ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Apr 2022 - 5:05 am

पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 5:05 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ सहमत.
मजूरांना ऊपाशी युपीच्या सिमेवर रोकनार्या तसेच गंगेत प्रेतं फेकबन देनार्या योगींपेक्षा लाखपट चांगलं काम केलंय ह्या सरकारने. योगींची मजल भोंग्यांपर्यंत, विकास वगैरे कशाशी खातात हेत्याना कोण सांगनार?

sunil kachure's picture

30 Apr 2022 - 5:19 pm | sunil kachure

हनुमान चालीसा ,भोंगे ह्यांचे राजकारण करून राज्यातील दोन समाजात तेठ निर्माण व्हावी आणि त्याचा राजकीय फायदा घेवून सत्ता हस्तगत करावी.
असे डावपेच जोरात आहेत.
महाराष्ट्र मधील हिंदू,मुस्लिम दोघांनी संयम पाळावा.
आणि ह्यांचे मनसुभे उधळून लावले जावेत.
मध्येच खलिस्तान,पाकिस्तान ,रोहिंगे ह्यांची फोडणी पण दिली जात आहे.
कसोटी च काळ आहे.संयम सोडला नाही तर काही लोकांच्या इच्छा पूर्ण होणारच नाहीत.

देश स्वतंत्र झाला तेव्हा अनेक प्रश्न देशासमोर होते.
हिंदू मुस्लिम मध्ये उभी फट पडून एका देशाचे दोन देश झाले होते.
बरीच राज्य भारतात नव्हती.पोर्तुगीज लोकांनी अजून हक्क सोडला नव्हता.
प्रचंड गरिबी,अज्ञान देशात होते.
सरकार पुढे खूप मोठी आव्हान होती.
त्या वर मात करून त्या काळातील नेहरू असतील किंवा बाकी नेते ह्यांनी देश उभा केला.
शिक्षण पासून,शेती पर्यंत,आरोग्य सुविधा पर्यंत,ग्रामीण अर्थ व्यवस्था ठीक करणे ,जलसिंचन .
काय काय नाही केले पुढे इंदिराजी सारख्या नेत्यांनी.

आज च्या कोणत्याच नेत्याची नेहरू जी किंवा त्या कठीण काळातील नेत्यांवर टीका करण्याची कुवत नाही.
जे टीका करत आहेत ते तेव्हा सत्तेवर असते तर समस्या बघून त्यांना वेड लागले असते.
इतक्या समस्या देशासमोर आहेत.
आता फक्त युक्रेन युद्ध झाले तर आताच्या नेत्यांची लेंडी पातळ झाली आहे

डिझेल पासून खाद्य तेलापर्यंत ,आणि कोळशा पासून विजे पर्यंत देशात टंचाई निर्माण झाली आहे.
साधं कोळसा पुरवठा करणे आताच्या नेत्यांना जमत नाही.
ते नेहरू वर,इंदिराजी वर टीका करतात.
ह्या पेक्षा दुसरा मोठा जोक नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 7:40 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. चिन चे नाव घ्यायला घाबरवारे आजकालचे नेते कुठे नी ईंदीरा गांधी कुठे? बहुमत नाही असं बोंबलायची ही सोय नाही.