द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन!
या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली.
एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.
प्रतिक्रिया
25 Jul 2022 - 2:39 pm | आग्या१९९०
मी तर पी. चिदंबरम ह्यांना ह्याबाबतीत मानतो. केंद्राने कितीही चौकश्या मागे लावल्या तरी सरकारच्या चुका दाखवण्यात कुठेही कमी पडत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांचे मुद्दे खोडून काढायला एकही नेता बीजेपीकडे नसावा ह्याचे आश्चर्य वाटते.
25 Jul 2022 - 7:30 am | सुखी
लाचार विरोधीपक्ष... ED च्या भीतीपोटी लपुन बसलेत... जे काम करायला हवं ते पण करेनासे झालेत.
24 Jul 2022 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली
शिवसैनिंकांचा रोष पाहून सुहास कांदेंना काढावा लागला पळ.
https://mmkmedia.in/शिंदेगटाच्या-आ-कांदेंना/amp/
24 Jul 2022 - 9:00 pm | अमरेंद्र बाहुबली
काळजावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यंमंत्री केलं. - चं. पाटील
https://berartimes.com/153380/
भाजपची सत्तेची हाव किती हे ह्या वाक्यातून कळते.
शिंदेंना स्वाभिमान असेल तर ते पद सोडायला हवे त्यांनी.
25 Jul 2022 - 7:24 am | सुखी
सत्तेत जे नसतात त्यांना ही हाव असतेच...
सत्तेत जे असतात त्यांना अजून जास्त हवच असत.
केजरवालांना हाव नसती तर पंजाब मध्ये कशाला लढले असते...
सध्या हाव नसलेला एकमेव पक्ष काँग्रेस आहे असं एकूण त्यांच्या वागण्यावरून वाटतं.
25 Jul 2022 - 2:33 pm | श्रीगुरुजी
परत तेच
https://www.loksatta.com/mumbai/roads-in-aarey-are-closed-trees-are-bein...
25 Jul 2022 - 5:06 pm | मुक्त विहारि
ह्यात फरक आहे....
25 Jul 2022 - 2:56 pm | अमरेंद्र बाहुबली
आजचं हे व्यंगचित्रही भयानक आवडलंय.
https://ibb.co/28h15hc
25 Jul 2022 - 5:03 pm | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/nashik/adityas-bridge-was-carried-away-and-shinde...
25 Jul 2022 - 5:19 pm | अमरेंद्र बाहुबली
काका मागे तुम्हा पुणे पालिकेतील भ्रष्टाचाराची लिंक टाकली होती त्यावर राज्य सरतारला दोषी धरले होते, नंतर कुणीतरी मिपाकराने तुम्हाला आठवण करून दिली की पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. नंतर तुम्हावत्या भ्रष्टाचारावर अवाक्षरही काढलं नाही, असं का?, पुढे त्या भ्रष्टांवर कारवाई झाली का? काही अपडेट?
25 Jul 2022 - 7:53 pm | मुक्त विहारि
स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-controversy-ove...
स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
25 Jul 2022 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली
हेया पेक्षा मोदींना सांगून ईडी सोडू अशी धमकी दिली असती तरी चाललं असतं.
25 Jul 2022 - 9:26 pm | श्रीगुरुजी
शपथविधी होऊन २५ दिवस उलटल्यानंतरसुद्धा मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. मला जरा वेगळीच शंका येतीये.
शिंदे गटाची बाजू काहीशी दुर्बळ आहे हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले असावे.
अश्या परिस्थितीत शिंदेनी राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट आणण्याआधी आरे, बुलेट ट्रेन सारखे स्थगित प्रकल्प पुनरूज्जीवित करावे, हव्या असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी त्यांना आणावे, नको असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, प्रशासनात हवी ती माणसे हव्या त्या जागी आणावी, काही विरोधकांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून द्यावे, विरोधी पक्षात जमेल तेवढी फूट पाडावी या दृष्टीने काम सुरू आहे असं दिसतंय. एकदा हे झालं की राष्ट्रपती राजवट आली तरी चालेल, हा हेतू असावा. म्हणजे थोडक्यात पोल पोझिशनवर येऊन मग राष्ट्रपती राजवट आणावी या दिशेने काम सुरू असावे.
25 Jul 2022 - 10:01 pm | अनन्त अवधुत
तर भाजपला मोठा फटका पडेल. शिंदे कदाचित स्वगृही परत जातील आणि शिंदेंना भाजपने फसवले असे चित्र उभे केले जाईल. त्यात भाजप सगळी सहानूभुती गमावेल.
