ताज्या घडामोडी । जानेवारी २०२३

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
1 Jan 2023 - 1:40 pm

सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०२३ या वर्षाच्या पूर्वार्धात, ईशान्य भारतातील काही राज्यांच्या तर उत्तरार्धात राजस्थान, तेलंगणा सहित इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुकादेखील याच काळात होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी या निवडणुकांमधून होईल.

---

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. चीनमधील औद्योगिक उत्पादन नीचांकाला पोहोचल्याची ही बातमी त्याची साक्ष देते. २०२० ची कोरोना-स्थिती पुन्हा येऊ शकेल का?

---

नवीन वर्षात गलेमा, मिपादिवाळी, शशक इ माध्यमांतून मिपाकरांना चांगलेचुंगले लेखन चाखायला मिळेल अशी अपेक्षा.

मिसळपाव

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

31 Jan 2023 - 12:11 pm | सुबोध खरे

या बोटावरची थुंकी त्या बोटावर कशाला करताय?

पहिल्यांदा असा कायदा नाहीच इथून आपली सुरुवात झाली आहे?

सरकारने गुन्हा दाखल करावा हे ठीक आहे पण अंनिसनेच सगळे करावे असे कोण म्हणतंय?

अभ्यास वाढवा अशी विनंती आहे.

चौकस२१२'s picture

1 Feb 2023 - 5:46 am | चौकस२१२

फसवणुकीचे कायदे आहेतच कि ... नुसते कोणी प्रवचनातून प्रसिद्ध झाले तर त्याविरुद्ध कायदा कसा करणार ..त्या प्रसिद्धीतून जर फसवणूक / शोषण आणि आर्थिक घोटाळा केलं तर त्याविरुद्ध कायदे आहेत आणि त्यांचे समर्थन आहेच
अनिस ने पक्षपाती पणा करू नये हे मान्य करा कि ? का तिथे मात्र मौन ?

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; धर्मांतर, लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी

https://www.loksatta.com/pune/sakal-hindu-community-called-hindu-janakro...

अनिसला बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कार चालू झाल्या झाल्या पोटदूखी चालू झाली. पण बा़जींन्दरसिंग याचे चमत्कार ज्या मधे आंधळे बघु लागले, अपंग चालू लागले, बहिरे,मूके बरे झाले, क्यांसरचे रोगी बरे झाले असे दावे फेसबूकवर केले जातात, तसेच तूम्ही इन्स्टाग्राम, ट्विट्ट्ररवरही पाहू शकता.
विशेष म्हणजे बजिंदर सिंगवर खून, बलात्कार आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने पंजाब पोलिसांना ऑगस्ट 2021 मध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत बाजींदर सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
मला वाटते,पोटदूखीचे मूळ हे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रींच्यामुळे परत 'घरवापसी' सुरू होत आहे, हे असावे. हिंदू इतर धर्मात गेले तर चालते, पण कोणी हिंदू धर्मात आले की लगेच ठराविक लोकांना त्रास होतो.

बाजींदर सिंगबरोबर हेही बघुन घ्या
https://www.facebook.com/lakhasidhana.41/videos/483170834015788/

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2023 - 8:10 am | श्रीगुरुजी

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या घरावर FBI ची धाड, १३ तास झडती

भारतात एखाद्या विद्यमान पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या घरावर सीबीआय धाड टाकेल अशी मी स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही.

गवि's picture

23 Jan 2023 - 8:19 am | गवि

सहमत.

नुकतेच यू के पंतप्रधान ऋषी सूनक यांनाही तिथल्या पोलिसांनी कारमध्ये सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंड केला.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Jan 2023 - 10:55 am | चंद्रसूर्यकुमार

कलकत्त्यातील जादवपूर विद्यापीठातील कन्स्ट्रक्शन इंजिनिअरींगचे प्रोफेसर पार्थ प्रतिम बिस्वास आणि अन्य एकाने विद्यापीठाला पत्र लिहून चे गव्हेराच्या मुलीचा आणि सुनेचा सत्कार करण्यासाठी विद्यापीठाचे ऑडिटोरिअम उपलब्ध करून द्यावे आणि विद्यापीठाने त्या समारंभासाठी एक लाख रूपये द्यावेत अशी मागणी केली आहे हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Che

या पत्राच्या मजकुरात चुकीने २०२२ असे वर्ष घातले असले तरी त्यावर केलेल्या सह्यांच्या खाली लिहिलेल्या तारखांवरून ते पत्र या वर्षीचेच आहे हे स्पष्ट आहे. चे गव्हेराच्या मुलीने आणि सुनेने मुद्दामून सत्कार करावा असे काही केले असेलही. त्याविषयी मला माहिती नाही. त्या दोघींनी तसे काही काम केले असले तर त्यांचा जरूर सत्कार करावा. अजिबात ना नाही. आणि तसेही त्या दोघींशी वैर असायचे काही कारणही नाही. पण पत्राच्या मजकुरावरून हे प्रोफेसर महाशय चे गव्हेराला अगदी प्रातःस्मरणीय मानतात असे दिसते. तेव्हा त्या दोघींचा सत्कार त्या चे गव्हेराच्या नातलग आहेत म्हणून केला जात असला तरी आश्चर्य वाटू नये.

या प्रोफेसर महाशयांच्या वेबपेजवरून समजते की त्यांनी १९९१ मध्ये एम.ई केले. म्हणजे त्यांचे आताचे वय ५५ च्या आसपास असावे. अगदी शाळकरी वयात अशा कोणाचे आकर्षण वाटले तर समजू शकतो. मला स्वतःला शाळेत असताना हिटलरचे अतोनात आकर्षण वाटायचे. माझ्या अभ्यासाच्या टेबलवर मी हिटलरचा एक वर्तमानपत्रातील कोणत्यातरी लेखात आलेला फोटो कापूनही लावला होता. मिपावर पूर्वी आलेल्या काही लेखांमध्येही इतर काही सदस्यांनीही त्यांना पूर्वी हिटलर आवडायचा असे लिहिले होते असे आठवते. पण नंतरच्या काळात हिटलर म्हणजे नक्की काय चीज होती हे समजले. ज्याप्रमाणे वय वाढते, अधिक जग बघितले जाते त्याप्रमाणे अशा व्यक्तीमत्वांविषयी पूर्वी वाटत असलेले आकर्षण कमी व्हायला हवे. वयाची पन्नाशी ओलांडल्यावरही हे प्रोफेसर चे गव्हेराला वंदनीय म्हणत असतील तर त्याला काय म्हणावे?

याच चे गव्हेराने क्युबामध्ये फायरींग स्क्वाड्समध्ये नक्की किती (हजार) लोकांना ठार मारले याचा नक्की कोणाला आकडा माहित असेल असे वाटत नाही. १९६२ मध्ये क्युबन मिसाईल प्रकरणात या चे गव्हेरा (आणि स्वतः फिडेल कॅस्ट्रोलाही) अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा असे वाटत होते. तसे स्वतः गव्हेरा आणि कॅस्ट्रोंनी नंतर मुलाखतीत मान्य केले होते. असल्या माणसाला डोक्यावर घ्यायची नक्की कसली मनोवृत्ती ही?

बरं चे गव्हेरा किंवा तसे लोक आवडणारे हे एकटेच आहेत असेही नाही. मिपावर जवळपास १४ वर्षांपूर्वी विकी म्हणून एक कम्युनिस्ट समर्थक होते (त्यांच्या लिहिण्यात त्यांनी स्वतःच ते म्हटले होते). त्यांनी एप्रिल २००९ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मराठीतून संकेतस्थळ काढले ते आणखी एक मराठी संकेतस्थळ म्हणून लेख लिहून सगळ्यांना सांगितले होते. आता ते संकेतस्थळ चालत नाही असे दिसते. पण त्या लेखावर कमेंट्समध्ये बिपीन कार्यकर्तेंनी त्या संकेतस्थळावर क्रूरकर्म्या स्टालिनचा फोटो खटकला असे लिहिले होते हे वाचता येईलच. स्टालिनने हिटलरने केल्या त्यापेक्षा जास्त लोकांच्या कत्तली केल्या होत्या हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. स्टालिननंतर सोव्हिएट रशियाचे अध्यक्ष झालेल्या निकिता ख्रुश्चेव्ह यांनीच ते मान्य केले आहे आणि त्यांनी destalinization हा कार्यक्रम सुरू करून स्टालिनच्या खाणाखुणा शक्य तितक्या पुसल्या होत्या. स्टालिनग्राड या दुसर्‍या महायुध्दात गाजलेल्या शहराचे नाव मुळचे व्होल्गाग्राड त्या वेळेसच पुनःप्रस्थापित झाले. सीताराम येचुरींनी २०२० मध्ये लेनिनच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिआ या कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेच्या स्टुडंट स्ट्रगल या नियतकालिकात हा लेख लिहिला होता आणि स्टालिनने लेनिनच्या 'शिकवणुकीचा' लावलेल्या अर्थाविषयी लिहिले होते.

