दोन शशक- बटणाचा मोबाईल

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 12:58 pm

शशक१-
बाबा, जाऊदेना तो जुनापुराणा बटणाचा मोबाईल आता?मी इकडे अमेरिकेत, तुम्ही काही इकडे यायला तयार नाही.आई गेल्यापासून मला सारखी तुमची काळजी लागून राहते. मी काय म्हणते? आजकाल सगळे म्हातारे लोक व्हाट्सअप वापरतात. व्हिडीओ कॉल करून मुला-नातवंडांशी छान बोलतात. तुम्हालाही मी इथून एक चांगला मोबाईल पाठवू का? हळू हळू जमेल तुम्हालापण.

अग नको पोरी , मला काही ते समजत नाही. फक्त आलेला कॉल घ्यायचा किंवा कधीतरी कॉल करायचा इतकेच जमते ते बस आहे की.

ते काही नाही बाबा.मी आता तुमचे काही ऐकणार नाही.पुढच्या आठवड्यात माझी मैत्रीण येणारे इंडियाला परत. मी पाठवतेच तुमच्यासाठी एक छान मोबाईल तिच्याबरोबर. तुम्हाला व्हाट्सअपसुद्धा शिकवेल ती. आता आपण व्हिडीओ कॉलवरच बोलू.
==================================================================================
शशक दोन-
काही महिन्यांनी -
बाबा- आजकाल तुम्ही असे घाबरेघुबरे का दिसताय? व्हिडीओकॉल वरसुद्धा काही सांगत नाही नीट.काय झालाय?मोकळेपणाने बोलत का नाही माझ्याशी?आणि हो! तुमच्या अकाऊंटमधून अचानक पन्नास हजार रुपये कोणाला दिलेत परवा?

पोरी-आग काय सांगू तुला? परवा रात्री मी उघडाच झोपलो होतो. अचानक मला एक व्हिडीओकॉल आला आणि एक नागडी बाई समोर येऊन काहीतरी अचकट विचकट चाळे करायला लागली. मी घाबरून कॉल बंद केला . मला वाटले सुटलो. पण आता तिने आमचा दोघांचा घाणेरडा व्हिडीओ बनवून पाठवलाय. ते लोक मला पैशासाठी धमक्या देत आहेत.या वयात काय ग ही बदनामी? मी खरे सांगतो मी काहीसुद्धा केले नाहीये ग. माझा बटणाचा मोबाईलच बरा होता का ग?

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

13 Mar 2023 - 1:13 pm | तुषार काळभोर

मोबाईल चांगला किंवा वाईट नसतो.
मला सायकल येते, विना गियर स्कूटर येते, मोटरसायकल येते. कार नाही जमत.
मग मी Ferrari 360 किंवा McLaren F1 चालवायचा प्रयत्न केला तर काय होईल?
मग मी कधी कार चालवायचीच नाही का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Mar 2023 - 2:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

भारतात एकट्या पडलेल्या , नवीन तंत्रज्ञान अवगत नसणाऱ्या, आणि या वयात काही शिकणे जीवावर आलेल्या वृद्धाच्या भूमिकेतून विचार करा. सत्य घटनेवर आधारित.

चित्रगुप्त's picture

13 Mar 2023 - 5:11 pm | चित्रगुप्त

द्विशशक आवडली.

भारतात एकट्या पडलेल्या , नवीन तंत्रज्ञान अवगत नसणाऱ्या, आणि या वयात काही शिकणे जीवावर आलेल्या वृद्धाच्या भूमिकेतून विचार करा. सत्य घटनेवर आधारित.

अगदी बरोबर. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने आणि ते जीवनाचा आवश्यक भाग झालेला असल्याने वृद्ध लोकांना ते आत्मसात करणे फार कठीण जात आहे, याची प्रचिती ८० + वयाचे माझे मोठे भाऊ, बहीण आणि अन्य परिचित यांच्यामुळे येत आहे आणि मलासुद्धा कधीकधी ते नकोसे वाटणे सुरु झालेले आहे. हल्ली दहा वर्षाच्या नातवाला सहजशक्य असणारे व्यवहार सत्तर-ऐंशीच्या आजी-आजोबांना अवघड/अशक्य होऊन बसले आहेत.

