!! सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम !!
बातमी कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाने नुकतेच एक सुंदर असे मराठी संकेतस्थळ सुरू केले आहे येथे टिचकी मारा व या संकेतस्थळावरही वावरा.
आपला
कॉ.विकि
!! सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम !!
बातमी कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाने नुकतेच एक सुंदर असे मराठी संकेतस्थळ सुरू केले आहे येथे टिचकी मारा व या संकेतस्थळावरही वावरा.
आपला
कॉ.विकि
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 4:53 pm | विसुनाना
माकपाचे हे संकेतस्थळ अजून अर्धवट असल्याचे दिसते. पक्षाच्या कार्यक्रमाची पाने चुकीच्या दुव्यामुळे दिसत नाहीत.
तरीही माकपाचे अभिनंदन!
हे संकेतस्थळ कॉ. विकी यांनीच तयार केले असेल तर योग्य ती दुरुस्ती करावी.
कॉ. उद्धव भवलकर हेच कॉ. विकी काय?
28 Apr 2009 - 4:56 pm | विकि
हे संकेतस्थळ मी तयार केलेले नाही माकपच्या जीवनमार्ग या मुखपत्रात या विषयी आताच वाचले आणि मिपावर लिहीले.
28 Apr 2009 - 5:05 pm | विकास
असे मराठी (प्रादेशिक) संकेतस्थळ सुरू करण्याची कल्पना नक्कीच चांगली आणि स्वागतार्ह आहे. (स्वगतः तिथे जाऊन लेख लिहायला हवेत ;) )
बाकी इतर मार्क्सवादी वेबसाईट च्या अंतर्गत "गुगल समाचार" असे नाव वाचून गंमत वाटली (जणू काही गुगल मार्क्सवादी आहे असा अर्थ होतो).
बाकी एक गोष्ट या संकेतस्थळात "मिसिंग" आहे: RSS Feeds :-)
28 Apr 2009 - 7:00 pm | सुनील
बाकी एक गोष्ट या संकेतस्थळात "मिसिंग" आहे: RSS Feeds
=))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Apr 2009 - 5:10 pm | विकि
तुमच म्हणण अगदी योग्य आहे त्याबाबत संकेतस्थळ चालविणार्यांशी संपर्क साधायला हवा.
28 Apr 2009 - 5:13 pm | वाचक
अगदी खाली जाउन बघा आयकॉन दिसेल
ही लिंक आरएसएस फीड्स
28 Apr 2009 - 6:45 pm | विकास
अहो मी जेंव्हा मार्क्सवादी पक्षाच्या संकेतस्थळावर "rss feeds" (हे शब्द) दिसले नाहीत म्हणतो तेंव्हा त्यात "पन इंटेन्डेड" अर्थात "द्व्यर्थी" उद्देश असतो.... ;)
28 Apr 2009 - 6:57 pm | वाचक
अरेच्चा - क्षमा - सकाळी घाईत हा 'श्लेष' लक्षातच आला नाही :)
30 Apr 2009 - 9:03 am | राघव
कोटी म्हणायचे असावे बहुदा तुम्हाला!! ;)
राघव
28 Apr 2009 - 5:16 pm | प्रमोद देव
सभासत Online
आपले स्वागत आहे मार्क्सवादी क्म्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय वेबसाईट्वर!
संकेतस्थळ अजूनही बाल्यावस्थेत दिसतंय. वर दाखवलेल्या टंकलेखनाच्या सहजपणाने नजरेत भरणार्या चुका कशा टाळता येतील हे पाहावे.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
28 Apr 2009 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते
कॉ. विकि, वाकडा सलाम!!! (ह.घ्या.)
हे संकेतस्थळ आताच बघितले. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थळ मराठीत आले ही एक चांगली घटना आहे. तुमच्या पक्षाचे अभिनंदन.
