(पाऊस .....कळलांय का?)

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
3 May 2009 - 2:25 pm

प्रेरणा : उदय सप्रे यांची मोठी कविता

मुसळधार पावसामधे दारु पिऊन
चिखलात कधी लोळलांय का?
मद्याबरोबर चखणा म्हणुन
लसुण कधी तळलाय का?

वाटेवरच्या मुलीची कधी छेड काढावी
असा किडा वळवळलाय का?
तिची छेड सोसवेना म्हणून
तिचा धिपाड्ड भाऊ खवळलांय का?

थरथरणार्‍या आवाजात ईंटरविव्यु मधे
अचानक धीर कधी गळलाय का?
भरभरुन उत्तरे दिली तरी ,त्यातून
नेमका तुमचाच अर्ज फेटाळलाय का?

दिवसभर अरबट चरबट खाउन
पोटात अचानक डुचमळलय का?
आणी तेव्हाच नेमके घरापसुन दुर
म्हणुन तुम्ही कळवळलाय का?

तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस
अकाली म्हातारपणाकडे करून वळलाय का?
' बालपण ते तारुण्य ' हा काळ
आयतं बसुन खाण्यात फुगलाय का?

ऐन पावसात छत्री घरी विसरुन
स्वत:लाच शिव्या देत कधी चाललाय का?
आणी त्यातच तुमच्या पांढर्‍या शर्टवर
गाड्यांनी चिखल उडवलाय का?

रस्त्यांच्या कडेची उघडी खळखळती गटारे
मनाचे बांध फोडून कधी त्यात डुंबलाय का?
समोरच्यानं उठुन श्रीमुखात भडकवावी
ईतके तुम्ही कधी बरळलाय का?

प्रत्येक दिवस एक नवा अनुभव देतो
एखाद्या अनुभवाने कधी चळलाय का?
आपल्याच अंतरात असतो एक गाढव
उमजुन कधी गाढवपणा केलाय का?

'पुन्हा म्हणून मुर्खपणा करणार नाही 'हा शब्द
स्वतःच्याच मनाशी तरी पाळलाय का?
माणुस हणजे शेम नसून प्रेम म्हणजे माणुस
अनुभव आल्यावर तरी अर्थ हा कळलाय का?

आपला,
मराठमोळा

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अनंता's picture

3 May 2009 - 6:02 pm | अनंता

=))

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

सागर's picture

4 May 2009 - 11:46 am | सागर

=)) =)) =))

हात जोडले मालक...
मेंदू खूपच सुपीक आहे महोदय आपला :)

उदय सप्रे's picture

4 May 2009 - 11:51 am | उदय सप्रे

लय भारी राव !

आपल्याला म्हणूनच मिपा आवडते ! एक्दम फाकडू कल्पना असतात इथे आपल्या मिपा कर मित्र-मैत्रिणींच्या !

मान गये उस्ताद ! वाहवा !

मराठमोळा's picture

4 May 2009 - 11:56 am | मराठमोळा

विडंबन हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अवलिया's picture

4 May 2009 - 11:53 am | अवलिया

हा हा हा
मस्तच !!
जय हो !!

--अवलिया

पाषाणभेद's picture

4 May 2009 - 1:32 pm | पाषाणभेद

मस्त झाले विडंबन
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

अश्विनि३३७९'s picture

4 May 2009 - 3:28 pm | अश्विनि३३७९

मस्तच !!