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 2:54 pm | कुमार१

भागातील शशक आवडल्या.
छान.

सौंदाळा's picture

13 Mar 2023 - 7:15 pm | सौंदाळा

छान आहे. पण आजोबांनी पन्नास हजार रुपये बदनामीला (काहीच केले नसताना) घाबरुन दिले हे पटत नाही.
व्हिडेओ कॉल मधे समोर विवस्त्र बाई आली तुम्ही व्हिडिओ नुसता बघितला किंवा फोन कट केला तर घाबरायचे काहीच कारण नाही पण तिच्या कामुक इशार्‍यांना बळी पडून स्वतःपण तसेच चाळे केले तर ब्लॅकमेलिंगसाठी फुलटॉसच दिला. मधे पुण्यात तरुणाने याच कारणाने केलेल्या आत्महत्येची बातमी वाचली होती. पण त्यात त्याचाही सहभाग होता का हे बातम्यात दिले नव्हते.
म्हातार्‍यांचा मोबाईल हॅक करुन पैसे गेले तर समजू शकतो. मुलाच्या फोनवरुन मेसेज आला 'बाबा त्वरीत ५० हजार पाठवा' आणि खाली फिशिंग लिंक वगैरे

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2023 - 11:49 am | राजेंद्र मेहेंदळे

मोबाईल हॅकिंग होत नाही ईथे. फिशिंग सुद्धा नाही.
सरळ तुमची मॉर्फ केलेली क्लिप पाठवुन समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली जाते आणि पैसे उकळले जातात. क्लिप तयार करण्यासाठी तुम्ही "तसे चाळे" केलेले असण्याची गरज नाही. नुसता व्हिडिओ मिळाला तरी चालते.

मुख्य मुद्दा म्हणजे असे काही घडले तर स्पष्टपणे बोला, तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यायला लाजु नका, वकीली सल्ला घ्या, सायबर सेलकडे तक्रार नोंदवा, निदान तुमच्यासारखे अजुन काही लोक यामुळे जागरुक होतील आणि वाचतील.

पाठवलेला मोबाईल वापरणार कसा.
बाकी विंडोज फोन असता तर गोष्ट वेगळी होती. ओपन सोर्स ओएस नाही. आइफोनचं माहीत नाही. बाकी पैसे जातील असे ? फोनातला नंबर नेट बँकिंगला लिंक केलेला नसेल, फोनात कार्ड डिटेल्स भरलेले नसतील तर पैसे जाणार कसे?
बाकी शशक'ला मर्यादा असतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2023 - 11:51 am | राजेंद्र मेहेंदळे

मुलीची मैत्रीण शिकवणार आहे ना आजोबांना. आणि पैसे "गेले" नाहीयेत . घाबरुन "दिले" आहेत.

कंजूस's picture

14 Mar 2023 - 3:44 pm | कंजूस

तर एकूण मुलीच्या मैत्रीणीने काकांना युपीआइ पेमेंट सुरू करून दिले छोटी मोठी वीज बील,फोन रीचार्ज,वाणी बिल भरण्यासाठी. काकांच्या बँक अकाऊंटमध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम होती. ती गेली.
युपीआइ पेमेंट लिमिट ( म्हणजे वैयक्तिक पैसे ट्रान्स्फर करण्याचे रु पन्नास ते एक लाख रुपये आहे विविध बँकांचे.)पूर्ण वापरले.

विषय 'तंत्रज्ञान' विषयाकडे वळतो आहे, तस्मात आयटी का काय त्या क्षेत्रातील जाणकारांनी या कथेत वर्णिल्याप्रमाणे घटना प्रत्यक्षात कशी घडू शकते (किंवा नाही) वगैरें तांत्रिक बाबींचा खुलासा केल्यास सर्वांनाच उपयोग होईल.
खात्यातून पन्नास हजार 'कापले' गेले नसून कोणाला तरी 'दिले' गेले आहेत, हाही एक मुद्दा विचारणीय आहे.

