ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

निनाद's picture
निनाद in राजकारण
1 Apr 2022 - 5:05 am

पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

प्रतिक्रिया

कुराण जाळल्याच्या घटनांनंतर धुमसतंय स्वीडन, तीन दिवसांपासून संघर्ष

https://www.bbc.com/marathi/international-61138587

स्वीडनचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख एंडश टूनबेरी यांनी शनिवारी (16 एप्रिल) सांगितलं की, आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाचीही पर्वा केली नाही. "आम्ही यापूर्वीही हिंसक दंगली पाहिल्या पण हे काही वेगळंच आहे."

https://www.loksatta.com/maharashtra/tensions-erupt-over-saffron-flag-ho...

राज्य सरकार, आता काय पावले उचलते? हे बघणे रोचक ठरेल ....

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Apr 2022 - 2:13 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे : चंद्रकांत पाटील

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/pune/chandrakant-patil-say...

महाभारत युद्धात भाजपेयींनी महत्वाची भूमिका बजावल्याचेही उद्या सांगू शकतील.

भोंग्यांना कायमची परवानगी धसतेच हे उघड झाले. पण यांना पाठीशी घालणारेच उघडे पडलेत. लाव रे तो विडिओ जोरात आहे.

धर्मराजमुटके's picture

23 Apr 2022 - 10:06 am | धर्मराजमुटके

नऊ वाजता अमरावती ड्युओ वि. मुंबई सेना लाइव्ह मॅच सुरु होणार होती पण अजुनही मॅच सुरु झालेली दिसत नाही. आजची मॅच चालू होईल की रद्द होईल ?

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 12:54 pm | श्रीगुरुजी

२ वाघ विरूद्ध शेकडो शेळ्या अशी लढत आहे.

तिकडे ठाकरे भरपेट आमरस खाऊन वातानुकूलित खोलीत गाढ वामकुक्षी घेत असतील, राणा दांपत्य सुद्धा भरपेट जेवून गारव्यात लोळत असेल आणि इकडे हे कार्यकर्ते उपाशीपोटी राणा दांपत्याची वाट पहात घामाच्या धारांनी चिंब भिजून मातोश्रीसमोर कडक उन्हात रस्त्यावर बसलेत. केवळ दोघांनी शेकडोंना रस्त्यावर आणून कडक उन्हात बसवलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली

घरात लपून बसलेले वाघ. खिक्क. घरासमोर जमलेल्या शेळ्या. डबल खिक्क. रच्याकने सेनेला ताकद दाखवायची संधी देतच असतात भाजपेयी. मागे राणे प्रकरणावरून भाजपने आपल्या कार्यालयाच्या काचा फोडून घेतल्या. आता राणा प्रकरणावरून धडा घएून सेनेच्या नादी लागायची कुठला नेता हिंमत करनार नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 1:31 pm | श्रीगुरुजी

२ विरूद्ध शेकडो याच्यात कोण वाघ हे स्पष्ट आहे. बिच्चारे कडक उन्हात उपाशी बसलेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 1:58 pm | अमरेंद्र बाहुबली

२ विरूद्ध ईतर भाजपेयी पळाले का?

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 2:08 pm | श्रीगुरुजी

आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे आहेत. इतरांची गरज नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 2:11 pm | अमरेंद्र बाहुबली

आख्ख्या शिवसेनेसाठी २ पुरेसे आहेत. इतरांची गरज नाही.
खिक्क. म्हणूण लपुन बसलेत का?

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Apr 2022 - 3:45 pm | चंद्रसूर्यकुमार

