ध्रांगध्रा - १३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Jan 2022 - 11:59 am


नक्कीच कोणीतरी इथे वावरतय. स्वच्छता ठेवतय.
..... पण मग पूजा..... फुले काहीच कसं नाही. तसं पूजा करायला इथे देवाची मूर्ती ही नाहिय्ये म्हणा.
त्या अष्टकोनी गाभार्‍याच्या कानाकोपर्‍यातून माझ्या कॅमेर्‍याची नजर फिरतेय. एका कोपर्‍यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.

मागील दुवा ध्रांगध्रा - १२ http://misalpav.com/node/49783
मी कॅमेरा डोळ्यासमोरून बाजुला करतो. त्या बाजूला एक दार दिसतय.पहाणाराला पटकन दिसणार नाही असं भिंतीतल्या नक्षीत चपखलपणे लपवलेलं. त्यामुळेच कदाचित मघाशी दिसलम नाही. ते दार उघडलय. मी दाराजवळ जातो.दरातून पलीकडे खाली उतरणारा जीना दिसतोय. महेश जिन्याच्या पायर्‍या उतरतोय.
त्याच्या मागे जावे की कसे याचा मी विचार करतो. पण अगोदर इथले फोटो काढून घेऊया. खाली तितकासा प्रकाशही दिसत नाही. . इथेच थांबून मी गाभार्‍याच्या भिंतींचे पुन्हा पुन्हा फोटो काढतोय. पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे. भिंतीवरच्या प्रत्येक शिल्पाचा हा दुसर्‍यापेक्षा चेहेरा वेगळा आहे.
महेशकडे मोबाईल आहे म्हणा तो तिथले फोटो काढेलच. इथला प्रकाश कमी होत चाललय.काहीतरी उजेडाची सोय करता येते का ते पहायला मी इकडे तिकडे पहातो. एखादा दिवा , कापड काठी सापडली तरी चालेल.पण दिवा सापडला तरे तो पेटवायचा कशाने हा पुढचा प्रश्न आहेच.
मी बाहेर सभामंडपात येतो.इकडे तिकडे पहातो.पण काहीच दिसत नाही.तिथल्या आठ कोनाड्यातल्या मूर्ती पुन्हा एकदा पहातो. या वेळेस जरा आणखी वेगळ्या कोनातुन फोटो काढतो. छतावरच्या नक्षीत मला काही चेहरे दिसायला लागलेत. डोळे स्पष्टपणे जाणवतात.
हे कोरीव काम खरंच अद्वितीय. यावर एक लेख लिहून छापून आणला तर संशोधक म्हणून जगभरात आपलं नाव होईल या भावनेनं मी सुखावतो. मी बारकाईने न्याहाळायला लागतो.छतावरच्या नक्षीत मघाशी न जाणवलेले अनेक चेहरे आता दिसताहेत..... हे म्हणजे ढगात आपल्याला कधी वाघ हत्ती असे आकार जाणवतात तसे तर नाही! मी आता छताचे फोटो काढायला लागतो.प्रत्येक कोनातून, प्रत्येक कोपर्‍यातून.... आपल्याला होणारे हे भास असतील तर उद्या हे कॅमेर्‍यातले फोटो काँप्यूटरवर घेतल्यावर समजेलच. छतावरच्या नक्षीत दिसणारे ते चेहरे , त्यांचे डोळे माझ्यावरच रोखलेले आहेत. मी क्षणभर दचकतो. मग लक्ष्यात येते . ही परस्पेक्टीव्ह ड्रॉइंग ची च आयडीया. मोनालीसा चित्रासारखी, कुटूनही पहा ती आपल्याकडेच पहातेय असं वाटतं.
इतकी परफेक्ट शिल्पकला!!!!!!! कोणत्याही नव्या मशीननेही इतकं परफेक्ट स्टॉन कटिम्ग जमणार नाही. ज्या काळात ही शिल्पे घडवली गेली अस्तील त्या काळात कारागीरांकडे कुठली आली कटींग मशीन्स. छिन्नी हातोडीने इतके परफेक्ट काम केवळ अशक्य...... स्वप्नात दिसलं म्हणावं तर ते मी इथे प्रत्यक्ष पहात आहे. लाहान मोठ्या अनेक आकारात, मानवी जीवन दगडात चितारलय. खेळताना युद्ध करताना, शेती करताना, नृत्य करताना, नीत बारकाईने पाहिले तर प्रत्येक चेहेरा वेगळा, प्रत्येक चेहेर्‍यावरचे हावभाव निराळे आहेत. रागीट , दु:ख्खी शांत..... अरे हा इथे बसलेला माणूस शून्यात नजर लावून बसलाय. आणि ही बाइ चकणी आहे. हातातला चेंडू भिरकवणारा हा मुलगा... त्याचे घामाने ओले झालेले केस अगदी स्पष्ट जाणवताहेत.......... कमाल आहे आपण फोटो काढतो. त्या काळातला हा फोटोच म्हणायचा. कागदा ऐवजी दगडावर काढलेला.
इतके स्पष्ट भाव, इतकी प्रमाणबद्धता. ते ही ज्याकाळी फारशी प्रगत अवजारे नव्हती त्या काळात!!!!!
