ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ५)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
21 Jul 2022 - 11:04 pm

द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन!

या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली.

एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.

प्रतिक्रिया

निनाद's picture

22 Jul 2022 - 5:24 am | निनाद

नॅशनल हेराल्ड प्रकरण: जामिनावर बाहेर असलेल्या सोनिया गांधी अखेर ईडी कार्यालयात पोहोचल्या. ही एक ऐतिहासिक घटना आहे. सोनियाची भारतात आजवर कधीही चौकशी झालेली नाही. अगदी इंदिरा गांधी हत्या प्रकरणातही यांची चौकशी झाली नाही. असे म्हणतात की या खुनाच्या सर्वात प्रथम साक्षिदार त्याच होत्या. (पण मला नक्की माहीत नाही.) इतका मोठा खटला असूनही त्यात त्यांची चौकशी झाली नव्हती. कारण गांधी नेहमी कायद्यापेक्षा मोठे मानले गेले. पण परिस्थिती बदलते आहे असे दिसते.

नॅशनल हेराल्ड घोटाळा हा भारतीय इतिहासातील सर्वात उल्लेखनीय कायदेशीर प्रकरणांपैकी एक आहे, कारण गांधींवर थेट आरोप आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल यांची आई-मुलगा जोडी, त्यांचे सहकारी - ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल वोहरा आणि सॅम पिथ्रोडा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर 'फसवणूक आणि विश्वासभंग' केल्याचा आरोप आहे. कोट्यवधी रुपयांची जनतेची मालमत्ता गांधींच्या घशात घातली गेली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील दोन जणांना अल्पवयीन मुलांसह तरुणांना बंदुक कशी चालवायची हे शिकवले जायचे.
याचा व्हिडियो ही काढला गेला होता. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची ओळख इंतजार हुसैन आणि गुलजार हुसेन अशी झाली असून ते सख्खे भाऊ आहेत. प्रशिक्षणासाठी वापरलेली रायफलही पोलिसांनी जप्त केली आहे.

या व्हिडिओमध्ये काही किशोरांना काही प्रौढांकडून रायफल चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसत होते. या व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व लोक मुस्लिम आहेत. प्रौढ आणि किशोरवयीन मुले रायफल चालवायला शिकताना दिसत आहेत, त्यांच्यामध्ये मुले देखील दिसतात.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2022 - 10:32 am | मुक्त विहारि

आखाती देशांत असतांना, एका कंपनीत काम करत असतांना, तिथले भारतीय मुसलमान म्हणत होतेच की, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये जे गैर मुस्लिम लोकांचे झाले तेच भारतात करणार...

मार्गारेट अल्वा बाईंनी गांधी घराण्याची खूप नालस्ती केलेली पण सोनियांसाठी bitter pill to swallow असं लिहिलेलं आहे.

कपिलमुनी's picture

22 Jul 2022 - 2:17 pm | कपिलमुनी

ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसाठी असलेली रेल्वे भाड्यामधील सवलत सध्याच्या सरकारने रद्द केली आहे.
व्हाट्सअप वर सरकारची लाल करणाऱ्या म्हाताऱ्यांचे अभिनंदन

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jul 2022 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क. म्हातार्यांचे अच्छे दिन गेले.

इरसाल's picture

22 Jul 2022 - 3:42 pm | इरसाल

शपांची पण सवलत गेली म्हणायची.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2022 - 4:33 pm | श्रीगुरुजी

खिक्क . . . खिक्क . . . खिक्क . . .

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2022 - 10:36 am | अमरेंद्र बाहुबली

शपां कोण?

मुक्त विहारि's picture

22 Jul 2022 - 4:19 pm | मुक्त विहारि

सार्वजनिक सेवा, तोट्यात चालवण्यात अर्थ नाही...

आजच आमच्या घरी हा विषय बोलण्यात आला.

आई आणि वडील दोघांचेही हेच म्हणणे आहे की, सार्वजनिक सेवा, तोट्यात चालवण्यात अर्थ नाही.....