हे सगळे लोक भरपूर शिकलेले आहेत बरं का. आणि तरीही चे गव्हेरा, स्टालिन असल्या क्रूरकर्म्यांचे समर्थन करायला काहीही वाटत नाही. आणि त्याउपर ते स्वतःला मानवतावादी वगैरे म्हणवात. त्यांनी स्वतःची सारासारविचार बुद्धी गहाण टाकलेली असते का? अमेरिकन विद्यापीठांमध्येही त्या मानसिकतेचे कित्येक प्रोफेसर मिळतील. ते उघडपणे कत्तलीचे समर्थन करत नाहीत/ करू शकणार नाहीत पण म्हणून 'इट वॉज नॉट रिअल कम्युनिझम' हे नेहमीचे गंजके पालुपद लावतात.

एखादा माणूस जितका जास्त आणि जितक्या मोठ्या संस्थेतून शिकलेला असतो तितका तो आपली बुद्धी गहाण टाकायची शक्यता वाढत जाते असे वाटते ते असले प्रकार बघूनच.

(भरपूर आणि मोठ्या संस्थेतून शिकलेला) चंसुकू

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2023 - 1:07 pm | श्रीगुरुजी

मिपावर पूर्वी आलेल्या काही लेखांमध्येही इतर काही सदस्यांनीही त्यांना पूर्वी हिटलर आवडायचा असे लिहिले होते असे आठवते.

महाविद्यालयीन वयात मला हुकुमशाही, हिटलर, बाळ ठाकरे, सद्दाम हुसेन अश्या गोष्टींचे खूप आकर्षण होते. परंतु नंतर हिटलरसंबंधी अनैक पुस्तके वाचली, शिवसेना ही फक्त एक खंडणी वसूल करणारी माफिया टोळी आहे हे समजत गेले. तेव्हापासून या सर्व गोष्टींचे आकर्षण संपून तीव्र चीड निर्माण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2023 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे


(व्यंग्यचित्रकाराच्या ट्वीटर भिंतीवरुन)

विवेकपटाईत's picture

25 Jan 2023 - 11:36 am | विवेकपटाईत

बीबीसी म्हणजे ब्लफ ब्रोडकास्टिंग सेंटर. भारता विरूद्ध गरळ ओकणे त्यासाठी खोट्या बातम्या देणे हा त्यांचा एक सूत्री कार्यक्र्म. दहा वर्षाचा होताना 1971 युद्धाच्या बातम्या घर मालकाच्या रेडियो वर ऐकताना प्रथमच हे कळले होते. राहिले मोदीजी पहिले मुख्यामंत्री होते ज्यांनी हिंदू दंगे खोरांवर गोळ्या चालविल्या आणि हजारो मुस्लिम लोकांचे प्राण वाचविले. शंभरच्या वर दंगेखोर उडविले होते त्यात 90 टक्के हिंदू होते. माझ्या एका वरिष्ठतम सिख अधिकार्‍याने म्हंटले होते, जर दिल्लीत दहा बारा दंगेखोरांना मारले असते तर हजार दीड हजार सिखांचे प्राण वाचले असते. मोदी जर कोंग्रेसचे मुख्यमंत्री असते तर बीबीसी ने त्यांचा सत्कार केला असता. असो. अनिसचाश्याम मानव हा भारत जोडो यात्रेत होता.

सुरिया's picture

25 Jan 2023 - 11:48 am | सुरिया

@narendramodi_in
India government official
.
Till there was DD, Akashvani, what did common people discuss- we heard it on BBC...there was no faith in DD, Akashvani: @narendramodi
4:31 PM · Apr 8, 2013
.
हेच का ते ब्लफ ब्रॉडकास्टिंग सेंटर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2023 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा. अस असतं व्हय. “India: The Modi Question,”
दुसरा भाग नक्की बघा.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Jan 2023 - 1:51 pm | चंद्रसूर्यकुमार

फिनलंड आणि स्वीडन सुध्दा नाटोमध्ये सामील व्हायला तयार आहेत असे अमेरिकेने म्हटले आहे. इतकी वर्षे हे देश तटस्थ होते. आता हे देश पण नाटोत जायचे म्हणत आहेत.

फिनलंडला रशियासारखा शेजारी मिळाल्यामुळे त्या देशाची ओढाताण झाली. स्टालिनला फिनलंडचा काही भाग पाहिजे म्हणून दुसर्‍या महायुद्धात सुरवातीला रशियाने फिनलंडवर हल्ला केला. कधीनाकधी जर्मनी आपल्यावर हल्ला करणार आणि त्यावेळी लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) फिनलंडच्या सीमेपासून खूप जवळ होते तो धोका स्टालिनला जाणवत होता म्हणून फिनलंडची जमिन त्याला हवी होती. रशियाने केलेल्या हल्ल्यात लाल सैन्याचे भरपूर म्हणजे फिनिश सैन्यापेक्षा अनेक पटींनी नुकसान झाले पण रशियाच्या तुलनेत फिनलंड बराच लहान देश असल्याने रशियन सैनिकांच्या एकामागोमाग येणार्‍या लोंढ्याला फिनलंड पुरा पडू शकला नाही आणि त्याला माघार घ्यावी लागली. पुढे जर्मनीने रशियावर हल्ला केल्यानंतर आपला गेलेला प्रदेश परत मिळवायला म्हणून फिनलंडने जर्मनीबरोबर रशियाविरूध्द युध्दात भाग घेतला. लेनिनग्राडला महाभयानक वेढा घातला होता त्यातही फिनिश सैनिक होते. हा राग मनात ठेऊन स्टालिनने फिनलंडकडून युध्द संपल्यानंतर भरपूर नुकसानभरपाई घेतली. तसेच रशियासारखा बलाढ्य बोका शेजारीच असल्याने इतर युरोपीय देशांना अमेरिकेकडून मिळालेली मदत फिनलंडला 'नम्रपणे' नाकारावी लागली. नंतरच्या शीतयुध्दाच्या काळातही आपली अवस्था हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे पूर्व युरोपातील देशांप्रमाणे होऊ नये म्हणून रशियाला न दुखावायची कसरत फिनलंडला करावी लागली होती.

पुतीनकाकांनी युक्रेन नाटोमध्ये सामील व्हायच्या प्रश्नावरून युध्द सुरू केले आहे. त्यात फिनलंडपण नाटोमध्ये सामील झाला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Jan 2023 - 11:32 pm | चंद्रसूर्यकुमार

मी मिपावर वेगवेगळ्या प्रतिसादांमधून डाव्या विचारांवर नेहमीच हल्ला करत असतो. तो हल्ला करायला आज आणखी एक कारण मिळाले आहे. त्याचे झाले असे की मी फेसबुकवर मधूनमधून काही पत्रकारांच्या भिंतींना भेटी देत असतो. अशाच एका भिंतीवर मला ऑक्सफॅमच्या रिपोर्टविषयी द हिंदू या वर्तमानपत्रात आलेली ही बातमी सापडली. दिनांक १६ जानेवारी २०२३ म्हणजे मागच्या आठवड्यात ही बातमी आली होती. त्या बातमीत ऑक्सफॅमच्या रिपोर्टचा हवाला देऊन म्हटले होते की भारतातील सर्वात १% श्रीमंत लोक देशातील ४०% पेक्षा जास्त संपत्ती राखून आहेत. दिसायला हे आकडे किती नाट्यमय दिसतात ना? की बघा भारतात किती टोकाची विषमता आहे. आणि मग समानता आणण्यासाठी म्हणून कोणते कोणते उपाय करावेत असे सल्ले डावे लोक देत असतात.

