5 मे

नगरी's picture
नगरी in जनातलं, मनातलं
5 May 2022 - 12:48 pm

आज 5 मे,
थोर संगीतकार नौशाद अली यांचा स्मृतिदिन. हा धागा त्या साठी , मिपाकरांनी त्यांच्या आठवणी आणि आवडती गाणी प्रतिसादात लिहावीत.
1982-83 सालचा काळ असावा,त्यावेळी घरी b/w tv घेतला होता.त्यावर फक्त मुंबई दूरदर्शन दिसे,ते ही 30 फुटी अँटेना लावल्यावर. त्यावर एकदा नौशादजींची मुलाखत ऐकली होती. त्यातला एक किस्सा आजही आठवणीत आहे.
त्या वेळी ते मुंबईत इंडस्ट्रीत नशीब अजमावल्याला आले होते. दादरला एका स्टुडिओत प्रयत्न चालू होते पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्या स्टुडिओच्या समोरील एक पुस्तक दुकानात ते काम करीत आणि रात्री त्या दुकानाच्या बाहेरील फडताळावर झोपत. त्यांच्याच शब्दात- "मुझे वो रास्ता क्रॉस करने के लिये ग्याराह साल लगे".
त्यांच्या स्मृतीस अभिवादन

संगीतविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

5 May 2022 - 12:51 pm | कुमार१

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

नौशाद म्हंटलं की अगदी जुनी गाणी आठवतात .. जुन्या कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यातली. जास्त करुन दिलीप कुमारच्या चित्रपटांना नौशादचं संगीत असायचं .. बैजू बावरा, गंगा-जमुना वगैरे चित्रपट ही नौशादजींची ओळख सांगतात..
पण नौशादची काही नवीन आणि वेगळ्या धाटणीची गाणी इथे देण्याचा मोह होत आहे.

नगरी's picture

5 May 2022 - 2:41 pm | नगरी

असूच शकत नाही, तरी मी पाहतो

नगरी's picture

6 May 2022 - 12:27 pm | नगरी

हा राव खरंय!

नगरी's picture

6 May 2022 - 12:30 pm | नगरी

साठी बुद्धि नाठी! दुसरे काय

सौन्दर्य's picture

5 May 2022 - 10:50 pm | सौन्दर्य

नौशादजींनी प्रचंड सुंदर सुंदर गाण्यांना संगीत दिलं, किंबहुना त्यांच्या संगीतामुळेच ती गाणी सुंदर झाली असं म्हंटलं तरी चालेल. 'जाब प्यार किया तो डरना क्या' हे त्यांचं आस्चसुंदर अजरामर गाणं आहे जे मला प्रचंड आवडतं.

नगरी's picture

6 May 2022 - 12:37 pm | नगरी

मला सर्वच आवडतात पण 'मन तरपत' जास्त.
मोगले आजम तर मस्तच

चौथा कोनाडा's picture

6 May 2022 - 12:54 pm | चौथा कोनाडा

मुहब्बत का इक देवतासा मिला,
खुदा तो नही, पर खुदासा मिला ||

आवडले गाणे. आधी ऐकल्याचे आठवते. पण सिनेमा नव्हता पाहिला.
माझा आवडता ऑलराऊंडर गोविंदा आणि नृत्यनिपुण मिनाक्षी पाहून सुखद धक्का बसला.
गोविंदा नृत्यनिपुण असुन सुद्धा त्याला अतिशय संयत स्टेप्स आहेत.

वाटत नाही की हे गाणे नौशादजींचे असेल !

लतादिदींचा आवाज, गीताचे बोल आणि नौशाद जींचे (कालानुरुप) संगीत, छान कोरियोग्राफी, समर्पक सेट यामुळे हे गाणे सुंदरच झाले आहे !

नगरी's picture

6 May 2022 - 1:29 pm | नगरी

अरे पण माणूस असा कसा बदलू शकतो?
शास्त्रीय संगीताची बैठक असणारा माणूस असा कसा बदलू शकतो!