एक गोष्ट कळत नाही. उध्दव ठाकरेंना राजकारणाचा जराही सेन्स नाही की त्यांना संजय राऊतांसारखे सल्लागार दिशाभूल करणारे सल्ले देत आहेत? एक तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे यात अवैध किंवा कायद्याविरोधात काहीही नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू अशी धमकी राणा दांपत्याने दिली नव्हती. नुसती हनुमान चालिसाच म्हणणार होते ना? मग त्यात एवढा गहजब करण्यासारखे काय होते? हा प्रकार राजकारणासाठी केला जाणार होता हे उघड आहे. अशावेळेस मग विरोधकांच्या शिडातील हवा काढायला मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरासमोर जाऊन राणा दांपत्याबरोबर हनुमान चालिसा म्हणण्यात भाग घेऊन मग त्यांना घरी चहापाण्याला बोलावून घेतले असते तर मग हे राजकारण करायची संधीच विरोधकांच्या हातून काढून घ्यायची नामी संधी होती. पण काहीही झाले तरी मग महाराष्ट्राचा अपमान वगैरे बाष्कळ गोष्टी करत अंगावर जायचा मूळ स्वभाव असेल तर त्याला कोण काय करणार? प्रत्येक गोष्टीला आपण रिअ‍ॅक्ट केलेच पाहिजे असे यांना का वाटत असते कोणास ठाऊक.

नेहमीप्रमाणे जी मुळातच अगदी क्षुल्लक गोष्ट होती त्याला यांनी विनाकारण महत्व देऊन मोठे करून ठेवले आहे. असे करणे कधीतरी अंगलट येऊ शकते याचे भान शिवसेनेतल्या कोणालाच नाही का? मग त्यात मोहित कंबोज काल त्या परिसरात गेले. अतीउत्साही शिवसैनिकांनी चिथावले जाऊन गाडीवर हल्ला वगैरे करावा या उद्देशानेच ते तिथे गेले होते की काय समजत नाही. मग लोकांपुढे दिसताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या गाडीवर हल्ला केला हेच दिसणार ना? त्यात नुकसान कोणाचे आहे? एवढेही यांना समजत नाही? आपले विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 3:54 pm | अमरेंद्र बाहुबली

एक तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणे यात अवैध किंवा कायद्याविरोधात काहीही नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू अशी धमकी राणा दांपत्याने दिली नव्हती. नुसती हनुमान चालिसाच म्हणणार होते ना? मग त्यात एवढा गहजब करण्यासारखे काय होते?

काय गहजब केला?? राणा दांरत्याने यावे आम्हीलत्यांना “प्रसाद” देऊ हेच सैनिक बोललेत ना?

मुख्यमंत्र्यांनी स्वतः घरासमोर जाऊन राणा दांपत्याबरोबर हनुमान चालिसा म्हणण्यात भाग घेऊन मग त्यांना घरी चहापाण्याला बोलावून घेतले असते राणा दांरत्याला ईतकं महत्व आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोबत चहापाणी करावा? खिक्क.

विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत. भाजपेयींना अश्याच प्रकारे आवर घालावा लागेल हे सेना जाणून आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 5:06 pm | श्रीगुरुजी

आपले विरोधक आपल्यापुढे सापळे लावत आहेत आणि त्या सापळ्यांना टाळणे दूरच राहिले हे अगदी प्रत्येक वेळेस न चुकता त्या सापळ्यांमध्ये चालत जात आहेत.

राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ जवळ आली आहे. पुढील निवडणुक भाजप वि. राष्ट्रवादी कॉंग्रेस+कॉंग्रेस वि. शिवसेना अशी होईल व त्यात कोण सर्वाधिक जागा जिंकेल व कोणाची पूर्ण वाट लागेल हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट ज्यांना हवी आहे तेच यामागे आहेत.

कॉमी's picture

23 Apr 2022 - 6:18 pm | कॉमी

पुरेपूर सहमत. यात विरोध करण्यासारखं काय आहे ? उलट आत AC मध्ये बसून लिंबू सरबत पिऊन मग म्हणा म्हणले असते तर हे राणा खुळे वाटले असते दुसऱ्यांच्या घरी जाऊन हनुमान चालिसा म्हणायला.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 2:28 pm | श्रीगुरुजी

सरकार यांचं, पोलिस यांचे, कार्यकर्ते यांचे. हे स्वतः सुरक्षारक्षकांशिवाय घराबाहेर पाऊल ठेवत नाहीत. पण देवाची प्रार्थना करणाऱ्या एका निःशस्त्र बाईला रोखायला हजारो लोक लाठ्या काठ्या दगड घेऊन आले. आपलं सर्वत्र हसू होतंय हे यांना समजतही नाही.

कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 2:43 pm | अमरेंद्र बाहुबली

हसू राणा दांपत्याचं झालंय. आपण कोण? आपली ताकद किती? कोणाविरूध्द लढावं?? ऊगाच सुर्यावर खूंकण्याचा का प्रयत्न करावा? ज्यांच्या भरवश्यावर करायचं ते अश्या वेळी पळ काढतात.

बरोबर आहे तुमच त्यांना कळायला हव होत गुंडाबरोबर भांडण्यात काही फायदा नसतो ते.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 3:03 pm | अमरेंद्र बाहुबली

आधी गुंडगीरी करायची मग मार पडला की समोरचाला गुंड म्हणावे. छान.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 3:19 pm | श्रीगुरुजी

आपलं सर्वत्र हसू होतंय हे यांना समजतही नाही. हे मी आधीच लिहिलं होतं. त्याचं प्रत्यंतर लगेच आलं.

सुबोध खरे's picture

26 Apr 2022 - 9:42 am | सुबोध खरे

असंबद्ध लिहिण्यात भुजबळांचा हात कोणी धरू शकणार नाही हे मी सुरुवातीलाच लिहिले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2022 - 10:40 am | अमरेंद्र बाहुबली

असंबध्द काय ते कळालं तर बरं होईल की भाजप,राणा,राणे ह्यांच्या बद्दल लिहीलं की ते तुमच्या लेखी असंबध्द धरल्या जातं??

कंजूस's picture

23 Apr 2022 - 5:21 pm | कंजूस

अगोदर गोवऱ्या रचून या!!
काय भाषा, काय समज मराठी साहित्य संमेलना वेळी महाराष्ट्रात राजधानीत!

sunil kachure's picture

23 Apr 2022 - 6:44 pm | sunil kachure

1) कंगना ल पुढे करून महारष्ट्र च्या cm च वरचेवर एकेरी उल्लेख.
असे कधी पाहिले घडले नव्हते.
२) अर्णव ल पुढे करून तोच तमाशा.
३) सुशांत सिंग वरून उगाचच तमाशा.
CBI कडे केस आहे अजून काहीच सिध्द झाले नाही.
उगाचच काही लोकांना केंद्रीय एजन्सी नी त्रास दिला निष्पन्न त्यांना काहीच करता आलं नाही.
४), हनुमान जयंती कित्येक वर्ष साजरी होत आहे.
भोंगे कित्येक वर्ष मशीद वर आहेत.
आताच हनुमान चालीसा कशी आठवली.

फालतू काही तरी विषय घेवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे माकड चाळे आज पर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच विरोधी पक्षाने केले नव्हते.
हे पहिल्यांदाच घडतं आहे.

आणि प्रतिक्रिया उलटली की बघा कसे गुंड वृत्ती चे आहेत.
असे रडगाणे गायला हेच पुढे.
कोणाला दोष देणार .

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2022 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
शिवसेना पुरून ऊरतेय पण. आपले माकडचाळे चालत नाहीयेत हे विरोधी पक्षाला कळतंय पण सुधारनारे नाहीत.
~कंगना ने ठाकरेंवर टिका करू आपले नूकसान करून घेतले, जाहीराती नी सिनेमे गेले तिचाकडून हे तिने स्वतच कबूल केले, तिला पद्मश्री मिळाला पण त्या बदल्यात मोठी किंमत चुकवावी लागली.
~ अर्नब ने आपल्या चॅनलच्या जाहीराती घालवून घेतल्या. आता काय करतो कुणाच्या गिणतीत ही नाही.
~ सोमय्या नी खासदारकी घालवून घेतली.
~सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलीसांचा देशभर बदनामी केली भाजपने
~पेट्रोल १२० रूपये केलंय मोदी सरकराने, लोक शिव्या घालताहेत मग हयअश्या मुद्द्यांवरून लक्ष ऊडवला हनूमान चालीसा प्रकरण काढलंय भाजपने.

