टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
12 Aug 2022 - 12:06 pm

"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!

पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!

असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात. पण जर का डायरेक्ट प्लेटमधल्या पोह्यांवरच लिंबू हलका जरी पिळला तरी पहिल्याच प्रयत्नांत हटकून सर्वच्या सर्व बिया पोह्यांमध्ये पडतात! नुसत्या पडत नाहीत तर पोह्यांमध्ये आतमध्ये लपून दडून बसतात.चमच्याने शोध शोध केल्यावरही प्लेटमधील पोह्यांत त्या सापडत नाहीत आणि बरोबर पोहे खायला सुरुवात केली रे केली की पहिल्याच घासाला चमच्यामधून बेमालूमपणे घासात येतात आणि जिभेला कडवट करतात!

हेच थोड्याफार फरकाने लिंबू सरबत बनवताना अनुभवास येते. सरबतातील पेल्यातून बियांना काढायला गेले की बिया चमच्याशी खो खो आणि कबड्डी खेळतात करतात आणि चमचात येत नाहीत.

यावर अद्भुत वैज्ञानिक उपाय असा होऊ शकतो की, आपण एखाद्या ठिकाणी जमिनीवर पसरलेले किसलेले लोखंड (चुरा) किंवा बारीक खिळे जसे लोहचुंबकाद्वारे (म्हणजे सोप्या मराठीत "मॅग्नेट") ओढून घेतो तसे एखादे लिंबीचुंबक (लिंबी = लिंबाची बी) असले पाहिजे जेणेकरून ते कापलेल्या लिंबासमोर, पोह्यांसमोर किंवा सरबताच्या पेल्यासमोर धरले की बिया आपोआप ओढल्या जाऊन त्याला चिकटतील.

बाय द वे, एखाद्या गाळणीतून लिंबू पिळावा असा वास्तववादी एक उपायसुद्धा यावर आहे म्हणतात.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Aug 2022 - 1:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

असला प्रश्ण आम्हाला प्यांटीत पाय घालताना सुध्दा पडतो, म्हणजे आधी उजवा पाय घालावा की आधी डावा? एकदा तर आम्ही उडी मारुन दोन्ही पाय एकदम घालायचा प्रयत्न केला होता पण दुर्देवाने प्यांट फाटली आणि पुढचा एक दात अर्धा पडला.

लिंबु मातीत पुरुन ठेवा व रोज त्याला पाणी घालत रहा, सात आठ दिवसात बियांची रोपे तरारुन वर येतिल, ती खुडून टाका व नंतर लिंबु मातीतुन अलगद बाहेर काढा आणि मग पोह्यांवर पिळा, एक जरी बी पोह्यात पडली तर नाव बदलेन.

तुमच्या समस्येवर अजून एक उपाय आहे, किंवा मग लिंबु सरळ खलात टाकून बत्त्याने चांगले ठेचुन काढा, एक पण बी शिल्लक रहायला नको असे वस्त्रगाळ ठेचा अन मग पोह्यांवर टाका,

अजून एक बिया तोंडात आल्या तर त्या तशाच न चावता गिळून टाका, गिळताना मोजायला विसरु नका. दुसर्‍या दिवशी सगळ्या बिया पडून गेल्या आहेत ना याची मोजुन खात्री करुन घ्या.

पैजारबुवा,

नि३सोलपुरकर's picture

12 Aug 2022 - 1:50 pm | नि३सोलपुरकर

हा..हा ,पैजारबुवा _/\_ ,तुस्सी ग्रेट हो .

जाता जाता असे दिसुन येते की, वरील प्रतिसादातून धागा लेखकासाठी पुढील धागा विषयाची बेगमी करुन दिली. ( ह. घ्या)

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 1:59 pm | रंगीला रतन

:=)

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2022 - 2:08 pm | कानडाऊ योगेशु

तुमच्या समस्येवर अजून एक उपाय आहे, किंवा मग लिंबु सरळ खलात टाकून बत्त्याने चांगले ठेचुन काढा, एक पण बी शिल्लक रहायला नको असे वस्त्रगाळ ठेचा अन मग पोह्यांवर टाका,

मग ते कांदेपोहे न राहता वांदेपोहे होतील. :)

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2022 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले

दुसर्‍या दिवशी सगळ्या बिया पडून गेल्या

हा प्रयोग भेंडीच्या भाजीबाबत करुन पाहिलेला आहे , मोजायच्या भानगडीत पडलो नाही पण बहुतेक हिशोब चुकला नसावा. ;)
बाकी तेंव्हा आरतीप्रभुंच्या "समईच्या शुभ्रकळ्या" ह्या कवितेचे बिडंबन सुचले होते -

"भेंडीच्या शुभ्र बिया डोकाऊन बघते
आवड्ते भेंडी जरी, पण अता कुठे पचते"

=))))

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2022 - 3:39 pm | कानडाऊ योगेशु

तुमच्या समस्येवर अजून एक उपाय आहे, किंवा मग लिंबु सरळ खलात टाकून बत्त्याने चांगले ठेचुन काढा, एक पण बी शिल्लक रहायला नको असे वस्त्रगाळ ठेचा अन मग पोह्यांवर टाका,

त्याने कांदेपोहे चे वांदेपोहे होतील हो!