या फोन निमित्ताने एकूणच फोन बँकिंग, नेट बँकिंग, कार्डांचा वापर वगैरे विषयी काय सावधगिरी बाळगावी, काय काय फसवणूक होण्याची शक्यता असते, वगैरे सगळी माहिती कुणीतरी द्या रे बाबानू. अनेक आजी - आजोबा मडळींना आणि जास्त तांत्रिक माहिती नसणारांना खूप मदत होईल. असा धागा पूर्वी आलेला असेल, तर 'दुवा' देऊन 'दुवा' मिळवावा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Mar 2023 - 9:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्या प्रकाराला "सेक्सटॉर्शन" म्हणतात. समोरुन व्हिडिओ कॉल येतो. कॉलवर विवस्त्र बाई असते.आपण १० सेकंद जरी फोन उचलुन बघितला तरी आपली इमेज कॅप्चर होते. मग काही मोर्फिंग सॉफ्टवेअर वापरुन अश्लील व्हिडिओ बनवला जातो. तो पाठवुन ब्लॅक मेलिंग चालु होते. प्रथम थोडे पैसे मागितले जातात. एकदा सावज फसले हे समजले की रक्कम वाढत जाते. माझ्या ओळखीतील एक दोघे जण (वय ६५+) फसले आहेत. बदनामीच्या भितीने पोलिस तक्रार फार कमी प्रकरणात केली जाते. जरी सायबर सेल कडे तक्रार केली, तरी गुन्हेगार मिळायची शक्यता फार कमी. राजस्थान मधील गावेच्या गावे या प्रकारात सामील आहेत. एक पकडला तर दुसरा तयार असतो.

मोबाईलचा फ्रंट कॅमेरा बंद ठेवा. जरुर असेल तेव्हाच उघडा हा सोपा उपाय आहे. बाकी नेट बँकिंग्/फोन बँकिंग फार मोठे विषय आहेत. अकाउंटमध्ये कमी पैसे ठेवणे, बाकी सगळॅ फिक्स डिपॉझिट्ला ठेवणे हा सोपा उपाय आहे इतकेच सांगतो. "जमतारा पॅटर्न" ही वेबसीरिज नेट फ्लिक्स वर बघा म्हणजे समजेल.

एकुणातच टेक्नॉलॉजीचा भस्मासुर आपल्याला कुठे घेउन जाणारे माहित नाही.