माझी काही निरीक्षणं आणि मतं:
०१. संस्थळावर इंग्रजीचा खूपच प्रभाव दिसतो आहे. "आपले स्वागत आहे मार्क्सवादी क्म्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय वेबसाईट्वर!" हे वाक्य मराठीत असले तरी वाक्यरचना पूर्णपणे इंग्रजाळलेली आहे. (चिं. वि. जोश्यांच्या काही कथांमधे अशा वाक्यरचना विडंबनात्मक म्हणून वापरल्या आहेत.)
०२. मराठी शब्द चुकीचे लिहिले आहेत. सभासद ==> सभासत.
०३. फाँट बरोबर दिसत नाहीयेत.
०४. गोरगरिबांची बाजू घेण्याची इच्छा असलेल्या पक्षाच्या संस्थळावर स्टालिन सारख्या क्रूरकर्म्याचा फोटो खटकला.
बिपिन कार्यकर्ते
28 Apr 2009 - 6:53 pm | क्लिंटन
>>गोरगरिबांची बाजू घेण्याची इच्छा असलेल्या पक्षाच्या संस्थळावर स्टालिन सारख्या क्रूरकर्म्याचा फोटो खटकला.
अहो या पक्षाने गोरगरीबांची बाजू घेत तशा अनेक गोष्टी केल्या आहेत. स्टॅलिनच्या एका फोटोचे काय घेऊन बसलात?
याच पक्षाने १९६२ च्या युध्दानंतर बिनदिक्कतपणे चीनचे समर्थन केले.
याच पक्षाचे नेते आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या अहिल्या रांगणेकर यांचे बंधू बी.टी.रणदिवे यांनी विभाजनपूर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते असताना १९४८ साली नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारत देशाच्या सरकारविरूध्द ’हे स्वातंत्र्य खोटे आहे’ असे म्हणत हे सरकार उलथवून लावा असा नारा दिला होता. रणदिव्यांनीच भारत सरकार हे साम्राज्यवाद्यांच्या हातातले बाहुले असून सशस्त्र क्रांतीनेच ते उलथवून लावले पाहिजे असे म्हटले.
याच पक्षाच्या पूर्वसुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १९४२ च्या चलेजाव चळवळीत रशियाच्या सांगण्यावरून भाग घेतला नव्हता . काँग्रेसमधील राजगोपालाचारी यांच्यासारख्या नेत्यांचा चळवळीला व्यूहरचनात्मक दृष्ट्या विरोध होता. तसेच सावरकरांनीही ’Quit India' चळवळ 'Split India' बनेल असे सांगितले होते. मात्र भारतातील कम्युनिस्टांचा विरोध मात्र रशियातून आलेल्या आदेशावर होता. कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना आपल्या देशाचे हितसंबंध जपणे हा एकमेव मापदंड असायला हवा.रशियात किंवा इतर देशांमध्ये काय घडते किंवा त्या देशांचे हित कशात आहे यावर इथल्या लोकांनी आपली भूमिका ठरविणे सर्वथैव चुकीचे आहे.चलेजाव चळवळीने भारताचे हित होणार नाही असे वाटत असेल तर जरूर चळवळीपासून दूर रहा पण त्यामुळे रशियाचे हित साधले जाणार नाही हा विचार करून चळवळीपासून दूर राहणे कसे समर्थनीय ठरेल?
तीच गोष्ट वाढत्या भारत-अमेरिका संबंधांची. असे संबंध ठेवल्यास भारताचे नुकसान होईल असे वाटत असेल तर जरूर त्यास विरोध करा काही हरकत नाही. पण याच पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांचे म्हणणे आहे की वाढते भारत-अमेरिका संबंध चीनच्या विरोधात आहेत म्हणून त्यास यांचा विरोध. बघा चीनचे हितसंबंध राखायची किती तळमळ लागून गेली आहे यांना. माओ-डेंग यांच्या आत्म्यांना अगदी गहिवरून आले असेल ही मुक्ताफळे ऐकून!
