर इन गॉड्स प्लेस.. लेमि प्रे.. बोलाss पुंढलीक..”
प्रतिक्रिया
14 Mar 2023 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
अरे काय ही भाषेची खिचडी!! पांडुरंग पांडुरंग!!
14 Mar 2023 - 5:04 pm | सौंदाळा
परदेशी गेलेल्यांच्या भारतीयांच्या दुसर्या पिढीचे (बहुतांश) खरच हाल होत असतील. आई-बाप भारतीय संस्कार, रुढी-परंपरा शिकवणार आणि समाजात वेगळेच दिसत असणार.
शशक आवडली ओ
14 Mar 2023 - 6:20 pm | कर्नलतपस्वी
जुन्या चालीरीती का आहेत,त्यांचा अर्थ काय,कुणी बनवल्या, केव्हापासून प्रचलित आहेत. त्याचा उपयोग काय.... इत्यादी प्रश्न आजच्या पिढीला पडत आहेत. त्याची तर्कसंगत पटणारी उत्तरे मोठ्यांना देता येत नाहीत. खरेतर आम्हांला सुद्धा निट माहीती नाहीत. पुर्वज करत होते म्हणून आपण करायचे हे या पिढीला मान्य नाही.
नुकतेच इतिहासाचार्य राजवाडे यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतीहास हे पुस्तक वाचले. त्यात लग्नातला लज्जा होम हा संस्कार कसा सुरू झाला (तो आजही चालू आहे )याबद्दल माहीती कळाली. खरोखर आजच्या काळात ही पद्धत चालू आहे यावर विचार व्हायला नको.
करोना काळात कुठल्याच प्रकारचे संस्कार न करता समाजात,जन्म,लग्न ,मृत्यू सोईनुसार कसेतरीच पार पडले. काय फरक पडला?
त्रिबंकेश्वर ला गेलो होतो. तेथील पुजारी म्हणले अभिषेक करायचा का? आकराशे रूपये घेतले. चातुर्मास पुस्तकातील( आमचे मराठी विषयाचे शिक्षक देवळे सर यांनी लिहीले आहे) काही मंत्र म्हणत दोन चार वेळा हातावर पाणी सोडले. बायकोला हाताला हात लावायला सांगीतले. फुलवाल्याने शंभर दोनशे रूपये घेतले. हाच प्रकार कोल्हापुरात, घृष्णेश्वर व इतर देवस्थानात. नुसती लुटा लुट.
एक वेगळा लेख व तर्कसंगत चर्चा होऊ शकते.
15 Mar 2023 - 4:32 pm | हणमंतअण्णा शंकर...
मी वाचले आहे हे पुस्तक. लग्नोत्सुक मंडळींना तर आवर्जून भेटही दिलेले आहे!!
परंतु, एका बाजूने हे ही वाटते की कर्मकांडातले सौंदर्यसुद्धा काळागणिक बदलते. मला कर्मकांड ही मानवी अनुभवांमधली खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.
उदा.
अग्नीशी मानवाचे एक प्रायमल नाते असते.
तुम्ही मॅन फ्रॉम अर्थ (भाग १) हा चित्रपट पाहिला आहे का? युट्यूबवर देखील सहज सापडेल हा चित्रपट. (नसेल तर अवश्य पाहा. स्टोरीटेलिंगचा कळस आहे हा चित्रपट. हा एकाच खोलीत घडतो आणि फक्त संवादाने अथपासून इतिपर्यंत अक्षरशः हलू देत नाही. मला चर्चानाट्य आवडत नाही तरीही हा चित्रपट पाहून मी साफ उडालोच होतो. नंतर बराचकाळ हा चित्रपट डोक्यात राहतो नि:संशय) त्यामध्ये नायकसुद्धा आगीशी एक आदिम नातं आहे हे सांगतो. म्हणजे चित्रपटाच्या कथेला जोडून हे नातं तपासलं की हे स्पष्ट उमगतं. राजवाड्यांनी हाच संबंध अजून विस्ताराने सांगितला आहे, प्रजापति इत्यादींच्या संदर्भाने. अग्नीच्या सानिध्याचा गर्भवती स्त्रियांना जो फायदा होत होता म्हणून अग्नी तत्कालिन लग्नसंस्काराच्या कर्मकांडात सुद्धा महत्त्वाचा होऊन बसला. आजही कदाचित बाळंतीणीच्या कॉटखाली विस्तव ठेवतात म्हणूनच.