धर्मराजमुटके's picture

23 Apr 2022 - 6:44 pm | धर्मराजमुटके

सकाळी ९ ची वेळ होती सामन्याची पण सामना काही वेळेत सुरु झालाच नाही. नंतर थेट प्रक्षेपण नाही पाहता आले. आता क्षणचित्रांवर समाधान मानावे लागणार ! :)

sunil kachure's picture

23 Apr 2022 - 7:42 pm | sunil kachure

Bjp ह्या तीन चार वर्षात देशात कोणत्याही ही राज्यात जन हितासाठी एक तरी आंदोलन केले आहे का?
एक पण आंदोलन केले नाही.
Bjp चे नेते,मंत्री आज पर्यंत देशाच्या कोणत्याही राज्यात जनतेच्या प्रश्नावर बोलले आहेत का ?
उत्तर बिलकुल नाही.
ह्यांची आंदोलन कोणती..
१)राम मंदिर.
२) गौ हत्या.
३) हनुमान चालीसा.
४) मुस्लिम न विरुद्ध.

संपले ह्यांची आंदोलन
.ह्यांना फक्त धार्मिक विवाद निर्माण करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायच आहे.
आणि त्याचा फायदा घेवून मित्र आणि ,ठराविक वर्ग ह्यांना मालामाल करायचे आहे.
देशातील जास्तीत जास्त लोक गरिबीत कशी जातील.
देश आर्थिक ,सामाजिक बाबतीत कसा कमजोर होईल.
हे सर्व दुष्ट हेतू आहेत.
विकास अजून पण जन्माला येत नाही...विकास च अजून जन्माला येत नाही तर मग प्रगती चा जन्म कधी होणार.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2022 - 10:06 pm | श्रीगुरुजी

या पक्षाची इतके दिवस चीड येत होती. पण आता शिसारी आली आहे.

सुक्या's picture

24 Apr 2022 - 2:17 am | सुक्या

महाराष्ट्रात नक्की मुख्यमंत्री आहे काय? आहे तर कुठे आहे?
सोमैया असो की कम्भोज. एख्याद्याच्या गाडीची काच फोडणे यात गुंडागर्दी नाही तर काय आहे. कायदा हातात घेउ नका हे सांगायचा मुख्यमंत्र्यांची जीभ का कातरते आहे.
की भागुबाई झाली त्यांची ?

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2022 - 6:17 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात सरकार व प्रशासन अस्तित्वात नाही. एक भान नसलेली टोळी आपल्याला हवे ते करीत अक्षरशः धुडगूस घालीत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 11:36 am | अमरेंद्र बाहुबली

तिथावनीखोर भाषणं करनार्यांना अक्क्ल नको का?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 11:36 am | अमरेंद्र बाहुबली

चिथावनीखोर भाषणं करनार्यांना अक्क्ल नको का?

रात्रीचे चांदणे's picture

24 Apr 2022 - 6:39 am | रात्रीचे चांदणे

अत्ता मुख्यमंत्री स्वतः मातोश्री बाहेर येऊन दगडफेक केलेल्या गुंडांबरोबर फोटोसेशन करतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चे नेते दगडफेकीला भाजपालाच दोषी ठरवून मोकळे होणार. खरंतर राणा दाम्पत्याकडे सेनेने दुर्लक्षच करायला पाहिजे होते. स्वतः सत्तेत असतानाही मातोश्री साठी गुंडांच सरंक्षण कशाला पाहिजे होते?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 11:37 am | अमरेंद्र बाहुबली

का दुर्लक्ष करावे?? कुणीही येऊन काहीही बोलेल, मुख्यमंत्र्यांच्य् घरासमोर धूडगूस घालतील.

रात्रीचे चांदणे's picture

24 Apr 2022 - 11:55 am | रात्रीचे चांदणे

धूडगूस घातला तर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे त्यासाठी गुंड कशाला पाहिजे?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 12:22 pm | अमरेंद्र बाहुबली

गुंड?? चष्मा काढा.

