गाभा:
नमस्कार
मला माझ्या मुलींसाठी BBA जनरल साठी पुण्यात प्रवेश घावयाचा आहे . आम्ही आता प्रयन्त MIT WPU , नेस वाडिया , BMCC PUNE , श्री बालाजी युनिव्हर्सिटी , भारती विद्यापीठ
साठी फॉर्म भरले आहेत आणि सर्व कॉलेज मध्ये ऍडमिशन सुध्या केल्ले आहे . पण आत एक फायनल करावयाचे आहे
आम्ही BMCC PUNE, MIT WPU आणि श्री बालाजी असे तीन पर्याय निवडलेले आहेत त्या पैकी BMCC फायनल करावयाचा विचार आहे . आणि तीन वर्ष CAT ची तयारी कारवायचा विचार चालू आहे . त्या मुळे BMCC हे कॉलेज कसे राहील शिक्षण दर्जा आणि कॉलेज वातावरण कसे आहे याच मार्गदर्शन पाहिजे .
धन्यवाद . ( कृपया मराठी टायपिंग साठी सॉरी )
प्रतिक्रिया
19 Jul 2022 - 5:26 pm | मुक्त विहारि
माझ्या मोठ्या मुलाने पुण्यातच इंजिनीयरिंग केले.
1. शक्यतो काॅलेज आणि रहाण्याचे ठिकाण, यांत फार अंतर नको.
2. BBA नंतर मास्टर्स करणार असेल तर, भारतात न करता France किंवा Germany हे उत्तम पर्याय ठरू शकतात. (मी माझ्या मुलासाठी Germany निवडले होते, पण Admission न मिळाल्याने तो बेत रहित केला.)
3. कुठलीही एक तरी परदेशी भाषा पुण्यात नक्कीच शिकता येईल. विशेषतः German. पुण्यातील Goethe Institute अतिशय उत्तम आहे. माझ्या मुलाने, पहिली लेव्हल, जर्मन भाषेची, पुण्यातूनच केली.
4. Campus Selection असलेले काॅलेज, हा पण चांगला मार्ग आहे.
तुमच्या मुलीच्या पुढच्या शैक्षणिक प्रगती साठी, मनापासून शुभेच्छा...
24 Jul 2022 - 3:09 pm | रानरेडा
मुविकाका
तुम्ही जर्मन कॉलेज बद्दल बरेच काही सांगत असता
पण आपली मुले MS ला जाणार होती आणि मला वाटते MBA साती हे आपल्या कन्ये साठी प्रयत्न करीत आहेत
तर पहिले म्हणजे जर्मन mba हे चांगले आहे का ?ते केले तर भारतीय मुलांना प्लेसमेंट काय मिळते ?भारतासारखी जर्मनी मधील ब्रँड / टॉप MBA कॉलेज आहेत का ? कोणती ?त्यांचे प्लेसमेंट कशी असते ? त्यात भारतीय मुलांना प्लेसमेंट काय मिळते ?
भारतातील पहिल्या २०-२५ कॉलेज च्या तुलनेत हि कोठे आहेत ? अगदी मी मुंबईतील NM किंवा पुण्याच्या Symbiosis च्या तुलनेत म्हणतोय
जर्मन MBA डिग्री ला भारतात काय व्हॅल्यू आहे ? अमेरिकेत ? त्यांना ब्रँड differential treatment मिळते का ? त्यांचा पगार किती असतो ? काही उदाहरणे ? आणि त्याचा ROI काय ??
आणि भारतात BBA केलेली जर्मनी मध्ये MBA ला कशी जाऊ शकेल ?? हे शक्य आहे का ?
24 Jul 2022 - 5:16 pm | मुक्त विहारि
पण, माझ्या माहितीत दोन मिपाकर अद्याप तरी जर्मनी मध्ये आहेत आणि ते तिथेच स्थाईक झालेले आहेत ... ते परत भारतात येण्याची शक्यता जवळ पास शून्य ....
माझ्या बायकोचा एक विद्यार्थी, MS करायला जर्मनीत गेला होता आणि तो पण MS नंतर जाॅब करत आहे ...
युरोपच्या गुहेत जाणार्याचे फक्त पायच दिसतात, परत येणार्याचे पाय दिसत नाहीत... इतपत, शीतावरून भाताची परीक्षा, करून बघायला हरकत नाही....
24 Jul 2022 - 6:08 pm | रानरेडा
विचारले काय सांगत काय आहेत ?