या अशा विचारसरणीची गरज भारतात नसून चीनमध्ये आहे असे माझे स्पष्ट मत आहे आणि अशा मंडळींना चीनमध्ये हाकलून दिले तर तो भारतासाठी मोठा सोन्याचा दिवस असेल. मिपाच्या धोरणांना अनुसरून माझा प्रतिसाद नसेल आणि तो संपादित केला तर काही हरकत नाही. पण कम्युनिस्ट ही भारताला मोठी किड लागली आहे असे माझे स्पष्ट मत आहे आणि ते बदलण्याची मला जराही गरज वाटत नाही.
याच कम्युनिस्ट पक्षाने हे सगळे प्रकार गोरगरीबांच्या नावानेच तर केले आहेत. मग एका फोटोचे काय घेऊन बसलात? ती तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
28 Apr 2009 - 7:28 pm | यशोधरा
>>कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना आपल्या देशाचे हितसंबंध जपणे हा एकमेव मापदंड असायला हवा.
केवढी मोठी ही अपेक्षा!! ;) :D
>>पण कम्युनिस्ट ही भारताला मोठी किड लागली आहे >>
पूर्ण अनुमोदन.
29 Apr 2009 - 1:28 am | हरकाम्या
क्लिंटन्साहेब भेटीबद्दल आभार मीही तुमच्या मताशी सहमत आहे. आपले दुर्दैव असे की या हरामखोर मंडळींना
आपण देशाबाहेर हाकलु शकत नाही.
28 Apr 2009 - 5:47 pm | श्रावण मोडक
इतक्या बाल्यावस्थेत संकेतस्थळ 'गो लाईव्ह' (आयला, सॅपमधली ही टर्म इथं कुठं आली असं कोण म्हणतंय ते...) करण्याची घाई का केली? 'ऐतिहासीक घोडचुकां'ची परंपरा कायम राखण्यासाठी?
प्रमोद देवांनी, बिपिनने काही चुका दाखवल्या आहेतच. त्यापलीकडे इंग्रजीतलं होम काय, संर्पक काय, चर्चित माहिती काय अगागागागा... आणि बिपिन, मार्क्सच्या आधी येचुरी, वृंदा आहेत. त्यात काही संकेत असावा काय?
सुधारणा करा, त्यासाठी खंडीभर शुभेच्छा.
28 Apr 2009 - 6:27 pm | मुक्तसुनीत
माझी प्रतिक्रिया मिळतीजुळती आहे. संस्थळ उघडल्या उघडल्या त्यातल्या निष्काळजीपणामुळे बंद करावेसे वाटते. मग हे वाचणार कोण आणि मग प्रकाशित तरी करायचे कशाला ? शाळकरी पोरांचे प्रोजेक्ट्स यापेक्षा जास्त बरे , निदान पुन्हा उघडून पहावे इतपत काहीतरी करून दाखवण्याची किमान इच्छाशक्ती दर्शविणारे असतात. हे संस्थळ म्हणजे "वेबसाईट हवी ना ! ही घ्या वेबसाईट ! वाचा काय वाचायचे ते !" यातली गत :-)
28 Apr 2009 - 7:26 pm | संदीप चित्रे
असेच म्हणतो...
संस्थळ उघडल्यावर पहिली गोष्ट वाटली ती म्हणजे लगेच बंद करावं !
28 Apr 2009 - 7:34 pm | चतुरंग
उजवीकडे सतत फिरणारा तो कोयता-हातोडा कधी डोक्यात बसेल याचा नेम नाही अशी भीती वाटत रहाते! ;) बर्याच सुधारणा आवश्यक.
(खुद के साथ बातां : रंगा, संस्थळ निर्मितीचे काम चीनमधे झाले असावे का? कारण मराठीची जी वाट लावली आहे ती अभूतपूर्व आहे! ;) )
चतुरंग
28 Apr 2009 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते
हे तर काहीच नाही...