तर्कवादी's picture

6 May 2022 - 6:45 pm | तर्कवादी

शास्त्रीय संगीताची बैठक असणारा माणूस असा कसा बदलू शकतो!

आपणही वेगळं काही करु शकतो का हे बघायचं असू शकतो.. मला तरी यात फार काही अयोग्य असं वाटत नाही.. वेगळा अनुभव थोडा... नेहमी साडी नेसणार्‍या , पारंपारिक राहणीमान असलेल्या गृहिणीने कधीतरी फिरायला गेल्यावर जीन्स टी शर्ट घालून फोटो काढून हौस भागविण्यासारखं...
बाकी वर मी नमूद केलेलं "मेरा प्यार भी तु है..." हे पण शास्त्रीय वाटत नाही (नक्की माहित नाही, जाणकारांनी अधिक माहिती पुरवावी). पण खूप सुरेख गाण आहे ते

कारण ही सगळी माणसे आहेत. कारण माणूस बदलतो. आणि कोणताही माणूस परफेक्ट असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या ९९ चांगल्या गोष्टींविषयी आदर असेल, तर एका वाईट्/न पटणार्‍या गोष्टीने तो आदर कमी/नाहिसा होणे ठीक नाही. आणि तसे होत असेल, तर तो आदर मुळातच तकलादू आहे, हे नक्की!

बाकी खालील व्हिडिओ पाहून काही 'आपली' गाणी आठवू शकतात.
* यात अन्नू मलिक, राजेश रोशन, जतिन ललित या दिग्गजांचे व्हिडिओ घेतले, तर धाग्याहून मोठा प्रतिसाद होईल. (असाही हा शशधा - शतशब्दधागा - आहे).

१. लक्ष्मीकांत प्यारेलाल :

२. सलिल चौधरी

३. ओ. पी. नय्यर

४. परत ओ. पी. नय्यर

५. आर. डी. बर्मन

चंद्रसूर्यकुमार's picture

7 May 2022 - 12:42 pm | चंद्रसूर्यकुमार

अरे पण माणूस असा कसा बदलू शकतो?

ही मंडळी नक्की कसा आणि काय विचार करतात हे आपल्यासारख्या सामान्यांच्या झेपेपलीकडचे असते.

आनंद, चुपके चुपके, अनाडी, गोलमाल असे चित्रपट देणारे हृषिकेश मुखर्जी झूठ बोले कव्वा काटे सारखा सुमार चित्रपटही देऊ शकतात यावर कोणाला विश्वास बसू शकेल का? पण ती सत्य परिस्थिती आहे.

Nitin Palkar's picture

6 May 2022 - 9:25 pm | Nitin Palkar

नौशादजी खरोखरी एक थोर संगीतकार होते. पण किशोर कुमार सारख्या गुणी कलाकाराशी मात्र त्यांचे सूर जुळले नाहीत. 'सुनहरा संसार' या चित्रपटासाठी अशा भोसले आणि किशोर कुमार यांचे एक द्वंद्व गीत नौशाद यांनी संगीतबद्ध केले होते पण १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मात्र ते गीत नव्हते. त्यानंतर हे दोघे कधीच एकत्र आले नाहीत.
नौशादजींच्या अनेक अमर गीतांपैकी माझ्या आवडीचे एक भजन https://www.youtube.com/watch?v=2al9aty18kU ,

ईंडी पॉप च्या महापुरात माझ्या पिढिने (किंवा मी) बर्‍याच थोर संगीतकारांची गाणी जास्त ऐकलीच नाहीत. संगीतकार : नौशाद असे आकाशवाणी वर बर्‍याच वेळा ऐकले पण जास्त लक्ष दिलेच नाही. आम्ही "जॉनी जॉनी जोकर" किंवा "परी हू मै" यातच जास्त अडकलो.

ह्या अवलिया ला आदरांजली . . .