25 Jul 2022 - 10:04 pm | श्रीगुरुजी
शिंदे परत सेनेत जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात येत असावी. अश्या परिस्थितीत शिंदे गटातील बहुसंख्यांना भाजपत सामावून घेतले जाईल. न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार टिकू शकले नाही हे अधोरेखित केले जाईल.
26 Jul 2022 - 7:19 am | निनाद
तस्करांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सीमावर्ती शहर जोगबानी मार्गे सीमा ओलांडून भारतात जाण्याची योजना आखली होती.
नेपाळमधील विराटनगर येथील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या अटक तस्करांच्या ताब्यात दोन किलो युरेनियम आणि इतर वस्तू सापडल्या. सीमा ओलांडून भारतात येण्याच्या उद्देशाने ते काठमांडूहून निघाले. जप्त करण्यात आलेल्या युरेनियमची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. मोरंगचे एसपी शांतीराज कोईराला यांनी नेपाळमधील युरेनियमच्या अटकेची आणि जप्तीची पुष्टी केली. ते म्हणाले की, तस्कर मुक्कामी असलेल्या विराटनगर येथील दोन हॉटेलमधून सुमारे दोन किलो वजनाचे युरेनियम आणि इतर संशयित साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने पुष्टी केली की तस्कर साहित्यासह भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
हा फार मोठा धोका वाटतो. युरेनियमचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.
26 Jul 2022 - 7:23 am | निनाद
झारखंडमध्ये लव्ह जिहादची एक नवीन घटना. मो. नईम मियाँ याने सुरुवातीला एका हिंदू महिलेला त्याचा धर्म लपवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणीला संदीप सिंग असे नाव भासवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. नईम मियाँ याने महिलेच्या अल्पवयीन बहिणीवरही बलात्कार केला. इतकेच नाही तर आणि हे कृत्य रेकॉर्ड केले आणि आता तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे.
समाजाने या बाबतीत सावधान राहणे फार आवश्यक आहे.
26 Jul 2022 - 10:32 am | विवेकपटाईत
फेसबूक वर वचलेली बातमी
"मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९ झाली. २०२० मध्ये यात आणखी घट होऊन ५ हजार ६३३ मृत्यू नोंदले गेले. जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. "
केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला।
26 Jul 2022 - 11:27 am | जेम्स वांड
१. फेसबूक वर वचलेली बातमी - अर्धा उत्साह इथेच मावळतो
२. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे.
- माहितीच्या अधिकारात ही माहिती कशी अन कुठून मागवता येईल ?
३. केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला।
तुमच्या मताला आधार काय ? दोनचार वैयक्तिक एनेकडोट्स सोडून काही पियर रिव्युड स्टडीज असल्या तर विदा द्यावा ! मुळात तुम्ही सरकारी नोकर आहात ना ? मेडिकल सायन्सला हलक्यात घ्यायला त्याचं किती नॉलेज आहे तुमच्याकडे ?
संपादक मंडळ, वरील प्रतिसादाच्या विरुद्ध माझी हरकत आहे, एकतर हे महाशय वैद्यकीय क्षेत्रातील नाहीत किंवा स्वतः वैद्य/ डॉक्टर इत्यादी पण काहीच नाहीत, तरीही दोनचार वैयक्तिक उदाहरणे पाहून खुशाल वैद्यकीय मते देत आहेत, हे वेजबाबदारच नाही तर कोणाच्या जीवावर बेतणारे पण ठरू शकते, तरीही कृपया इथे लक्ष द्यावे ही नम्र विनंती
26 Jul 2022 - 11:51 am | कॉमी
अनेकवार सहमत.
26 Jul 2022 - 10:37 am | अमरेंद्र बाहुबली
एकनाथ शिंदे सुध्दा फडणवींसांप्रमाणे कुचकामी मुख्यमंत्री सिध्द होत आहेत, अनेक प्रशासकीय कामो रखडलीत.
26 Jul 2022 - 4:17 pm | मुक्त विहारि
मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण, 200 जणांचा जमाव आला शाळेवर चालून, 35 जणांविरोधात FIR
https://www.tv9marathi.com/national/teacher-beaten-up-for-making-girl-an...
पश्चिम बंगालमधील (W. Bangal)दक्षिण दिनाजपूर येथे हा प्रकार घडला आहे. ही मुलगी अल्पसंख्याक समाजातील होती, असे सांगण्यात येते आहे......