मुसु, रंगा, संदीप..... जालावर थोडी शोधाशोध करत होतो कम्युनिस्ट, पार्ट्या आणि त्यांचे इतिहास याबद्दल. बरेचसे माहित होते... काही परत एकदा कन्फर्म करायचे होते. शोधता शोधता पाकिस्तानच्या कम्युनिस्ट पार्टीचे संस्थळ मिळाले. मी मेलो कसा नाही ते संस्थळ बघून हेच कळत नाहीये मला. वर उल्लेखिलेल्या संस्थळाच्या रंगसंगतीने डोक्यात हातोडा पडत असेल तर पाकिस्तानी पार्टीच्या साईटने माणूस डायरेक्ट वरच जायला पाहिजे. ;)
हीच ती साईट... (स्वत:च्या जबाबदारीवर बघणे) http://www.cppak.org/
अवांतर: रंगा, या मराठी आणि पाकी संस्थळामुळे आपल्या डोळ्याला त्रास झाला हे आपल्या ब्राह्मणी विचारसरणीमुळेच असणार. ;)
सगळ्यांनी ह.घ्या.
बिपिन कार्यकर्ते
28 Apr 2009 - 7:50 pm | चतुरंग
ह्यांनी तर संपूर्णच लाल करुन घेतली आहे, साईट म्हणतोय मी!
मला वाटलं इथे हातोडा आणि कोयता डाव्या बाजूला आणि डावीकडे फिरत असेल पण तसं काही दिसलं नाही! विसरले वाटतं. ;) (जाम ह.घ्या.)
चतुरंग
28 Apr 2009 - 8:00 pm | दवबिन्दु
उन्द्याला पाकीस्तानमधे कम्युनिस्टाच लाल राज्य येनार हाये. म्हंजे पुढल्या म्हैन्यात तालिबान पाकवर कब्जा करनार आनि तालिबान तितल्या कमुनिश्ट लोकान्ला सिर काटुन लाल रन्गामधे रंगवनार. झाला की नाय पाकीस्तान कम्मुनिजमने लालिलाल.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
28 Apr 2009 - 10:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कं. अदितीकडून वाकडा सलाम करण्यासाठी वाकडा प्रतिसाद (ह. घ्या)
त्या वेबसाईटवर मी सगळ्यात पहिले काय केलं असेल तर ते अंगावर येणारं विळा, हातोडा आणि चांदणीचं फिरतं चित्रं 'ऍडब्लॉक'च्या फिल्टर्समधे टाकलं. हुश्श, आता वाचण्यासारखं काही आहे का ते पहायला हरकत नव्हती.
पहिल्याच पानांवर दोन लालभाईंची माहिती आहे पण वेबसाईट हे माध्यम वेगळं असताना तिथेही 'पान सत्राशेपन्नासवर पहा' टाईप मजकूर पाहूनमात्र मी दचकलेच. दोन छोटे लेख स्कॅन करून टाकायच्या ऐवजी टंकित केले असते तर वाचणार्यांची बरीच सोय झाली असती.
आणखी एक शंका: कम्युनिस्ट का कम्युनिष्ठ?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
28 Apr 2009 - 10:37 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण तर बाबा 'कम्मो'निष्ठ.... :X
बिपिन कार्यकर्ते
28 Apr 2009 - 11:08 pm | विकास
>>>कम्युनिस्ट का कम्युनिष्ठ?
कमीनिष्ठ (म्हणजे देशापायी कमी निष्ठा असलेले) :-)
28 Apr 2009 - 11:49 pm | संदीप चित्रे
मी माकपची साईट बघून लिहिणार होतो की लाल रंग खूप दिसतोय पण इथे तर तेवढा एकच रंग दिसतोय.
रंग्या -- तुझ्या कॉमेंटसाठी =D>
28 Apr 2009 - 6:41 pm | नितिन थत्ते
संस्थळाचा यु आर एल डॉट को डॉट इन कसा? डॉट ऑर्ग का नाही?