इथे येऊन किती वेळ झाला काय माहीत.सभामंडपातला उजेडही कमी होत चाललाय. हा महेश खाली गेलाय . तिथे काय आहे ते पहायचं राहिलय. .... तो तिथेच आहे की अजून खाली जायला पण रस्ता आहे ते माहीत नाही.
मी म्गाभार्‍यात जातो. त्या कोपर्‍यातल्या दारात उभा रहातो. आपणही खाली जाऊया का........तिथे काय असेल ? कोणती शिल्पे असतील...याची उत्सूकता आहेच्पण नको.इथलाच उजेड कमी होत चाललाय. संध्याकाळ व्हायला आली असावी......
"महे.....श म...हेश .." मी तिथूनच आवाज देतो. माझ्या आवाज घुमत कुठेतरी आत जातो. त्या आवाजाने मीच चकित होतो. मायला .... या देवळात आवाज घुमत असेल हे लक्ष्यातच आले नाही.
" म.....हेश" या वेळेस मी मघाच्या इतकी जोरात हाक मारत नाही. तरी पण आवाज घुमतो.
माझ्या हाकेला उत्तर म्हणून की काय.... " किर्र.......र्र किच्च्च्च्च्च" .... हुंं....." असला कसलासा जोरदार हुंकार ऐकायला येतो.पाथोपाठ कोणीतरी पळतय असे पावलांचे आवाज. त्या नंतर पुन्हा " किर्र ...र्र किच्च्च्च्च" माकडाने दात विचकून ओरडावे तसा.
जिन्यावरून कोणीतरी धावत वर येतंय. मी पटकन दारातून बाजूला सरकतो.जिन्यात आता जवळजवळ अंधारलंय. त्यामुळॅ वर येणाराची फक्त आकृती दिसतेय.
महेश.... महेशच आहे हा. तो धावत जिना चढतोय. घाईघाईत.
महेश वर आलाय.मी जिन्याच्या दारात उभा असतो तर मला धडकलाच असता. तो क्षणभर थांबलाय. इकडे तिकडे पहातोय. त्याला मी दिसतो. महेश माझ्या जवळ येतो. पटकन माझा हात पकडतो. ... त्याच्या तोम्डून शब्द फुटत नाहिय्ये. " पळ....." इतकाच काय तो शब्द कसाबसा उच्चारतो. मला ओढतच बाहेर काढतो. कॅमेरा कव्हर बंद करायचीही उसंत देत नाही. महेश धावतोय. मलाही ओढतोय. आम्ही मंदीराच्या सभा ग्रुहातून पायर्‍या चढून वर येतो. सूर्य मावळून काही वेळ झाला असावा . अंधार दाटून आलाय.आम्ही आलो ती वाट शोधायला वेळ लागत नाही. .... आम्ही त्या वाटेवरून गावाच्या दिशेने चाललोय. महेश मला ओढतोय. त्याच्या बरोबर धावताना मी अक्षरशः फरफटतोय काही वेळा. तो जिवाच्या आकांताने धावल्यासारखा धावतोय.
वाटेवरची गर्दी आत्ता नाहिय्ये. पण जे काही लोक रस्त्यावर आहेत ते आम्हाला वाट करून देताहेत. मधे मधे अडथळे नाहीत म्हणून आम्ही पण सुसाट धावतोय.
मी मधेच कधितरी थोडे मागे वळून पहायचा प्रयत्न करतो.काहीतरी कुत्र्यासारखं येताना दिसतंय. तेवढ्यात महेशच्या हाताचा हिसडा बसतो " पळ ... लवकर पळ "
महेश मला ओढतो. माझा तोला जाता जाता रहातो.कसाबसा सावरत मी धावायला लागतो.
गावातली घरं आता मागे पडलीत. अंधार त्यामुळे अधीकच गडद वाटतोय. आकाशात चंद्र... त्याचाच काय तो उजेड.
आता आम्ही गावाबाहेरच्या खंदका जवळ आलोय. वाट खंदकाच्या पायर्‍यांपर्यंत पोहोचते.महेशने पायर्‍या उतरायला सुरवातपण केलीये. मी कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे कोंबतो.झीप लावतो. आणि महेशच्या पाठोपाठ खंदकाच्या पाण्यात पाऊल टाकतो

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

16 Jan 2022 - 2:43 pm | श्रीगणेशा

वाचत आहे.
पुढील भागात उलगडा होईल सर्व असं वाटतंय.

चौथा कोनाडा's picture

16 Jan 2022 - 5:58 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त आहे !
खिळ्वून ठेवलंय विजुभाऊ.

उत्सुकता वाढत चाललीय !
|| पु भा प्र ||

शित्रेउमेश's picture

17 Jan 2022 - 10:01 am | शित्रेउमेश

बापरे......

विजुभाऊ's picture

18 Jan 2022 - 8:28 pm | विजुभाऊ

पुढील दुवा ध्रांगध्रा - १४ http://misalpav.com/node/49793

सुखी's picture

31 Jan 2022 - 2:15 pm | सुखी

वेगवान झालाय हा भाग