जगणे

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
1 Nov 2022 - 9:33 pm

आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही
मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही.

जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा
सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही.

करार मदार सजावट कागदावरची
जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही.

होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे
पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही

हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी
नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही.

----- अभय बापट
३१/१०/२०२२

जीवनकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2022 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना. सर्वच ओळी क्लास.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सागरसाथी's picture

2 Nov 2022 - 8:23 pm | सागरसाथी

धन्यवाद

सागरसाथी's picture

2 Nov 2022 - 8:23 pm | सागरसाथी

धन्यवाद

सागरसाथी's picture

2 Nov 2022 - 8:25 pm | सागरसाथी

धन्यवाद

Bhakti's picture

2 Nov 2022 - 11:09 am | Bhakti

करार मदार सजावट कागदावरची
जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही

कर्नलतपस्वी's picture

2 Nov 2022 - 2:19 pm | कर्नलतपस्वी

छानच लिहिलयं.
संदीप खरे यांची 'नामंजूर' कवीता आठवली.