ई सकाळ प्रमाणे फॉण्ट बटबटीत झाले आहेत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
28 Apr 2009 - 8:07 pm | दवबिन्दु
दिसत नाय. अहल्याताई गेल्या त्याबदल एक पन शब्द नाय. छि.थु.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
28 Apr 2009 - 8:43 pm | विकास
अहल्याताई गेल्या त्याबदल एक पन शब्द नाय. छि.थु.
एकदम मान्य! तेच वास्तवीक मला इथे कम्युनिस्ट म्हणून वावरणार्यांच्या संदर्भात खटकले (एकानेही अहील्याबाईंच्या धाग्यात एक शब्द लिहीला नव्हता).
28 Apr 2009 - 8:21 pm | ढ
देणार्यांची संख्या:
आज : १३१
काल : १
परवा : ३
हा मिपा इफेक्ट आहे ! :D
28 Apr 2009 - 9:32 pm | टारझन
प्रतिक्रिया वाचून अक्षरशः फुटलो आहे !!
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
मुक्तसुनित , चतुरंग ,बिप्स आणि चित्रे,मोडक आणि क्लिंटण साहेब ... आपण धन्य आहात
____/\____
29 Apr 2009 - 12:03 am | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो...
_____________________________
28 Apr 2009 - 11:08 pm | उमेश__
विकी तुझ्या भावना सर्वांपर्यंत पोहचल्या आहेत.........आता तुझा लेख काढून टाक नाहीतर या ही पेक्षा छान प्रतिक्रिया येतील..........आणि यापुढे पुढील मजकुर विचार करुन छाप
बातमी कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाने नुकतेच एक सुंदर >:P असे मराठी संकेतस्थळ सुरू केले आहे
28 Apr 2009 - 11:57 pm | विकि
आपल्यापैकी बरेचजण कम्युनिष्ठांविरुध्द आहात हे मान्य केले तरी प्रत्येकाने कम्युनिष्ठांना किंवा कोणालाही संधी मिळेल तेव्हा धोपटण्याचा वैचारीक मोह टाळायला हवा.हा मोह टाळला की आपोआपच मिपावरील भांडणे कमी होतील.
आपला(सध्या सौम्य शब्दात प्रहार करणारा)
कॉ.विकि
29 Apr 2009 - 12:01 am | चतुरंग
आम्ही नाही बॉ मोह बिह टाळत, आम्ही सतत विडंबनाची मोगरी हातात घेऊनच हिंडत असतो दिसला की धू, दिसला धू! ;)
चार द्यायचे, चार घ्यायचे काय म्हणता? :>
चतुरंग
29 Apr 2009 - 8:38 am | प्रमोद देव
विकी नावाचा हा जो कुणी प्राणी आहे तो अतिशय एकांगी मनोवृत्तीचा आहे असे माझे आजवरचे निरीक्षण आहे. मनोगतापासून मी त्याला पाहतोय. एक-दोन ओळींचा चर्चाप्रस्ताव देऊन नंतर त्यात सहसा भाग न घेणे,चुकून माकून कधी भाग घेतलाच तर तत्वांना विरोध न करता वैयक्तिक दोषारोप करणे , उठसुठ ब्राह्मणी संस्कृतीवर घसरणे अशा संकुचित विचारांचा हा जातीयवादी प्राणी आहे असे माझे अनुभवांती झालेले मत आहे. तेव्हा लोकहो ह्या माणसाला फार गंभीरपणे घेऊ नका.
स्वत:ला कॉम्रेड म्हणवणारा हा प्राणी 'कॉ.अहिल्याताई रांगणेकर' ह्यांच्या निधनानिमित्त दुखवटा व्यक्त करण्याचा साधा शिष्टाचारही पाळू शकला नाही.
बाबासाहेबांच्या जयंती/पुण्यतिथीनिमित्त मिपावर का कुणी काही लिहीले नाही असे आगाऊपणे विचारणार्या ह्या प्राण्याला स्वतःला त्यांच्याबद्दल चार शब्द लिहावे असे कधीच वाटलेले नाही. स्वतः काही विधायक करायचे नाही आणि इतरांना फुकटमध्ये सल्ले देत राहायचे इतकाच ह्याचा पराक्रम आहे.