तुम्हाला MS आणि MBA वेगळ्या पोस्ट ग्रॅड डिग्री आहेत ते माहिती आहे का ?
भारतात BBA केलेला जर्मनी मध्ये ला कसा जाऊ शकेल ?
MBA चा जर्मनी चा प्लेसमेंट सिन काय आहे ? भारतीय विद्यार्थ्यांचा काय आहे ?
माहिती नसताना दिशाभूल करू नये
MS करायला जर्मनीत गेला होता आणि तो पण MS नंतर जाॅब करत आहे ... त्याची प्लेसमेंट कशी झाली ?
बाकी इतर कॅन्डिडेट्स च्या तुलनेत तो पगाराच्या कोणत्या ब्रॅकेट मध्ये आहे
हा एम एस म्हणून त्याला इंजिनिअर पेक्षा अधिक पगाराचा आणि ग्रेड चा जॉब आहे का ?
24 Jul 2022 - 7:02 pm | मुक्त विहारि
पास
24 Jul 2022 - 10:36 pm | रानरेडा
काका आधी MBA आणि MS / Mtech मधील फरक माहीत आहे का ?
बरे भारतात BBA केलेली जर्मनी मध्ये MBA ला कशी जाऊ शकेल ? या सध्या प्रष्णांचे उत्तर का नाही ?
जर्मनी मध्ये जे वाचले त्या प्रमाणे १२+४ वर्षांची डिग्री मास्टर्स साठी लागते आणि BBA १२ वि नंतर ३ वर्षांचा कोर्स आहे
कि मी चुकीचे सांगतोय - तर नीट माहितीची लिंक द्या
बाकी याबद्दल MBA कॉलेज बद्दल बाकी काही माहिती देत नाही देत
तर पहिले म्हणजे जर्मन mba हे चांगले आहे का ?ते केले तर भारतीय मुलांना प्लेसमेंट काय मिळते ?भारतासारखी जर्मनी मधील ब्रँड / टॉप MBA कॉलेज आहेत का ? कोणती ?त्यांचे प्लेसमेंट कशी असते ? त्यात भारतीय मुलांना प्लेसमेंट काय मिळते ?
भारतातील पहिल्या २०-२५ कॉलेज च्या तुलनेत हि कोठे आहेत ? अगदी मी मुंबईतील NM किंवा पुण्याच्या Symbiosis च्या तुलनेत म्हणतोय
जर्मन MBA डिग्री ला भारतात काय व्हॅल्यू आहे ? अमेरिकेत ? त्यांना ब्रँड differential treatment मिळते का ? त्यांचा पगार किती असतो ? काही उदाहरणे ? आणि त्याचा ROI काय ??
इतके प्रश्न विचारणारा पहिल्यादा कोणी भेटला का ? आणि करिअर बरोबर खेळ होतो तेंव्हा पालकांनी प्रश्न विचारू नये का ?
25 Jul 2022 - 5:48 am | चौकस२१२
क्षमा करा पण येथे जर्मनी मधील शिक्षणाचा काय संबंध हे कळले नाही मु वि ?
धागाकर्ते पुण्यातील महाविद्यालय बद्दल विचारत आहेत !
का माझ्या आकलनात काहीतरी चूक झाली !
25 Jul 2022 - 10:45 am | मुक्त विहारि
पुढे मास्टर्स केलेले कधीही उत्तम .....
आणि मास्टर्स करायचेच असेल तर, France किंवा Germany हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
आणि गुगलबाबा, तसे दाखवत पण आहे.
अनायसे मुलगी जर पुण्यात शिकत आहे तर साइड बाय साइड, गोथे इन्स्टीट्यूट मधून जर जर्मन भाषा शिकली तर, काय हरकत आहे?
ह्यात दोन फायदे होतात ....
1. BBA ची डिग्री घेता घेता, जर्मन भाषेच्या सहा लेव्हल पुर्ण होतात आणि जर्मन भाषा शिकवायला ती सुरूवात करू शकते किंवा ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकते.
2. MBA साठी जर्मनीत प्रवेश मिळाला तर, तिथे तिला भाषेची कुठलीच अडचण जाणवणार नाही.
(इंग्रजी व्यतिरिक्त अजून एक तरी परदेशी भाषा यायला हवी. माझा धाकटा मुलगा फ्रेंच भाषा शिकला आहे आणि मोठ्या मुलाचे जर्मन भाषेचे पहिल्या लेव्हल पर्यंत शिक्षण झाले आहे.भाषेचे शिक्षण वाया जात नाही, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.)
