एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 Mar 2022 - 8:42 am

कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो...

2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत...

पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही.

मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न ....

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

वेस्ट इंडीज विरूद्ध न्यूझीलंड... (मॅथ्यूजचे अप्रतिम शतक आणि सोफी डिव्हाइनचा कडवा प्रतिकार, दोन्ही शतके जबरदस्त, पण वेस्ट इंडीजचा निसटता विजय)

साउथ आफ्रिका विरूद्ध बांगलादेश, साउथ आफ्रिकेचा अपेक्षित विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड... रंगतदार मॅच, WBBL मुळे, ऑस्ट्रेलियन महिला अतिशय सहजतेने खेळत आहेत, संघाची उत्तम आखणी... ऑस्ट्रेलियाला रोखणे, अतिशय कठीण आहे...

भारत विरूद्ध पाकिस्तान... अपेक्षे प्रमाणे, मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांनी घाण केलीच, पुजा वस्त्रकार आणि स्नेह राणा, यांनी योग्य रित्या फलंदाजी केली म्हणून जिंकलो... गेल्या दोन वर्षांत स्नेह राणाने चांगले पुनरागमन केले आहे...

बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड... एकतर्फी मॅच... सुझी बेटस् आणि अॅमेलिया केर, यांनी बांगलादेशला सहज पराभूत केले... (वेस्ट इंडीज विरूद्ध देखील, अॅमेलिया केर उत्तम खेळली होती...

पी महेश००७'s picture

11 Mar 2022 - 8:02 pm | पी महेश००७

मिताली राज का संघात आहे तर केवळ प्रतिष्ठेसाठी... तिला हा वर्ल्डकप खेळून निवृत्त व्हायचंं आहे. त्यासाठीच तिला संघात घेतलंय... हे खरंय, की इतर खेळाडूंवर अन्याय झालाय... मिताली राज या दिवशी होणार निवृत्त...

संघ जिंकणे महत्वाचे आहे.

न्यूझीलंड विरूद्धची मॅच हरण्यामागे, हिचा आणि स्मृती मंदानाचा संथ खेळ आणि शेफाली वर्माची अनुपस्थिति, हीच कारणे आहेत...

मितालीच्याच पावलावर पाऊल टाकून, स्मृती मंदाना चालत आहे की काय? असे वाटते ...

सुजित जाधव's picture

25 Mar 2022 - 8:12 pm | सुजित जाधव

मिथाली राज बद्दल माहित नाही पण हरमन प्रीत सिंग ला बाहेर ठेवणे योग्य नाही वाटत..कारण ती एक अनुभवी बॅटर आहे आणि तिच्याकडे मोठे फटके खेळण्याचे कौशल आहे..आणि तिने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध पण करून दाखवले.