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....

(वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे. इतरांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये...)

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jul 2022 - 4:34 pm | अमरेंद्र बाहुबली

वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे.
मग फक्त त्यांनाच व्यनि करायचा ना? :)

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jul 2022 - 4:36 pm | अमरेंद्र बाहुबली

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....
एका नाण्याला दोन बाजू असतात हे माहीत होतं, पण असंख्य बाजू?? खिक्क.

भारतातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे असंघटित क्षेत्रातील काम करणारे आहेत. ज्यांना पुरेशी पेन्शन किंवा इन्कम सोर्स नाहीये.
इन्कम टॅक्स सोडला तरी ते इतर सर्व मार्गाने सरकारला टॅक्स देत असतात.. (खरेदी ,विक्री, जी एस टी , टोल वगैरे) ..
त्यामुळे आपल्याच देशातील लोकांचे जीवन सुखकर किंवा कमी त्रासाचे बनवण्यासाठी ही सवलत गरजेची आहे .
सरकार इतर ठिकाणीही पैसे कमावत आहेच..
यात काही बदल करून रेल्वेमधील ही सोय चालू ठेवता येऊ शकते
उदा - ए सी डब्या साठी सवलत लागू नसावी..
विस्ताडोम सारख्या डब्यांना सवलत नसावी..

पण संवेदनशीलपणें विचार केला तर आयुष्य भर टॅक्स भरून म्हातारंपणी सुद्धा सरकारने एवढी सवलत देऊ नये याचे आश्चर्य वाटते..

मुक्त विहारि's picture

22 Jul 2022 - 7:25 pm | मुक्त विहारि

पण त्याच बरोबर सरकार, इतर प्रवाशांना पण काही प्रमाणात सवलत देत आहेच की, जसे की विद्यार्थी, कॅन्सरग्रस्त रुग्ण.

सवलत हे दुधारी आहे, इतपत तरी भुमिका झाली...

(आमदार-खासदार यांना मिळणारी सवलत, ही तिसरी बाजू झाली, पण ह्या सवलतीला कुणीच धक्का लावण्याची शक्यता नाही)

(रेल्वे कर्मचारी वर्गाला मिळणारी तहहयात सवलत, ही पण एक सवलतीच्या बाबतीत बाजू आहेच)

अपेक्षा होती, तसाच कपिलमुनी यांचा संतुलित प्रतिसाद आला. धन्यवाद, कपिलमुनी...

जेम्स वांड's picture

23 Jul 2022 - 4:29 pm | जेम्स वांड

त्यांचे "अंताजींची बखर" हे मला वाटते समरसून लिहिलेले पुस्तक खूप प्रसिद्ध होते.

चक्क काल्पनिक असलेली ही कादंबरी लोकांना खरोखर बखर वाटावी इतकी ताकदीने लिहिलेली होती.

विनम्र श्रद्धांजली.

केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही तुरुंगवासाला घाबरत नाही, हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात, आम्ही भगतसिंग यांची मुलं आहोत. भगतसिंग यांनाच आम्ही आमचा आदर्श मानतो. ज्यांनी इंग्रजांसमोर नतमस्तक व्हायला नकार दिला आणि फासावर गेले. तुमच्या तुरुंगवासाला आणि फाशीला आम्ही घाबरत नाही, आम्ही अनेकदा तुरुंगात जाऊन आलो आहोत” असंही केजरीवाल म्हणाले.

सावरकर म्हणा, गांधीजी म्हणा किंवा भगतसिंग म्हणा. यांच्या नखाची सर नसलेल्या व्यक्ती त्यांची थट्टा उडवितात, त्यांच्याविषयक अपमानजनक वक्तव्ये करतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटते. कहासे आता है इतना कॉन्फिडन्स ??