---------
26 Jul 2022 - 5:14 pm | डँबिस००७
ह्या प्रकरणातली मुलगी व शिक्षीकेला निवस्र करणारे २०० हे शांतीदूत समाजाचे होते. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवुन घ्यायला नकार दिला होता, पण हिंदू समाजाने रस्ता रोको सुरु केल्यावर नाईलाज झाला व तक्रार नोंदवुन घेतली.
26 Jul 2022 - 6:02 pm | शाम भागवत
हे असंच चालू राहीलं तर पुढच्या निवडणुकात बंगालात भाजपाचा मुख्यमंत्री नक्की. बंगाली लोकांना थोडासा त्रास सहन करायला लागेल
पण त्याला इलाज नाही. ध्रृविकरणात असं होतच असतं.
आले नियतीच्या मना…..
26 Jul 2022 - 6:29 pm | अमरेंद्र बाहुबली
बंगाली लोक आगीतून फूफाट्यात जातील मग.
26 Jul 2022 - 5:14 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
26 Jul 2022 - 5:34 pm | प्रसाद_१९८२
26 Jul 2022 - 5:39 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
26 Jul 2022 - 5:30 pm | यश राज
आजच्या मौखिक जत्रेत खालील वाक्य कहर म्हणजे भलतच TRP खेचणारे होते ब्वा
" सगळ्यात मोठं टेन्शन होते की डास चावला, मुंगी चावली की खाजवायच कसं??"
लयच भारी.. अशी ही खाजवा खाजगी
26 Jul 2022 - 5:51 pm | मुक्त विहारि
म्हणजे, स्वयंपाक हे शास्त्र असेल तर, तो पचवणे ही एक कला आहे.
केर काढणे हे शास्त्र असेल तर, केरसुणी पकडणे, ही एक कला आहे ...
इत्यादी ...
26 Jul 2022 - 6:32 pm | अमरेंद्र बाहुबली
@ संपादक मंडळ, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री ठाकरो साहेब व श्री राऊत साहेब ह्यांना प्रसाद १९८२ हा आयडी द्वेषातून विदूषक म्हणतोय ना खाली तशी लिंकही दिलीय. कृपया संबंधीत आयडीवर योग्य ता कारवाई करावी.
26 Jul 2022 - 5:35 pm | मुक्त विहारि
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल
https://www.esakal.com/desh/farooq-abdullah-chargesheeted-in-money-laund...
आरोप सिद्ध झाला तर, दोषींवर कारवाई व्हायलाच हवी....
26 Jul 2022 - 5:46 pm | श्रीगुरुजी
राणे आता मुलाखतीत जोरदार फटकेबाजी करताहेत.
26 Jul 2022 - 6:32 pm | जेम्स वांड
वरील परिच्छेद हा गुरुजींच्याच एका जुन्या प्रतिसादातील आहे
गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव
वरील सगळे गुण शुचिर्भूत होऊन आता फटकेबाजी झालेत म्हणायचं का गुरुजी ??
२-३ तालुके प्रभाव असणारा नेता अन कुटुंबिय असे आपणच म्हणाले होते असे ही दिसते आहे....
तेव्हा "राणे हा जिल्हा पातळी नेता ही नाही"
आता "राणे फटकेबाजी करताहेत बस क्या ?"
तुम्ही म्हणे विधानसभेत भाजपला मतदान करणार नाही घोषित केले आहेत ?
अरे हो, खफवर लिहायचे राहिले होते आता तो नारायण पासून ते नारायणराव झालेले राणे जी
मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत न ?
26 Jul 2022 - 10:04 pm | डँबिस००७
विश्व प्रसिद्ध ब्लुंबर्ग ने येऊ घातलेल्या
जागतीक आर्थिक मंदीत जगातील महत्वाच्या देशांची संभाव्य स्थितीवर आपला अहवाल सादर केलेला आहे.
ब्लुंबर्गच्या अश्या अहवालाला जगात खुप महत्व दिल जात.
ब्लुंबर्गच्या अहवाला प्रमाणे भारताला जागतीक आर्थिक मंदीची झळ बसण्याची शक्यता ०% आहे. भक्कम परकीय वित्तीय गंगाजळी व रीझर्व बँकेच्या कठोर व योग्य नियोजनामुळेच हे शक्य आहे अस ब्लुंबर्गच म्हणण आहे.
https://youtu.be/9X_SSPFtPPA
26 Jul 2022 - 10:30 pm | सुक्या
हायला .. मोदींनी ब्लुंबर्ग पण विकत घेतले ?