आता आणखी एका गोष्टीविषयी लिहितो. त्या गोष्टीचे नाव आहे परेटोचे तत्व यालाच ८०-२० चा नियम असेही म्हणता येईल. या तत्वाप्रमाणे बर्‍याच घटनांपैकी ८०% परिणाम हे २०% कारणांमुळे होत असतात. हे तत्व आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळते. अर्थकारणात ते तत्व बघायला मिळतेच पण त्याबरोबरच अगदी कॉम्प्युटर सायन्समध्ये सुध्दा. म्हणजे बग यायची महत्वाच्या २०% कारणांचा बंदोबस्त केला की ८०% तक्रारींचा निपटारा होतो अशाप्रकारचे. त्या तत्वानुसार ८०% संपत्ती २०% लोकांकडे असते. आता हेच तत्व सगळ्यात श्रीमंत २०% लोकांना लाऊन बघितले तर ८०% च्या ८०% म्हणजे ६४% संपत्ती २०% च्या २०% म्हणजे सगळ्यात वरच्या ४% लोकांकडे असेल. सगळ्यात वरच्या ४% लोकांना हे तत्व लाऊन बघितले तर ६४% च्या ८०% म्हणजे ५१.२% संपत्ती ४% च्या २०% म्हणजे ०.८% लोकांकडे असेल.

आता हा रिपोर्ट काय म्हणतो? तर सगळ्यात वरच्या १% लोकांकडे ४०% संपत्ती आहे. म्हणजे ८०-२० च्या नियमापेक्षा विषमता थोडी कमीच आहे. ७५-२५ चा नियम नियम लावला तर सगळ्यात वरच्या १.५६२५% लोकांकडे ४२.१८७५% संपत्ती असेल. म्हणजे आपल्याकडे कदाचित ७५-२५ नाही तर ७४-२६ किंवा तशाप्रकारचा नियम लागू होतो असे दिसते.

सगळ्यात वरच्या २०% लोकांकडे ८०% संपत्ती एकवटली आहे असे म्हटल्यावर विषमतेचे जितके मोठे चित्र उभे राहते तितके सगळ्यात वरच्या २६% लोकांकडे ७४% संपत्ती एकवटली आहे असे म्हटले तर उभे राहत नाही. खरी गोम इथेच आहे. म्हणून मग आकड्यांचे खेळ खेळून सगळ्यात वरच्या १% लोकांकडे ४०% संपत्ती आहे अशाप्रकारचे आहे त्यापेक्षा अधिक नाट्यमय चित्र उभे केले जाते. पण हे जे चित्र दिसत आहे ते ७४-२६ म्हणजे ८०-२० पेक्षा कमी विषम नियमाचाच परिणाम आहे हे ते लोक कधी सांगतिल का?

सौंदाळा's picture

25 Jan 2023 - 10:22 am | सौंदाळा

परेटोचे तत्व
असेही वाचले होते की अगदी डाव्यांचे ऐकुन या संपत्तीचे पूर्ण देशात समप्रमाणात वितरण केले तरी काही दिवसातच परत हेच ८०-२० चे प्रमाण होईल.

भारतातील सर्वात १% श्रीमंत लोक देशातील ४०% पेक्षा जास्त संपत्ती राखून आहेत.

मला वाटतं हे बहुतेक देशांना लागू होईल. १% लोकांकडे ४०% संपत्ती (किंवा थोडे इकडे तिकडे) अशी परिस्थिती जगातील बहुतेक देशांना लागू होईल. भारतात काही वेगळं असेल असं वाटत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Jan 2023 - 11:11 am | चंद्रसूर्यकुमार

१% लोकांकडे ४०% संपत्ती (किंवा थोडे इकडे तिकडे) अशी परिस्थिती जगातील बहुतेक देशांना लागू होईल. भारतात काही वेगळं असेल असं वाटत नाही.

सहमत. सगळीकडे तसेच असते. जर कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय अर्थकारणाला काम करू दिले तर असेच वितरण राहील. अगदी बळजबरीने सगळ्यांना संपत्तीचे समान वाटप केले तरी काही काळानंतर परत ७५-२५ किंवा ८०-२० अशाप्रकारेच चित्र उभे राहील. याचे कारण आपल्याकडे जे काही आहे ते वाढवायचे कसे यासाठी अंगात वेगळ्या प्रकारचे गुण लागतात. ते सगळ्यांकडे नसतात. खरं तर ते गुण फार थोड्या लोकांकडे असतात. एकूण समाजात नोकरदारांची किंवा पठडीतले उद्योग (दुकान वगैरे) चालविणार्‍यांची संख्या किती आणि वेगळ्याच कल्पनेची बिझनेस आयडिया बनवून तोच आपला पेशा करणारे लोक किती असतात या दोन आकड्यांची तुलना केली तर ते समजून येईलच. ज्यांच्याकडे ते गुण असतात ते पुढे निघून जाणार आणि नसतात ते मागे राहणार. हे होणे अपरिहार्य आहे.

दुसरा एक नेहमी मांडला जाणारा मुद्दा असतो की अंबानींचे घर विका आणि त्यातून पैसे उभे राहतील ते गरीबांमध्ये वाटा त्यातून त्यांचे पोट भरता येईल. २१ व्या शतकातले रॉबिन हूड म्हणायचे का हे? असे म्हणणारे लोक नेहमी एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अंबानींचे घर हे इन्व्हेस्टमेंट अ‍ॅसेट आहे आणि गरीबांचे पोट भरायचे म्हणजे त्यांना कंजप्शन अ‍ॅसेट्स पाहिजेत. समजा माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अंबानीकडे १ लाख पटींनी जास्त संपत्ती आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ मी जेवढे खातो त्याच्या १ लाख पटींनी जास्त अंबानी खातो असा होत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अ‍ॅसेट्समध्ये इतकी पराकोटीची विषमता दिसत असली तरी ती कंजप्शन अ‍ॅसेट्समध्ये तितक्या प्रमाणावर नसते. तसेच इन्व्हेस्टमेंट अ‍ॅसेट्स अशाप्रकारे कंजप्शन अ‍ॅसेट्समध्ये बदलता येत नाहीत. अंबानीचे घर किती कोटींचे असेल? कुठे ७ हजार कोटी कुठे १० हजार कोटी असे वेगवेगळे आकडे वाचले आहेत. एवढ्या किंमतीचे घर विकत कोण घेणार- खरं तर विकत कोण घेऊ शकणार? तर असाच कोणीतरी दुसरा बिलिअनर- समजा अडानी. आता अडानीने अंबानीला ७/१० हजार कोटी देऊन घर विकत घेतले तर ते पैसे अंबानीला मिळणार. त्यातून गरीबांची पोटं कशी भरणार आहेत? अगदी सरकारने अशा बिलिअनर्सचे घर आणि सगळी संपत्ती जप्त करून विकायला काढली तरी ती विकत घ्यायची ऐपत कोणाची असणार आहे?
म्हणजे ही घरे आणि संपत्ती विकायची कशी आणि त्यातून गरीबांची पोटं भरायची कशी?