आजकाल ह्याची फॅशन आली आहे. सनसनाटी निर्माण करुन फुटेज खाने याउपर अशा बाबतीत काही जास्त अपेक्षित नसते.
म्हणुन काहीतरी बोलावे ज्याने जनमानसात प्रक्षोभ निर्माण होइल.

म्हणतात ना "घटं भिंद्यात, पटं छिंद्यात . . ." तसेच आहे हे.

अनन्त अवधुत's picture

22 Jul 2022 - 8:27 pm | अनन्त अवधुत

हे ह्या केजरीवालांच्या बाबत एकदम खरे आहे. काहिही करून चर्चेत राहिले पाहिजे, बस्स..!

बाकि अरविंद केजरीवालने स्वतः अकाली दलाचे नेते मजिठिया, अ‍ॅड. अमित सिब्बल, नितीन गडकरी, आणि अरूण जेटलींची वेगवेगळ्या प्रसंगी नाक घासत माफी मागितली होती.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2022 - 9:57 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप या एका पर्यायावर मी विचार करीत होतो कारण कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेना हे पक्ष माझ्यासाठी कधीच पर्याय नव्हते. मनसे हा तर पक्षच संपलाय. फडणवीस-चंपा (आणि आयाराम) व्यतिरिक्त भाजप हा पर्याय शिल्लक आहे, परंतु फडणवीस-चंपा इतक्यात बाजूला होण्याची किंवा त्यांना मोदी-शहा बाजूला करण्याची पुढील काही वर्षे तरी शक्यता दिसत नाही.

परंतु आजची केजरीवालांची द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित व असत्य मुक्ताफळे वाचल्यानंतर आआप या पर्यायावर अजिबात विचार करणार नाही असे ठरविले आहे.

महान स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या दिल्याने कोणत्याही पक्षाला नवीन मते मिळत नाहीत व पक्षाकडे वळू पाहणारी मते जवळ न येता दूर जातात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सावरकरांना शिवीगाळ करून कॉंग्रेसच्या मतात एक मताचीही भर पडल्याचे दिसत नाही. उलट आहे ती मते सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. केजरीवालांना अजून हे समजलेले दिसत नाही. जो मध्यमवर्ग आआपकडे वळण्याची थोडी शक्यता निर्माण होण्याची शक्यता होती, ती शक्यता आजच्या मुक्ताफळांमुळे केजरीवालांनी उमलण्याआधीच खुडून फेकून दिली आहे.

असो. हा माणूस सुधारत आहे असे थोडे वाटायला लागले तेवढ्यातच हा आपल्या मूळ स्वरूपात परत आला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2022 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आजची केजरीवालांची द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित व असत्य मुक्ताफळे वाचल्यानंतर आआप या पर्यायावर अजिबात विचार करणार नाही असे ठरविले आहे.

अरे देवा...! आपल्या या निर्णयामुळे उद्यापासून या सृष्टीत सुर्याभोवती इतर ग्रहांचे भ्रमण बंद होईल. सगळे ग्रह-तारे कुठंतरी हेलपाटून पडतील. सर्व चराचर सृष्टीत हाहाकार माजेल. या जगाचा नियमित राहाटगाडा रुटीन चालावे असे वाटत असेल तर, प्लीज प्लीज प्लीज . असा विनाशकारी निर्णय घेऊ नये अशी आमची तमाम जीवसृष्टीच्या लोकांची इच्छा आहे. विचार व्हावा. =))

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2022 - 10:42 pm | श्रीगुरुजी

जे काय असेल ते असेल. आपण येथे जी नियमित आगपाखड करता त्यामुळे मोदींना जितका फरक पडतो, त्यापेक्षा कमी फरक तुमच्या नीलाक्षतनय केजरीवालांना पडला तरी हरकत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jul 2022 - 12:08 am | कानडाऊ योगेशु