परंतु आजच्या कर्मकांडात हा अग्नि एक सिम्बॉलिक गोष्ट आहे. केवळ आजचाच विचार केला तर ती एक अनावश्यक गोष्ट आहे. आज अग्नि सतत तेवत ठेवायची गरज नाहीच, पण अग्निचीही गरज नाही. तरीही फक्त एक परंपरेने आलेली गोष्ट म्हणून कर्मकांडात अग्निला एक सौंदर्याचे स्थान आहे. मला वाटते की या कर्मकांडाला आजच्या काळाचा संदर्भ देऊन पाहून तिच्यातल्या युटीलिटीचाच विचार करू नये. नाहीतर अग्निकुंडाऐवजी लोक बजाज इंडक्षन ठेवून सात फेरे घेतील. हा एका टोकाचा निरर्थक विचार झाला. एक कर्मकांड म्हणून ते किती सुंदर आहे हाच विचार त्यामागे असावा. ते कर्मकांड जर निसर्गाच्या मुळावरच उठत असेल तर मात्र ते त्यागावे किंवा पर्यायी विचार करावा.
वाहत्या पाण्यात अस्थी वाहणे ही एक प्रचंड सुंदर गोष्ट आहे. भावनिक आहे, भारतीय विचारांना धरून आहे, मन हलकं करणारी आहे, 'मूव्ह ऑन' जे म्हणतात तेही सांगणारी आहे. परंतू पाण्यात अर्धवट जळालेली प्रेतं फेकून देणे हा गाढवपणा आहे. प्रचंड लोकसंख्या असल्याने आधीच मेलेल्या नद्यांत अस्थी वाहणे देखील निसर्गाला मारक ठरेल. मग कर्मकांड तसेच ठेऊन पूर्ण अस्थिंचा कलश नदीत रिकामा करण्या ऐवजी चिमूटभर राख नदीतल्याच गाळात मिक्स करून तो गाळ नदीत वाहून द्यावा. काहीतरी तोडगा काढता येईलच की. कर्मकांडातले सौंदर्य उणावू नये.
विवाहातले काही कर्मकांड आज त्यागून देण्याच्याच लायकीचे आहेत. एकेकाळी अंगवस्त्र किंवा उत्तरीय ही प्रचंड चैनीची गोष्ट होती. कापडच ही एक दुर्मिळ कमोडिटी होती. तेव्हा ठीक आहे, आज टॉवेल टोप्या द्यायची काय *टाची गरज आहे हेच कळत नाही. त्यातून कसले सौंदर्य प्रकट होते कोणास ठाऊक! त्या टॉवेलचा उपयोग शेंबूड पुसायलापण होत नाही. त्याऐवजी नवीन कर्मकांडे का तयार करू नयेत? उदा. लग्नवृक्ष म्हणून एक वृक्ष दाम्पत्यांनी एकत्र लावावा. तो वाढवण्याची जबाबदारी त्या दांपत्याची. तो जितका बहरेल तितके सुख दाम्पत्याला मिळेल अशा कथा रचाव्यात फारफारतर. गावांनी असे वृक्ष लावायला जागा उपलब्ध करून द्याव्यात देवरायांसारख्या. नाहीतर पत्रिकांमध्ये देववृक्ष वगैरे नॉनसेन्स भरलेलाच असतो. त्याचा काहीतरी उपयोग होईल प्रत्यक्ष आयुष्यात. मला हे जास्त सौंदर्यपूर्ण आणि कालसुसंगतही वाटते.
