पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.
प्रतिक्रिया
6 Apr 2022 - 9:28 pm | अमरेंद्र बाहुबली
असम्बद्ध लिहिण्यात तुमचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही.
हे कुणी आणी कशावरून ठरवलं?
5 Apr 2022 - 5:42 pm | कंजूस
अगोदर सूचना मिळतच असेल ना?
6 Apr 2022 - 10:19 pm | चंद्रसूर्यकुमार
नर्मदा बचाओ आंदोलनादरम्यान पैशाची अफरातफर केल्याबद्दल ई.डी ने मेधा पाटकरांविरोधात एफ.आय.आर दाखल केला आहे. ही घटना २००५ मधील आहे.
मेधा पाटकर यांच्याविषयी माझे वैयक्तिक मत अजिबात चांगले नाही. त्याविषयी अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले आहे त्याची पुनरावृत्ती नको. तरीही मेधा पाटकर समर्थकांविषयी एक गोष्ट लिहितो- मी ज्या काही थोड्याफार मेधा पाटकर समर्थकांना बघितले आहे त्यांच्यात कमालीचा उद्दामपणा आणि उर्मटपणा पुरेपूर भरलेला आढळला. त्यांना जरा एखादा प्रश्न विचारायला गेल्यावर असा प्रश्न विचारणारा माणूस आदिवासींना देशोधडीला लाऊन त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजणारा हैवान आहे असे समजून ते लोक अंगावर येतात. मिपावरही असले पाटकरांचे खिकारणारे कार्यकर्ते होते. आणखीही काही होते. असले प्रकार हे लोक कुठून शिकतात काय माहित. त्यातून मेधा पाटकरांविषयी मत आणखी खराब झाले. असो. रत्नागिरीच्या कोणत्या स्थानिक पेपरात प्रेसिडेंट रिचर्ड निक्सनना सज्जड दम अशी बातमी आल्यावर व्हाईट हाऊसमध्ये जितका परिणाम झाला असेल त्यापेक्षाही कमी परिणाम माझे मत कसेही असले तरी होणार असला तरी वैयक्तिक मत ठेवायचा अधिकार आहेच की.
7 Apr 2022 - 10:41 am | अमरेंद्र बाहुबली
राजकीय नेते झाले आता सामाजीक कार्यकर्त्यांच्याही मागे ईडी ला लावन्यात आलंय पुढचा पायरी काय असेल?? हुकूमशाही कडे दमदार पाऊल पडतंय.
7 Apr 2022 - 10:55 am | निनाद
गंदा है पर धंदा है!
व्यवसाय आहे हा...
8 Apr 2022 - 12:35 am | अमरेंद्र बाहुबली
हे कोणी ठरवलं? आयटी सेलच्या ढकलगाड्या म्हणजे अमृतवचन का?
8 Apr 2022 - 7:58 am | मुक्त विहारि
सहमत आहे...
सर्वज्ञ असतात ....
त्यामुळे, अशा लोकांपासून दूरच राहणे उत्तम ...
7 Apr 2022 - 5:59 am | कंजूस
हे जाणून घ्यायचं आहे. फंड कुठून आणायचा हा एक मोठा प्रश्नच असतो.
7 Apr 2022 - 6:20 am | निनाद
एक प्रचंड मोठी इकोसिस्टिम यासाठी काम करते. (माझ्या मते) हे आंदोलनवाले लोक त्यांच्या राजकीय नेत्यांना सत्तेवर यायला मदत करतात. आणि मग ते लोक यांना पैसे पुरवतात. सर्व डावी इकोसिस्टिम यावर एकसंध पणे काम करते. याचे धागेदोरे सहजपणे आणि उघडपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. म्हणजे एका लहान चळवळीला येणारा पैसा कसा येत गेला हे पहत शोधत गेले तर पार जॉर्ज सोरोस, हिलरी क्लिंटन आणि पवार यांची नावे आढळून येतात. यात विविध विद्यापीठे आणि त्यातले प्रोफेसर्स संलग्न असतात.
शोधले तर सहजपणे धागेदोरे जुळत जातील. पण फक्त चिवट पणे शोध घेत जायचे.
