तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं.
अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो.
ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली.
"आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं
"मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं.
" इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं.
" . . . . "
" तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर..
तुझ्याकडे आता एकही पैसा नाहीये. त्यामुळे तु तसलं काहीही करु शकणार नाहीस.आता मीच तुझं वर्तमान आहे"
प्रतिक्रिया
16 Jun 2022 - 5:49 pm | तर्कवादी
[उगाच मोठा लेखक वगैरे असल्याचा आव आणत अशी प्रस्तावना लिहिणं म्हणजे एकदम भारी वाटतं म्हणून खरडतोय :)]
सुरुवातीचे दोन शब्दः
तर मंडळी काल रात्री , खरंतर आज उत्तररात्री वा पहाटे एक वाईट कथानक सुचले. त्याचं असं झालं की मला बरं वाटत नव्हतं. अंगात बारीक ताप. त्यामुळे झोप लागत नव्हती. त्यात झोपण्यापुर्वी एक 'तसला' व्हिडीओ बघितला होता. खरं तर मला आता 'त्या' विषयाचा वीट आलाय पण तरी तो व्हिडिओ बघितला. डोक्यात गेला हो अगदी ( आता मी का बघितला ? .. होते राव चुक कधी कधी ) तर झोप लागण्याची वाट बघत बिछान्यात अस्वस्थपणे तळमळत असताना त्या व्हिडिओतला विषय नको असतानाही पुन्हा पुन्हा डोक्यात घोळू लागला. मग एक कल्पना सुचली किंवा एक विरोधाभास सुचला असं म्हणेन , त्यातून मग एक वाईट कथानक सुचले. आता ते वाईट असो की अतिवाईट लिहायला तर हवे आणि आपल्या मिपाकर मंडळींच्या माथी तर मारायला हवेच ना. नुकत्याच पार पडलेल्या शशक स्पर्धाचा ज्वर अजूनही पुरता ओसरला नसल्याने शशकच लिहिण्याचा विचार केला.
शशकचे गुण ते काय वर्णावेत ? आहाहा.. अचाट कथेची अगम्य मांडणी, चक्रावणारा शेवट, भरकटवणारे शीर्षक .. वाचकावर फुल्ल टू जुलूम करता येतो. तसंही स्पर्धेतली माझी धडपड विजयी न झाल्याने समस्त मिपाकरांवर सूड उगावण्याची हीच ती संधी साधत ही शशक लिहून प्रसिद्ध केली :) आणि हा जुलूम थोडा सुसह्य व्हावा म्हणून कथेत एका सुमधूर गाण्याचा दुवा दिला आहे त्याचा आनंद घ्यावा.
लोभ असावा __/\__
आपलाच ,
तर्कवादी
उरलेले दोन शब्दः
[ते चार-पाच दिवसानंतर हो.. तोवर सेवेचा लाभ घ्यावा :)]
16 Jun 2022 - 6:39 pm | अमरेंद्र बाहुबली
तसंही स्पर्धेतली माझी धडपड विजयी न झाल्याने
जे जिंकले त्यांचा आयडी ब्लाॅक मारून त्यांना बक्षीस देण्यात आलं. तुम्हालाही हवंय का बक्षीस?17 Jun 2022 - 4:11 pm | तर्कवादी
तो आयडी ब्लॉक होण्याचा स्पर्धेशी काही संबंध नसावा. पण जे झाले ते खेदजनक. स्पर्धा जिंकणारा आय डी असा अचानकपणे गायब व्हावा हे काही ठीक नाही झाले.
16 Jun 2022 - 6:21 pm | विजुभाऊ
कथेपेक्षा विश्लेषण मोठे झालं यातच कथेचे यश सामावलेले असते
17 Jun 2022 - 4:16 pm | तर्कवादी
विश्लेषण नाही प्रस्तावना दिलीय. असो.
आणि यश/अपयश वगैरे काही नाही.. केवळ गंमत , मजा-मस्ती वा टाईमपास म्हणून ही कथा प्रसिद्ध केलीय.. म्हणूनच प्रस्तावनेत मी सरळच म्हंटल की हे एक वाईट कथानक आहे ..आणि त्याला अधिक वाईट पद्धतीने लिहिलंय हे वेगळे सांगायलाच नको :)
मिपाकरांनी त्याची मजा घ्यावी, कथेचे वेगवेगळे अर्थ लावावेत नाहीतर यथेच्छ चिंध्या फाडाव्यात ..हॅव फन...नथिंग सिरीयस..