माझा विकीला एक सल्ला आहे की बाळा,(तू मला आजोबा म्हणतोस म्हणून मी त्या अधिकारात तुला बाळा म्हणतोय) आधी स्वतःचा शोध घे. स्वतःला समजून घे आणि मग इतरांवर टिकाटीप्पणी कर.
अजून बरेच लिहीता येईल पण सद्या इतकेच पुरे.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
29 Apr 2009 - 1:00 pm | विकि
मी आजोंबांना उत्तर देऊ शकत नाही कारण आजोबांना उत्तर दिल्यास त्यांना उलट उत्तर करतो असे होईल त्यामुळे केवळ त्यांनी दिलेल्या सुचनांचा विचार करेन.वयाने मोठी असणारी माणसे कधीकधी रागाने बोलतात पण त्यांचे फार काही मनावर घ्यायचे नसते. राग निवळला की ...................................
कळावे
29 Apr 2009 - 12:07 am | नितिन थत्ते
धोपटण्यासाठी का होइना, एवढ्या जणांनी ती साईट पाहिली.
विकिसाहेब तुम्ही राग मानू नका हो. तिकडे पाचलगांनी संघाचा धागा काढला होता तेव्हा पण सगळ्यांनी संघाला धोपटून घेतले होते.
स्वगतः मेथांबाराव मौनात आहेत वाटते. की विकि हेच मेथांबा आहेत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
29 Apr 2009 - 12:10 am | विकि
तात्यांनाही असेच वाटत असावे.
29 Apr 2009 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते
विकि,
इथल्या सगळ्याच टिप्पण्या या ते करणारे लोक केवळ कम्युनिस्टविरोधी आहेत म्हणून केल्या गेल्या आहेत असे म्हणणे केवळ चुकीचे आहे. किंबहुना कोणतीही टीका, ती करणारा माणूस, बूर्झ्वा किंवा प्रतिगामी किंवा ब्राह्मणीविचारांचा आहे असे म्हणून उडवून लावायची असेच का नेहमी चालते? वर उल्लेखलेल्या मुद्द्यांपैकी कोणते मुद्दे चूक आहेत असे तुम्हाला वाटते?
मी माझ्यापुरते बोलतो. मी शक्य तितक्या समतोल किंवा अपूर्वगृहदूषित दृष्टीने ती आणि इतर संस्थळे बघितली. जे चूक किंवा त्रासदायक वाटले त्याबद्दल लिहिले. वर असे संस्थळ आल्याबद्दल आनंदच व्यक्त केला. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे लिहिले. याला तुम्ही विधायक टीका (कंस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम) मानणार नाही का? का वरील काही शेलकी विशेषणं लावून दुर्लक्ष करणार? तसं असेल तर संवादच खुंटेल. असो.
जेव्हा जेव्हा संघावर चर्चा झालेली आहे तेव्हा पण मंडळींनी हात धुवून घेतलेच आहेत की? मग हे फक्त कम्युनिस्टांच्याच बाबतीत होते असे म्हणणे कितपत बरोबर आहे?
मी यानिमित्ताने आपल्याला परत एकदा विनंति करतो की आपल्या विचारांबद्दल वगैरे माहितीपूर्ण लेखमाला लिहा किंवा आपल्या समानधर्मींपैकी कोणास प्रवृत्त करावे. चर्चा झाली आणि प्रश्न विचारले गेले की त्याची उत्तरे द्यावीत. http://www.misalpav.com/node/5706 या धाग्यावर पण बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. मनावर घ्या.