7 Apr 2022 - 10:23 am | सुबोध खरे
मेधा पाटकर यांनी मुलुंड पूर्व येथे झोपडपट्टी हटवू नये आणि त्यांना पर्यायी जागा मिळावी यासाठी ठिय्या आंदोलन केले होते.
त्यासाठी प्रत्येक झोपडीधारकांकडून १० हजार रुपये घेतले होते. त्यांना असे सांगितले होते कि उद्या तुम्हाला ३३० चौ फूट जागा मिळेल ज्याचे बाजार मूल्य ८० लाखाच्या वर जाईल.
त्यांना एका स्थानीक पत्रकाराने तुम्ही असे पैसे कसे घेता असे विचारले त्याला त्या म्हणालाय आंदोलन चालवायला पैसे लागतात.
दोन तीन दिवस तेथे बसून त्या निघून गेल्या.
एक महिन्याने झोपड्या हटवला आणि झोपडीवाले निघून गेले. कुठे कुणास ठाऊक?
7 Apr 2022 - 11:34 am | कानडाऊ योगेशु
ते काहीही असले तरी बाई मात्र फार चिवट आहे हे मान्य करायलाच हवे. मध्यंतरी अशाच कोणत्यातरी धरणासंबंधीत आंदोलनात बाई काही गावकर्यांसोबत बराच वेळ (बहुतेक रात्रभर) कमरेइतक्या पाण्यात उभ्या होत्या.
7 Apr 2022 - 12:38 pm | इरसाल
काही मोठा फायदा असल्याशिवाय असा चिवटपणा कोणी दाखवणार नाही. मागे एकदा कोणीतरी असाच पावसात भिजत भिजत (ऑफर केलेली छत्री बाजुला सारुन) चिवटपणा दाखावला होता.
8 Apr 2022 - 12:37 am | अमरेंद्र बाहुबली
मोदींचे गुरूना?? काही तर सत्तेसाठी ईतका चिवटपणा करतात की पहाटे पहाटे शपथा घेतात.
7 Apr 2022 - 12:23 pm | कंजूस
कोर्टाचे आदेश सरकारने मानले. कामगार काय करतात पाहू.
8 Apr 2022 - 6:20 am | निनाद
हे विधेयक कलम १२ द्वारे केंद्राला मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांच्या निधीमध्ये गुंतलेल्या लोकांची आर्थिक मालमत्ता आणि आर्थिक संसाधने गोठवण्याचे, जप्त करण्याचे किंवा संलग्न करण्याचे अधिकार देईल. कोणतीही व्यक्ती या कायद्याखाली किंवा संयुक्त राष्ट्र (सुरक्षा परिषद) कायदा, १९४७ अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या कोणत्याही क्रियाकलापांना वित्तपुरवठा करू शकणार नाही.
ही तरतूद सरकारला अशा व्यक्तीच्या मालकीच्या किंवा नियंत्रित केलेल्या, पूर्ण किंवा संयुक्तपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, निधी किंवा इतर आर्थिक मालमत्ता किंवा आर्थिक संसाधने गोठविण्याचे, जप्त करण्याचे किंवा संलग्न करण्याचे अधिकार देतो.
पण संयुक्त राष्ट्र (सुरक्षा परिषद) कायदा जोडल्याने आता याला आंतरराष्ट्रीय कोन आला आहे का?
हा कायदा पाकिस्तान ला अजून दिवाळखोरीत नेईल का?
8 Apr 2022 - 6:30 am | निनाद
लखनौमधील ब्रह्मोस युनिटसह विविध संरक्षण प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जात आहेत.
आत्मनिर्भर भारत अभियानाला नव्याने चालना देण्यासाठी , भारत लवकरच जटिल संरक्षण प्रणालीसह १०८ लष्करी उपकरणांचे स्वदेशी उत्पादन सुरू करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढील आठवड्यात यासंदर्भात औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे.
स्वदेशी उत्पादित होणार्या उपकरणांच्या यादीमध्ये सेन्सर्स, सिम्युलेटर, सोनार, रडार, विविध शस्त्रे, हेलिकॉप्टर, नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) सिस्टीम, टँक इंजिन, मध्यम पॉवर रडार यांचा समावेश आहे.
