आणखी एक किस्सा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
3 Feb 2022 - 8:20 pm

आणखी एक किस्सा

काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी.
व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच.

(आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा)

सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती.

आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती.

मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो.

त्यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यांना विचारलं घरी कुणाला मधुमेह आहे का?

त्यावर ते म्हणाले वडिलांना होता.

होता?

हो, वडील हृदयविकाराने गेले. ५७ व्या वर्षी

मी त्यांना म्हटले कि मधुमेह अनुवांशिक आहे. तुमचे वय ४३ आहे या वयाला तुमचे वजन ६८ किलो हवे, त्या ऐवजी ९८ किलो आहे म्हणजेच ३० किलो जास्त आहे. याचा अर्थ ४५ % जास्त आहे.

एक गोष्ट सांगतोय. तुमच्याकडे ट्रक आहे ज्याची क्षमता १० टन आहे त्यात रोज जर १४.५ टन वजन भरले तर काय होईल? इंजिन वर ताण येईल, सस्पेन्शन खराब होईल आणि टायर लवकर झिजतील.

हीच स्थिती तुमच्या शरीराची आहे. तुमच्या हृदयावर, पाठीच्या कण्यावर ताण पडतो आणि गुढघे लवकर खराब होतात.

येथे ट्रक आणि शरीर यातील साम्य संपते. कारण संध्याकाळी ट्रकची चावी बंद करून तुम्ही इंजिन बंद करू शकता.

परंतू तुम्ही चालत आहात, येथे आडवे पडले आहात, झोपला आहात तरी प्रत्येक क्षणी तुमच्या हृदयावर ४५ % अधिक दबाव पडतो आहे.

त्यात तुमच्या वडिलांना हृदयविकार होता त्यांना मधुमेह आहे याचा अर्थ तुम्हाला जी गुणसूत्रे मिळाली आहेत त्यात तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे.

त्यावर त्यांची पत्नी म्हणाली कि अहो यांचे मोठे भाऊ आहेत त्यांची वयाच्या ४५व्य वर्षी ( दोन वर्षापूर्वीच) अँजियोप्लास्टी झाली आहे.

मी त्यांना स्पष्ट शब्दात म्हणालो कि तुम्ही टाइम बॉम्ब वर बसला आहात. वेळेत यावर उपाय आणि उपचार करा.

मी तुम्हाला भाषण देतो आहे त्यात माझा पाच पैशाचा फायदा नाही. पण हे भाषण हृदयविकार झाल्यावर तुम्हाला देण्यात काय हशील आहे?

हे केवळ एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये २ वर्षे विभाग प्रमुख म्हणून काम करताना ३००० बायपास आणि जवळ जवळ ८००० अँजियोप्लास्टीचे रुग्ण पहिले आहेत त्या अनुभवावरून सांगतो आहे.

पुढच्या पाच वर्षात तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता १० % असेल पण तुम्ही त्या १० टक्क्यात आहात कि उरलेल्या ९० टक्क्यात आहात हे तुमच्या ज्योतिषाला विचारून घ्या.

१२५ किलोची माणसे सिगरेट पितात दारू पितात मधुमेह असतो तरी ९० वर्षापर्यंत जगतात.

एक उदाहरण देतो आहे.-- तुमच्या घरात २ माणसे आहेत आणि घराचा पाण्याचा पाईप १/२ (अर्ध्या) इंचाचा आहे तुम्हाला पाणी पुरतंय.
हेच घरी ४ माणसं आली तर पाणी कमी पडतं.

याउलट तुमच्या घराचा पाण्याचा पाईप मुळात १ इंचाचा असेल तर चार काय सहा माणसाने आली तरी पाणी कमी पडणार नाही.

हीच स्थिती तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची आहे.

तुमच्या रक्तवाहिन्या अनुवांशिकतेमुळे मुळातच अरुंद आहेत त्यामुळे तुमची हृदयविकार येण्याची शक्यता इतर माणसांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यात तुमचं जसं वय वाढेल तशा रक्तवाहिन्या अधिकच कठीण होत जातील आणि हृदयाचा रक्त पुरवठा कमी होईल.