पक्षाच्या मीटिंग मध्ये अमित शाह ह्यांनी वक्तव्य केले आहे.
"लोक सरकार चे काम बघून मत देत नाहीत:

संघटना मजबूत असेल तर च मत मिळतात.
आता मजबूत संघटना म्हणजे काय?
ज्याचे त्यानी ठरवावे.
बाहुबली नेते मजबूत संघटन असल्या मुळे च निवडून येतात.
असा अर्थ मी तरी काढला .आहे.
बाहुबली लोकांना जन हिताची काम करायची गरज नसते निवडून येण्यासाठी.

देशातील निवडणूक मजबूत संघटन निर्माण करून जिंकायच्या.
देशातील मोजक्याच लोकांचा आर्थिक फायदा करायचा.
आणि कोणी विरोध केला की मजबूत संघटना आहेत च.
देशातील बहुसंख्य लोक गरिबीत लोटली गेली तरी काळजी करायची नाही.
मजबूत लष्कर सेवेला ठेवायचं.म्हणजे बाकी देश पण गप्प.
Same उत्तर कोरिया ची कॉपी.

sunil kachure's picture

24 Apr 2022 - 11:30 am | sunil kachure

पवार आहेत तो पर्यंत कोणत्याही षडयंत्र चे बळी महविकास आघाडी सरकार होणार नाही.

फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत.केंद्र सरकार ल राष्ट्रपिता राजवट उठवे पर्यंत आपल्याला फसवले जात आहे हे समजलेच नव्हते.

आता पण जे काही चालू आहे त्याचा कोणताच तोटा सरकार ल होणार नाही.
सरकार बरखास्त करावेच आणि राष्ट्रपती राजवट लागावी .
राष्ट्रपती राजवट काही महिनेच लावता येते.
नंतर निवडणूक जाहीर करावी लागेल.
आणि त्या मध्ये bjp सडकून आपटेल.
असा कयास bjp चाणक्य पण नक्कीच आहे.
म्हणून ते राष्ट्रपती राजवट लावत नाहीत.
नाही तर त्यांना काय अशक्य आहे.
पूर्ण बहुमत असलेले सरकार केंद्रात आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

असा मनमानी कारभार करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावली तर तियाचा काय परिणाम होईल हे भाजप जाणून आहे. महाराष्ट्राची ताकद त्यांना माहीतीय. त्यामुळे कुठलंही ओपरेशन वगैरे राबवायचा प्रयत्न त्यांच्या तथाकथात चाणक्याने केला नाहीये. मध्यप्रदेश, कर्नाटक सारखं फोडफोडी, घोडेबाजार महाराष्ट्रात चालनार नाही. कारण नहाराष्ट्रैतील आनदार सहज विकले जात नाहीत, गेले तरी भाजप कडून पुन्हा निवडूण येण्याची शक्यता जवळपास ०.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 1:37 pm | अमरेंद्र बाहुबली

राणा दाम्पत्याला कोठडी. अमरावतीतील लोकांचे प्रश्न सोडवत बसण्याएवजी हे लोक ठाकरेंच्या घरा समोर हनुमान चालिसा म्हणत बसतात. ह्यासाठी ह्या लोकांना अमरावतीकरांनी निवडून दिलंय का?

sunil kachure's picture

24 Apr 2022 - 2:09 pm | sunil kachure

घरचे अन्न देण्यास पण बंदी केली असेल न्यायालय नी तर अवघड आहे
जेल मधील फिक्की डाळ आणि भात ह्या वर च १४ दिवस काढावे लागणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2022 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
हनुमानाचा प्रसाद म्हणून आता पाच दिवस कोठडीत पाहुणचार.

संवैधनिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री महोदय न विरुद्ध जाहीर पण अपशब्द वापरणे ही कोणती संस्कृती.
1) कंगना राणावत नी तेच केले.
२)राणे फॅमिली तेच करत आहे.
३) अर्णव नी पण तेच केले
.
४) आता हे राणा कपल पण तेच करत आहे.
सर्व एकच प्रकार चे वर्तन कसे करत आहेत.
कोणी तरी त्यांना तसे वागा अशी जबरदस्ती करत आहे..