भारताने देशांतर्गत उत्पादकांना त्यांचा वेग वाढवण्यासाठी मोदी सरकारने २०२१ च्या अखेरीस या १०८ पैकी ४९ वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी भारतासाठी चांगली ठरली आहे. ही सर्व उत्पादने आता भारतात तयार होत आहेत! विकसित झालेली स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा इतर राष्ट्रांना निर्यात करण्यावर मोदी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे असे दिसते आहे.
8 Apr 2022 - 11:33 am | श्रीगुरुजी
जुन्या गुत्त्यावर जुन्या बाटलीत जुनीच देशी दारू
https://www.loksatta.com/mumbai/shivsena-sanjay-raut-claimed-kirit-somai...
8 Apr 2022 - 4:49 pm | सौंदाळा
संजय राउत यांची खासदारकीची मुदत ३१ मार्चला संपली आहे. आता त्यांना ईडी कारवाईमुळे खासदार नसल्याने कोणतीही इम्युनिटी मिळणार नाही.
त्यामुळे हा माणूस पूर्णपणे विस्कटला आहे. पत्रकारांसमोर सोमय्यांवर अर्वाच्य भाषेत टीका केली. फाळणी, बांगलादेश मुक्तीसंग्राम वगैरे वाट्टेल ते बरळून झाले.
आता याच्यासमोर दिग्विजय सिंग आणि मणिशंकर अय्यर बरे म्हणायची वेळ आली आहे.
8 Apr 2022 - 4:19 pm | धर्मराजमुटके
आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे आज शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधता जोरदार घोषणाबाजी केली.
असे व्हायला नको होते पण तरीही महाराष्ट्रात सरकार प्रमुख कोण आहे हे आज या निमित्ताने दिसून आले.
8 Apr 2022 - 6:56 pm | मुक्त विहारि
शरद पवार, यांना कुणीतरी जाहीर रित्या मारले देखील होते...
8 Apr 2022 - 5:56 pm | कंजूस
कोर्टाकडे कर्मचारी गेले. परवा निर्णय आला आणि सरकारतर्फे मान्य झाला. कर्मचारी काय करणार आहेत? त्यांच्यापुढे
आता दोनच पर्याय शिल्लक उरले आहेत.
१) कोर्टाचा निर्णय मान्य करून संप मिटवणे,
किंवा
२) आणखी वरच्या कोर्टात फेरविचारासाठी अर्ज करणे आणि तो दावा दाखल करून घेतला वरच्या कोर्टाने तर तिकडच्या दाव्यासाठी वकील फी देत राहाणे.
३) तिथला निर्णय काय होतो पाहून आणखी काय पर्याय आहेत हे शोधणे.
पण आजच्या पवारसाहेबांच्या घरासमोर निदर्शने करून नक्की काय साध्य होणार होते/आहे?
एकूण एसटी कर्मचारी स्वत:च निर्णय घेत आहेत असे दिसते.
8 Apr 2022 - 7:35 pm | सुबोध खरे
अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आता सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं आहे म्हणून फिल्डिंग लावणं चालू आहे अशी आतली बातमी आहे.
आंदोलनाचा आणि शरद पवार यांचा काय संबंध?
गृह खाते राष्ट्रवादी कडेच आहे पण पोलिसांना आंदोलकांच्या हालचालींची माहितीच नव्हती हे कसं शक्य आहे?
सुसू ताई बद्दल सहानुभूती निर्माण करायची आहे त्यामुळे केवढे फुटेज दिले जात आहे ते पाहून घ्या.
8 Apr 2022 - 8:45 pm | कंजूस
हे मान्य. पण ते काय कोर्टाचा निर्णय फिरवणार असा विश्वास कामगारांना आहे. चांगली गोष्ट.
8 Apr 2022 - 8:50 pm | कंजूस
त्यामुळे राज्यात आलबेल होत असेल तर चांगलेच आहे. परवा ( थोडे दिवसांपूर्वी ) मा. मुख्यमंत्री तयार आहेत अशी हवा झालेली.