तुम्ही माझ्याकडे आलात ते पोट बिघडलं म्हणून त्यावर तुमचे फॅमिली डॉक्टर औषध देतील च. त्याचा मी सांगतो आहे त्याच्याशी तसा संबंध नाही

पण मी सांगतो आहे ते जास्त गंभीरपणे घ्या म्हणून त्यांना कळकळीने सांगितले.

त्या सद्गृहस्थानी आणि पत्नीने सिन्सिअरली आम्ही आतापर्यंत या गोष्टी हसण्यावारी नेत होतो.

पण आता नक्की गंभीरपणे उपाय आणि उपचार करु आणि लाईफ स्टाईलच बदलू म्हणून सांगितले आणि रजा घेतली

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

4 Feb 2022 - 12:09 am | सौन्दर्य

डॉक्टर साहेब तुम्हाला सॅल्यूट. पेशंटची तक्रार काय आहे हे जाणून घेऊन त्यात मुळापर्यंत जाण्याची तुमची अभ्यासू वृत्ती, तुमचा अनुभव, तसेच रुग्णाला सोप्या शब्दांत वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची तुमची हातोटी आवडली. माझ्या सारखे वाचक तुमच्या ह्या बोधप्रद गोष्टींवरून नक्कीच योग्य ती काळजी घेतील ह्यात शंकाच नाही. असेच लिहिते रहा.

शशिकांत ओक's picture

4 Feb 2022 - 12:12 am | शशिकांत ओक

पण येरे माझ्या मागल्या... म्हणून पालथ्या घड्यावर पाणी व्हायला नको...

निनाद's picture

4 Feb 2022 - 8:15 am | निनाद

सगळे काही करून ६५ ला राम म्हणणे बरे
की अगदी वाट पाहून १०० ला राम म्हणणे बरे?

कासव's picture

4 Feb 2022 - 6:05 pm | कासव

जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही l

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 6:24 pm | सुबोध खरे

५० पण खूप झालं

हा विचार स्वतःसाठी ठीक आहे.

ज्यांचे आईवडील अकाली निवर्तले आहेत त्यांना विचारा.

पंचवीशीच्या आत बाहेर आई किंवा वडील नसणे म्हणजे काय?

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 9:20 am | सुबोध खरे

५० लाच राम म्हणावे लागले तर काय?

Coronary Artery Disease (CAD) occurs at a younger age in Indians with over 50% of Cardiovascular Disease (CVD) mortality occurring in individuals aged less than 50 years.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5072004/

नचिकेत जवखेडकर's picture

7 Feb 2022 - 7:10 am | नचिकेत जवखेडकर

नक्की माहित नाही पण जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांना देखील हाच आजार झाला होता आणि त्यात ते निवर्तले ना? त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या हृदयस्थ या पुस्तकामध्ये उल्लेख आहे असे वाचल्याचे स्मरते.

बदलण्यास असमर्थ असल्या मुळे वजन वाढणे किंवा मधुमेह हे त्याच्या शी संबंधित आजार वाढत आहेत.
तुम्ही सल्ला दिला पण तो मनावर घेणे आणि अमलात आणणे हे खूप कठीण काम असते अनेकांना बिलकुल जमत नाही.
स्वतः डॉक्टर असलेल्या लोकांना सर्व माहीत असते तरी बहुतांश डॉक्टर शरीराने unfit असतात.
वजनदार असतात,अनेक व्याधी नी ग्रस्त असतात.
दारू वाईट,सिगारेट वाईट, जंक फूड वाईट,cold ड्रिंक वाईट हे सर्वांना माहीत असते पण मोह कोणाचाच सुटत नाही.

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 5:41 pm | चौथा कोनाडा

दारू वाईट,सिगारेट वाईट, जंक फूड वाईट,cold ड्रिंक वाईट हे सर्वांना माहीत असते पण मोह कोणाचाच सुटत नाही.

यू नेल्ड् इट !

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 10:20 am | सुबोध खरे

अनेकांना बिलकुल जमत नाही.

मग त्यांनी परिणामाला सामोरे जायची तयारी ठेवायला हवी.

आमचा एक शाळेतील वर्गमित्र भरपूर सिगरेट ओढतो. मध्येच एकदा छातीत दुखायला लागले तेंव्हा मी त्याला सिगरेट सोडायला सांगितले.

त्यावर तो म्हणाला हि सवय माझ्याबरोबरच जाणार.

उत्तम आहे !!!

एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये काम करत असताना पायाला रक्त पुरवठा होत नाही म्हणून एका बोटाला गँगरीन झालेले एक सद्गृहस्थ बोट कापण्याची शल्यक्रिया करण्यापूर्वी माझ्याकडे डॉपलर करायला आलेले होते.

सिगरेट प्यायल्यामुळे त्यांच्या पायाचा रक्त पुरवठा नीट होत नव्हता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले कि सिगरेट सोडून दिली नाही तर हे एकच नव्हे तर अधिक बोटे कापायला लागतील.
Cigarette smoking is one of the most important risk factors for peripheral arterial disease (PAD). Smoking increases the risk of PAD by several fold and is a more influential risk factor for PAD than for coronary artery disease.
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/15580157/#:~:text=Cigarette%20smoking%20....

त्यावर त्यांनी सांगितले कि डॉक्टर, पाय कापावा लागला तरी चालेल मी सिगरेट सोडू शकत नाही.

मी काहीही न बोलता पुढच्या रुग्णाला बोलावले.

कर्मण्ये वाधि कारस्ते मा फलेषु कदाचन !!.

आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती.

डॉक्टर यासाठी कोणती सोनोग्राफी करायची?

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 10:38 am | सुबोध खरे

सध्या रुटीन पोटाच्या सोनोग्राफीत सरळच दिसतं

विजुभाऊ's picture

4 Feb 2022 - 10:29 am | विजुभाऊ

लाईफ स्टाईल बदलणे हे शक्य असते.
निदान आहाराच्या सवयी बदलणे आणि हलका व्यायाम इतके प्रत्येकालाच शक्य आहे.

व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच.
अवेळी आणि तेलकट जेवण नसते पण व्यायाम शून्य आणि बसुन काम आणि आत घरुनच काम असल्यामुळे आधी असलेली थोडीफार हालचाल पण बंद झाली (ऑफिसला येणे, जाणे तिकडे जिने वापरुनच चार-पाच वेळा वर खाली करणे वगैरे) त्यामुळे अपचन मग कमी जेवण असे चालू झाले. पण मागील काही महिन्यांपासून आठवड्यातुन दोन-तीनदा सूर्यनमस्कार आणि शनि, रवि सकाळी चालायला जातो.
वजन गेली १२ वर्षे नियंत्रणात आहे.
पण काळजी घ्यायलाच पाहिजे. तुमच्या लेखातून नेहमीप्रमाणेच ते अधोरेखीत झाले आणि तुमची कळकळ समजून आली.
धन्यवाद.

Nitin Palkar's picture

4 Feb 2022 - 12:18 pm | Nitin Palkar

प्रत्येकालाच अंतर्मुख व्हायला लावणारा किस्सा.
माझ्या एका मित्राचा किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाही... याची साधारणपणे वीस वर्षांपूर्वी कोरोनरी बाय पास सर्जरी झाली. तेव्हा तो पंचेचाळीस वर्षांचा होता. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी दिवसाला सुमारे दहा सिगारेट्स ओढत असे, नियमित माफक (त्याच्या दृष्टीने, एकावेळेस एक क्वार्टर, आठवड्यातून तीन किंवा चार वेळा) मद्यपान. शस्त्रक्रिया झाल्यावर दोन महिने हे दोन्ही संपूर्ण बंद होते. नंतर हे हळूहळू परत सुरु झाले. आम्ही काही मित्र त्याला हटकत असू. तो हसून म्हणत असे, 'आता हे माझे बोनस लाईफ आहे, लेट मी एन्जॉय इट,. गमतीची बाब म्हणजे अजूनही तो लाईफ व्यवस्थित एन्जॉय करतोय. फक्त आता मद्यपान आणि धुम्रपान बऱ्यापैकी कमी आहे.
अर्थात प्रत्येकजण एवढा सुदैवी असेलच असे नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Feb 2022 - 12:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

वर्क फ्रॉम होम करणार्‍या आमच्यासारख्या सगळ्या लोकांना हा प्रॉब्लेम आहेच थोड्याफार फरकाने. मागची ४-५ वर्ष मी जेव्हा ऑफिसला जायचो तेव्हा दिवसात ३-४ वेळा चहा, उशीराच्या मीटींग,रात्री घरी आल्यावर १२/१२.३० ला जेवण, मग झोप नीट न लागणे, पित्त असे त्रास होते, पण वजन आणि पोटावरची चरबी नियंत्रणात होती.