25 Jul 2022 - 6:16 pm | क्लिंटन
भारताला इतके कमी लेखू नका. भारतातही मॅनेजमेंटच्या उत्तम संस्था आहेत. विशेषतः जर्मनीत मॅनेजमेंट शिक्षण कसे आहे याविषयी साशंक आहे. म्हणजे जर्मनीत बी-स्कूल्स नाहीत असे नक्कीच नाही पण जगात रँकिंगचा प्रश्न येतो तेव्हा जर्मनीतील संस्था त्यात कमीच दिसतात. जर्मनी (आणि जपानसुध्दा) ऑन द जॉब ट्रेनिंगवर जास्त भर देतात असे दिसते आणि ते एका अर्थी योग्यही आहे. त्यातही जर्मनीतील आघाडीचे विद्यार्थी युरोपमधील इतर देशात अधिक चांगली बी-स्कूल्स आहेत तिथेच जातील ही शक्यता जास्त वाटते. त्यामुळे भारतातील चांगल्या संस्थांमध्ये भारतातील आघाडीचे आणि जर्मनीत तिकडचे अॅव्हरेज अशी बॅच असेल ही शक्यता जास्त. तेव्हा जर्मनीपेक्षा भारतातील संस्थाच अधिक उपयोगी शिक्षण देऊ शकेल ही शक्यता जास्त.
तुम्हाला फ्रेंच किंवा जर्मन भाषा येते म्हणून फ्रान्स किंवा जर्मनीतील बी-स्कूल्स प्रवेश देणार नाहीत तर एकूण प्रोफाईलवर प्रवेश देतात. इन्सिअॅड या जगातील पहिल्या ५ मध्ये असलेल्या फ्रान्समधील बी-स्कूलमध्ये इतर देशातील विद्यार्थ्यांपैकी किती जणांना फ्रेंच भाषा येत असेल? फार नाही. तसेही रँकिंगमध्ये असलेल्या सर्व बी-स्कूल्समध्ये इंग्लिशमध्येच शिक्षण असते- अगदी युरोपमधील बी-स्कूल्समध्येही. फ्रेंच किंवा जर्मन भाषा शिकू नये असे म्हणत नाही पण त्यापेक्षा एकूण प्रोफाईल बनविणे- चांगल्या कामाची इंटर्नशीप करणे, लाईव्ह प्रोजेक्ट्स वगैरे गोष्टी अधिक महत्वाच्या असतील.
25 Jul 2022 - 7:01 pm | मुक्त विहारि
ह्याचा अर्थ, भारतात MBA शिक्षण कमी दर्जाचे आहे, असा अर्थ नाही ..
तो तसा झाल्या असल्यास, क्षमस्व....
24 Jul 2022 - 5:19 pm | श्रीगुरुजी
CAT तयारीसाठी १ वर्ष पुरेसे आहे. ३ वर्षे खूपच जास्त आहेत.
24 Jul 2022 - 6:11 pm | रानरेडा
आपले दरवर्षी किती विद्यार्थी टॉप ४ IIM मध्ये गेलेत ?
बाकी टॉप २०=२५ बी स्कुल मध्ये ?
बरे हि मुलगी इंजिनिअरिंग ला जाणार नाही त्याचा थोडातरी सेटबॅक नसणार आहे का ?
24 Jul 2022 - 6:20 pm | श्रीगुरुजी
तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता. ज्यांच्यासाठी होता त्यांनी विचारल्यास त्यांना सांगेन. आपण विनाकारण स्कंधावर अनावश्यक भार घेऊन नासिकाग्राने उत्खनन करू नये. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे.
24 Jul 2022 - 6:47 pm | रानरेडा
कोणत्या अधिकारात आपण हे विधान करीत आहेत ?
आपले किती विद्यार्थी १ वर्ष अभ्यास करून टॉप ४ iim मध्ये गेले आहेत ?
बरे काकी टॉप २५ बि स्कुल मध्ये ? कोणत्या ?
बरे एक वर्षात मुंबई च्या MBA कॉलेज मध्ये जायच्या इंटरव्ह्यू ची तयारी कशी करता येईल ?
24 Jul 2022 - 7:04 pm | श्रीगुरुजी
कोणत्या अधिकारात आपण मला जाब विचारताहात? आपण कोण? आपल्याला स्पष्टीकरण देण्याची मला अजिबात आवश्यकता नाही व देऊन ते आपणास समजणारही नाही. तस्मात् वृथा स्कंधभार न घेता नासिकाग्रे उत्खनन करू नये.