17 Mar 2023 - 1:35 pm | चांदणे संदीप
अतिशय आवडता चित्रपट! :)
सं - दी - प
14 Mar 2023 - 6:32 pm | चौकस२१२
कथा वाचली, आणि जरी हे निरीक्षण अगदी चुकीचे आहे असे म्हणणार नाही ... तरी "नेहमीच येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे " ते परदेशात गेलेले ना असेच " या पठडीतील वाटली ...
स्थलांतरांच्या दुसऱ्या पिढीच्या भाषेत दोन्ही येणार हे साहजिक आहे .. विचारात हि ओढताना होत असणार ( अर्थात या लघुकथेत जरा थोडी अतिशयोक्ती होतीय "
अहो पण आज भारतातील अनेक "वेल टू डू हा" कुटुंबात हि "ना घर का ना घाट का" हि परस्थिती दिसते .. परदेशात निदान हे तरी म्हणू शकतो कि दुसरी पिढी खऱ्याच एका वेगळ्या समाजात वाढते आहे तिथे त्यांना नुसतेच इंग्रजी भासाहिक नाही तर इराणी पासून ते कोरियन पर्यंत लोकांशी संपर्क येतो ,, मुंबई पुण्या सारख्या शहारात अगदी "कॉस्मो " वातावरण असून असून असे किती असणार आज टोरँटो किंवा सिडनी एवढे तर नक्कीच नाही.
बरेच जण तर मराठी भागात राहून सुद्धा " एस नो यार काय वैताग आहे " असे बोलतात आणि विचार असतात , मातृभाषेतील किती जण वाचतात ? किती जण मराठी गाणी ऐकतात किंवा मराठीतून लिहितात ? तेवहा " नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) लोकांच्या दुसरया पिढीवर भाष्य करण्याआधी मातृभूमीत काय परस्थिती आहे ती हि बघावी !
14 Mar 2023 - 7:53 pm | राजेंद्र मेहेंदळे
असे निरिक्षण नोंदवतो. खालील लेखावर मागे ही सर्व चर्चा झाली आहे.
https://www.misalpav.com/node/51024
https://www.misalpav.com/node/50966
14 Mar 2023 - 9:06 pm | हणमंतअण्णा शंकर...
असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही.
असे पालक मी सांगली कोल्हापूरात पंढरपूरातसुद्धा बघितले आहेत. सिडनी, लंडन वगैरेतली मंडळी खास कशाला जाऊन उगाचच पंढरीला देवळात उभी राहतील?
14 Mar 2023 - 10:36 pm | गवि
एम आय टी प्रेप क्लासेस महाराष्ट्रातील इच्छुक पोरे कुठून तरी करत असतीलही. पण
हे जरा जास्तच झालं सांगली पंढरपूर किंवा अगदी पुणे, मगरपट्टा, बँड्रा -जुहूसाठी सुद्धा.
अगदी फाईव् स्टार मेनू कार्ड.
खरंच ही कथा परदेशातून आलेल्या कुटुंबाबद्दल घडत असली (असती) असे establish झाले तरी कथेच्या आशय आणि विषयाला किंवा इम्पॅक्टला काहीच बाधा येत नाहीये असे वाटते. तेव्हा ती भारतीय मराठी कुटुंबा बाबत भारतात विठ्ठल मंदिरात होऊ शकेल असे म्हणण्याची आवश्यकता वाटत नाही.
कथा आवडली हे वे सां न ल.
15 Mar 2023 - 6:47 am | चौकस२१२
असं कुठंही लिहिलेलं नाही वा सूचितही केलेले नाही.
चूक झाली माझी , घाईत सौंदाळा यांचा प्रतिसाद वाचून तुमच्या मूळ कथेला प्रतिसाद दिला
15 Mar 2023 - 10:48 am | सौंदाळा
स्वतःची वाक्ये, विचार माझ्या तोंडी घालू नका. मी कोठेही नको असलेल्या भारतीय ( एन आर आय ) वगैरे लिहिले नाही. परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत. अगदी अस्तिक / नास्तिक वादासारखे.
