का?
सजल्या तुझ्या वेणीवरी
मोगरा फुलला न का?
ऐन आषाढातला
पाऊस का झाला सुका?
अजून तू माझ्या कवेत
'एकटा' मी, "दूर" का?
सर्वस्व लुटुनी मी कफल्लक
हाय् ! तू मजबूर का?
राहिल्या गझला अभंग
का बुडाला पण तुका?
मैफिलीच्या स्वागताला
भैरवीचा सूर का?
२५ एप्रिल '०९ , स.०६.३०
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 9:17 am | दिपक
ऐन आषाढातला
पाऊस का झाला सुका?
अजून तू माझ्या कवेत
'एकटा' मी, "दूर" का?
छान कविता!
"सा रे ग म प" सारखी "मि स ळ पा व"वर रेंटींग्ज असती तर मी तुम्हाला "व" दिला असता. :)
27 Apr 2009 - 9:23 am | उदय सप्रे
मिपा वर च्या प्रतिक्रिया पण इअतक्या छान आणि कल्पक , कधी कधी एकदम करमणूक करणार्या असतात.
तुमची प्रतिक्रिया एकदम मार्मिक आणि मनापासून आहे , आभार !
उदय सप्रेम
27 Apr 2009 - 9:54 am | राघव
ही कविता गझल वाटत नाही.
स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका.
पु.ले.शु. :)
राघव
27 Apr 2009 - 8:13 pm | क्रान्ति
मैफलीच्या स्वागताला
भैरवीचा सूर का!
अप्रतिम!
अवांतर :- दीपक यांच्या प्रतिसादातली कल्पना आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
27 Apr 2009 - 8:35 pm | प्राजु
कविता छान आहे.
आवडली.
भैरवी मस्तंच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Apr 2009 - 1:38 am | बेसनलाडू
ही कल्पना आवडली.
(कल्पक)बेसनलाडू
28 Apr 2009 - 10:37 am | उदय सप्रे
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
विशेषतः प्राजुताईंची कल्पकता आवडली : "कविता" आवडली , म्हणजेच कदाचित त्यांना पण राघव साहेबांसारखेच ही गझल वाटली नसावी.
असाच लोभ असो द्यावा !
आपला विनम्र,
उदय सप्रेम
28 Apr 2009 - 10:53 am | ऋषिकेश
कविता चांगली..
हि द्वीपदी विषेश आवडली
अवांतरः ही गझल नाहि या मताला अनुमोदन
ऋषिकेश