अनेक आभार राजेन्द्रभौ.
अनेक वर्षांपूर्वी (बहुधा स्मार्टफोनच्याही आधीच्या कळात) जेंव्हा पहिल्यांदा लॅपटॉप घेतला, तेंव्हा का कुणास ठाऊक, मी लहानसा कार्डाचा तुकडा सेलोटेपने कॅमेरावर चिकटवून बंद केला. त्यानंतर लॅपटॉप बदलले, आयपॅड घेतले, त्या सर्वांचे कॅमेरे मी बंदच ठेवत आलेलो आहे. अधून मधून मोबाइलचा फ्रंट कॅमेराही अश्या रितीने बंद करतो. सेल्फीची हौस मला नसली, तरी व्हिडियो कॉलसाठी तो रोजच लागत असतो. आताच मी मोबाईलच्या सेटिंगात कॅमेरा बंद ठेवण्याची सोय आहे का बघितले, पण तसे काही मिळाले नाही. (असल्यास सांगावे.) आपल्यावर एक अदृष्य डोळा सतत नजर ठेऊन आहे, ही जाणीवच नकोशी वाटते. मायक्रोफोनच्या द्वारे सुद्धा आपले संभाषण्/आवाज ऐकले जाऊन तत्संबंधित जाहिराती यूट्यूबवर आलेल्या दिसतात. एवढेच काय, फिरताना मी जे फोटो काढत असतो, त्याच प्रकारचे फोटो 'पिंटरेस्ट' वर लगेच येऊ लागतात.
जमताडा भाग १ बघितला होता. मी नेटबँकिंगचा वापर खूप करतो, पण त्यासाठी मोबाईल कधीच वापरत नाही. लॅपटॉपवर उपयोगापूर्वी आणि नंतर लगेच कुकी़ज, कॅश (?) ब्राउजिंग डाटा वगैरे डिलीटवतो. बँकेच्या लॉगिनसाठी व्हर्चुअल कीबोर्ड वापरतो. डेबिट - क्रेडिट कार्डाची कमाल मर्यादा गरजेनुसार बदलत रहातो, किंवा बंदही करतो. ओटीपी वगैरे आहेच. (SBI पेक्षा HDFC ची सुरक्षा व्यवस्था जास्त चांगली आहे. तिच्यात प्रत्येक अक्षर टाईपल्यावर कीबोर्ड बदलतो)
एफडी वगैरे तर केलेले आहेच, पासवर्डही नियमितपणे बदलून डायरीत लिहून ठेवतो. काही शंका आल्यास बँकेच्या Relationship Manager ला फोन करून विचारतो. हे सगळे करत असल्याने म्हणा, मला आजवर कधीही काही समस्या आलेली नाहे, तरी बदलत्या टेक्नॉलॉजीचे भान ठेवणे गरजेचे आहेच. नववीपासून पुढली बरीच वर्षे दासबोध खूप वाचायचो, त्यातून 'सावधपण सर्वविषयी' हे मनावर ठसलेले आहे. घरच्या मंडळींच्या मते मी अतीच चिकित्सकपणा करत असतो.
माझा एक चांगला मित्र दिल्ली पोलीसात ACP आहे, ही पण एक जमेची बाजू.

विवेकपटाईत's picture

15 Mar 2023 - 6:33 pm | विवेकपटाईत

आज आपले फोटो फेसबूक इत्यादि वर उपलब्ध असतात. कुणीही एडिट करून आपले अश्लील विडियो बनवू शकतो. फोन बंद असला तरी तो आपण घरात काय बोलतो ते ऐकतो. लेप टॉप वर काम करताना केमरा ही आपल्या न कळत आपले फोटो घेऊ शकतो. उपाय एकच ब्लॅक मेल करणार्‍याला न घाबरणे आणि पोलिसांत तक्रार करणे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Mar 2023 - 9:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

ह्या प्रकाराला "सेक्सटॉर्शन" म्हणतात. समोरुन व्हिडिओ कॉल येतो. कॉलवर विवस्त्र बाई असते.आपण १० सेकंद जरी फोन उचलुन बघितला तरी आपली इमेज कॅप्चर होते. मग काही मोर्फिंग सॉफ्टवेअर वापरुन अश्लील व्हिडिओ बनवला जातो. तो पाठवुन ब्लॅक मेलिंग चालु होते. प्रथम थोडे पैसे मागितले जातात. एकदा सावज फसले हे समजले की रक्कम वाढत जाते. माझ्या ओळखीतील एक दोघे जण (वय ६५+) फसले आहेत. बदनामीच्या भितीने पोलिस तक्रार फार कमी प्रकरणात केली जाते. जरी सायबर सेल कडे तक्रार केली, तरी गुन्हेगार मिळायची शक्यता फार कमी. राजस्थान मधील गावेच्या गावे या प्रकारात सामील आहेत. एक पकडला तर दुसरा तयार असतो.

मोबाईलचा फ्रंट कॅमेरा बंद ठेवा. जरुर असेल तेव्हाच उघडा हा सोपा उपाय आहे. बाकी नेट बँकिंग्/फोन बँकिंग फार मोठे विषय आहेत. अकाउंटमध्ये कमी पैसे ठेवणे, बाकी सगळॅ फिक्स डिपॉझिट्ला ठेवणे हा सोपा उपाय आहे इतकेच सांगतो. "जमतारा पॅटर्न" ही वेबसीरिज नेट फ्लिक्स वर बघा म्हणजे समजेल.