माझ्या प्रतिसादात मातृभूमीतील परिस्थितीबद्दल काही लिहिले नाही. याचा अर्थ सगळे ईकडे सगळे आलबेल आहे असा नाही. पण गविंनी म्हटल्याप्रमाणे भाजी भाकरीचे असे स्पष्टीकरण देणारे लोक ईकडे किती निघतील आणि तिकडे किती निघतील याचा जरुर विचार करा.
सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न अशा परदेशात वास्तव्य करणार्या बहुतांश दुसर्या पिढीची (मी तर भारतीय असे पण म्हणालो नव्ह्तो) ही समस्या आहे. घरातून पहिली पिढी एक शिकवत असते पण आजूबाजूला अगदी शाळा, कॉलेज, तिकडच्या सुट्ट्या, सण ते साजरे करण्याच्या पध्दती सगळे वेगळेच दिसते. मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा.
आणि दुसरा मुद्दा म्हणजे अर्धी इंग्लिश / मराठी बोलणे ह्याला मात्र स्थळाची मर्यादा नाही. हा मुद्दा भारतीय (मराठी म्हणुनच) पहावा. बाकी भाषा किंवा देशांबद्दल मला माहिती नाही. पण अगदी खेडेगावापासून, शहरांपर्यंत ते परदेशात पण कोठेही अशी मिश्र भाषा बोलणारे मराठी लोक दिसतात.
15 Mar 2023 - 4:16 pm | चौकस२१२
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज होतोय मी तुमच्या प्रतिसादाला कोणतेही नाव ठेवत नाहीये, अण्णांचं शशक हे भारताबाहेरील कुटुंबाबद्दलचा आहे हे मी घाईत गृहीत धरले ... आणि "नको असलेल्या भारतीय हि माझी शब्दकोटी होती त्याचाही तुमच्या प्रतिसादाशी काही संबंध नाही
राहता राहिले ते "परदेशात वास्तव्य करणारे लोक हा विषय आला की अगदी अंगावर का येतात काही कळत नाहीत."
कारण गेली अनेक वर्षे असे लेख वाचनात येतात कि जे अर्धवट माहिती आणि थोड्याश्या वास्त्यव्यावर लिहिले असतात ..
अण्णांचाही हि कथा प्रथम तशी वाटली एकदम, पण त्यातील कुटुंब हे कुठलेही असू शकते शकते हे समजले आणि क्षमा पण मागितली कि
आता तूच पुढचा मुद्दा "मायदेशातील बहुतांश मुलांना मात्र कमीत कमी घरी आणि बाहेर एक सुसुत्रता तरी दिसते (भलेही कोणताही देश, धर्म असो किंवा ही सुसुत्रता बरोबर असो वा चूक) त्यामुळे त्यांची अशी ओढाताण होत नाही. हा एक मुद्दा."
आता तुम्ही मायदेशी आणि परदेशी मुले हा मुद्दा काढलाच आहे तर मग एक विचारतो ... तशी सुसुत्रता दिसत असून सुद्धा मायदेशी " यु नो व्हॉट ना " असला धेडगुजरी पण का चालतो?
अहो दक्षिण मुंबईत हुचभ्रु राहणारे मराठी लोक "इंडियन बॉर्न कन्फयुज्ड देशी" दिसले मग फॉरीन बॉर्न कन्फयुज्ड देशी होतील तर नवल ते काय ?
15 Mar 2023 - 4:46 pm | सौंदाळा
मी तेच म्हणतोय
हा मुद्दा स्थल निरपेक्ष आहे. खेडेगाव, शहर, आपला देश, परदेश सगळीकडे असला धेसगुजरीपणा करणारे दिसतात.
मात्र सांस्कृतिकद्रुष्ट्या ओढाताण हा मुद्दा मात्र बहुतांश परदेशात राहणार्यांच्या दुसर्या पिढीचा प्रश्न आहे. तुमच्या अन्य धाग्यांवरच्या प्रतिसादात तुम्ही ऑस्ट्रेलियातील शिखांच्या मोर्चांबद्दल लिहिले होते हा पण त्यातलाच प्रकार वाटतो. समजा तीन, चार पिढ्या तिकडे गेलेले शीख लोक असे मोर्चे काढतील का ? असो हणमंतण्णांच्या धाग्यावर अवांतर नको, पुढील चर्चा खरडवहीत करु.