आता घरुन काम करण्यामुळे जेवणाच्या वेळा सुधारल्या ,चहा कमी झाला पण चालणे फिरणे कमी झाले आणि अधेमधे अनावश्यक खाणे, वजन वाढणे,पोटावरची चरबी हे त्रास सुरु झाले.

रच्याकने-- ह्रुदय विकार आणि मधुमेह जर अनुवांशिकच असेल तर टाळता किवा निदान लांबवता येउ शकतो का? आणि कसा? यावर काही उपाय?

sunil kachure's picture

4 Feb 2022 - 12:51 pm | sunil kachure

खरे नी हार्ट attak आणि मधुमेह होण्याचे एकच कारण सांगितले आहे.
हार्ट अटॅक येण्यास किती तरी कारण जबाबदार असतात.
अगदी योग्य वजन,रोज व्यायाम,योग्य आहार घेणाऱ्या लोकांना पण हार्ट attak येतो आणि मधुमेह पण होतो.
आणि सर्व व्यसन करणारे,वजनदार असणारे,,जंक फूड खाणं रे .
ह्यांना attak पण येत नाही आणि मधुमेह पण होत नाही .
माणसाचे आयुष्य कसे असेल,कोणते रोग होतील.
ह्याचा प्रोग्राम अगोदर च लिहला गेलेला असतो .
आणि तसेच घडते.
अशी मत असणारी पण लोक आहेतं

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 6:16 pm | सुबोध खरे

ह्याचा प्रोग्राम अगोदर च लिहला गेलेला असतो .
आणि तसेच घडते.
अशी मत असणारी पण लोक आहेतं

माझ्याकडे असेच एक गृहस्थ रुग्ण म्हणून तपासायला आलेले होते.

ते मला म्हणाले कि डॉक्टर तुम्ही हे सगळं सांगताय त्याला काही अर्थ नाही.

माझ्या नशिबात मृत्यू योग नसेल तर मला काहीही होणार नाही.

मी त्याना म्हणालो कि साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.

पण तुमच्या ज्यातिषाने सांगितलेले आहे कि तुमच्या नशिबात आज मृत्यू योग्य नाही म्हणून हि समोरची रेल्वे लाईन तुम्ही डोळे मिटून पार करणार का?

हा धोका मात्र ज्याचा त्याने घ्यायचा आहे.

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 6:20 pm | सुबोध खरे

प्राक्तनात जे काही आहे ते होणारच आहे.

मग डोक्यावर हेल्मेट कशाला घालायचं? सीट बेल्ट कशाला लावायचे?

ए बी एस, इ बी डी, एअर बॅग असलेली महाग कार कशाला विकत घ्यायची?

फार कशाला जन्माला आल्यापासून पोलिओ ट्रिपल धनुर्वात च्या लसी पासून कोव्हीड ची लस सुद्धा कशाला घ्यायची?

हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे.

sunil kachure's picture

4 Feb 2022 - 9:54 pm | sunil kachure

अपघात नी मृत्यू,विष,आग ह्या मुळे आलेला मृत्यू ह्या विषयी नाही बोलत मी.
आपल्या genome/ DNA मध्ये आपल्या पूर्ण आयुष्याचा लेखा जोखा असतो.
आणि अगदी उंची ,रंग पासून .कोणते रोग होतील ह्याचा पण प्रोग्राम फीट असतो.
असे मला म्हणायचे आहे.
सत्य काय ते मला माहीत नाही.
पण असा प्रोग्राम अगोदर च फीट असतो का ?
असे विचारायचे होते..
कारण .
समान आहार,. समान शारीरिक हालचाल,सामान लाइफ स्टाइल असली तरी दोन व्यक्ती च्या आरोग्यात फरक असतो .
असे ठळक पण दिसते

कंजूस's picture

4 Feb 2022 - 7:03 pm | कंजूस

यावर निरनिराळे कारस,रिपेअरस, वगैरे कार्यक्रम गंमत म्हणून पाहतो तेव्हा त्यात एकेक जाडजुड माणसं आणि चांगलीच धट्टीकट्टी कामं करणारी दिसतात. वजनं सहज १२०+ किलो असावीत. ते काही त्यांच्या आरोग्याबद्दल सांगत नाहीत परंतू एकूण फारच तरतरीत दिसतात. मग विचार येतो की यांचं बरं चाललं आहे. व्यसनं करतात का माहिती नाही.