24 Apr 2022 - 10:07 am | जेम्स वांड
आतली म्हणजे कुठली सांगू शकाल का डॉक्टर साहेब ? तुमच्या रीच (आवाका) अन ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटतो सर, आता त्यात तुमच्या नेट्वर्किंग स्किल्सची पण भर पडली आहे !
मी हे सिरीयसली म्हणतोय, चेष्टा नाही सरजी.
8 Apr 2022 - 6:59 pm | मुक्त विहारि
अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर; 'करमुक्त' दाव्यांची होणार छाननी
https://www.esakal.com/amp/maharashtra/farmers-on-radar-of-the-income-ta...
केंद्र स्तरावरील, सरकारी खाती, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे....
आता, कोटीच्या कोटी, वांगी किंवा मिरच्या उत्पादन घेणारे, काय करणार?
8 Apr 2022 - 7:30 pm | कॉमी
हे कोट्यावधी उत्पादन वांग्यातून किंवा मिर्चीतून नसते असे म्हणायचे आहे का ?
8 Apr 2022 - 8:51 pm | आग्या१९९०
शेतकरी संघटनांचा विरोध मोडून कृषी उत्पादनावर आयकर लावावा.
9 Apr 2022 - 10:18 am | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yugat Mandli... :- Pawankhind
9 Apr 2022 - 8:51 pm | कॉमी
भावना दुखावतात म्हणून नास्तिक मेळावा रद्द करण्यास भाग पाडले.
धन्य आहे.
9 Apr 2022 - 10:01 pm | वामन देशमुख
पवीत्र रमझान महिना सुरू आहे; असे कार्यक्रम नकोत.
10 Apr 2022 - 7:37 am | कॉमी
तक्रार रामनवमी वाल्यांनी केलीये कि, तुम्हाला तुमच्या वाईट सवयीप्रमाणे हिंदू मुस्लिम केल्यावाचून राहावंत नाही वाटतं.
10 Apr 2022 - 2:37 pm | वामन देशमुख
चंद्रसूर्यकुमार यांच्यासारखा अनुभव मलाही येतोय...
बाकी ज्यांना इतर अनेक लोक विचारवंत म्हणतात ते लोक बोलतात/लिहितात तेव्हा असे मला नेहमीच वाटते. या विचारवंत लोकांमध्ये समाजवादी/डाव्या लोकांचा समावेश होतो. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी सहमत असता तोपर्यंत त्यांच्याइतका सहिष्णू माणूस जगात सापडणार नाही. पण जरा त्यांच्याशी असहमती दर्शवा. मग ते कट्टरातल्या कट्टर फासिस्टापेक्षाही जास्त असहिष्णू बनतात आणि चवताळून अंगावर येतात हा अनुभव अनेकदा घेतला आहे.
10 Apr 2022 - 2:48 pm | वामन देशमुख
बाकी, भारतवासियांचे दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तांबद्धल असली शब्दरचना?
रामभक्त हे खरंच (सकारात्मक अर्थाने) धन्य आहेत. त्यांच्या भावनांचा ठरवून अवमान करणाऱ्यांची त्यांनी केवळ तक्रार केलीय; हातपाय तोडले नाहीत.
10 Apr 2022 - 3:48 pm | कॉमी
अवमानकारक बोलण्याचा हेतू नव्हता आणि अवमानकारक आहे असे वाटले नव्हते. तेव्हा क्षमस्व.
बाकी तुमच्या बोलण्यावर टीका करणे म्हणजे असहिष्णुता नसते.
10 Apr 2022 - 4:03 pm | वामन देशमुख
नाही नाही, कॉमी; आपले केवळ वैचारिक मतभेद आहेत. क्षमा वगैरेमुळे कसेसेच वाटते; कृपया गैरसमज नसावा.
माझ्याकडूनही अवमानकारक शब्दप्रयोग झालेले असल्यास - भविष्यात झाल्यास क्षमस्व.
10 Apr 2022 - 4:02 pm | कॉमी
हातपाय तोडेपर्यंत सगळे चालवायचे, हातपाय तोडू लागल्यावरच बोलायचे असे काही आहे का ?