15 Mar 2023 - 4:37 pm | हणमंतअण्णा शंकर...
चूक कसली? चील!
तुमचा प्रतिसाद मला जे म्हणायचं आहे त्याला सुसंगतच आहे!
16 Mar 2023 - 8:31 pm | कर्नलतपस्वी
मिसळ मग ती मटकी,फरसाण तर्रीदार असो किंवा भाषेची,चटकदारच असते. आता वसुधैव कुटुंबकम म्हटल्यावर देवाण घेवाण होणारच.
पुर्वी रंगपंचमीला रंग खेळायचे पण उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकांमुळे धुळवडीलाच काही ठिकाणी रंग खेळतात.
15 Mar 2023 - 12:28 am | चित्रगुप्त
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड. आय रियली लाईक दीज हंड्रेड हंड्रेड वर्ड्च्या स्टोरीज. खूप फनी वाटतं. मराठी लँग्वेज रियली खूप रीच आहे. सिल्वेस्टर, मंजे माजा डॉगी, कांट रीड, सो मी त्याला लाऊडली वाचून दाखवते. ही आलसो लाईक्स इट.
-- मोना डार्लिंग.
15 Mar 2023 - 2:18 am | कंजूस
मोना आणि पृथ्विक महान जोडी आहे. आणि लेखकही.
शशांक आवडली.
15 Mar 2023 - 1:00 am | हणमंतअण्णा शंकर...
नामक एका मराठी नटीने मागे एक व्हिडिओ शेअर केला होता. बारामतीतला.
सवि* दा*ले यांचे पती त्यांच्या नवजात मुलाशी बोलत होते. उन्हाळा असावा.
तर पतीमहोदय बारामतीत पाळण्यातल्या मुलाला जोजवताना - 'टू मच हीट ना? आर यु फिलींग हीट? हीट? येस? येस?' असलं काहीतरी बरळत होते. मूल काही महिन्यांचे असावे.
सविता दामले किंवा तसली दांभिक माणसं बर्याचदा मराठी भाषेतून, मराठी भाषेविषयीच आभाळ हेपलत असतात. प्रत्यक्षात पाहिलं तर ती मुलांशी मराठीतही बोलत नाहीत.
विठ्ठलाला आजही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठलाच्या डोक्यावर गुराख्याची टोपी आहे. त्याचा वेश बावळा आहे. एका हातात गुराख्याची काठी आहे. असा हा गोपवेषातला विठ्ठल तुम्ही कधी मूळ रूपात पाहिला आहे का? असला गुराखी विठ्ठल म्हणूनच भाजी भाकरी खातो. ज्वारीची भाकरी खातो. रोज खातो. कारण तेच त्याचे खरे अन्न आहे. सेलिब्रेट करायला तो भाकरी एक्झॉटिक गोष्ट म्हणून खात नाही.
"रूप पाहता लोचनी" मधला विठ्ठल हा असा साधा विठ्ठल आहे.
आज आपल्याला जो वैभवी विठ्ठल दिसतो तो संतांना दिसणारा विठ्ठल नव्हे. ते विठ्ठलाला विठोबा म्हणू शकतात. या गुराखी विठ्ठलाचे उन्नयनीकरण कसे झाले हे रांचि ढेर्यासारख्यांनी सविस्तर लिहिले आहे, मी पामराने काय लिहावे? आताही हे सुरू आहे. काही दिवसांनी विठोबा म्हणण्यावरही बंदी येईल. कारण विठ्ठलाचा अपमान होऊ शकतो. आजच्या विठ्ठ्लाला चार टन द्राक्षे लागतात सजवून घ्यायला. तो भाजी भाकरी खाणारा नागवा विठ्ठल वेल्वेटनी नखशिखांत झाकला जातो. कोट्यवधी किमंतीचे दागिने तो परिधान करतो.