तिसरे म्हणजे काहीतरी जादू करून सगळी संपत्ती विकून सगळ्या पैशाचे समान वाटप केले असे गृहित धरू आणि समजा प्रत्येकाला काही क्ष लाख रूपये मिळाले हे गृहित धरू. आपल्याला जितके पैसे हाताळायची सवय असते त्यापेक्षा असे अनेक पटींनी पैसे मिळाले तर ते पैसे व्यवस्थित मॅनेज करायची सगळ्यांची मानसिकता असतेच असे नाही. अगदी माझेच उदाहरण घ्यायचे तर मी बी-स्कूलमध्ये विद्यार्थी असतानाही शेअर विकत घेणे/ विकणे हे प्रकार करायचो. त्यावेळी माझे बजेट अगदी मर्यादित होते त्यामुळे अगदी ५०० रूपयांचा तोटा झाला तरी माझा जीव वरखाली व्हायचा. पुढे नोकरीला लागल्यानंतर माझ्याकडचे कॅपिटल वाढले तरी माझी 'मनी स्टोरी' वाढलेली नव्हती. त्यामुळे माझी रिस्क घ्यायची मानसिक क्षमता पूर्वी ५०० रूपये होती ती काही तितक्या प्रमाणात वाढली नव्हती. तेव्हा नोकरीला लागल्यावरही बराच काळ माझ्याकडील जास्त भांडवल तसेच पडून असायचे आणि मी जास्त मोठ्या पोझिशन्स घेऊच शकायचो नाही. आजही मार्केटमध्ये १ लाख कॅपिटलचे ५ लाख करणारे बरेच लोक दिसतील पण त्यांना ५ लाखाचे २५ लाख करताना मात्र प्रॉब्लेम येतो. कारण तेच- त्यांची 'मनी स्टोरी' वाढलेली तितक्या प्रमाणावर वाढलेली नसते. त्यातूनही मी शिकला सवरलेला आणि सारासार विचार करू शकणारा असल्याने समजा जास्त पैसे आले तर ते मी दारूत उधळायची शक्यता शून्य होती. सरकारने एका कारणासाठी मदत म्हणून दिलेले पैसे त्या कारणासाठी न वापरता दारूत उधळले असे कित्येक ठिकाणी होताना दिसेल. ते का होते? कारण एक तर सारासार विचार करायची क्षमता नसते आणि दुसरे म्हणजे 'मनी स्टोरी' न वाढल्याने मिळालेले पैसे नक्की कसे वापरायचे हे समजत नाही. मग अशा मारून मुटकून आणलेल्या समतेला काय अर्थ राहिला?

गुलाग हे पुस्तक लिहिलेल्या अलेक्झांडर सोल्झेनिस्टिन या रशियन लेखकाने एक सुंदर वाक्य म्हटले आहे- Human beings are born with different capacities. If they are free, they are not equal. And if they are equal, they are not free. अशी मारून मुटकून आणलेली समता ही स्वातंत्र्याची पायमल्ली करूनच आणता येते हे कम्युनिस्ट देशांमध्ये बघायला मिळालेले आहे. रशियातील परिस्थितीचा अनुभव घेतलेल्या सोल्झेनिस्टिननी हे म्हटले आहे हे महत्वाचे आहे. तसा अनुभव न घेतलेले पण अशा डाव्या विचारांविषयी ममत्व वाटणारे लोक बघितले तर खरोखरच आश्चर्य वाटते.

अशी मारून मुटकून आणलेली समता ही स्वातंत्र्याची पायमल्ली करूनच आणता येते हे कम्युनिस्ट देशांमध्ये बघायला मिळालेले आहे.

त्यामुळेच साम्यवादी देश हुकूमशाही पद्धतीने चालवावे लागतात. ते लोकशाही पद्धतीने चालवता येतच नाहीत.
साम्यवाद असलेल्या एखाद्या देशात खरी लोकशाही (उत्तर कोरिया सारखी लोकशाही नको, एकच उमेदवार, सगळ्यांनी त्यालाच मत द्यायचे. मग तो निवडून येणार) असल्याचे उदाहरण आहे का?

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Jan 2023 - 1:49 pm | चंद्रसूर्यकुमार

साम्यवाद असलेल्या एखाद्या देशात खरी लोकशाही (उत्तर कोरिया सारखी लोकशाही नको, एकच उमेदवार, सगळ्यांनी त्यालाच मत द्यायचे. मग तो निवडून येणार) असल्याचे उदाहरण आहे का?

माझ्या माहितीत तरी नाही.

भारतातही सगळ्यात जास्त राजकीय हिंसाचार होतो ती राज्य बंगाल आणि केरळ हीच आहेत. त्याचे कारण वेगळे सांगायलाच नको.

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2023 - 9:49 am | श्रीगुरुजी

भारतातील केरळचा अपवाद वगळता इतर ३-४ ठिकाणी असलेले डाव्या पक्षांचे बालेकिल्ले आता संपूर्ण उद्ध्वस्त झाले असले तरी जनेवि हा डाव्यांचा बालेकिल्ला अजूनही भक्कम आहे असे बीबीसीच्या चित्रफीत प्रकरणातून दृग्गोचर होतंय.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Jan 2023 - 2:22 pm | चंद्रसूर्यकुमार

भारतातील केरळचा अपवाद वगळता इतर ३-४ ठिकाणी असलेले डाव्या पक्षांचे बालेकिल्ले आता संपूर्ण उद्ध्वस्त झाले असले तरी जनेवि हा डाव्यांचा बालेकिल्ला अजूनही भक्कम आहे असे बीबीसीच्या चित्रफीत प्रकरणातून दृग्गोचर होतंय.

तरीही रात्र वैर्‍याची का कोणाची म्हणतात तशी आहे. डाव्यांची भारतातच नाही तर जवळपास सगळ्या देशांमधून पिछेहाट झाली आहे. तरी डावे संपलेले नाहीत. कारण intellectualism च्या मार्गाने डाव्वे परत येत आहेत/ यायचा प्रयत्न करत आहेत. जगातील बहुतांश मोठ्या विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्राशी संबंधित इतर विषयांच्या विभागांमध्ये डाव्यांचे प्राबल्य दिसेल. अमेरिकेत बर्कले, हार्वर्ड वगैरे त्यांचे बालेकिल्ले आहेत. भारतात जनेयु तर त्यांचा अड्डाच आहे. त्याबरोबरच इतर आघाडीच्या संस्थांमध्ये- आय.आय.एम, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, जादवपूर विद्यापीठ वगैरे ठिकाणी त्यांचे लक्षणीय अस्तित्व दिसेल. हे लोक डावे म्हटले की लगेच स्टालिनसारख्या कत्तली करणारे, लोकांना गुलागमध्ये पाठविणारे आहेत असे अजिबात नाही. पण असे अगदी फिके लाल लोकही सत्तेत गेले की त्यांची वाटचाल लेफ्टिस्ट लिबरटेरिअन पासून लेफ्टिस्ट ऑथोरिटॅरिअनपर्यंत होणे अपरिहार्य असते हे अन्यत्र लिहिले आहेच आणि तसेच जगभर बघायला मिळाले आहे. अगदी लेनिन किंवा चे गव्हेरा किंवा माओ हे लोक लोकांच्या कत्तली करायच्या हा अजेंडा घेऊन सत्तेत आलेले नसतात पण ते लोक सत्तेत आल्यानंतर मात्र लोकांच्या कत्तली होणे हा परिणाम होतोच.

सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेत जन्मलेल्यांमध्ये समाजवाद/ डावे विचार यांचे आकर्षण पूर्वीच्या पिढीपेक्षा बरेच जास्त आहे असली सर्वेक्षणे मधूनमधून येत असतात. पाच वर्षांपूर्वी पेनसिल्वेनियात गेटिसबर्गजवळ एका हायस्कूलमध्ये रशियन क्रांतीला १०० वर्षे झाली त्याबद्दल विशेष कार्यक्रम आयोजित केला होता हे वाचले. असे पूर्वी व्हायची शक्यता फारच थोडी होती. दुसरे म्हणजे गेटिसबर्ग म्हणजे यादवी युध्दात गाजलेल्या लढाईच्या ठिकाणी अमेरिकन तत्वे सोडून रशियन राज्यक्रांतीची कौतुके करायचे भिकेचे डोहाळे का लागले असावेत समजत नाही. कारण सरळ आहे. गरीबांविषयी कळवळ वाटणे वगैरे गोष्टी 'कुल' वाटतात. त्यात सुप्रसिध्द वचनाप्रमाणे- वयाच्या २०व्या वर्षी तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या ४०व्या वर्षीही कम्युनिस्ट राहिलात तर तुम्हाला डोके नाही त्यामुळे हे लोक भविष्यातही तसेच राहतील असे नाही. पण हे म्हटले होते जॉर्ज बर्नाड शॉने आणि त्याच्या काळात सोशल मिडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप नव्हते. आता सगळ्या बाजूने माहितीचा इतका महापूर सगळीकडे आहे (त्यात खरं किती आणि थापा किती हा पुढचा प्रश्न) की समजा कम्युनिझम कित्ती कित्ती चांगला अशाप्रकारचेच कोणा प्रोफेसरचे व्हिडिओ सोडून दुसरे काही बघण्यात आले नाही तर ती नक्की काय चीज आहे हे त्यांना कळायचे नाही हा धोका आहे.