नगरी's picture

13 Aug 2022 - 11:58 am | नगरी

प्यांटीत पाय की पायात प्यांट

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2022 - 1:05 pm | कानडाऊ योगेशु

मी सरळ ते लिंबु पिळायचे उपकरण वापरतो.बिया आतच राहतात आणि लिंबु पाहिजे तितके पिळता येते.

सोत्रि's picture

12 Aug 2022 - 2:04 pm | सोत्रि

--

- (पैजारबुवांचे सल्ले आवडलेला) सोकाजी

सोत्रि's picture

12 Aug 2022 - 2:04 pm | सोत्रि

--

- (पैजारबुवांचे सल्ले आवडलेला) सोकाजी

लिंबीचुंबक चे पेटम्ट रजिस्टर करुया.
असाच अनुभव अंडे फोडल्यावर भांड्यात जर अंड्याच्या टर्फलाचा तुकडा पडला तर होतो.
अंटचुंबक पण शोधून काढायला हवा.
आंघोळीच्या साबणाचा शेवटचा तुकडा हातातून निसटतो तो नेमका खाली पडतो आणि उचलता येत नाही.
सातुचुंबक पण शोधायला हवा.
( एक शंका : तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी सांगेल का? )

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Aug 2022 - 3:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी सांगेल का?

भलतेच बुवा आशावादी तुम्ही,

पैजारबुवा,

एक शंका : तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी सांगेल का?

कश्शाला ? बायको हरवली ही इष्टापत्ती समजून त्यापुढे ठेविले अनंते तैसेची रहावे :)

तुळशीबागेतून परत येतात. कुठे होते ध्यान म्हणून पडलेल्या शिव्या प्लस रिक्शाचा भुरदंड पडतो.
कायमस्वरुपी हरवण्यासाठी कुठे जावे?
.
;)

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2022 - 7:03 pm | धर्मराजमुटके

आम्हाला एवढी अक्कल असती तर लग्न केले असते काय ?
आता अडचणीत आणणारे प्रश्न विचारु नका बुवा :)

नगरी's picture

13 Aug 2022 - 12:01 pm | नगरी

शोधू नका, सुखी व्हाल, बादवे घरी येईलच की

अमर विश्वास's picture

12 Aug 2022 - 3:42 pm | अमर विश्वास

एका टपरी वर पाहिलेला उपाय .... लिंबू पंक्चर करायचं .. म्हणजे जाड दाभणासारख्या हत्याराने डेखापाशी भोक पडायचं आणि लिंबू पिळायच

घरी ट्राय केलंय ... जास्त ताकद लागते पिळायला .. पण जमतय

बॅ अमर विश्वास कथेतले सरकारी वकील त्यांच्या चेहेर्‍यासकट समोर उभे राहिले

पण मी काय म्हणतो, एवढी उठाठेव कशाला करायची पोहे खाण्यासाठी?

त्यापेक्षा पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोहे खाल्लेले चालणार नाहीत का?

विजुभाऊ's picture

12 Aug 2022 - 6:28 pm | विजुभाऊ

त्यापेक्षा पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोहे खाल्लेले चालणार नाहीत का?

माझा मुलगा अजून त्या वयाचा नाहिय्ये. त्यामुळे मला कांदेपोह्याच्या कार्यक्रमात जायचे असेल तर मध्यस्थ म्हणूनच जावे लागेल.
मध्यस्थाला तेवढे एकच काम उरते त्या कार्यक्रमात

वामन देशमुख's picture

12 Aug 2022 - 4:08 pm | वामन देशमुख

बाकी, पैजारबुवांचे उपाय आणि विजुभाऊंची एक शंका यांबद्धल गांभीर्याने विचार करावा लागेल!