बिपिन कार्यकर्ते
29 Apr 2009 - 12:31 am | चतुरंग
जोक्स अपार्ट विकी, चर्चा करायची असेल तर जरुर मुद्दे मांडा आम्ही चर्चा करु, प्रश्न विचारु त्यांची उत्तरे द्या, तुम्ही प्रश्न विचारा. विचारांना विरोध असू शकतो पण त्याचा प्रतिवाद चर्चेतूनच व्हावा.
साईटबद्दल जे उघडउघड खटकणारे आहे ते सर्वांनीच वेगवेगळ्या शब्दात सांगितले आहे. त्यातला मतितार्थ ध्यानात घ्यावा.
चतुरंग
29 Apr 2009 - 1:18 am | श्रावण मोडक
झिंदाबाद!
उत्पादन साधनांवर कब्जा (शब्दांचे खेळ इथे खूप चालतात, म्हणूनच ताबा. नियंत्रण, हुकमत वगैरेही विचारात घ्या) करा, असे म्हणे मार्क्स म्हणाला होता. हा एक कब्जा आहे. कशावर ठाऊक आहे - वेबसाईट नावाची एक चीज असते आणि आमची वेबसाईट आहे, हे सांगता येणे हेही एक हत्यार आहे या जाणिवेवर कब्जा. ही जाणीव म्हणजे हत्यार आहे का? कोणी मार्क्सवाद्यानेच सांगावे.
वेबसाईट हे जनसंपर्काचे माध्यम असे बहुतांशी भांडवलशाही कंपन्या मानतात. जन हा शब्द महत्त्वाचा. जन म्हणजे पीपल म्हणा, लोक म्हणा किंवा आणखी काहीही. भांडवलशाही व्यवस्थेतील ग्राहक किंवा गिऱ्हाईक म्हणा.
ही वेबसाईट चालवण्यासाठी जे लागते त्याला भांडवल म्हणतात का, हे कोणी सांगेल का? तात्या किंवा इतर कोणीही...
बाकी काही असो, मार्क्सवाद्यांच्या )मी मार्क्सवादी नाही, असे म्हणणाऱ्या त्या गृहस्थाचा हा अवमानच की( या नव्या हत्यारावरच्या कब्जाला हसावे तितके थोडेच ('हा'च्या अलीकडंपासून ते 'की'पुढचा कंस उलटे टाकण्याचे डोक्यात आले हे महत्त्वाचे. कसं, दृष्टिकोन बदलतो ना एकदम!!! आता इथं 'कं'स आणि क'सं' यातही दृष्टिकोन बदलतो आहे हे वेगळे).
स्वगत : )हे आपलं सगळ्यांनीच काही म्हटले म्हणून( आपणही एक वेबसाईट..., नकोच; पोर्टल, काढावं का?
'बातमी कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की' याची चाल अगदी 'कळवण्यास अत्यंत दुःख होते की' अशी का आहे बरं? पुन्हा शीर्षकातील 'आणखी एक' या शब्दांचे प्रयोजन काय असावे?
चर्चा? १००-१०० वाक्यं खर्ची टाकण्यासाठी अशी जागा उत्तम.
29 Apr 2009 - 1:28 am | Nile
वा!!! सुंदर!!!
29 Apr 2009 - 1:23 am | हरकाम्या
आतापर्यंत बर्याच बाहेरच्या लोकांनी येउन या मराठि लोकांचे वाटोळे केले हीच मंडळी तेवढि राहिलि होती.
29 Apr 2009 - 7:14 am | अवलिया
संकेतस्थळाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !!
--अवलिया
29 Apr 2009 - 11:36 am | आंबोळी
प्रमोद देव, बिका, श्रावण मोडक यांचे प्रतिसाद आवडले.
विशेषतः देवांनी विकीचे केलेले पोस्टमॉर्टेम.
तो काही उत्तरे देइल असे वाटत नाही.
(धारी)आंबोळी
29 Apr 2009 - 1:14 pm | इनोबा म्हणे
मार्क्सवाद्यांचे संस्थळ ही त्यांच्यासारखेच अर्धवट अवस्थेत आहे.