मुख्यमंत्री पदावर असताना मग ते कोणत्या ही पक्षाचे असू ध्या.
असे जाहीर अपशब्द विरोधी पक्षांनी वापरल्याचा महाराष्ट्र च इतिहास आहे का?
बाळासाहेब मैद्याचे पोते बोलायचे पवार साहेबांना.
पण ती एक उपमा झाली अपशब्द नाही.
फडणवीस स्वतः cm होते.
त्यांना कोणी जाहीर पने शिवराल भाषा केली का?
मग ही नवीन च संस्कृती महाराष्ट्रात कशी आली.

sunil kachure's picture

24 Apr 2022 - 4:21 pm | sunil kachure

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://indianexp...

भारत सरकार ची चित्रविचित्र आर्थिक धोरण बघून जपान पण वैतागला.
जपान नीच अनुदान दिलेल्या पैशावर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्याच अभियंत्यांना इन्कम टॅक्स पण भारत सरकार लावत आहे.
जपान नी ह्याला हरकत घेतली आहे.आणि प्रकल्प रखडवण्या चा इशारा दिला आहे.

https://www.sumanasa.com/go/KPXDh6
गूळ , पापड वर पण ५% Gst लावणार केंद्र सरकार.
इंधनावर भरमसाठ वीविथ टॅक्स लावले च आहेत.
जवळ जवळ प्रत्येक वस्तू वर टॅक्स लावला आहे.
इतकी वर्ष बाकी पक्षांची सरकार होती त्यांना कधी गरज पडली नाही.
विकास तर होत नाही.मग ह्या जमा होण्या टॅक्स चे काय करत असतील.
आता फक्त हवे वर टॅक्स लावला की झाले.

मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या वाघ्याचे छावे, आणि सिंहाचे बछडे अशी स्वतःची स्तुती करणारे मोठी बकबक करणरे खोट्या धडाडी चेअसणारे .
तुरुंगात गेले की सर्व विकार नी त्रस्त होतात.
बीपी,sugar, सर्व वाढते.

हा वाघाचा आणि सिंहाचा अपमान आहे.
हे दोन्ही प्राणी कोणत्याही स्थिती मध्ये त्यांचे धाडस,जिवावर उदार होवून प्रतिकार करण्याचे विसरत नाहीत.
नवनीत रणा चे ब्लड pressure वाढले.
तुरुंगात गेल्या बरोबर.

मदनबाण's picture

25 Apr 2022 - 7:24 pm | मदनबाण

आर ठाकरेंच्या मशिदी वरील भोंग्यांच्या बंदीच्या मागणीस माझे पूर्ण समर्थन आहे. अगदी ताजा अनुभव सांगतो... मागच्या आठवड्यात कोल्हापूर-वाडीला जाऊन आलो.
नरसोबाच्या वाडीला [ नृसिंहवाडी ] दत्त मंदीरात देखील समोरच्या औरवाड गावातील बांग रेकण्याचा आवाज येतो... जितके दिवस वाडीत होतो तितके दिवस रोज सकाळी या बांगेच्या आवाजाने माझी झोप मोड होत होती ! समोरच्या गावातुन पल्याड लाऊड स्पिकरचा आवाज येतो म्हणजे आवाजाची पातळी किती असेल याचा विचार करुन पहा.

जाता जाता :- ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिलेला आहे, त्या नंतर आर ठाकरे काय करतात ते पाहणे रोचक ठरणार आहे. धार्मीक ध्वनी प्रदुषणाचा दहशतवाद हा थांबलाच पाहिजे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2022 - 7:43 pm | श्रीगुरुजी

राज ठाकरेंच्या स्क्रिप्टमागील बोलविता धनी वेगळाच आहे. त्यामुळे ३ मे नंतर काहीही होणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2022 - 8:11 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. अश्या कितीगी स्क्रिप्ट लिहील्या तरी तो काही “पुन्हा येणार नाहीये.” :)

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2022 - 9:31 pm | श्रीगुरुजी

आय मीन २०१९ मध्ये यांचा बोलविता धनी जो होता तोच आजही आहे. पाटाचे पाणी जसे वळवितात तसेच शिवसेनेपासून दूर जाणारी मते भाजपकडे जाऊ नयेत यासाठीच हा पाट काढला आहे.