24 Jul 2022 - 11:05 pm | रानरेडा
आपण ट्रेनिंग वगैरे देतो म्हणून इतक्या पण अधिकारवाणीने विधान करू नये कि प्रश्न विचारले कि उघडे पडाल
ट्रेनिंग देत आहात तर समोर विद्यार्थ्याचा वकूब न पहाता त्याबद्दल काहीही माहिती नसताना असला बेजबाबदार सल्ला का देता ?
परत विचारत आहे - उत्तर तर नाही आहे मला माहीत आहे पण
आपले किती विद्यार्थी १ वर्ष अभ्यास करून टॉप ४ iim मध्ये गेले आहेत ?
बरे काकी टॉप २५ बि स्कुल मध्ये ? कोणत्या ?
बरे एक वर्षात मुंबई च्या MBA कॉलेज मध्ये जायच्या इंटरव्ह्यू ची तयारी कशी करता येईल ?
आणि कोठल्या अधिकारात विचारत आहे - तुम्ही बेजबाबदार विधान केले म्हणून उघडे पडावे म्हणून विचारत आहे :))
24 Jul 2022 - 11:21 pm | श्रीगुरुजी
पास
24 Jul 2022 - 6:48 pm | रानरेडा
कोणत्या अधिकारात आपण हे विधान करीत आहेत ?
आपले किती विद्यार्थी १ वर्ष अभ्यास करून टॉप ४ iim मध्ये गेले आहेत ?
बरे काकी टॉप २५ बि स्कुल मध्ये ? कोणत्या ?
बरे एक वर्षात मुंबई च्या MBA कॉलेज मध्ये जायच्या इंटरव्ह्यू ची तयारी कशी करता येईल ?
25 Jul 2022 - 11:06 am | राजेंद्र मेहेंदळे
पण ईथे चोप्य पस्ते करुन प्रत्येक उत्तरात अनावश्यक पिंका टाकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे रसभंग झाला.
25 Jul 2022 - 1:01 pm | सुक्या
तेच. स्कोअर सेटल केला जातोय.
माहीती काहीच नाही पण अनावश्यक प्रश्न जास्त आहेत.
25 Jul 2022 - 2:07 pm | श्रीगुरुजी
यैथे नक्कीच माहिती देता आली असती.
परंतु क्वचितच कधीतरी दिसणारे एक धूमकेतूसारखे सदस्य अचानक उगवले आणि आपण सर्वज्ञ असल्याच्या थाटात अक्षरशः एखाद्या फौजदाराप्रमाणे जाब विचारायला सुरूवात केली. तुम्ही काय केलंय, तुमचा अनुभव काय, तुम्ही बेजबाबदार लिहिता अश्या आरोपांच्या आणि प्रश्नांच्या फैरीवर फैरीवर झाडायला सुरूवात केली. एकदा दुर्लक्ष करूनही पुन्हा कॉपी पेस्ट करून तेच. बर आम्ही सांगतोय ते जर चुकीचे आहे तर त्यात काय चुकलंय, बरोबर काय, योग्य काय, स्वत:चा अनुभव काय यावर अवाक्षर नाही. उलट रस्ता अडवून लायसन्स दाखवा, पीयूसी दाखवा, गाडीचे कागद दाखवा, तुमची गाडी चोरीची आहे, कोणाला ठोकून पळून आलात असले विचारायला लागल्यावर धाग्याचा सत्यानाशच होणार.
बरं आम्हाला जाब विचारणारे हे कोण/ कोणत्या अधिकारात हे आम्हाला जाब विचारतात? यांचा अनुभव किती, शिक्षण किती? एखाद्याला काही माहिती असती तर त्याने ती सांगितली असती. म्हणजे
आम्ही जर काही चुकीचे लिहिले असेल तर ते खोडलं गेलं असतं आणि आमच्याही माहितीत भर पडली असती.
पण यांना तर या विषपाची शून्य माहिती दिसते आणि सर्वज्ञाचा आव आणून इतरांना जाब विचारत बसलेत. असल्यांना मी फाट्यावर मारतो. पण आपल्याला फाट्यावर मारलं गेलंय याचंही यांना भान नाही. हा प्रकारच तिडीक आणणारा आहे. हा धागा काढल्याचा धागाकर्त्याला पश्चाताप होत असणार.
