तुमच्या आवडत्या तुनळी वाहिन्या कोणत्या?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
29 Dec 2022 - 4:59 pm

आमची प्रेरणा--
ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे?

नमस्कार मिपाकर
ईतिहास काळात घरोघरी मंडळी लवकर रात्रीची जेवणे वगैरे आटोपुन पत्ते,कॅरम्,पट वगैरे खेळत बसायची म्हणे. गेला बाजार जेवताना किवा चहा पिताना एकमेकांशी गप्पा वगैरे मारायची. शेजार्‍या पाजार्‍यांकडे वर्तमानपत्र वाचायला किवा शिळोप्याच्या गप्पा मारायला, रमी किवा बुद्धीबळ खेळायला जायची. काहीच नसेल तर घरीच गॉसिपिंग करत बसायची. पुढे रेडिओ आणि मग टि.व्ही. आले, आणि रिकामा वेळ घालवायला माणसाला एकमेकांची गरज उरली नाही. आणि आता तर काय? स्मार्ट फोन आल्यापासुन रेडिओ,टि.व्ही. सगळे हातातच आले आहे. (त्यात मिपाही आलेच :)

रेडिओ मस्त होते, जाता येता ऐकता यायचे. टि.व्ही. हे प्रकरण मला फारसे कधीच आवडले नाही. त्यातल्या त्यात एपिक्,डिस्कव्हरी,नॅट जिओ, हिस्टरी अश्या वाहिन्या कधी मधी बघतो, पण ते ठराविक कार्यक्रमासाठीच. एका जागी बसुन ३ तास चित्रपट किवा तासभर मालिका बघणे मात्र कधीच जमले नाही. अ‍ॅमेझॉन्/नेट्फ्लिक्स/हॉट स्टार वगैरे फार थोडा काळ वापरले,पण त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत आणि ते सतत वाढत गेल्याने हळुहळु बंद केले. मात्र वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यापासुन दोन मीटिंगच्या मध्ये किवा ईतर वेळी करमणुक म्हणुन चकटफु तुनळीवरचे कार्यक्रम बघता बघता अनेक चॅनल सबस्क्राईब करत गेलो आणि काही चॅनलवरचे आशय खरोखरच आवडु लागले. असे काही चॅनल्स खाली देत आहे. मिपाकरांनी त्यात भर घालावी ही सर्वांना विनंती

न्युज
वि ऑन

वैचारिक
थिंक बँक
बोलभिडु

भटकंती
रानवाटा
मुक्ता नार्वेकर
झुंजारमाची

पाककृती
वाह रे वाह
मधुरा किचन

तबला
तेज सिंग

शेअर्स
लेट्स क्रिएट वेल्थ

याशिवाय काही कामाचे टेक्निकल चॅनल्स, दुरदर्शनचे जुने कार्यक्रम (भारत एक खोज, गजरा, जुन्या मुलाखती,सुरभि वगैरे), गाण्याचे चॅनल्स, बागकामाबद्दल्चे चॅनल्स, स्टोरी टेलिंगचे चॅनल्स, वैद्यकिय ज्ञान देणारे चॅनल्स एक ना दोन.

तर असेच चांगले आणि आपापले आवडते चॅनल्स मिपाकरांनी इथे या धाग्यावर शेअर करावेत अशी विनंती करुन ईथेच थांबतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

29 Dec 2022 - 5:27 pm | वामन देशमुख

तेलुस्को (मराठी: जाणून घ्या) ही वाहिनी सॉफ्टवेअर टेकनॉलॉजीज् प्राथमिक स्तरावर शिकण्यासाठी उपयुक्त आहे.

तिथला, अजाइल् ची तोंडओळख करून देणारा हा विडिओ, उत्सुकांना कदाचित आवडेल.

---
अवांतरः विडिओ या माध्यमात मला फारसा रस नाही म्हणून मी या धाग्यात फार काही भर घालू शकणार नाही.

शानबा५१२'s picture

29 Dec 2022 - 10:23 pm | शानबा५१२

या श्रेणीत याहु बाबा https://www.youtube.com/@YahooBaba व ड्ब्ल्युएस क्युब https://www.youtube.com/@wscubetech ला कोणीच तोड नाही. हे जुने खिलाडी आहेत, मला आठवत हा त्यांच्या मानाने हा खुप नविन युट्युबर आहे.

कंजूस's picture

29 Dec 2022 - 7:58 pm | कंजूस

पाककला, भटकंती , बागकामांचे चालेल सारखे बदलावे लागतात. महिन्यातून एखादा विडिओ टाकणारे बरे.
रिपेरिंगसाठी zero lab

शानबा५१२'s picture

29 Dec 2022 - 10:17 pm | शानबा५१२

असा धागा काठल्याबद्दल धन्यवाद. माझी कितीतरी जास्त युट्युब चॅनल्स आवडती आहेत. त्यातली काही खुप आवडती व युनिक चॅनल्स शेअर करतो सहाजिक आहे कोणालाही आवडतील अशी आहेत.

न्युज : विओन
कॉमेडी ; सोनी मराठी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' आणि 'हींदी काउंटडाउन' फार ईंटरेस्टींग वाटते.
पाककृती : 'गोलगप्पा गर्ल' ' माय रुरल लाईफ' (https://www.youtube.com/@Myrurallife) मराठी पाकृसाठी सोप्पे व हटके (https://www.youtube.com/@Maharashtrian_Recipes_Latika)
भटकंती : क्रेझी अबाउट फीशींग अँड कुकींग,
ईंग्लिश पिक्चरचे हींदी मध्ये एक्सप्लेनेशन : व्हायपर एक्सप्लेन्ड.https://www.youtube.com/@ViperExplained हाहाहाह्हाह्हा ह्याचे जुने चकी टॉय स्टोरीचे व्हीडीओ धमाल आहेत.