एकुणातच टेक्नॉलॉजीचा भस्मासुर आपल्याला कुठे घेउन जाणारे माहित नाही. इत्यलम.

सेक्स्टॉर्शन वगैरे टाळायला मोबाईल कसा धरावा, याविषयी एक कल्पना वरील प्रतिसाद दिल्यावर सुचली ती अशी : मोबाईलवर कॉल आल्यावर लगेच तो आपल्या डोळ्यांसमोर न धरता हात जरा लांब करून उताणा-तिरपा धरून कुणाचा कॉल आहे ते बघणे (अश्याने समोरच्याला आपला चेहरा न दिसता खोलीचे छत, आकाश वगैरेच दिसेल) खात्री पटल्यावर मगच समोर धरणे. चला, आजपासूनच ही सवय लावून घ्यावी म्हणिजे बरे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2023 - 11:55 am | राजेंद्र मेहेंदळे

कॅमेरा धरायचा हा सोपा उपायही मस्त आहे.
शिवाय तुम्ही नेट बँकिंग बद्दलही बरीच काळजी घेताय असे दिसते. तस्मात घाबरु नये. फक्त सेविंग मध्ये मोजके आणि एफ डी मध्ये जास्त पैसे ठेवा. २-४ बँकात खाती ठेवा. सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवु नका.

योगी९००'s picture

15 Mar 2023 - 8:21 pm | योगी९००

माझ्या एक दोन नातेवाईकांना कुठलीही पुर्वकल्पना न देता व्हीडीओ कॉल करायची सवय आहे. त्यांना अजून एक गोष्ट कळत नाही की व्हीडीओ कॉल केल्याने त्यांचे ही बोलणे स्पिकरवर जाते. दोन-तीन वेळा सांगून पाहिले पण ते काही सुधारत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी असलो तर यांचा कॉल कधीच घेत नाही. आता घरी असलो तरी त्यांचा व्हीडीओ कॉल आला तर त्यांना मोबाईलवर छत दाखवतो.

कर्नलतपस्वी's picture

14 Mar 2023 - 10:54 am | कर्नलतपस्वी

इलाज नाही. तंत्रज्ञान पुढे जाणारच. कितपत वापरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.

नुकत्याच घडलेल्या (शीतल म्हात्रे) व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणाच्या पार्शवभूमीवरील समयोचित शशक आवडल्या!
बाकी आता असे ब्लॅकमेलिंगचे प्रकार इतके कॉमन झाले आहेत कि बहुतांश लोकांना त्याबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे बदनामीची भीती वगैरे बाळगण्याची काही गरज नाही, त्यांच्या धमक्यांना भीक न घालता सरळ सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवावी. त्याचा काही उपयोग होईल कि नाही ह्याचा विचार करू नये. अशा तक्रारींचे प्रमाण वाढल्यावर अनिच्छेने का होईना पण गृहमंत्रालयाकडून दबाव आल्यावर पोलिसांना काहीतरी कारवाई करावीच लागते आणि तक्रारदाराकडेही त्याच्या तक्रारीची पोच रहाते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2023 - 4:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

भिउन पैसे वगैरे तर देउ नयेतच पण गुन्हेगार सापडेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा तक्रार नोंदवुन मोकळे व्हावे. शेकडो तक्रारी आल्या की पोलिसांना अ‍ॅक्शन घ्यावीच लागेल.

दिल्ली पोलीस/सायबरक्राईम विभागात काय परिस्थिती आहे, याबद्दल खात्रीची माहिती माझ्या दिल्ली पोलीसातील मित्राला विचारून सांगू शकतो, तरी त्याला नेमके काय प्रश्न विचारावेत, हे कळवावे. अर्थात याविषयी बाहेर माहिती देण्यावर काही बंधने असण्याचीही शक्यता आहेच.

