ताज्या घडामोडी । जानेवारी २०२३

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
1 Jan 2023 - 1:40 pm

सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०२३ या वर्षाच्या पूर्वार्धात, ईशान्य भारतातील काही राज्यांच्या तर उत्तरार्धात राजस्थान, तेलंगणा सहित इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुकादेखील याच काळात होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी या निवडणुकांमधून होईल.

---

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. चीनमधील औद्योगिक उत्पादन नीचांकाला पोहोचल्याची ही बातमी त्याची साक्ष देते. २०२० ची कोरोना-स्थिती पुन्हा येऊ शकेल का?

---

नवीन वर्षात गलेमा, मिपादिवाळी, शशक इ माध्यमांतून मिपाकरांना चांगलेचुंगले लेखन चाखायला मिळेल अशी अपेक्षा.

मिसळपाव

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2023 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या इंडिया : द मोदी क्वश्चन या बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाच्या प्रदर्शनावरुन देशभर सध्या वाद असताना आता महाराष्ट्रातही हे लोण पसरले आहे. पुण्यातील फ़िल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत विद्यार्थी संघटनेचा वतीने प्रजासत्ताक दिनाच्या रात्री हा माहितीपट दाखविण्यात आला तर मुंबैतही टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या विद्यार्थ्यांनीही २६ जानेवरीला शनिवारी कॅम्पसमधे पाहिला. ( वृत्त मटा)

''साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट आणि प्रसारमाध्यंमावर बंदी घालणे हे ढासळलेल्या समाजाचे लक्षण आहे. लोकशाही देशात चित्रपटांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. बीबीसीचा माहितीपट देशातील हिंसाचार अधोरेखित करतो. माहितीपट पाहून भारतातील कोणीही आश्चर्यचकीत झाले तर ते जास्त धक्कादायक आहे. जातीय आणि धार्मिक हिंसाचार सत्ताधारी पक्षाच्या राजकारणाचा भाग झाला आहे. चित्रपट पाहणे हे सेन्सॉरशीपला उत्तर आहे. कोणी काय पाहावे हा निर्णय नागरिकांवर सोडून दिला पाहिजे. इतकेच आम्हाला सादरीकरणाद्वारे म्हणायचे आहे'' - एफटीआयआय स्टुडंट असोशिएशन. ( वृत मटा)

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्यामुळे त्याची उत्सुकता लागून राहते. खरं तर, त्यावर बंदी घालायला नको होती, असे माझं मत आहे. पण, सरकारने असे कोणते निर्णय घ्यावे आणि कोणते निर्णय घेऊ नये याची एखादी समिती असेल तर त्यांनी काही गोष्टींचा सारासर विचार केला पाहिजे असे वाटले.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2023 - 10:03 pm | श्रीगुरुजी

केंद्र सरकारने बीबीसीच्या वृत्तफीतिवर बंदी घालून मोठी चूक करून विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. जर या वृत्तफीतिकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारले असते, तर या वृत्तफीतिबद्दल बहुसंख्य भारतीयांना समजलेच नसते व काही विरोधकांनी यावरून मोदींविरोधात वक्तव्ये केली असती तर नेहमीप्रमाणे मोदींनाच फायदा झाला असता. कोणाच्या सल्ल्यावरून ही बंदी घातली हे लक्षात येत नाही. कदाचित मोदींना अडचणीत आणण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हा सल्ला मोदींना दिला असावा. सुधींद्र कुलकर्णींनी अडवाणींना जसे अडचणीत आणले तसाच हा प्रकार असावा. आंतरजाल व समाजमाध्यमे उपलब्ध असताना अश्या बंदी घातलेल्या चित्रफीति वेगाने सर्वत्र पसरतात व त्यांची वेगाने प्रसिद्धी होऊन बंदी अयशस्वी ठरते, हे मोदी किंवा केंद्र सरकारला समजले नसेल तर आश्चर्य आहे. आता पुढील काही दिवस ही वृत्तफीत सर्वत्र जाहीर दाखविली जाईल व त्यातून बंदीचा फज्जा उडणार हे नक्की.

