गोष्टी - गोष्टीचा व्यवहार,
जागोजागी चालतो बाजार !
देणे-घेणे सॄष्टीचा नियम,
फळासाठीही ,लागतो संयम!
पाहण्यासाठी लागते नजर,
प्रश्नालाही लागते उत्तर !
दाम मिळाले तरच काम,
आळसासाठी ही ,लागते बेकाम !
देता ओलावा फुटेल अंकुर,
अंधार मिळताच, चांदणे टिपूर !
घेण्यासाठी द्यावा लागतो श्वास,
अन्यथा मिळतो, यमपुरी वास !
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 4:17 pm | अनंता
जागु, तुमच्या कविता नेहमीप्रमाणे वर्तमानात राहायला शिकवतात.
छान आशय!
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
30 Apr 2009 - 5:44 pm | अनामिक
देता ओलावा फुटेल अंकुर,
अंधार मिळताच, चांदणे टिपूर !
मस्तं कविता, वरच्या ओळी विशेष आवडल्या.
-अनामिक
30 Apr 2009 - 7:46 pm | क्रान्ति
देता ओलावा फुटेल अंकुर,
अंधार मिळताच, चांदणे टिपूर !
मलाही याच दोन ओळी जास्त आवडल्या. कविता नेहमीप्रमाणेच मस्तच!
:) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 7:53 pm | प्राजु
देता ओलावा फुटेल अंकुर,
अंधार मिळताच, चांदणे टिपूर !
ही ओळ जास्ती आवडली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 10:46 pm | चन्द्रशेखर गोखले
व्यवहारी जगाच वास्तव नेमक्या शब्दात मांडलं आहे . कविता आवडली.
30 Apr 2009 - 11:42 pm | बेसनलाडू
विशेष!
(व्यवहारी)बेसनलाडू
1 May 2009 - 12:56 pm | उमेश__
सुंदर कविता..
5 May 2009 - 11:29 am | जागु
अनंता, अनामिक, क्रांती, प्राजू,गोखले, बेसनलाडू, उमेश तुमचे खुप खुप धन्यवाद.
४ दिवस नसल्यामुळे आभार मानायचे राहून गेले. परत एकदा धन्यवाद.
5 May 2009 - 5:01 pm | मदनबाण
जागु ताई कविता फार आवडली. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.