हे चॅनल कुठल्या यादीत येईल माहीती नाही पण त्या एकट्या, छोट्याश्या बाईचे शेति करणे, पिक काढणे व ते नंतर मार्केट मध्ये जाउन विकणे, अगदी पुर्ण माल विकला जाईपर्यंत व्हीडीओ बनवने नंतर घरी येउन सर्व पाळिव प्राण्यांना आलेल्या पैशातुन खायला घालणे. आणि हे सर्व एकटेच राहुन करणे. त्या व्यक्तीचे दीसणे व एकुण पर्सनालीटी फार मजेशीर आहे.https://www.youtube.com/@AnhBushcraf मी हल्लीच हे चॅनल बघणे सुरु केले आहे पण मला हे फार आवडते.

अशी खुप चॅनल्स आहेत वेळ असेल तेव्हा लिहेन.
ईतरांनी ही अशी माहीती नसलेली चॅनल्स कळवावी, मलाही काही नविन कळतील, मस्त धागा आहे.

तुषार काळभोर's picture

29 Dec 2022 - 11:44 pm | तुषार काळभोर

मी सबस्क्राइब नाहीi करत. पण एखादा चॅनल रोचक वाटल्यास जनहितार्थ इथे शेअर करण्यात येईल :)

'स्मृतिगंध' वाहिनीवर संगीतविषयक अत्युत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी 'साज-तरंग' या शीर्षकाखाली विविध वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या वादकांच्या मुलाखती असून त्यात त्या त्या वाद्याविषयी साग्रसंगीत माहिती, त्या वादकाचे अनुभव कथन आणि वादन वगैरे खूपच सुंदर रितीने संगीतकार मिथिलेश पाटणकर सादर करत असतात. सध्या यावर असे ४२ विडियो उपलब्ध असल्याचे दिसते.

Playlist: Saaz Tarang (42 videos 27,223 views Last updated on Aug 2, 2022)
https://www.youtube.com/playlist?list=PLP86fkuqWUc1SRAPo2c5jMSJcBber0xaS

.

Chanel : SmrutiGandha @SmrutiGandhaMarathi. (67.8K subscribers)
https://www.youtube.com/@SmrutiGandhaMarathi

.
--------------------------
याखेरीज आणखी पुष्कळ वाहिन्या मी सब्स्क्राईबलेल्या आहेत त्याबद्दल लिहीनच.
हा खूपच उपयुक्त धागा काढल्याबद्दल राजेन्द्र मेहेंदळे यांचे अनेक आभार.

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Dec 2022 - 5:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

स्मृतिगंध आणि साजतरंग माझीही लाडकी आहेत. विशेषतः चर्मवाद्यवाले एपिसोड्स. म्हणजे तबला,ढोलक्,लोकतालवाद्य वगैरे
आणि मिथिलेशचे सादरीकरणही मस्तच.

कर्नलतपस्वी's picture

31 Dec 2022 - 6:34 pm | कर्नलतपस्वी

आजच शांताबाई शेळके याच्यावर श्रीधर फडके व डाॅक्टर समीरा गजरे जोशी यांचा कार्यक्रम ऐकला.

सुंदर कार्यक्रम आहे.

नेमका एक असा तुनळी कार्यक्रम नाही पण दिसतील ते टिकलत असतो.

मनिश उमराणी यांचा कवी ग्रेस याच्या "ती गेली तेंव्हा" रसग्रहण तुनळीवर आहे खुप आवडले.

प्रतिभा व प्रतिमा हा पण कार्यक्रम रविवारी असायचा व दर्जेदार असायचा असे तेव्हा ऐकलेले. पण अभ्यास, परीक्षा कॉलेजच्या या चक्रामुळे बघणे जमले नाही म्हणून नेहमीच खंत वाटायची आता काही जुने कार्यक्रम दिसले की बघतच असते, त्यांबद्दल आणखी माहीती कळल्यामुळे धन्यवाद.

प्रतिभा व प्रतिमा हा पण कार्यक्रम रविवारी असायचा व दर्जेदार असायचा असे तेव्हा ऐकलेले. पण अभ्यास, परीक्षा कॉलेजच्या या चक्रामुळे बघणे जमले नाही म्हणून नेहमीच खंत वाटायची आता काही जुने कार्यक्रम दिसले की बघतच असते, त्यांबद्दल आणखी माहीती कळल्यामुळे धन्यवाद.

वरच्याच प्रतिक्रियेत समीरा गजरे जोशी हे नांव चुकीचे आहे असे वाटते ते समीरा गुर्जर जोशी असे आहे.त्या अंदाजे १९७९-८० पासून ते आतापर्यंत २०२२ पर्यंत अजूनही सह्याद्री वाहिनीवर मुलाखती घेत असतात.

आंद्रे वडापाव's picture

2 Jan 2023 - 4:06 pm | आंद्रे वडापाव

"द प्रिंट" हे आवडते आणि एकमात्र चॅनेल मला सजेस्ट करावेसे वाटते ...

https://www.youtube.com/@ThePrintIndia

तर्कवादी's picture

13 Jan 2023 - 4:26 pm | तर्कवादी

ध्रुव राठी : https://www.youtube.com/@dhruvrathee
विग्यान टिव्ही https://www.youtube.com/@VigyanTvIndia
झेम टीव्ही https://www.youtube.com/@ZemTV.Official

शानबा५१२'s picture

14 Jan 2023 - 4:38 am | शानबा५१२

प्रितिसाद देण्यास दाखवला जाणारा निरुत्साह बिल्कुल पचला नाही!