त्यामुळे डाव्यांची कितीही पिछेहाट झालेली असली तरी मी त्यांच्यावर हल्ला करत राहणारच आणि माझा खारीचा वाटा उचलणारच. कारण ते कधी डोके वर काढतील हे सांगता येत नाही. आणि त्यांनी डोके वर काढले आणि त्यांचे प्राबल्य वाढले तर मानवी स्वातंत्र्याची पायमल्ली झालीच. रॉनाल्ड रेगननी म्हटल्याप्रमाणे-- “Freedom is never more than one generation away from extinction. We didn't pass it to our children in the bloodstream. It must be fought for, protected, and handed on for them to do the same, or one day we will spend our sunset years telling our children and our children's children what it was once like in the United States where men were free.”

सुबोध खरे's picture

25 Jan 2023 - 7:45 pm | सुबोध खरे

वयाच्या २०व्या वर्षी तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या ४०व्या वर्षीही कम्युनिस्ट राहिलात तर तुम्हाला डोके नाही.

दांभिकता आणि संधीसाधूपणा हि डाव्या लोकांची व्यवच्छेदकता आहे

Communist until you get rich. Feminist until you get married. Atheist until the airplane starts falling.”

विवेकपटाईत's picture

25 Jan 2023 - 11:35 am | विवेकपटाईत

बीबीसी म्हणजे ब्लफ ब्रोडकास्टिंग सेंटर. भारता विरूद्ध गरळ ओकणे त्यासाठी खोट्या बातम्या देणे हा त्यांचा एक सूत्री कार्यक्र्म. दहा वर्षाचा होताना 1971 युद्धाच्या बातम्या घर मालकाच्या रेडियो वर ऐकताना प्रथमच हे कळले होते. राहिले मोदीजी पहिले मुख्यामंत्री होते ज्यांनी हिंदू दंगे खोरांवर गोळ्या चालविल्या आणि हजारो मुस्लिम लोकांचे प्राण वाचविले. शंभरच्या वर दंगेखोर उडविले होते त्यात 90 टक्के हिंदू होते. माझ्या एका वरिष्ठतम सिख अधिकार्‍याने म्हंटले होते, जर दिल्लीत दहा बारा दंगेखोरांना मारले असते तर हजार दीड हजार सिखांचे प्राण वाचले असते. मोदी जर कोंग्रेसचे मुख्यमंत्री असते तर बीबीसी ने त्यांचा सत्कार केला असता. असो. अनिसचाश्याम मानव हा भारत जोडो यात्रेत होता.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Jan 2023 - 4:28 pm | चंद्रसूर्यकुमार

डॉनल्ड ट्रम्पतात्यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री असलेले माईक पॉम्पिओ यांनी एक दावा केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सी.आर.पी.एफ च्या ताफ्यावर हल्ला करून ४० पेक्षा जास्त जवानांना ठार मारले. त्यानंतर भारताने वायव्य सरहद्द प्रांतात बालाकोट येथे दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करायच्या तयारीत आहे आणि आम्ही पण त्याला प्रत्युत्तर देऊ असे भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना सांगितले असा दावा माईक पॉम्पिओ यांनी लिहिलेल्या पुस्तकात केला आहे.

https://zeenews.india.com/world/pak-was-planning-nuclear-attack-on-india...

हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने दावे करताना काही प्रोटोकॉल वगैरे असतो का? कारण असा दावा एखाद्या व्यक्तीच्या नावाने केला आणि ती व्यक्ती हयात नसेल तर त्याविषयी कसलेही स्पष्टीकरण प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून येणे शक्य नाही. मग त्या व्यक्तीच्या नावाने असे दावे एखाद्याने केले तर ते खरे आहेत की नाही हे तपासून कसे बघायचे?

वामन देशमुख's picture

25 Jan 2023 - 6:22 pm | वामन देशमुख

श्री नरेंद्र मोदी यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यावर चादर चढवायला पाठवली आहे.

गझ्वा-ए-हिंद २०४७ च्या दिशेने दमदार वाटचाल!

वामन देशमुख's picture

25 Jan 2023 - 6:28 pm | वामन देशमुख

(या दर्ग्यासंबंधीत) मागच्या वर्षीची एक बातमी:

नुपूर शर्मांचा शिरच्छेद करा, माझे घर घ्या' अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिस्ती म्हणतात; एफआयआर दाखल

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/behead-nupur-sharma...

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2023 - 5:38 pm | श्रीगुरुजी

मोदी १० फेब्रुवारीस पुन्हा मुंबईत येत आहेत. निमित्त आहे दाऊदी बोहरा समाजाचा काही तरी कार्यक्रम आहे. वाजपेयींच्या पावलांवर पाऊल टाकून दमदार वाटचाल सुरू झाली आहे. अशीच वाटचाल सुरू राहिली तर २०२४ मध्ये २००४ ची पुनरावृत्ती होऊ शकते.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Jan 2023 - 8:06 pm | चंद्रसूर्यकुमार

वाजपेयींच्या पावलांवर पाऊल टाकून दमदार वाटचाल सुरू झाली आहे.

अगदी तसे नाही. बोहरा समाज म्हणजे देवबंदी किंवा अन्य कुठचे कट्टर लोक असतात त्यात मोडत नाहीत. तो समाज बर्‍यापैकी शिकलेलाही आहे. दहशतवादी कारवायांमध्ये किंवा कट्टरपणात बोहरा नावे कधी दिसायची नाहीत. मुंबईत आणि गुजरातमध्येही बर्‍याच प्रमाणात व्यापार उद्योगात आहे. त्या समाजातील स्त्रियाही इतर मुस्लिम स्त्रियांपेक्षा अधिक शिकलेल्या असतात. ज्या काळात 'अ ब्लो टू मोदी' अशा बातम्या आठवड्यातून दोनदा यायच्या त्या काळातही मोदींच्या मागे खंबीरपणे उभे राहून मिडियात मोदींची बाजू मांडणारे झफर सरेशवाला बोहरी समाजातीलच आहेत (त्यांचे आता मतभेद झाले आहेत ही गोष्ट वेगळी). मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही बोहरा समाजाच्या कार्यक्रमांमध्ये जात असत आणि त्या स्समाजात मोदी बर्‍यापैकी लोकप्रिय आहेतही. फक्त सुन्नी/ देबबंदी वगैरेंपेक्षा शियांमधील या समाजाची संख्या बरीच कमी आहे आणि तो समाज त्यामानाने सुशिक्षित आणि व्यापार उद्योगात असल्यामुळे इतरांपेक्षा वेगळा आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2023 - 10:38 pm | श्रीगुरुजी

बोहरा समाज म्हणजे देवबंदी किंवा अन्य कुठचे कट्टर लोक असतात त्यात मोडत नाहीत.

बोहरा उद्योगधंद्यात असले तरी बोहरा स्त्रिया बुरखा (काळा नसतो, रंगीबेरंगी असतो) वापरतात. लहान मुलींवर खतना नामक अत्यंत घृणास्पद अत्याचार फक्त बोहरांमध्येच करतात. भारतात शिया व सुन्नींंमध्ये सुद्धा हा अत्याचार नसतो, पण बोहरांमध्ये असतो व घरातील मोठ्या स्त्रियाच हा प्रकार करतात.. सुदान, सोमालिया अश्या मागास रानटी देशातील मुलींवर हाच अत्याचार केला जातो व हाच अत्याचार भारतात बोहरी करतात. यांचा पंथप्रमुख सैयदना म्हणून होता. तो अत्यंत कर्मठ व हुकुमशहा होता.

