विसरु नकोस नाते

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
22 Jan 2023 - 2:19 pm

नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई.

सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा
श्वासास दोष इतका देवू नकोस बाई.

वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.

मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा
विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई.

---- अभय बापट

भावकविताकविता

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

31 Jan 2023 - 9:08 am | कुमार१

छान आहे.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2023 - 11:48 am | कर्नलतपस्वी

तू सांगीतले ते, सर्व लक्षात आहे.
उगाच कवडसे मनाचे दवडू नकोस बाई.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2023 - 11:49 am | कर्नलतपस्वी

तू सांगीतले ते, सर्व लक्षात आहे.
उगा कवडसे मनाचे दवडू नकोस बाई.

विवेकपटाईत's picture

2 Feb 2023 - 4:48 pm | विवेकपटाईत

वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.
कविता आवडली

राघव's picture

2 Feb 2023 - 8:00 pm | राघव

छान लिहिलेत! आवडले.

लयीत बसण्यासाठी किंचित बदल करावासा वाटला -

नात्यास नाव अपुल्या देवू नकोस काही,
स्वप्नातील गाव, इतके, व्यापू नकोस बाई. / स्वप्नामधील गावा व्यापू नकोस बाई.

दरवळला सुगंध वाऱ्यावरी कधीचा,
श्वासास दोष इतका, देवू नकोस बाई.

माझेच वागणे जर होता कधी निराळे,
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.

तुझाच रंग लेवून मी रंगलो कधीचा,
विसरुन स्वप्न नाजुक, जावू नकोस बाई.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 10:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

मीटर मधे बसायला असे करता येईल का?

नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
"स्वप्नात गाव" इतके व्यापू नकोस बाई.

"वार्‍यावरी सुगंध" हा पोचला कधीचा
श्वासास दोष इतका देवू नकोस बाई.

वाटेल वागणे जे माझे जगा विरुद्ध
"खोडुनी विचार" माझे काढू नकोस बाई.

मिसळून रंग "तू"झा मी रंगलो कधीचा
विसरुन स्वप्न "हळवे" जावू नकोस बाई.

राघव's picture

3 Feb 2023 - 1:47 am | राघव

हेही छान आहे! आवडले! :-)

चलत मुसाफिर's picture

29 Jul 2023 - 8:52 pm | चलत मुसाफिर

+1

सागरसाथी's picture

29 Jul 2023 - 7:24 pm | सागरसाथी

सर्वांचे आभार, वृत, लय शिकण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन नक्की उपयोगी ठरेल.

सागरसाथी's picture

29 Jul 2023 - 7:24 pm | सागरसाथी

सर्वांचे आभार, वृत, लय शिकण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन नक्की उपयोगी ठरेल.

चलत मुसाफिर's picture

29 Jul 2023 - 8:51 pm | चलत मुसाफिर

कल्पना व शब्दसंपदा चांगली वाटली. गेयतेकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र सूचना करतो

सागरसाथी's picture

30 Jul 2023 - 1:22 pm | सागरसाथी

धन्यवाद

विवेकपटाईत's picture

30 Jul 2023 - 10:50 am | विवेकपटाईत

कविता आवडली.

सागरसाथी's picture

30 Jul 2023 - 1:23 pm | सागरसाथी

धन्यवाद

सतिश गावडे's picture

30 Jul 2023 - 2:44 pm | सतिश गावडे

कविता लयीत व मीटरमध्ये बसत नसल्याने तसेच गेय नसल्याने विरस झाला. मुळात अशी कविता कवी लीहूच कशी शकतो हा प्रश्न पडला.

शेवटी "तूम तो ठेहरे परदेसी" ची चाल लावून पाहिली. ती लागली आणि मी कवीला माफ केले.

पुढच्या वेळी कवीने काथ्याकुट सदरात धागा काढून लय, मीटर आणि गेयता वगैरे गोष्टींच्या विषयी सूचना मागवून त्यानुसार कविता लिहावे असे मी कवीला सुचवतो.

वामन देशमुख's picture

30 Jul 2023 - 4:45 pm | वामन देशमुख

"नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही."

असे काही आम्ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात कॉलेजात असताना बरळायचो.