अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं.
एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते.
हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्ध शरीरसुख देत जगत असते.अमूचे ते हाल पाहून मनावर ओरखडे उठतात..
अमुची सुटका होईल का असाच जन्म जाणार याचा विचार जाणारं.अमू नवर्यावर विरोधात तक्रार करायला जाते पण अस्तिनचा साप तिचा नवरा हेही होऊ देत नाही..
अमु कशी सुटणार तर त्यासाठी ईश्वरी किरणासारखा तो येतो प्रभू! एक अट्टल गुन्हेगार पण बहिणीच्या मायेसाठी तडपणारा काहीसा मायाळूही.अमूचा नवरा त्याला फार त्रास देत असतो.पण चक्र अशी फिरतात की प्रभू आणि अमू तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्यासाठी एक योजना आखतात.अमू यात यशस्वी होते का? नक्कीच होते.
धगधगत्या ज्वाळेत असणार्या अमूच्या दु:खाला प्रभू फुंकर देतो एक पेटलेल्या वणव्यात अमूचा नवर्याला कर्माची फळं भोगावी लागतात.या योजनेतील उतार चढाव कधी या पारड्यात तर कधी या पारड्यात दाखवताना कथा, कलाकार , दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.
अमू नक्कीच कोणाचीतरी रोल मॉडेल होऊ शकते, सिनेमा मनोरंजनासाठी असतात.पण समाजातल्या कित्येक चुकीच्या, सहनशीलतेचा अंत पाहणारा गोष्टींना तोडण्याचे बळ दाखवणं कौतुकास्पद आहे.
-भक्ती
प्रतिक्रिया
4 Nov 2022 - 2:30 pm | वामन देशमुख
परीक्षण वाचून कदाचित सिनेमा पाहण्याची प्रेरणा मिळेल.
कोणत्या OTT वर आहे?
मी शोधलं तर https://en.wikipedia.org/wiki/Amu_(film) हा सिनेमा दिसला. पण सदर धाग्यातील सिनेमा वेगळा दिसतो.
4 Nov 2022 - 2:46 pm | प्रचेतस
प्राईमव्हिडिओवर आहे असे दिसते.
4 Nov 2022 - 3:06 pm | Bhakti
फोटो द्यायचा राहिला.प्राईमवर आहे.
ऐश्वर्यालक्ष्मी नायिकेने अप्रतिम काम केले आहे.
प्रभूची एन्ट्री होईपर्यंत चित्रपट अतिच संवेदनशील आहे याची नोंद घ्यावी :(
5 Nov 2022 - 2:23 pm | कर्नलतपस्वी
बघतो अन मग लिहीतो.
5 Nov 2022 - 2:23 pm | कर्नलतपस्वी
बघतो अन मग लिहीतो.