माझ्या आयुष्याची पहिली सव्वीस वर्षे इंदौरमधील 'राणीपुरा' भागात गेली. खाली दुकान आणि वरती दोन मजली घर अशी रचना असलेली ती एक मोठी उत्तम दर्जाची 'चाळ' असून तिथे रहाणारे बहुतांश लोक बोहराच होते. (आमचे पण औषधाचे दुकान होते) त्याखेरीज त्या भागात बोहरा मंडळींची शेकडो घरे-दुकाने असतील. ते सगळे लोक सज्जन आणि प्रमाणिक होते. अजूनही त्या भागात गेलो की मला ओळखतात आणि खूप प्रेमाने विचारपूस, पाहुणचार करतात, जुन्या दिवसांच्या आठवणी काढतात.
आता पुन्हा आम्ही इंदौरला रहायला गेलो आहोत, तिथून 'महू' गाव जवळ आहे. महूच्या बाजारातही खूप दुकाने बोहरांची आहेत. ते सगळे प्रामाणिक आणि विश्वसनीय आहेत. एकदा मला काहीतरी घ्यायचे होते (अमूक नंबरचा पाना का काहीतरी अवजार) तर बोहरा दुकानदाराने "काय को बेकार मे खर्चा करते हो? असे म्हणून तेच काम घरच्या घरी फुकटात कसे करता येईल हे सांगितले, आणि मी तसेच केले. आपल्याला हवी ती वस्तू एकाद्या दुकानदाराकडे नसली, तर तो बाहेर येऊन आपल्याला इकडे वळा, तिकडे वळा असे मर्गदर्शन करत ती वस्तू कुठे मिळेल हे सांगतो. मराठी, पंजाबी वा अन्य कोणताही दुकानदार असे करताना मी बघितलेला नाही.
आपल्याला घृणास्पद वाटणारी काही परंपरा त्यांच्यात समजा असली, तरी त्याचा त्रास बाहेरच्या इतर लोकांना काहीही नाही. त्यांच्यापैकी कुणीही आतंकवादी वगैरे होणे शक्य नाही. हे लोक घरात गुजराती भाषा बोलतात.
शिया-सुन्नीमधे खतना करत नाहीत ही माहिती चुकीची आहे. माझे शिया आणि सुन्नी दोन्ही मित्र आहेत, त्यांचा खतना झालेला आहे. असो.

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Jan 2023 - 12:25 am | चंद्रसूर्यकुमार

हिंदूंमध्ये सुध्दा अशा काहीकाही वाईट चालीरीती आहेतच. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असले प्रकार हिंदूंमध्ये आहेतच. प्रत्येक समाजात काहीना काही खोटं मिळेलच. अगदी पूर्ण धुतल्या तांदळासारखे किती समाज मिळतील? आता समाजात अशा काही वाईट गोष्टी आहेत म्हणून पूर्ण फटकून वागायचे तर बऱ्याच, कदाचित बहुसंख्य लोकसंख्येची फटकून वागावे लागेल.

मुद्दा हा की बोहरा समाजातील कोणाचा दहशतवाद किंवा तत्सम प्रकारात हात आहे असे कधी बघायला मिळालेले नाही. अशा समाजाच्या कार्यक्रमात जाणे आणि वाजपेयींनी हुर्रियत कॉन्फरन्स सारख्या उघड देशद्रोही संघटनेला पायघड्या घातल्या होत्या याची तुलना करणे अयोग्य आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2023 - 9:44 am | श्रीगुरुजी

हिंदूंमध्ये सुध्दा अशा काहीकाही वाईट चालीरीती आहेतच. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी असले प्रकार हिंदूंमध्ये आहेतच.

या चालीरीती हिंदू धर्माच्या परंपरा कधीच नव्हत्या. हे गुन्हे करताना, आम्ही हिंदू धर्माचे पालन करीत आहोत असेही करणारे म्हणत नाहीत. परंतु खतना, सुंता, हलाल हे प्रकार मुस्लिम धर्माची आज्ञा या नावाखाली केले जातात. बुरखा प्रकार सुद्धा कुराणच्या आज्ञेचे पालन आहे. बोहरांमध्ये त्यांचा पंथप्रमुख सैयदनाजशचे आदेश पाळावेच लागतात. न पाळल्यास त्या व्यक्तीवर व कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. असगर अली इंजिनिअर या सुधारणावादी बोहरावर व त्याच्या कुटुंबावर असाच बहिष्कार टाकलेला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना बोहरा स्मशानभूमीतही जागा दिली नव्हती. तस्मात् बोहरा सुद्धा कर्मठच असतात, पण ते शिखांप्रमाणै त्यांच्या पंथापुरते कर्मठ असतात. इतरांना त्यांच्या कर्मठपणाचा तसा त्रास नसतो.

बोहरा अतिरेकी नसतात हे बरोबर आहे. बोहरा इतर धर्मियांशी मिसळून राहतात यामागे आपला व्यवसाय चालावा व त्यासाठी सर्वांशी सौजन्याने वागावे लागेल हा विचार असणारच.

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2023 - 6:34 pm | श्रीगुरुजी

अत्यंत चुकीचे काम.

आग्या१९९०'s picture

25 Jan 2023 - 9:51 pm | आग्या१९९०

तोंड तर बघा त्यांची. उजवे किती ढोंगी आणि भेकड असतात ह्याचा पुरावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2023 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. पं.मोदी लिबरल होत चालले असे वाटले की नेतृत्व बदल करतील. अमित शा. योगी.
अशी बांधाबांध करतील.

-दिलीप बिरुटे

वाटले की नेतृत्व बदल करतील. अमित शा. योगी.
चला म्हणजे हे तरी नक्की झाले कि एका भाजपाची घृणा करणाऱ्याला हे मान्य कि भाजपात घराणेशाची कमी आहे !
उद्या शहा योगी
पर्वा गडकरी फडणवीस
आणि इकडे ... खर्गेंसारख्यांचे चे बुजगावणे ठेव्यायचे , थरूरांसारख्यांचे खच्ची करण कारायाचे आणि "रागा आणि मम्मी " यांची अंतिबंध सत्ता पक्षावर कायम ( रागांनन्तर कोण ? हा मात्र प्रश्न आहे बुवा ... .. हे लवकर पुढचा राजपुत्र / राजकन्य का निर्माण करीत नाहीत? दाढी साफ करा आणि बोहल्यावर उभे राहा हो लवकर )

सुबोध खरे's picture

1 Feb 2023 - 11:41 am | सुबोध खरे

हॅ
हे पुरोगामी तर भंपक आणि दरिद्री मनोवृत्तीचे असतात.

रागा सोगा प्रिव यांच्या बद्दल काही लिहिलं तर म्हणतात आमचा काँग्रेस शी संबंध नाही

केजरीवाल यांच्या बद्दल काही लिहिलं तर आम्ही आपटॉर्ड नाही म्हणून नकार घंटा वाजवायची

कम्युनिस्टांबद्दल लिहिलं तर आमचा कम्युनिस्टांशी संबंध नाही म्हणून हात वर करायचे.

बाजू कुणाचीच घ्यायची हिम्मत नाही. केवळ बुळबुळीत कण्याचे आणि बुळबुळीत वृत्तीचे लोक असतात.

एक ठोस विचार सरणी नाही. त्यातून एकाचे दुसर्याशी पटत नाही.

एखाद्या बरणीतून घरंगळणाऱ्या काचेच्या गोट्यांसारखे बेशिस्त आणि दिशाहीन असतात. पण उतार मिळाला कि वेगाने जाऊ लागतात.

हा उतार कोणता तर मोदीद्वेष. या मुद्द्यावर सगळे कसे एकाच दिशेने बेफाम सुटतात.

अर्थात उतारावरून घरंगळून शेवटी कचऱ्यातच यांची इतिश्री होते

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2023 - 11:40 pm | श्रीगुरुजी

अयोध्येत कारसेवक श्रीरामभक्तांवर गोळ्या झाडून मारणाऱ्या, बलात्कारी तरूणांचे समर्थन करणाऱ्या मुलायमसिंग यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जस एम कृष्णा यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनाही पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या लोकांना इतका मानाचा पुरस्कार देण्याइतके यांनी कोणते कार्य केले आहे?

अजमेर दर्ग्याला चादर पाठविण्याचे कारण काय?

मोदी आपल्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कालखंडात काही विचित्र निर्णय घेत आहेत जे अजिबात आवडले नाहीत. का त्यांना सुद्धा निधर्मी पुरोगामित्वाचा कीडा चावलाय?

मोदी आपल्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कालखंडात काही विचित्र निर्णय घेत आहेत जे अजिबात आवडले नाहीत. का त्यांना सुद्धा निधर्मी पुरोगामित्वाचा कीडा चावलाय?