केजरीवालांनी सावरकरांवर केलेली व्यक्तव्ये वाचल्यावर हा माणुस मनातुन उतरला.(केजरीवाल.)
ह्या सगळ्या नव नेत्यांना शरद पवार बनायची का हुक्की येते कोण जाणे? केजरीवालचे कामच बोलते आहे असे इथेच म्हटले जाते मग हे असे विधान करुन सुशिक्षित वर्ग (जो केजरीवालांची व्होट बँक आहे) संभ्रमित झाला तर त्यात काही आश्चर्य वाटणार नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2022 - 3:55 pm | श्रीगुरुजी

ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत सेना निर्माण होत आहे, तसाच पवार व पवारनिष्ठ विरहीत राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे व ठाकरेनिष्ठांच्या बेतात वक्तव्याने तो पक्ष आता संपला. पवार व पवारनिष्ठांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी पक्ष त्याच मार्गावर घोडदौड करीत आहे.

https://www.loksatta.com/pune/babasaheb-purandars-speeches-and-writings-...

काल केजरीवालांनी विनाकारण सावरकरांविरूद्ध गरळ ओकली. आज फक्त कलाकार बदललेत, थोडी कथा बदलली, पण मूळ संहिता व बरेचसे कथानक तेच आहे. जातीयवादी आग लावण्याचे प्रयत्न इतक्या उतारवयातही अथक सुरू आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 2:50 pm | अमरेंद्र बाहुबली

मी तरी केजरीवालांना हुशार नेता मानतो. तसंही सावरकरा्वर टिका केल्यावर त्यांचे कुठेलही मतं कमा होनार नाहीयेत. पण भगतसिंगाच्या नावाची मते त्यांच्या बाजूने आणखी वाढतील. केजरीवाल लंबी रेस का घोडा आहेत. सावरकरांच्या नावाचा मते हा भाजपला बांधलेली आहेत हे भाजप सह सर्व पक्ष जानतात त्यामुळे भाजपही सावरकरांता अपमान मूकाटपणे गिळून नितेश राणेंना पक्षात घेतो, भारतरत्नही देत नाही. कारण सावरकरवाद्यांना भाजपला मत देण्या शिवाय पर्याय नाहीये.

माफी मागायचा इतिहास पाहू :

१. मार्च १५ ला केजरीवाल ह्यांनी बिक्रम सिंग माकिजा ह्यांची जाहीर रित्या माफी मागितली. हे नेते ड्रग्स विकतात असा बिनबुडाचा आरोप ह्यांनी केला होता.

२. त्या आधी केजरीवाल आणि त्यांचे मंत्री ह्यांनी अमित सिब्बल ह्यांची जाहीर माफी मागितली. कपिल सिब्बल ह्यांच्या मुलावर केजरीवाल ह्यांनी असेच बिनबुडाचे आरोप केले होते.

३. अरुण जेटली ह्यांची पुन्हा लेखी माफी केजरीवाल ह्यांनी मागितली होती. मी तुमच्यावर खोटे आरोप केले आणि त्यामुळे तुम्हाला त्रास झाला, कृपया माज्यावर गुन्हा दाखल करू नये असे त्यांनी त्यांत म्हटले होते.

४. नितीन गडकरी आणि त्यांच्या वडिलांवर सुद्धा केजरीवाल ह्यांनी गलिच्छ आरोप केले आणि नंतर कोर्टांत खेचतंच साष्टांग लोटांगण घालून माफी मागितली.

हि ४ उदाहरणे फक्त मला आठवली म्हणून लिहिली आणखीन किमान २ लोकांची माफी ह्यांनी मागितली आहे.

प्रतिसाद संपादित.

