तोंड लोकांचे

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
20 Feb 2008 - 6:04 am

प्रसाद यांच्या गुंड लोकांचे या सुंदर कवितेपासून स्फुर्ती घेऊन हा प्रयत्न.

तहानेने सुकत गेले तोंड लोकांचे
भाषणाने फक्त चाले तोंड लोकांचे

चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!

दुथडी भरून वाहे येथली कृष्णा
कोरडेच उरले मराठी तोंड लोकांचे...

दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे
दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे

जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे
मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...

-ऋषिकेश

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...

वा! क्या बात है....

तात्या.

ऋषिकेश's picture

20 Feb 2008 - 7:52 pm | ऋषिकेश

धन्यवाद तात्या. तुम्ही एकटेच खरे आस्वादक आहात ;)

(गिरे तो भी टांग उपर करणारा) ऋषिकेश

सुनील's picture

21 Feb 2008 - 12:24 am | सुनील

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...

छान! सुरेश भटांच्या "निर्धार" ची आठवण झाली -

गीत माझे माझिया हातातली तलवार आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:15 am | प्राजु

ऋषिकेश..
अतिशय सुंदर गझल..

- प्राजु

वरदा's picture

21 Feb 2008 - 7:49 am | वरदा

चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!

जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे
मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे

खूपच सत्यवादी अर्थपूर्ण गझल.....

बेसनलाडू's picture

21 Feb 2008 - 8:00 am | बेसनलाडू

चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!
वा! छान!
वृत्ताभ्यासाने अधिक सफाई येईल, असे वाटते.
शुभेच्छा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू

तात्या विन्चू's picture

21 Feb 2008 - 9:34 am | तात्या विन्चू

दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे
दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे

हेही फार चान्गला जमल आहे.

ऋषिकेश's picture

21 Feb 2008 - 7:30 pm | ऋषिकेश

वृत्ताभ्यासाने अधिक सफाई येईल, असे वाटते

अगदी खरंय.. हळू हळू सराव होईलसे वाटते.. पण काहि खास उपाय आहे का? सर्कीटरावांनी ठेका धरून बघण्याचा उपाय सांगितला होता, पण त्यात एखाद्या मात्रेचा घोळ कधीकधी माझ्याकडून हेल काढून मिटवला जातो ;)
बाकी गंमत म्हणजे इतरांच्या कवितेत एखादी मात्रा हलल्याचं लगेच जाणवतं पण स्वतः लिहिलेल्या ओळींतील भला मोठा घोटाळा दिसत नाहि असे का असावे ? :)

बाकी प्रोत्साहनपर प्रतिसाद देणार्‍या तुम्हा सार्‍यांचे अनेक आभार.

-ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2008 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश ,
गझल मस्त आहे, विषय तर झक्कासच !!!

अवांतर :- वृत्ताभ्यास नक्की करा !!! फक्त त्या नादात आशय हरवू नका म्हणजे झालं !!! :)
( लघु-गुरु मात्रा, वृत्त यावर टिकात्मक लिहिण्याची वेळ जवळ आली आहे, असे वाटू लागलंय )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी's picture

21 Feb 2008 - 9:49 pm | सर्वसाक्षी

विडंबन आवडले, उत्तम.

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 1:32 pm | सुधीर कांदळकर

ही गजल.
प्रगतीचा वारु बाकी जोरात. मजा आली.

दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे
दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे

हे शब्द जास्त आवडले. शुभेच्छा.