बहुतेक दिवस भरत आलेत. श्री वाजपेयी, श्री आडवाणी यांनीही असेच चालु केले होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Jan 2023 - 7:42 am | चंद्रसूर्यकुमार

त्यातही मनोहर पर्रीकरांना २०२० मध्ये मरणोत्तर पद्मभूषण दिले गेले होते. आता मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण दिले जात आहे. म्हणजे मुलायमसिंग यादव मनोहर पर्रीकरांपेक्षा मोठे होते असे मोदी सरकारला म्हणायचे आहे का?

हा निर्णय अजिबात आवडला नाही.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2023 - 9:58 am | श्रीगुरुजी

इंडिया टुडे हे साप्ताहिक प्रत्येक वर्षी जानेवारी व ऑगस्ट महिन्यात देशभर मतदार सर्वेक्षण करते. दोश दशकांहून अधिक काळ हे सर्वेक्षण सुरू आहे. कालच जानेवारी २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, आज लौकसभेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षांना किती जागा मिळतील याचे अंदाज प्रसिद्ध झाले आहेत. तज अंदाज खालीलप्रमाणे -

१) भाजप २८४ (३९% मतै), कॉंग्रेस ६८ (२२% मते), इतर १९१ (३९% मते)
२) रालोआ २९८ (४३% मते), संपुआ १५३ (२५% मते), इतर ९२ (३२% मत)

- मोदींची लोकप्रियता ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत वाढली आहे. तशीच राहुल गांधींची लोकप्रियता सुद्धा वाढली आहे.

- रालोआला ४३% मते तर मोदींना ५२% लोकप्रियता मते आहेत, परंतु संपुआला २५% मते दिसत असली तरी राहुल गांधींची लोकप्रियता मते १४% आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की मोदी पक्षापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत म्हणजे एका अर्थाने ते भाजपचे asset आहेत, तर राहुल गांधी पक्षापेक्षा कमी लोकप्रिय आहेत, म्हणजे ते एका अर्थाने कॉंग्रेसची liability आहेत.

- भाजपची वैयक्तिक मते जवळपास १.५% वाढत आहेत, तर कॉंग्रेसची वैयक्तिक मते २.७% वाढत आहेत. परंतु अकाली दल, शिवसेना, संजद असे पत्र आता रालोआत नसल्याने रालोआची २% मते घटून जवळपास ५५ जागा कमी होत आहेत. भाजप सुद्धा वैयक्तिक १९ जागा गयावित आहे, तर कॉंग्रेसला १६ जागांचा व संपुआला ६१ जागांचा फायदा होत आहे.

- कोणता विरोधी नेता मोदींना पर्याय आहे, या प्रश्नाच्या उत्तरात २६% मते घेऊन केजरीवाल प्रथम क्रमांकावर तर राहुल गांधी बऱ्याच खाली १४% मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ५% मते घेऊन ममता बॅनर्जी व ३% मते घेऊन नवीन पटनाईक चौथ्या क्रमांकावर आहेत. पवार, ठाकरे वगैरे केवळ मराठी माध्यमांनी मराठी वाहिन्यांवर व वृत्तपत्रातून चर्चेत ठेवलेले नेते आहेत. महाराष्ट्राबाहेर त्यांना ओळख नाही असंच दिसतंय.

- भाजपत मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाला अमित शहा २६%, योगी आदित्यनाथ २५%, गडकरी १६% असा पाठिंबा दिसत आहे. फडणवीस या शर्यतीतच नाहीत. एकंदरीत राष्ट्रीय पातळीवर गडकरींचा काहिसा अपवाद वगळता मराठी नेत्यांना स्थान दिसत नाही.

- राहुल गांधींच्या पदयात्रेचा कॉंग्रेसला अगदी थोडा फायदा होताना दिसतोय.

- उत्तर प्रदेश (६ अधिक जागा), तेलंगण (२ अधिक जागा), बंगाल (२ अधिक जागा) व आसाम (३ अधिक जागा) ही ४ राज्ये भाजपला २०१९ च्या तुलनेत १३ अधिक जागा देत आहेत. परंतु महाराष्ट्र (भाजप १४, मविआ ३४), कर्नाटक (भाजप ७, कॉंग्रेस १७) व बिहार (भाजप ९, राजद+संजद+कॉंग्रेस ३१) या राज्यात भाजपला मोठा फटका बसून ३५ जागा जात आहेत.

कर्नाटकात मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. या राज्यात प्रत्येक ५ वर्षांनी सत्तांतर होण्याची परंपरा निर्माण झाली आहे. तस्मात् सध्या सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. तोच कल या सर्वेक्षणात प्रतिबिंबित झाला असावा. परंतु कर्नाटकात विधानसभा व लोकसभा निवडणचकीचै निकाल वेगळे लागतात. जो पक्ष राज्यात विरोधात बसतो तो पक्ष केंद्रात सत्तेत येतो, असे साधारणपणे १९८५ पासून दिसले आहे. तस्मात् २०२३ विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात असला तर २०२४ मध्ये तो केंद्रात सत्तैवर असण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिल्लक सेना एकत्रित लढेल या गृहीतकावर सर्वैक्षणाचे अंदाज बांधले आहेत. जर हे तिघे एकत्र लढले तर प्रत्येक पक्षाच्या वाट्याला फार तर १६ जागा येतील व कोणत्याही पक्षाला इतक्या कमी जागा मान्य होणार नाहीत. त्यात भर म्हणजे शिल्लक सेनेच्या वाट्यात वंचित व ब्रिगेड हे सुद्धा वाटेकरी आहेत व प्रकाश आंबेडकर जागांच्या बाबतीत अत्यंत हटवादी आहेत. त्यामुळे मविआतील पक्ष एकत्र लढणे शक्य वाटत नाही.

बिहारमध्ये सुद्धा राजद १७-१७, संजद १६-१७ व कॉंग्रेस ६-८ असे वाटप होत असल्यास २०१९ मध्ये सर्व ४० जागा लढविणारा राजद हे मान्य करणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2023 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंडिया टूडेचं सर्व्हे असंही म्हणतो की, आज निवडणुका झाल्यास काँग्रेसला 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचा अर्थ असा की आता काँग्रेस सावरत आहे. दुसरं असं की राहुल गांधीला भारत जोडो यात्रेने प्रतिमा सुधारायला मदत केली तसेच पक्षालाही ताकद दिली, असे, असले तरी अजून बूथलेवलला जाऊन काम करावे लागते आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची एक मजबूत आणि उत्स्फूर्त फळी असावी लागते ती अजून त्यांची नाही. पदाचे भूकेले असल्यामुळे तू नाही तर मीही नाही, ही एक अडचण. बाकी, भाजपासरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असला तरी, नुसते मंदिर हा मुद्दा भाजपाला किती यश मिळवून देईल त्या पेक्षा लोकप्रिय योजना प्लस हिंदुत्व हा अजेंडा भाजपची किती मतं टीकवून शकतील तेही महत्वाचेच आहे.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2023 - 1:24 pm | श्रीगुरुजी

इंडिया टूडेचं सर्व्हे असंही म्हणतो की, आज निवडणुका झाल्यास काँग्रेसला 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

चूक.

या सर्वेक्षणानुसार एकूण ५४३ पैकी भाजपला २८४, कॉंग्रेसला ६८ व हे दोन पक्ष वगळता इतर सर्व पक्षांना मिळून एकत्रित १९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. या इतर पक्षातील काही पक्ष भाजप आघाडी रालोआत असून त्यांना १४ जागा, तर काही पक्ष कॉंग्रेस आघाडी संपुआत असून त्यांना ८५ जागा मिळण्याची शक्यता आहे तर बिजद, तेरास, वाय एस आर कॉंग्रेस, आआप, तृणमूल अश्या कोणत्याही आघाडीत नसलेल्या पक्षांना ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच रालोआ २९८, संपुआ १५३ व इतर ९२ अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे.

बाकी, भाजपासरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असला तरी, नुसते मंदिर हा मुद्दा भाजपाला किती यश मिळवून देईल त्या पेक्षा लोकप्रिय योजना प्लस हिंदुत्व हा अजेंडा भाजपची किती मतं टीकवून शकतील तेही महत्वाचेच आहे.