क्लिंटन's picture

23 Jul 2022 - 8:00 am | क्लिंटन

केजीवालांना २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा मिळाल्यानंतर अक्षरशः स्वर्ग दोन बोटे राहिला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आपले काम सोडून इतर सगळ्या भानगडीत नाक खुपसणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशाप्रकारे बेताल वर्तन त्यांचे झाले होते. त्यातच अरुण जेटलींनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख असताना तिथे भ्रष्टाचार केला हा आरोप केजरीवालांनी केला. मग अरुण जेटलींनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. त्यावर आपल्या बचावासाठी एका हिअरींगला २२-२५ लाख रुपये घेणारा राम जेठमलानी हा महागडा वकील केला होता. जेठमलानी यांनी केजरीवालांना सव्वा कोटी रुपयांचे बिल लावले ते बिल स्वतच्या खिशातून न भरता दिल्ली सरकारला पाठवून द्यायचा शहाजोगपणा नव्हे हलकटपणा याच केजरीवालांनी बाळगला होता. म्हणजे एक मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित नसलेली बडबड हे करणार आणि त्याचे बिल करदात्यानी भरायचे. वा रे आम आदमी. हा मनुष्य अरुण जेटली गेल्यानंतर तिथे अंत्यदर्शन घ्यायला म्हणून गेला होता. खरं तर असल्या निर्ल्लज माणसाला तिथून चपला मारून हाकलून द्यायला हवे होते.

तरीही केजरीवाल हे देशातील सगळ्यात वाईट आणि निलाजरा राजकारणी आहे असे की तरी म्हणणार नाही. उध्दव ठाकरे त्याहून कितीतरी वाईट आहेत. सध्या तरी केजरीवालांचा नंबर दुसरा पक्का आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2022 - 8:21 am | श्रीगुरुजी

मी सध्या त्यातल्या त्यात कमी वाईट पर्यायाचा विचार करीत होतो. परंतु महान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काल केजरीवालांनी विनाकारण द्वेषपूर्ण गरळ ओकल्याने अतिशय संताप आला. हा माणूस सूधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

पूर्वी संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गरळ ओकणाऱ्या नितेश राणेला फडणवीसांनी पायघड्या अंथरून पक्षात आणून आमदार केले (आता कदाचित मंत्रीपद सुद्धा देतील), तेव्हापासून असाच संताप आला आहे. परंतु फडणवीस भाजपचे एक दुय्यम नेते व भाजपचे शीर्ष नेतृत्व सावरकरप्रेमी आहे. पण येथे तर आआपचा एकमेव सर्वात मुख्य नेताच काहीही कारण नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध.गरळ ओकतोय हे अक्षम्य वर्तन आहे.

गणेशा's picture

23 Jul 2022 - 11:09 am | गणेशा

अक्षम्य आहेच...

आणि महात्मा गांधी यांच्या बद्दल हि जो अपप्रचार केला जातो... आणि जसा नथुराम चा जो उदो उदो मधल्या काळात केला गेला, त्याबद्दल हि घृणा आहे...

सगळ्या स्वातंत्र्य विरांनी घेतलेल्या सगळ्या भूमिका कदाचीत मान्य नसतील परंतु ते नेते पुर्ण पणे चूक दाखवणे हे चूकच आहे..

आणि हे द्वेषाचे राजकारण कारण्यातच आजकालचे बरेचसे नेते.. त्यांचे अनुयायी आणि कार्यकर्ते धन्यता मानतात,

हे चुकीचेच आहे..

आता गांधी विरुद्ध सावरकर कोण भारी कोण चुकीचे हेच बोलणार असतील तर त्या मूर्ख नेत्यांच्यात आणि आपल्यात असा काय फरक?

नथुरामने जे केले ते चूक आहेच. गांधींना असलेला विरोध हा जनउठावातून पुढे आणण्याचा पर्याय योग्य असता.
सावरकर हे काळाच्या १०० वर्षे तरी पुढे असणारे नेते. त्यामुळे त्यांचे विचार जसे च्या तसे मान्य होतील असे शक्यच नाही. पण केजरीवाल सारखा माणूस त्यांच्या नखाच्या सरीचाही नाही आणि सावरकरांच्या नावाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, हे बघून तिडिक उठते. असो. स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणारे बरेच असतात, त्यातलाच हा एक.