सगळ्यात वास्तववादी उपाय अगदी सोपा आहे. लिंबू पिळलेली पोह्यांची पहिली प्लेट स्वतः सोडून दुसर्‍या कोणाला तरी द्यायची. आपण नंतरच्या प्लेट मधे लिंबू पिळून घ्यायचे :)

विजुभाऊ's picture

12 Aug 2022 - 9:17 pm | विजुभाऊ

हे एकदम पटणेबल आहे

उगा काहितरीच's picture

12 Aug 2022 - 6:43 pm | उगा काहितरीच

१. लिंबाच्या ऐवजी दही खा.
२. लिंबू मधोमध न कापता रेस्टॉरंट मध्ये जसे लिंबू कापतात तसे कापा.
३. लिंबू पिळन्यासाठी एक उपकरण मिळते ते वापरा.
४. लिंबू मिक्सरमध्ये बारीक करून मग वापरा.
५. पोहे व लिंबू मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून खा.
६. एक रिकामे इंजेक्शन विकत आणा, लिंबू सगळीकडून दाबून घ्या मग त्यात सुई खुपसून सगळा रस शोषून घ्या व पोह्यांवर फवारा.
७. जवळच्या कृषी विद्यापीठात प्रवेश घ्या आणि बिन बियांच्या लिंबावर संशोधन करा.
८. आधी वाटीत लिंबू पिळून घ्या, आणि पोह्याच्या आधी/नंतर रस पिऊन टाका. बिया गिळa वा थुका वा चाऊन खा.
९. छोटं लिंबू स्वच्छ धुऊन घ्या, आणि पोह्याचा आधी / नंतर गिळून टाका.
१०. बिन बियांच लिंबाचं लोणचं खा.

(ह घ्या ! बाकी लेख छान झाला आहे. हे वे सां न ल)

कंजूस's picture

12 Aug 2022 - 7:30 pm | कंजूस

आवडले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Aug 2022 - 9:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक हटके उपाय--उजवा पंजा बोटे जुळलेली ठेवुन पोह्यांवर धरा आणि डाव्या हाताने त्यावर लिंबु पिळा, बिया अडकतील आणि रस खाली गळेल
अजुन एक- चमचा तिरका करुन लिंबाची फोड चमच्यावर दाबा/पिळा म्हणजे फक्त रस सांडेल

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2022 - 9:32 pm | कर्नलतपस्वी

धा. ले.- प्रथम पुरस्कार एक धारी लिंबू .

सर्व प्र. ले.-ईडलिंबू

माऊली-म्यान ऑफ द म्याच, इशेश पुरस्कार एक Bitter bottle and onion pickle.&#128512
&#128521.

गामा पैलवान's picture

12 Aug 2022 - 11:03 pm | गामा पैलवान

निमिष सोनार,

इथे इंग्लंडात ऐकलेला उपाय असा की लिंबू ( फ्रीझरमध्ये ) गोठवा. मग बाहेर काढून लगेच किसून घ्या. मस्त चुरा निघतो. तो पोह्यांवर शिंपडा. लिंबू किसतांना बिया आपोआप दूर जाऊन पडतात. फक्त एक अडचण अशी की लिंबाच्या सालीचाही भुगा होतो. तो जरा कडवट लागतो. पण एकदा सवय झाली की ठीक लागतो.

आ.न.,
-गा.पै.

विजुभाऊ's picture

12 Aug 2022 - 11:08 pm | विजुभाऊ

लिंबाचा किस .... मराठीत की इंग्रजीत?

गामा पैलवान's picture

12 Aug 2022 - 11:12 pm | गामा पैलवान

विजुभाऊ,

कीस हो तो. किस नाही. मुद्दामून नाम वापरलं नाही. सर्वत्र क्रियापद वापरलंय. :-)

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

12 Aug 2022 - 11:47 pm | सुक्या

लई कीस पाडता बॉ तुम्ही . .

आमच्या किसला पण काही सुचल तर नक्की सांगा.

(खास पैजारबुवांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत)

नगरी's picture

13 Aug 2022 - 12:05 pm | नगरी

हसून हसून पोट दुखले

नगरी's picture

13 Aug 2022 - 12:07 pm | नगरी

हॉटेलात (परमिट) कापतात तसे लिंबू उभे कापायचे

गामा पैलवान's picture

13 Aug 2022 - 12:23 pm | गामा पैलवान

सांभाळून हां. उभं लिंबू कापल्यास जादूटोणाविरोधक यायचे अंगावर धावून.
-गा.पै.

मित्रहो's picture

15 Aug 2022 - 3:45 pm | मित्रहो

मस्त आहे खूप हसलो
समस्या अगदी महत्वाची आहे. पोह्यात ती बी कुठे निघून जाते ते दातात अडकून कडू लागल्याशिवाय कळत नाही. या समस्येवर काहीतरी ठोस उपाय हवा. मी ते लिबू पिळायचे यंत्र वापरतो परंतु अशी पिळवणूक करणारी यंत्र नको काहीतरी साधे सोपे हवे.

निमिष सोनार's picture

17 Aug 2022 - 7:08 pm | निमिष सोनार

लेख आवडल्याबद्दल धन्यवाद