भाजप सरकारने जनतेचा इतका भ्रमनिरास केला आहे की २०१४ (३१%), २०१९ (३७.५%) या तुलनत फक्त ३९% इतकी किरकोळ मते मिळण्याची शक्यता आहे. तसेच २०१४ (२८२), २०१९ (३०३) या तुलनेत फक्त २८४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Jan 2023 - 9:43 am | चंद्रसूर्यकुमार

वकिल सौरभ किरपाल यांची उच्च न्यायालयात नियुक्ती करण्याचे प्रकरण चांगलेच तापलेले दिसते. सौरभ किरपाल हे स्वतः वकिल आहेतच त्याबरोबर माजी सरन्यायाधीश बी.एन.किरपाल यांचे चिरंजीव आहेत. त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी अशी शिफारस न्यायाधीशांच्या कॉलेजिअमने केली. अशी शिफारस आल्यानंतर संबंधित व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी रॉ आणि आयबी कडून 'बॅकग्राऊंड चेक' होते. या दोन संस्थांनी किरपाल यांच्या नियुक्तीविरोधात मत दिले. सौरभ किरपाल यांचे दिल्लीतील स्वीस वकिलातीत कामाला असलेल्या निकोलस बॅकमान या व्यक्तीबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंध आहेत हे त्यामागे कारण आहे असे दिसते. न्यायाधीश पदावर जाणार्‍या कोणाचेही परदेशी नागरिकाशी आणि त्यातूनही वकिलातीत कामाला असलेल्याशी संबंध असू नयेत कारण त्यातून भारताच्या हितसंबंधांना धोका निर्माण व्हायची शक्यता आहे असे रॉ आणि आयबीचे मत आहे असे दिसते.

झाले. मग नेहमीप्रमाणे सौरभ किरपाल हे गे असल्याने त्यांना पुढे जाऊ दिले जात नाहीये वगैरे बोंब सुरू झाली. गे असणे हे काय क्वालिफिकेशन झाले का? गे असेल तर मग त्या व्यक्तीमुळे देशाच्या हितसंबंधांना धोका निर्माण होऊ शकतो ही शक्यता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचे का? अशा कोणत्याही महत्वाच्या पदावर जाणार्‍या व्यक्तीमुळे देशाच्या हितसंबंधांना कोणताही धोका निर्माण व्हायची शक्यता जरी असेल तर त्या व्यक्तीची नियुक्ती केली जात नाही. तरीही हे महाशय गे आहेत म्हणून त्या नियमाला अपवाद करायचा का?

सर्वसमावेशकता या नावाखाली लिब्बू लोकांनी ही घाण सगळीकडे केली आहे. आणि अन्य कोणत्याही कारणाने नियुक्ती होत नसेल तरी मग हे लोक 'गे असल्याने विरोध होत आहे' ही कोल्हेकुई करायला मोकळे. जसे काही गे असले की मग सगळे नियम आणि कायदेकानूच्या वर असतात.

या निमित्ताने काही प्रश्न पडतात-
१. समजा सौरभ किरपाल गे नसते आणि सरळ असते आणि त्यांचे कोणा परदेशी दुतावासातील स्त्रीशी संबंध असते तर आय.बी आणि रॉचा अहवाल आता आहे त्यापेक्षा वेगळा असता का?
१अ. समजा सौरभ किरपाल गे नसते आणि सरळ असते आणि त्यांचे कोणा परदेशी दुतावासातील स्त्रीशी संबंध असते आणि त्याकारणाने त्यांची नियुक्ती होत नसती तर लिब्बू लोकांनी आता घातला आहे तसा गदारोळ घातला असता का?

२. समजा सौरभ किरपाल यांचे कोणा परदेशी माणसाशी नाही तर भारतीयाशीच संबंध असते तर आय.बी आणि रॉचा अहवाल काय असता? आता गे असलेल्या कोणाही व्यक्तीची न्यायाधीशच नाही तर अशा कोणत्याही मोठ्या पदावर नियुक्ती करायची वेळ आली आहे का? आली असल्यास पूर्वी आय.बी आणि रॉने नक्की काय अहवाल दिला होता?

हे तथाकथित उदारमतवादी लोक गे हा शब्द जरी आला तरी इतके हिरवेपिवळे आणि आक्रमक होतात की काही विचारूच नका. त्यामुळे परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या कोणाला वाटायचे की दहा दगड रॅन्डमली मारले तर त्यातील पाच गे लोकांना लागतील.

बादवे, माझा स्वतःचा गे लोकांविषयी काहीही आक्षेप नाही आणि असायचे कारणही नाही. ते लोक त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करतात हा सार्वजनिक चर्चेचा प्रश्न असू नये. पण सौरभ किरपाल हे गे आहेत म्हणून त्यांच्यासाठी नेहमीच्या प्रक्रियेला फाटा देऊन गे असणे हे एक क्वालिफिकेशनसारखे समजणे मात्र नक्कीच चुकीचे आहे.

चंसुकु,. पण हे सर्वत्रच नसते का? कोणती केस सर्वांत स्ट्राँग बनेल हा विचार करूनच पवित्रा ठरवला जातो ना?

नुसता हात उगारला अशी केस होईल की स्त्रीवर उगारला अशी होईल, की विशिष्ट सामाजिक वर्गातील स्त्रीवर, की विशिष्ट सामाजिक वर्गातल्या मायनर मुलीचा विनयभंग केला, ही होईल? :-)

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Jan 2023 - 11:54 am | चंद्रसूर्यकुमार

सर्वत्र तसेच असले तरी चुकीचे ते चुकीचेच ना? कोणीही जी काही प्रोसेस ठरलेली आहे त्याच्या वर नसावा- मग गे असेल तरी किंवा सरळ असेल तरी किंवा जो कोण असेल तो. प्रश्न उभा राहतो जेव्हा संबंधित व्यक्ती गे किंवा आणखी कोणी आहे म्हणून सगळ्या प्रोसेसला बगल देऊन निर्णय घ्यावेत ही अपेक्षा असते तेव्हा. हे चुकीचेच आहे ना?

गवि's picture

28 Jan 2023 - 12:03 pm | गवि

हो. शंभर टक्के.

फक्त ते केवळ "लिबरल" लोकांचे व्यवच्छेदक लक्षण नाही इतकेच म्हणणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2023 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपट दिल्ली विद्यापीठात दाखविण्याचे आयोजन विद्यार्थी संघटनांनी केले होते, दिल्ली पोलिसांनी विद्यापीठ आवारात जमावबंदी लागू केली. तर, काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बीबीसीने गुजरात दंगलीबाबत 'इंडिया : दी मोदी क्वश्चन' नावाचा दोन भागात माहितीपट प्रदर्शीत केला आहे, माहितीपटातून मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा माहितीपट सर्व मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काढण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

विद्यार्थी संघटनांनी सदर माहितीपट लॅपटॉप आणि मोबाईलवरुन प्रदर्शीत करण्याची पर्यायी व्यवस्था केली होती पण विद्यापीठ प्रशासनाने वीज तोडली त्यामुळे विद्यार्थ्यांना माहितीपटाचे प्रदर्शन करता आले नाही असे एसएफआय संघटनेने दावा केला आहे, मात्र लिंक आणि क्यु आर कोड शेअर केल्याचा दावा केला.
(वृत्त संकलन विविध माध्यमे)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2023 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक संशोधन संस्थेने अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर शुक्रवारी या समुहाच्या भांडवलात मोठी पडझड झाली. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानुसार अदानी समूहाने अनेक दशके समभागांची विक्री करताना त्यात गैरप्रकार केला आहे. त्याचप्रमाणे या समूहाने लेखा नोंदीमधे गैरव्यवहार केला आहे, अशा आरोप केले आहेत. समभागांची किंमत फुगवणे, कर्जबाजारी उद्योग, वगैरे... मीडियात मात्र या विषयावर कमालीची शांतता आहे. अदानीच्या भरवशावर असणा-यांना आज तरी निब्बर फटका बसला आहे. सेबीने चौकशी सुरु केल्याची बातमी वाचनात आली. पुढे काय होईल ते माहिती नाही पण पालेमुळे खोल जातील इतके नक्की.

गौतम अदानी कोण आहेत. सविस्तर इथे झलक.

-दिलीप बिरुटे