10 Apr 2022 - 4:06 pm | वामन देशमुख
हातपाय तोडणाऱ्यांची संस्कृती (खरंतर विकृती) किमान भारतवर्षात पसरू नये म्हणून केवळ तक्रार करणाऱ्यांची संस्कृती जतन करावी, तिचे संवर्धन करावे.
तिसरा पर्याय दृष्टीक्षेपात नाही.
11 Apr 2022 - 7:21 am | मुक्त विहारि
गुजरातमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात तणाव ; दोन गटांत दगडफेक; दुकाने, गाडय़ांची मोडतोड, जाळपोळ
https://www.loksatta.com/desh-videsh/ram-navami-2022-communal-clashes-re...
काही लोकांना, स्वस्थ बसवत नाही....
12 Apr 2022 - 5:23 am | निनाद
रमजान संपतांना हे फार वाढणार आहे का? कारण शेवटी अशी भाषणे होतात आणि जमाव बाहेर पडतात मग दगडफेक सुरू करतात.
11 Apr 2022 - 7:38 am | मुक्त विहारि
संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीका
https://www.loksatta.com/nagpur/rss-spreading-religious-hatred-in-societ...
हो क्का? .... मग, बांगलादेश येथे हिंदू लोकांची घरे जाळली, पाकिस्तान मध्ये, गैर मुस्लिम माणसाला जाळले, त्या बद्दल, हे का बोलले नाहीत? पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही ....
11 Apr 2022 - 5:50 pm | चंद्रसूर्यकुमार
डॉ.अभय बंग सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून एक पुरस्कार स्विकारताना.
डॉ. अभय बंग यांच्या सामाजिक कार्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. रा.स्व.संघाने चांगले काम करणार्यांचा नेहमीच आदर केला आहे. सरदार पटेल आणि लालबहादूर शास्त्री यांची संघाबद्दलची मते वाईट होती तरीही संघाच्या वर्तुळातून त्यांच्याविषयी कायम आदरच व्यक्त होत आला आहे. त्यामुळे संघाविषयी वाईट मत असले तरी डॉ. अभय बंग यांनी समाजासाठी चांगले काम केले आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करायला संघाला कधीच वैषम्य वाटले नसावे. आणि नरेंद्र मोदी या मुळच्या संघाच्या एका स्वयंसेवकाच्या सरकारने डॉ.अभय बंग यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पण दिली आहे.
प्रश्न आहे डॉ. अभय बंग यांचा. जर संघ धार्मिक विद्वेष पसरवत असेल आणि ही गोष्ट त्यांना आवडत नसेल तर मग त्याच संघाकडून त्यांनी हा पुरस्कार का स्विकारला असावा? की संघ धार्मिक विद्वेष पसरवत असल्याचा दृष्टांत त्यांना हा पुरस्कार स्विकारल्यानंतर झाला? तसे असेल तर हल्ली आलेल्या पुरस्कार वापसीच्या फॅशनला अनुसरून ते संघाकडून मिळालेला आपला पुरस्कार कधी परत करणार?
हा फोटो आणि संबंधित बातमी खालील लिंकवर बघायला मिळेल.
https://timesofindia.indiatimes.com/.../arti.../67248381.cms
11 Apr 2022 - 7:51 pm | सुरिया
काहीही.
हा पुरस्कार लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला गेलाय. नागपूर स्थित डॉ. उदय बोधनकर हे ह्या संस्थेचे विश्वस्त आहेत. संस्थेचे कामकाज नागपूरमधून चालते. एखाद्या संस्थेने एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी निवडले आणि त्यास पुरस्कार देण्यासाठी रा स्व संघाचे सरसंघचालक (जे योगायोगाने नागपूरमधून्च कामकाज करतात) ह्यांना पाचारण केले तर डॉ. अभय बंगांनी नकार द्यावा काय? पुरस्कार संस्थेने दिला आहे. रा स्व संघाने नव्हे. फक्त कार्यक्रमास मान्यवर म्हणून सरसंघचालकाअंना पाचारण केले गेलेय. आणि गंमत म्हणजे पुरस्कार डॉ. राणी बंगाना दिलाय. ते दंपती मिळून सामाजिक प्रसंगास उपस्थित असतात हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे एखाद्याने संघावर टीका केली की त्याची सगळी कुंडली (कधी कधी अर्धवट ज्ञानावर तर कधी चक्क खोटी) काढायची घाणेरडी प्रथा तुम्ही तरी चालवू नका.
