हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली.
"या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता.
आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर.
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं...
दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक
माझ्याकडे पाहू लागतात
यापैकी कुठल्या पोस्टचा
मी टारगेट अॉडिअन्स असेन?
असेनच का?
कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स.
जसं की मी चाललोय भर संध्याकाळी
उपनगरीय स्टेशनातून बाहेर
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
स्टार करून ठेवलेल्या पोस्ट्सवर
पसरलेली ही भन्नाट धुळीची ऊब
माझी कार्यव्यग्रता करते प्रस्थापित
आणि आणते खोकला माझ्या रिकामपणाला
रात्रंरात्र भिंत नक्षत्रांकित
फक्त याच ग्रूपवर
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
नव्या भाषिक फ्लायओव्हरवरून
सारे निघालेले असतात
भाषाही कडेकडेने
आपल्या सावलीची अक्षरं नवलाने बघत
जगणारा मी ही भाषिक
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
खूप सारी फुलं, ओंजळी, प्राजक्त, चांदण्या, छानछान वगैरे
भिंतीवरच असतात
गोंडस शब्दाशब्दातून आल्हाद निथळत असतो
शब्दांनी शब्दातीतापासून
जिवाच्या आकांताने पळताना निथळावा तसा
अर्वाच्य आदराने पाहात राहतो मी
हा रोजचा जगण्यासाठीचा कार्डिओ
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
- कौस्तुभ आजगांवकर
प्रतिक्रिया
31 Jan 2022 - 9:27 am | अनन्त्_यात्री
किंवा त्यातील काही भाग द्यायला हवा होता
31 Jan 2022 - 5:18 pm | चौथा कोनाडा
छान आहे विडंबन ! आवडलं !