सुबोध खरे's picture

4 Feb 2022 - 7:26 pm | सुबोध खरे

In Asian Indians, risk of CAD is 3-4 times higher than Americans, 6 times higher than Chinese and 20 times higher than Japanese
हे वर दिलेल्या दुव्यात लिहिलेले आहे.

कर्नलतपस्वी's picture

4 Feb 2022 - 10:40 pm | कर्नलतपस्वी

नियमीत व्यायाम, संतुलित आहार आणि सात तास निद्रा हा सुखी स्वस्थ जीवनाचा मूलमंत्र.
शेवटच्या दिवसापर्यंत गोड तिखट, आंबट खाता यावे या साठी मुलमंत्र जगतोय.
झाले तीन विसावर सात अजूनपर्यंत तरी सर्व व्यवस्थित चालू आहे. महामारीच्या दोन लाटा सुद्धा पार झाल्या. मरणार कसे हे माहीत नाही पण जगायचं कसे हे तर आपण ठरवू शकतो.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2022 - 2:16 pm | मुक्त विहारि

प्रचंड सहमत....

भरपूर चालणे, चौरस आहार आणि वेळच्या वेळी कामे करणे.... साधं सोपं...

प्रसाद गोडबोले's picture

8 Feb 2022 - 9:03 pm | प्रसाद गोडबोले

लेख आवडला !

पण हा लेख थोडा नेति नेति प्रकारातील वाटला .
डॉक्टर तुम्ही "माणसाने १०० वर्षे जगायचे ठरवले असेल तर काय जीवनशैली राखली पाहिजे? " असा लेख लिहा .

माझ्या ओळखीत एक कोल्हटकर आजोबा म्हणुन होते , त्यांना मी लास्ट टाईम भेटलो तेव्हा ते ८४ वर्षाचे होते . स्वतःच्या दोन्ही पायांवर उभे , सुस्पष्ट आवाज , अख्खी भग्वदगीता अजुनही मुखोदगत पाठ अशी तल्लख बुध्दी ! हेवा वाटतो अशा लोकांचा !
पण ते शुध्द शाकाहारी होते , आपल्याच्याने ते जमणार नाही , मटण भाकरी अन बिर्याणी संपुर्णपणे फाट्यावर मारता येणे आपल्याला अशक्य आहे .
त्यांना सुपारीच्या खांडाचे व्यसन नव्हते , बहुतेक ते चहाही प्यायचे नाहीत ! व्यसने सोडणे त्यातहि विशेश करुन ड्रॉट बीयर सिंगल्माल्ट व्हिस्की आणि चहा सोडता येईलही पण मग लाईफ मध्ये मजा नाही राहणार ! (तरी सिगरेट अलमोस्ट संपुर्णपणे बंद केलेली आहे . कोव्हिड लॉकडाऊन मध्ये चहाच्या निमित्ताने बाहेर जाणे बंद पडले अन आपोआप सिगारेट सुटली !)
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते नित्यनेमाने दररोज एक तास पोहायचे ! अगदी ८४ व्या वर्षी सुध्दा ! आपल्याला पोहताच येत नाही ! =))))

तरी देवाच्या कृपेने अन तरुण्यात केलेल्या थोड्याशा व्यायामामुळे आमचे वजन उंचीच्या तुलनेत अजुन आटोक्यात आहे , एकदम परफेक्ट नंबर ६९ ;) पण आता जॉगिंग सायकलिंग वगैर करायला वेळच मिळत नाही :(

असो तर हे असे सगळे कंस्ट्रेंट आहेत , आता तुम्ही बोला की जीवेत शरदः शतम साठी काय लाईफ स्टाईल ठेवावी !

प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2022 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले

मुवी काका , तो लेख २०१६ मधील अहे, तुम्ही जर आज २०२२ मध्ये सेम स्टॅतिस्टिक्स मेन्टेन करुन असाल तर तुम्ही जिंकलेला आहात !!

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 7:14 pm | मुक्त विहारि

अद्याप तरी जीवनशैली अशीच आहे ....