विठोबा वाटतो का तो? की विठेश्वरा वाटतो? याला उन्नयन म्हणतात. शिवबाचे कसे छ. शिवाजी होते? एकेरी उल्लेख करायचा नाही अशा धमक्या का देतात लोक?
हैदराबादमध्ये पाच-सहा वर्षांच्या मुलांना मी आयआयटी प्रेप क्लासेस मध्ये जाताना पाहिले आहे. मुलांनी मास्टरशेफ, डान्स इंडिया डान्स, अथवा किमान युट्यूब सेलिब्रेटीतरी व्हावं म्हणून पालक जीवाचा आकांत करतात. हे तुमच्या आसपास दिसत नाही का?
परदेशात गेल्यावरच मातीशी सांधा तुटतो असं नाही. याच मातीवर राहूनही तुटतो. ही मंडळी भाषिक अभिव्यक्तीत गंडतात, स्वभाषेचा न्यूनगंड बाळगतात, आधुनिक विज्ञानाचे सगळे फायदे लाटून रुढी परंपरा यांना निरर्थकपणे लटकून राहण्याचा लटका प्रयत्न करतात, भाजी-भाकरीतला साधेपणा पण झेपत नाही, तिलाही त्यांना पिझ्झ्याचा बेस म्हणून एक्झॉटिक करावं लागतं, ऑरगॅनिक फूड, सात्विक फूड, गोशेण आणि गोमूत्रावर वाढलेले विषमुक्त झिरो बजेट अशी अनेक वलयं ओढून सर्वसामान्य लोकांच्या अन्नाला पवित्र करून घ्यावं लागतं, ती धड आधुनिकही होत नाहीत, धड पारंपारिकही होत नाहीत, अनेक दगडांवर पाय ठेवत भवसागर पार करायचा प्रयत्न करतात. त्यांना कुणीतरी बर्या इंग्रजीत सांगितलं की फोडणीत हिंगाची दुसरी चिमूट घातली तर अन्नाची आध्यात्मिक पातळी ३० टक्क्यांनी घसरते की त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, आर्ट ऑफ लिव्हींगच्या नावाखाली काहीतरी फंडे काढून आयुष्याच्या व्यामिश्रतेलाच नाकारून स्वतःहून आयुष्यावर मार्केट फोर्सेसनी दिलेली इस्त्री फिरवून घेतात... इत्यादी इत्यादी..
15 Mar 2023 - 4:30 am | गवि
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य अनेक ठिकाणी असतो. भाकरीचा पिजझा बेस म्हणून वापर करण्याची आयडिया देखील अशा वर्गात निश्चित निघते.
भाकरी म्हणजे फ्लॅट ब्रेड मेड ऑफ जोवार ऑर बाजरा, आणि भाजी ग्रीन लीफी व्हेजिटेबल मे बी फेनूग्रिक असे प्रथमच समजावून देणे हे फॉरेनर वाटते (टिपिकली five स्टार किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईट मेन्युत प्रथमच पाहणाऱ्या फॉरेनर व्यक्तीसाठी असे वर्णन लिहिलेले असते) इतका एकमेव आणि या एकमेव वाक्याबद्दल केवळ आणि केवळ त्या एका वाक्याबद्दल वर नोंदवले होते. वाचकाला हे फॉरेन कुटुंब आहे असे जे वाटल्याचे सुरुवातीच्या अनेक प्रतिसादात दिसले त्याचे कारण काय असू शकेल याची वाचक म्हणून संगती लावण्याचा प्रयत्न केला इतकेच. अगदी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असल्याने अर्थातच आंग्लाळणे कसे सर्वदूर झिरपले आहे त्याच्याशी सहमत आहेच.
पुढील शशकच्या प्रतीक्षेत.
15 Mar 2023 - 3:56 pm | हणमंतअण्णा शंकर...
गवि,
मी प्रतिसाद देण्याच्या नादात जरासा उद्धट झालो असे वाटते. त्याबद्दल तुमची सपशेल माफी. नेहमीप्रमाणे तुमचा संतुलित प्रतिसाद आवडला. तुमचे म्हणणे मला शतशः मान्य आहे. निदान भारतीय तरी असे लगेच समजावून देणार नाहीत हे मान्य.
परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं. मी माझ्या सासरी एकदा चकुल्या ओरपत होतो.
अर्थातच चकुल्या फारश्या न आवडणार्या परंतु सदैव युट्यूबवर पडीक असणार्या एका भाचराला चकुल्या म्हणजे इंडियन लझान्या/पाप्पारदेले पास्ता कुक्ड इन दाल असे समजावून सांगितल्यावर तो त्या खायला तयार झाला. पुण्यापासून ६० किमी वर एका निमशहरी भागात राहणारं लेकरू आहे हे.
चकुल्या म्हणजे काय हे त्याला माहित होते. पण ते पुरेसे एक्झॉटिक करून सांगावे लागले. म्हणूनच कथेतली आई, देवही ऑरगॅनिक सिम्पल फूडच खातो बरं का बाळा, तू ही खाल्लं पाहिजेस अशीही पुस्ती जोडते.
15 Mar 2023 - 4:30 pm | गवि
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत. आता बनवणे आले.
घरात या पदार्थाला सरळ आमटीतल्या पोळ्या असे म्हणतो, अत्यंत आवडता पदार्थ. काही ठिकाणी चकोल्या, काही ठिकाणी वरणफळे आणि बडोदे मुक्कामी असताना डाळ ढोकळी या नावाने हेच खात आलो आहे. गुजरातेत त्यावर कच्चे तेल घेतात हे शिकलो. घरी तूप घेत असे. आता वयानुसार विना तुपाने भागवतो. तर हे झाले विषयांतर..
आता अति अवांतर:..
पण समजा हा पदार्थ बनवणे एखाद वेळी शक्य नसले तर पोळ्या गरमागरम आमटीत कालवून देखील उत्कृष्ट लागतात. चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.
15 Mar 2023 - 4:53 pm | हणमंतअण्णा शंकर...
चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.
नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल.
ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.
15 Mar 2023 - 8:29 pm | योगी९००
चकोल्याला कोल्हापुरला असताना लहानपणी वरणफळं म्हणायचो.
मुंबईला आल्यावर डाळ ढोकळा हा शब्द घरात रूढ झालाय. महिन्यातून एकदातरी हा पदार्थ घरी होतोच कारण हा एक प्रकार घरातील सगळ्यांनाच आवडतो. बरोबर साजूक तुप व दह्यातली कोशिंबीर लागतेच.
15 Mar 2023 - 4:37 pm | Bhakti
परंतु मला हेही वाटते की असे दिवस दूर नाहीत, किंबहुना हे तर आत्ताही घडू शकतं.
मला माहित नसलेले पदार्थ माझ्या सात वर्षांच्या मुलीला माहिती आहे यु ट्युब जिंदाबाद! पण मराठी पदार्थ नावं तिला समजावून सांगाव लागत(तरी बरं मराठी मेडियमला आहे म्हणून लवकर समजतं)
मनोरंजक शशक!
ही शशक वाचून....
येस्टरडे आय स्प्रेडेड पीनट बटर ओन गरमा गरम भाकरी आणि एन्जाईड देसी भाकर विद विदेसी फ्लेवरड पण टच :)
15 Mar 2023 - 8:46 pm | योगी९००
कालच मी बंगलोरला ब्रेकफास्टला खालील गोष्टी खाल्या...
स्टिम्ड राईस केक मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स + ग्राऊंड राईस मिक्स्ड टुगेदर
+ डिप फ्राईड डोनट मेड अप ऑफ फर्मेटेड लेन्टील्स बॅटर
याच्याबरोबर साईड डिश म्हणून लेन्टील बेस्ड वेजेटीबल स्टु आणि कोकोनट पल्प (ग्राउंड विथ चिलीझ, कोरीअॅडर) पण होते.
15 Mar 2023 - 8:57 pm | गवि
वाह. आमच्या कार्यालयाच्या खालील अण्णाच्या हातगाडीवरही हेच मिळते उत्तम.
