आताच माझी Exam झाली त्यावेळी सुचलेली कविता
Exam म्हणजे Exam असते
तुमची आमची अगदी सेम असते
अखेरच्या क्षणापर्य॑त रट रट रटायच असत॑
कितीही अभ्यास केला तरी tension येतच असत॑
शेवटच्या दिवसापर्य॑त Notes शोधायच्या असतात
Notes मिळल्या तरी सगळ्या वाचायच्या नसतात
Exam जवळ आली की देव देव करायच॑ असत॑
म॑दिरात जाऊन रोज एक नारळ फोडायच॑ असत॑
Exam म्हणजे Exam असते
तुमची आमची अगदी सेम असते
पेपर हातात पडला की आधी सगळ॑ वाचायच॑ असत॑
काय काय येत नाही ते बाजुला काढायच॑ असत॑
शेजारचा काय सोडवतो ते टापायच॑ असत॑
दिसलच काही तर सरळ छापायच॑ असत॑
Result लागेपर्य॑त enjoy करायच॑ असत॑
कारण त्यात काय येनार हे आधीच माहीती असत॑
Exam म्हणजे Exam असते
तुमची आमची अगदी सेम असते
- स्वप्नील
प्रतिक्रिया
1 May 2009 - 10:40 pm | टारझन
ऐवजी
हे कसं वाटतं बघा ?
(प्रतिक्रिया घाटावरचे भटाला समर्पित ;) )
1 May 2009 - 11:21 pm | घाटावरचे भट
हाहाहा...आवडेश...अगदी सेमच असतंय बघा ते...
2 May 2009 - 12:08 am | मराठमोळा
तुम्ही १००% ईंजीनीअर आहात.. आणी ते पण बॅकबेंचर (आमच्यासारखेच)
ही तर ईंजीनअरिंगची कहाणी.. :)
आवडली कविता..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
2 May 2009 - 9:50 am | स्वप्निल मन
बरोबर ओळखलत
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
2 May 2009 - 5:39 pm | दवबिन्दु
सपनीलदादा exam विसरा आता फकस्त Njoy मारायचा
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
2 May 2009 - 5:52 pm | नितिन थत्ते
पेपर हातात पडला की आधी सगळ॑ वाचायच॑ असत॑
काय काय येत नाही ते बाजुला काढायच॑ असत॑
लै भारी. आमचा सगळा पेपरच बाजूला व्हायचा.
आमचा परीक्षेपूर्वीचा अभ्यास म्हणजे.
३०% पोर्शन : हे यंदा विचारणार नाहीत कारण मागच्याच वर्षी विचारले होते.
३०% पोर्शनः हे पहायची गरज नाही. हे कधीच विचारत नाहीत.
३० % पोर्शनः हे वाचायची गरज नाही. हे आपल्याला येतंय.
१०% पोर्शनः याचा अभ्यास करायचा.
परीक्षेत पेपर पाहिला की आमचे डोळे पांढरे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
2 May 2009 - 8:44 pm | स्वप्निल मन
आमचही काही वेगळ॑ नाही यापेक्षा
स्वप्निल मन
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.