चित्रा वाघ विनाकारण उर्फीच्या मागे लागून तोंडावर आपटल्या. त्या प्रकरणात उर्फीचा केसही वाकडा झाला नाही, पण चित्रा वाघा़ना मात्र चरफडत माघार घ्यावी लागली. महिला आयोगाची अध्यक्षा रूपाली चाकणकर राष्ट्रवादीची आहे व मुख्य म्हणजे तिला (म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीला) फडणवीसांचा पाठिंबा आहे, हे चित्रा वाघांच्या लक्षातही येऊ नये याचे नवल वाटते. सत्तेत येऊन ६ महिने झाल्यानंतरही चाकणकर बाईंना अध्यक्षपदावरून काढलेले नाही कारण फडणवीस राष्ट्रवादीला दुखावू इच्छित नाहीत, हे वाघ बाईंना कसे समजत नाही? फडणवीस म्हणजे पर्यायाने राज्य सरकार आपल्याला पाठिंबा देणार नाही व आपण तोंडघशी पडू याकडे वाघबाईंनी पूर्ण डोळेझाक केल्याने आता माघार घ्यावी लागली आहे.

बीबीसी वृत्तफीत प्रकरणात तसेच होताना दिसत आहे. काय होईल हे उघड दिसत असताना अट्टाहासाने बंदी घातल्याने आता केंद्र सरकारचे तोंड काळे झाले आहे. मोदी मुख्यमंत्री असताना अश्या प्रचाराला ते विरोध न करता आपण म्हणजे गुजराती माणूस म्हम्हणजे हिंदू अपप्रचाराचा बळी होत आहोत अशी भूमिका घेऊन ते बाजी पलटवून लावायचे. या प्रकरणात तसेच करायला हवे होते.

कपिलमुनी's picture

29 Jan 2023 - 10:07 pm | कपिलमुनी

महाराष्ट्रात एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीचे ऑनर किलिंग झाले पण असल्या क्षुल्लक गोष्टीत भक्त पुजारी लक्ष घालून
ही बातमी मराठी वर्तमानपत्रात आली का वगैरे चौकशा करत नाहीत

विवेकपटाईत's picture

30 Jan 2023 - 12:02 pm | विवेकपटाईत

राहुल गांधींनी कश्मीर मधून यात्रा काढली, लाल चौक वर तिरंगा लावला. लाल चौकवर भाषण ही दिले. 2014 आधी हे संभव होते का. मोदी सत्तेवर आल्यानंतर कश्मीर बदलले याचे प्रमाण पत्र राहुल गांधींनीचे दिले.

केरळ न्यायालयाने मदरसा शिक्षकाला त्याच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार आणि गर्भधारणा केल्याबद्दल तीन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दोषी मदरसा शिक्षकाला ६.६ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

घरी कोणी नसताना आरोपीने मार्च २०२१ मध्ये आपल्या मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केल्याची माहिती आहे. १५ वर्षांची मुलगी कोविडच्या प्रादुर्भावामुळे घरी शिकत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने आपल्या बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेने आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. हा लैंगिक अत्याचार ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरूच होता. आरोपी, मदरसा शिक्षक, घरी कोणी नसताना अनेक प्रसंगी त्याच्या मुलीवर बलात्कार करत राहिला.
तिने जानेवारी २०२२ मध्ये तक्रार केली आणि तिला तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे ती गर्भवती असल्याचे उघड झाले

राजस्थानमधील अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर गोंधळ झाला . बरेलवी आणि खादीम नावाच्या दोन मुस्लिम गटांमध्ये हाणामारी झाली.

तेजस मार्क II आणि AMCA लढाऊ विमानांसाठी DRDO च्या सहकार्याने न्यूटन थ्रस्ट GE-F414 जेट इंजिन भारतात बनवले जातील. या GE-414 इंजिनचे उत्पादन तंत्रज्ञानाचे संपूर्ण हस्तांतरण (ToT) प्रकारे केले जाईल.

ट्विन-इंजिन अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट विमान
एलसीएच्या विकासासाठी DRDO अंतर्गत नोडल एजन्सी असलेल्या ADA द्वारे विकसित केले जाणारे ट्विन-इंजिन अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) देखील GE-414 इंजिनद्वारे चालेल. भारताची भविष्यातील प्रगत मध्यम लढाऊ निर्माणाधीन आहेत आणि त्यात ही दुहेरी इंजिने असतील.