:-))
15 Mar 2023 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे
15 Mar 2023 - 12:03 pm | टर्मीनेटर
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट डिश; मेड फ्रॉम राईस अँड लेंटिल्स (एस्पेशली स्प्लिट अँड स्किन्ड ग्रीन ग्राम), स्पाईसेस अँड गार्निश्ड विथ फ्रेश कोरीअँडर लिव्हज आवडली 😂 😂 😂
15 Mar 2023 - 12:40 pm | गवि
Aromatic long grains of basmati from the foothills of Himalayas steamed, complemented by sun kissed yellow lentils from Vindhya ranges.. topped with seasoning of wildest Chilli handpicked from mystic state of Assam.
दाल तडका, राईस.
15 Mar 2023 - 12:47 pm | टर्मीनेटर
सही हैं... 😂 😂 😂
मा फेवरीट...
15 Mar 2023 - 1:03 pm | सर टोबी
Seasoned in cleared butter with mustard seeds, herbs, and a hint of asafoetida.
19 Mar 2023 - 4:43 pm | तुषार काळभोर
..
16 Mar 2023 - 1:31 pm | सामान्यनागरिक
खरे नांव असे आहे :
अ डेलीशियस मिक्सचर ऑफ़ राईस एण्ड लेण्टील्स कुक्ड टु पर्फ़ेक्शन विथ एन ईन्डीजिनस ब्लेण्ड ऑफ़ स्पाईसेस स्पेशल्ली इम्पोर्टेड फ़्रॉम काह्न्देश. अ हेल्दी डीश विथ अ डॅश ऑफ़ अन्सॉल्टेड बटर विथ एन अकम्पनीमेण्ट ऑफ़ रेड पेप्पर फ़्राईड इन ऑईल एण्ड मस्टर्ड सीड्स एण्ड गार्लीक
17 Mar 2023 - 11:00 am | टर्मीनेटर
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का? मी आपलं वरच्या प्रतिसादात गविंनी उल्लेख केलेल्या पंचतारांकित मेनूतील डिस्क्रिप्शनच्या अनुषंगाने खिचडीचे वर्णन करून टाकले होते 😀
पण हे वर्णन साध्या खिचडी पेक्षा 'दाल खिचडी तडका' साठी समर्पक वाटतंय! चू.भू.द्या.घ्या.
16 Mar 2023 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
फोडणी भात, फोडणीची पोळी यांची शास्त्रीय किवा पंचतारांकीत नावे कोणी सांगेल का? माहागाई किती वाढलेय नाही? तेव्हा रोज रात्री उरलेले शिळे सकाळी टाकुन देण्यापेक्षा अशी नावे वापरुन संपवुन टाकता ञेईल (मुले खात नाहीत हो, मी खातो निमुट).
16 Mar 2023 - 5:36 pm | सर टोबी
made by sauting immaculately preserved cooked rice with finely chopped onion, peanuts, and spices. Generously sprinkled with finely chopped fresh coriander and served with fresh yogurt.
17 Mar 2023 - 11:01 am | टर्मीनेटर
ये भी सही हैं... 😀
17 Mar 2023 - 12:43 pm | टर्मीनेटर
फोडणीची पोळी 😀
A delicious traditional Maharashtrian breakfast dish with high preparation time as 'round flat unleavened bread' made in evening needs to be shelved overnight to obtain a specific aroma. Next morning, chopped aged round flat unleavened bread sauteed in seasoning made with oil, mustard seeds, asafoetida, turmeric,red chilli powder and served directly as it tastes great on its own.
21 Mar 2023 - 2:00 pm | यश राज
फोडणीच्या पोळीचे एक सुंदर नाव म्हणजे "माणिक पैंजण".
आमच्या येथे उरलेल्या भाकरीला फोडणीची केली की तिला "मनोरा" किंवा "मनोहर" म्हणतात.
फोडणीच्या भाताला पण असेच काहीसे सुंदर नाव आहे पण पटकन अठवेनासे झाले.
काय ती एक एक सुंदर नावे..