चित्रगुप्त's picture

15 Mar 2023 - 6:14 pm | चित्रगुप्त

सरकारने पोर्नोग्राफी वगैरेंवरचे सगळे निर्बंध वगैरे हटवून सबकुछ खुल्लमखुल्ला करावे म्हणजे कुणालाही बदनामीची भिती वगैरे वाटणार नाही. हाय काय अन नाय काय. भरपूर रोजगाराच्या संधी पण उपलब्ध होतील.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2023 - 7:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

ये कुछ जम्या नही काका.
हे म्हणजे "वेश्या व्यवसाय कायदेशीर करावा म्हणजे बलात्कार कमी होतील" या सारखे झाले. आणि पोर्नोग्राफी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? सॉफ्ट पॉर्न/ हार्ड पॉर्न्/चाईल्ड पॉर्न्/अ‍ॅनिमल पॉर्न्/अ‍ॅनिमेटेड पॉर्न्/अश्लील वेब सीरीज्/अश्लील चित्रपट्/अश्लील संस्थळे/अश्लील मासिके आणि पुस्तके? विषय खोल आहे :)

@राजेन्द्रभौ, विषय खोल आहे खरा, पण यावरही (शक्यतो एका नवीन धाग्यावर) चर्चा व्हायला हवी.
सुरुवात म्हणून - खजुराहो / वात्सायनकालीन भारतात काय परिस्थिती होती ? यावर जाणकारांनी प्रकाश टाकल्यास उत्तम. महाभारतकालात आजच्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती होती, असे अगदी सामान्य माहिती असणारालाही दिसते. माझ्या कलेच्या अभ्यासावरून ग्रीक, रोमन, रेनासां वगैरे काळातही या बाबतीत हल्लीपेक्षा खूप वेगळे वातावरण असावे असे वाटते. राजवाड्यांचे पुस्तक वाचून फार वर्षे झाली, त्यामुळे त्यातले काही लक्षात नाही.
उदाहरणार्थ आजच्या घडीला कोणकोणत्या देशांमधे रतिचित्रण कायदेशीर आहे, आणि तिथे त्यामुळे काय परिस्थिती आहे, हेही बघतले पाहिजे.
नग्नतेला अनैतिक ठरवण्यात ख्रिस्ती धर्माचा मोठा हातभार होता, आणि ते लोण व्हिक्टोरियन काळात भारतात आले वगैरे काही वाचल्याचे आठवते.

आलो आलो's picture

15 Mar 2023 - 8:38 pm | आलो आलो

बाबौ !
राजेंद्रभौ लय मस्त शशक लिव्हलै .
प्रतिसादात तर धुमाकूळ चालूय .....आरारारा खत्तर्नाक्क .
एक्सेक आयड्या दिल्यात सबासदांनी....जबऱ्या अनुभवी लोकास्नी आमा सारख्या बालकांचा प्रणाम दंडवत !

धर्मराजमुटके's picture

16 Mar 2023 - 10:03 am | धर्मराजमुटके


बाकी आता असे ब्लॅकमेलिंगचे प्रकार इतके कॉमन झाले आहेत कि बहुतांश लोकांना त्याबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे बदनामीची भीती वगैरे बाळगण्याची काही गरज नाही,


खरे आहे. उलट आपल्याला हवे ते चाळे करुन त्याचे बिल मॉर्फींग, सेक्स्टॉर्शन वर फाडायची सोय देखील आपल्याला आयतीच मिळालेली आहे त्याचा इच्छूकांनी वापर करुन काखा वर करण्यास हरकत नाही.
मध्यमवर्गीय माणुस 'इज्जत' नावाच्या न दिसणार्‍या वस्तूला फार घाबरतो तिथेच चुकतो. ही वस्तू काही केलं तरी जाते आणि काही नाही केलं तरी जाते त्यामुळे फारसे घाबरण्यात हशील नाही.
'नंगेसे खुदा भी डरता है' म्हण उगाच नाही पडली !

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Mar 2023 - 12:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!! फक्त शशक वाचुन आवडली किवा नाही म्हणण्यापेक्षा त्यातुन जे ब्रेन स्टॉर्मिंग होत आहे ते महत्वाचे आहे.