25 Jul 2022 - 6:33 pm | क्लिंटन
BMCC हे कॉलेज कसे आहे याविषयी कल्पना नाही त्यामुळे त्याविषयी लिहिता येणार नाही. पण कॅट परीक्षेसाठी तीन वर्षे तयारी करायची गरज नाही असे वाटते. आता इंग्लिशच्या सेक्शनमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर अधिक भर असतो तेव्हा कमीतकमी वेळात एखाद्या लेखात लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे समजावून घेण्याच्या तंत्रावर काम सुरू करता येईल. बहुतेक विद्यार्थी कॅट परीक्षेच्या एक वर्ष आधी तयारी सुरू करतात. तीन वर्ष तयारी आधी सुरू करून त्याचा फायदा होईल असे वाटत नाही. एखाद वेळेस प्रत्यक्ष परीक्षेपर्यंत दमछाक होईल आणि त्या जास्तीच्या तयारीचा परीक्षेत उपयोग होईल असेही नाही. तेव्हा २०२५ मध्ये कॅट द्यायची असेल तर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ पासून खर्या अर्थाने तयारी सुरू केली तरी चालू शकेल.
मी कॅटच्या अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी काही मदत लागली तर जरूर व्य.नि वर संपर्क करा. तरीही एक गोष्ट आता लिहितो. अनेकदा विद्यार्थी शेवटचे वर्षे झाल्यानंतर एक वर्षाचा ड्रॉप घेऊन पूर्ण वेळ कॅटची तयारी करतात. अशी गॅप पुढे इंटरव्ह्यूमध्ये वाईट दिसते. अशा गॅपमुळे टॉपच्या २५-३० बी-स्कूलमध्ये नक्कीच परीणाम होऊ शकतो तेव्हा टॉपच्या बी-स्कूल्ससाठी प्रयत्न चालू असतील तर गॅप असू नये.
25 Jul 2022 - 7:48 pm | श्रीगुरुजी
बहुतेक विद्यार्थी कॅट परीक्षेच्या एक वर्ष आधी तयारी सुरू करतात. तीन वर्ष तयारी आधी सुरू करून त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.
धन्यवाद! आपण स्वतः CAT clear केली असल्याने आपले मत महत्त्वाचे आहे. माझ्या अल्पानुभवावरून मी साधारणपणे हेच सांगितले होते व सविस्तर लिहिणार होतो. पण एकाने सत्यानाश केल्याने पुढे काहीच लिहिले नाही.
27 Jul 2022 - 8:09 am | जेम्स वांड
मला वाटते बी एम सी सी उत्तम असावे. त्यांचे कॉमर्स मधले बी. कॉम. तरी उत्तम होते, पण बी बी ए बद्दल इतक्या आत्मविश्वासाने मी तरी सांगू शकणार नाही.
27 Jul 2022 - 9:03 am | श्रीगुरुजी
BMCC पुण्यातील सर्वोत्तम वाणिज्य महाविद्यालय आहे. ते स्वायत्त महाविद्यालय आहे.
29 Sep 2023 - 7:04 am | रानरेडा
आपल्या मुलीने कोठे प्रवेश घेतला ?
कसे आहे कॉलेज ?
प्लेसमेंट कशी आहे ?
आपल्या मुलीस पुढील वाटचालीस शुभेच्छा
बाकी मी सल्ला देईन कि जर बीबीए ला असेल आणि एमबीए ला जायचे असेल तर तयारी सुरु करा
मी अकरावी बारावी पासून काही ना काही तयारी करणारे पाहिले आहेत
अनेक मुले स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीत असतात
एमबीए च्या टॉप कॉलेज मध्ये ६० - ७० टक्के किंवा जास्त इंजिनिअर असतात आणि त्यात पण आय आय टी / एन आय टी सारख्या कॉलेज मधील मोठ्या प्रमाणात जातात
आणि या परीक्षा crack करायचा आणि महाराष्ट्रातील सर्वात सान्गल्या कॉलेज मध्ये जायच्या फर्स्ट हॅन्ड अनुभवावर सांगत आहे, डिग्री नंतर एक वर्षात .
आणि माझा भाऊ आय आय एम मध्ये होता आणि इंजिनिअरिंग संपल्यावर लगेच गेला होता . प्रवेश परिकसेची मुलाखत इंजिनिअरिंग viva मद्ये आली होती
त्यामुळे अनुभवाने सांगत आहे
29 Nov 2024 - 9:45 pm | रानरेडा
विदर्भनिवासी आपापल्या मुलीने कोठे प्रवेश घेतला कोठे सांगाल का ?
म्हणजे इतरांना फायदा होईल
तसेच पुढील परीक्षांची तयारी कुठपर्यंत आली ?