सावर्करांनबद्दल बोलाताना "गोडसे" उल्लेख करायलाच पाहिजे का?
जणूकाही सावर्करांच्या विचारांचा पाठींबामा देणार हा "आपोआप" गोडसेंच्या कृतीचे समर्थन करतो असे भासवायचे हा छूपा हेतू !
अर्बन नक्षल टूल किट मधील अजून एक टूल

सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून हि घ्या गांधींची स्तुति
१) गांधी
- दक्षिण अफ्रकेत वर्णद्वेषाबद्दल जो उठाव करण्यात गांधींनी पुढाकार घेतला त्याला नामसकर
- भारतात आल्यावर काँग्रेस मध्ये घुसून आपल्या पद्धतीने काँग्रेसच्या स्वान्त्र्यत्याचं चळवळीत "असहकार" हा विरोधाचा नवा प्रकार राबवून एक वेगळी अध्यात्मिक प्रकारची झळाळी त्या चलवलालीला प्राप्त करून दिली
- एकूणच स्वातंत्र्य चळवळ बांधून ठेवण्याचे काम आणि दिशा दिली आणि अर्हताःहातच झळाळी दिली
- अगदी मेक इन इंडिया नसले तरी "आयात करू नका" हे धोरण जनतेला समजवून सांगितले
- चिकाटी
बाकी महान आत्मांसाच्यातील त्रुटी बद्दल बोलण्याचे टाळतो

२) आता सावर्करांमधील एक त्रुटी
- विचारनची स्पष्टता आणि भव्यता असली तरी त्याचे रूपांतर "जन आधारात" म्हणावा तेवढा गोळा करू शकले नाहीत असे वाटते
बाकी सवारकरांच्या कौतीकाचे बोलण्याचे टाळतो

सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत जे कष्ट भोगले त्यावर प्रश्न उभा करणे आजिबात पटत नाही, निषेधार्ह आहे.

पण, सावरकरांबद्दल हा लेख वाचनात आला, आणि त्यामुळे सावरकरांच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेला हे नक्की.

https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-a...

तुमच्या मुद्दलाच घोळ आहे.
----------
चातुवर्ण आणि जात ह्यात फरक आहे. त्या लेखकाने त्यात गल्लत केली आहे.
----------
एकादा मनुष्य जर कायदा आणणार नाही असे म्हणला तर त्याचा अर्थ तो जातीव्यवस्थेच्या बाजुने होत आहे असा होत नाही. काहींना हळुहळु समाज सुधारणा जास्त पसंत असतात तर काहींना सरळ कायद्याचा दणका आवडतो, प्रत्येकाची गोष्ट वेगळी. जहाल - मवाळ वाद आठवा.
--
१९४० चा हिंदु धर्म आणि आताचा हिंदु धर्म ह्यात खुप फरक आहे.
बाकी आंबेडकरांनी इस्लाम आणि ईसाई रिलिजनबद्दल काय म्हटले आहे ते पहा.

चातुवर्ण आणि जात ह्यात फरक आहे. त्या लेखकाने त्यात गल्लत केली आहे.

कसलाही फरक नाही. असला तरीही दोन्हीही तितक्याच वाईट प्रथा आहेत.

बाकी आंबेडकरांनी इस्लाम आणि ईसाई रिलिजनबद्दल काय म्हटले आहे ते पहा.

माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 2:28 pm | अमरेंद्र बाहुबली

माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ?
विषयबदल करायचा प्रयत्न बाकी काही नाही.

राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना बक्षीस देण्याचे जाहीर करणारे महान नेते आहेत ते.