राहता राहिला पद्मश्री चा प्रश्न. पद्मश्री भारत सरकार देते. माननीय मोदी किंवा माननीय राष्ट्रपती भले स्वयंसेवक असतील किंवा अजून काही. पुरस्कार देताना ते भारत सरकारचे प्रतिनीधी असतात. त्यानंतरही डॉ. अभय बंगांनी संघावर टीका केलीय. भारत सरकारवर नाही तेंव्हा संघ म्हणजेच भारत सरकार आहे असे तुमचे म्हणणे आहे काय? शिवाय लोकांना कुठले दृष्टांत कधी व्हावे हे ठरवणारे तुम्ही कोण? शिवाय आता टीका केली म्हणून लगेच पुरस्कार वापस करा म्हणून पिल्लू सोडून द्यायची भाषा का?
11 Apr 2022 - 8:39 pm | कॉमी
पुरस्कार परत केल्यावर ऍवोर्ड वापसी गॅंग म्हणून हिणवणार, नाही केला तर दुटप्पी म्हणणार. शेवट आपलीच टिमकी.
एकदम बरोबर.
12 Apr 2022 - 5:52 am | निनाद
उगाच धावायची गरज नाही! हे लोक अजेंडा चालवतात हेच सत्य आहे.
आता पहा -
मग या सर्व कार्याला मदत करणार्या संस्थांविषयी यांच्या तोंडून एक शब्द कसा येत नाही?
येथे हिंदू भावना दुखावत नाहीत का?
12 Apr 2022 - 6:38 pm | गामा पैलवान
सुरिया,
लोकमाता सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्काराविषयी मला सापडलेली माहिती इथे आहे : https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/leave-the-tantrum-of-neg...
या बातमीच्या शेवटी दिलेल्या किश्श्यावरनं कळतं की राणी बंग यांच्या मातोश्री आणि मोहन भागवतांच्या मातोश्री यांचे घरोब्याचे संबंध होते. एकंदरीत मोहन भागवत हे अभय बंग यांचे परिचित असावेत. अभय बंग हे गांधीवादी आहेत, जी विचारधारा मला रुचंत नाही. याउलट संघाची विचारधारा मला पटते. मात्र तरीही अभय बंग व मोहन भागवत दोहोंच्या कार्याबद्दल व व्यक्तिमत्वाबद्दल मला आदर आहे.
अभय बंगांनी संघावर आरोप करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर बरं पडलं असतं, असं राहून राहून वाटतं. संघात नक्की कश्या प्रकारे द्वेषाचं बीज रुजवलं जातं याविषयी अधिक माहिती बंगांनी द्यावयास हवी होती.
आ.न.,
-गा.पै.
13 Apr 2022 - 5:16 pm | स्वधर्म
मुद्दे पटले.
13 Apr 2022 - 5:17 pm | स्वधर्म
सुरिया यांचे मुद्दे पटले.
11 Apr 2022 - 8:54 pm | मुक्त विहारि
ट्विन टाॅवर पाडले, तिथे संघ नाही...
श्रीलंकेत, चर्चवर हल्ला झाला, तिथे संघ नाही ...
न्यूझीलंड मध्ये, चर्चवर हल्ला झाला, तिथे पण संघ नाही ...
आमच्या सारख्या, सामान्य अशिक्षित जनतेला जे समजते, ते शिकलेल्या माणसांना समजत नाही .... ज्याची त्याची विचारसरणी ....
12 Apr 2022 - 5:22 am | निनाद
जर संघाची मते मान्य नाहीत आणि इतका त्याचा त्रास होत आहे तर त्यांच्या प्रमुखाहस्ते पुरस्कार कशाला घ्यायचा?
हे सगळे असेच भामटे आहेत हो!