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2022 - 5:06 pm | श्रीगुरुजी

लक्षात आहे ते. अश्या व्यक्तीला आणि अश्या व्यक्तीला पायघड्या घालणाऱ्यांना क्षमा नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2022 - 5:40 pm | अमरेंद्र बाहुबली

ते आता भाजपात आल्याने त्यांना आम्ही सावरकरभक्तांनी राष्ट्रहीतासाठी माफ केलेत. फडणवीसांची खुर्ची मजबूत करून हवीय आम्हाला बाकी काही घेणेदेणे नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jul 2022 - 8:48 pm | अमरेंद्र बाहुबली

दिल्ली सरकारचा बराच सुविधा फूकट देऊनही करातून जमा झालेला पैसा वाढतोय, केंद्रातील भाजप सरकार अमाप महागाई वाढवूनही सवलती बंदं करत आहे, नेमका पैसा जातो कुठेय? कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आमदार खरेदीत का?

सुक्या's picture

23 Jul 2022 - 1:34 am | सुक्या

होय

विवेकपटाईत's picture

23 Jul 2022 - 3:45 pm | विवेकपटाईत

दिल्ली सरकारचा बराच सुविधा फूकट देऊनही करातून जमा झालेला पैसा वाढतोय,
हा दिल्लीचा ईमानदार माणूस कधीच खोटे बोलत नाही. डीटीसीचा तोटा 26000 कोटीहून जास्त होऊन चुकला आहे. दिल्ली जल बोर्ड व्याज सकट 60000 कोटींचा वर. (आरटीआय करून सर्व आकडे तपासू शकतात). वीज रोज दोन तास जाते. पानी एक तास ही येत नाही. ते ही सकाळी 6च्या आधी. जर दिल्ली एक स्वतंत्र देश असता तर आजच्या घटकेला श्रीलंका झाला असता.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2022 - 3:52 pm | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्राताल लोक कुठं जानारेत चेक करायला? म्हणून हलॅ ते ठोकून द्यायचं?

डँबिस००७'s picture

23 Jul 2022 - 6:07 pm | डँबिस००७

महाराष्ट्रातील गुजरात मधील लोक कुठं जाणारेत, चेक करायला? म्हणून हलॅ ते ठोकून द्यायचं?

म्हणूनच केजरीवाल धाधांत खोट बोलु शकतो.

पंजाबात निवडणुकीच्या वेळेला "विज मुफ्त" "पाणी मुफ्त " वैगेरे घोषणा देऊन टाकल्या. दरम्यान च्या काळात मिडीया बरोबरच्या एका मुलाखतीत केजरीवालने चक्क अस म्हंटलेल होत की आम्ही आलो की १५ दिवसात सर्व भ्रष्टाचार नाहीसा करु ज्याने सरकारचे ३५,००० कोटी वाचतील आणि हेच वाचवलेल्या निधीतुन लोकांसांठी "विज मुफ्त" "पाणी मुफ्त " च्या योजना राबवता येतील
शपथविधीनंतर मु मंत्र्याला केंद्र सरकारकडे, ५०,००० कोटी दर वर्षाला निधी पाहीजे म्हणुन विनंती करायला पाठवल. खोट्या आश्वासनावर निवडणूका हे जिंकणार आणि ह्यांच्या योजनेसाठी निधी केंद्र सरकारने द्यायचा.

कपिलमुनी's picture

23 Jul 2022 - 5:39 pm | कपिलमुनी

Cag रिपोर्ट खोटे असावेत...

नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा; म्हणाला, “पाकिस्तानात….”

https://www.loksatta.com/desh-videsh/pakistani-infiltrator-rizwan-ashraf...

CAA आणि NRC कायदे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे....

मदनबाण's picture

22 Jul 2022 - 10:41 pm | मदनबाण

रणवीर सिंह नेहमी त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतो... यावेळी तेच कपडे काढुन, दिगंबर अवस्थेत राहुन चर्चेत आहे ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara

बहुतेक त्याने "ना रहेगा कपडा ना होगी चर्चा" असा काहितरी विचार केला असावा.

सावरकरांच्या वक्तव्याबद्दल केजरवाल चा तीव्र निषेध ...
असला पप्पू पणा सोडला तरच टिकेल . नाहीतर सूर्यावर थुंकून स्वतः चा तोंड खराब करून घेणार हा